गुरुवार, १४ मे, २०१५

आणि लग्न झाले …..

आणि लग्न झाले ….. 


घे भरारी ह्या लेखातील समिधा आणि तिची आई एक मोठे प्रश्न चिन्ह घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. समिधाने लग्न करावे अशी आईची इच्छा पण समिधाची तशी अजिबात इच्छा नव्हती. 
कुंडली मांडल्या मांडल्या पत्रिकेत सध्या अजिबात लग्नाचे योग नाहीत असे स्पष्ट सांगितल्यानंतर आईंचा हिरमोड झाला. समिधाच्या पत्रिकेत व्यवसाय करण्याचे जबरदस्त योग दिसत होते. आयुष्यात तू नोकरी नाही तर व्यवसायच करशील असे सांगितल्यावर समिधाची कळी खुलली होती. 
आणि झालेही त्याप्रमाणेच, २०१० ते २०१४ हा समिधाच्या व्यवसायासाठी खूप उत्कृष्ट काळ ठरला. चार वर्षात व्यवसायाचा विस्तार बऱ्यापैकी फोफावला आहे. २०१५ पासून नवीन प्रोजेक्ट्स सुरु करायचे आहेत. ह्या सर्व काळात तिच्या आईला नेहेमीच तिच्या लग्नाचीच काळजी होती आणि समिधाकडे मात्र नवनवीन व्यवसायाच्या कल्पना तयार असायच्या.
 तर सांगायचा मुद्दा हा की ह्या समिधाचे लग्न झाले ११मे २०१५ रोजी. २०१० पासून मी तिला नेहेमी हेच सांगत आले व्यवसायात पुढे जा…लग्न २०१५ च्या आधी होत नाही. जून २०१४ ला जेंव्हा ती नवीन व्यवसायाबद्दल विचारायला आली तेंव्हा निघताना शेवटचा तीच एक प्रश्न होता "मैडम तुम्ही नेहेमी माझे लग्नाचे योग २०१५ ला आहेत म्हणून सांगता परंतु नक्की कधी हे जाणून घ्यायचे होते". 
मी म्हणाले,"पत्रिकेतील दशा- अंतर्दशा,गोचर ह्यावरून तरी मे २०१५ ला तुझे लग्न दिसतेय". "ओके मैडम " असे म्हणून समिधा निघाली. त्यांनतर तिचा २०१५ च्या एप्रिल मध्ये फोन आला," माझं लग्नं ठरलयं.  मैडम, आजच साखरपुडा झाला. मे महिन्यची ११ तारीख लग्नासाठी मुहुर्ताची तारीख ठरतेय. तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण द्यायला घरी येईनच ". 
तिला अभिनंदन केले आणि पुनश्च के.स. कृष्णमूर्तींचे आभार मानले. आज पुन्हा एकदा ज्योतिषशास्त्रामुळे एका व्यक्तीला आयुष्याची चार वर्ष मिळाली. कारण समिधाचे लग्नाचे वय झालेय म्हणून तिच्या आईने लग्नासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले असते. आणि लग्नासाठी प्रयत्न करतोय म्हणून व्यवसायही सुरु करू दिला नसता. परंतु योग नसल्यामुळे लग्न २०१५ झाले असते. २०१५ लाच लग्नाचे योग आहेत हे आधीच कळल्यामुळे ह्या चार वर्षात समिधाच्या व्यवसायाने नुसती सुरवातच नाही केली तर व्यवसायाने उंचीही गाठली. राशी आणि त्यांचे स्वभावराशी आणि त्यांचे स्वभाव 


हा नवीन प्रयोग सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. 

READERS ALL OVER THE WORLD