प्रश्नकुंडली/शासक-ग्रह अर्थात Ruling Planets (कृष्णमुर्ती पद्धती)
"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गु ण-मिलन,नवमांश" ह्या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु "प्रश्नकुंडली" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द. त्याबद्दलच आज मी लिहिणार आहे. जन्मकुंडली बनवताना जर ज्योतिषाला अचूक जन्म वेळ दिली गेली नाही तर सांगितले गेलेले भविष्य हे चुकू शकते. पण काही वेळेस तुमच्याकडे तुमच्या जन्माचा पूर्ण तपशील नसतो. म्हणजे काही वेळेस जन्म तारीख माहिती आहे पण जन्म वेळ नाही. काहींनी तर मला खुपदा "जन्म ६.०० ते ७.०० च्या दरम्यान आहे पण madam सकाळी की संध्याकाळी माहिती नाही", काहीना जन्मवार अगदी पाठ पण जन्म तारीख माहित नाही???
असे जरी असले तरी आयुष्यातील प्रश्न तर प्रत्येकालाच भेडसावतात. मग अशावेळी करायचे का? hmmmmm......आहे... शास्त्रात ह्याला सुद्धा पर्याय आहे तो म्हणजे "प्रश्नकुंडली".
प्रश्नकुंडली म्हणजे ज्यावेळेस जातक ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्या वेळेची ग्रहांची आकाशातील स्थिती कागदावर मांडणे. ही कुंडली ९९%वेळेस ज्योतिषाला जन्मकुंडलीपेक्षा ही अचूक उत्तरं देऊ शकते. काही वेळेला काही प्रश्नांची उत्तरे ही जन्मकुंडली वरून check करू शकत नाही. अशावेळेस प्रश्नकुंडलीचा वापर आपण करू शकतो. ह्यासाठी उदाहरण दिले तर तुमच्या लवकर लक्षात येईल.
नवीन घरी आम्ही नुकतेच shift झालो होतो आणि सोसायटीमध्यॆ जरा ओळख झाली होती. ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजता मला आमच्या सोसायटीतल्या सौ. जोशींनी फोन केला. "अग अनुप्रिया, माझं महत्वाचे काम आहे तुझ्याकडे.जरा urgent आहे आत्ता लगेच येऊ का ग?" झाले असे होते की सौ. जोशीना नुकतीच मुलगी झाली होती त्यामुळे घरी मोलकरीणीचा ताफा राबत होता. एका दुपारी सौ जोशीना लक्षात आले कि आपले मंगळसूत्र नेहेमीच्या जागेवर नाही. तेंव्हा सर्वत्र शोधले गेले,संध्याकाळ उजाडली परंतु मंगळसूत्र काही मिळाले नाही. आत्तामात्र परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात ४-५ नोकर..आत्ता संशय घ्यावा तरी कोणावर? कोणावर संशय घ्यावा आणि कोणी दुखावले गेले तर एखादी मोलकरीण गमवावी लागेल..मुंबईत नोकर मिळणे सोप्पे आहे पण ते टिकवणे महाकठीण. त्यांनी झाला प्रकार श्री.जोशींना सांगितल्यानंतर सौ जोशीना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल काय काय ऐकावे लागले असेल ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. श्री.जोशींनी सर्वप्रथम पोलिसांत रिपोर्ट करण्याचे ठरवले व त्यांनी सोसायटी समोरच्या पोलिस-स्टेशनात तक्रार नोंदवली सुद्धा....पोलिसांनी त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तपासाला सुरवात केली व दुसरया दिवशी सकाळी सकाळीच घरातील सर्व नोकरमंडळीना पोलिस-स्टेशनात हजर राहण्यास सांगितले. तेंव्हा घाबरून सौ. जोशीना माझी आठवण झाली. सर्व नोकर-मंडळी आणि श्री.जोशी पोलिस-स्टेशनात तर सौ.जोशी माझ्याकडे.....
माझ्याकडे सर्व कथाकथन झाल्यानंतर मी त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडली.
१) कन्या लग्नाची कुंडली
२) चंद्र होता तूळ राशीत म्हणजेच धन स्थानात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने प्रश्न जर मनापासून विचारला गेला असेल तर चंद्र त्या संबंधातील स्थान कुंडलीत दशवतो. आणि इथे चंद्र होता "धन स्थानात" म्हणजे किती मनापासून प्रश्न विचारला गेला आहे.
३) चंद्राची "कर्क" राशी होती "लाभ" स्थानात. "लाभ","धन" ह्यावरून काही कळले का?? hmmmm म्हणजेच अपेक्षित "धनाचा लाभ" नक्की होणार. पण पुढचा प्रश्न कधी? सौ.जोशीना त्यांचे मंगळसूत्र मिळणार तरी कधी ?
४) ह्यासाठी "शासक ग्रहांची" मी मदत घेतली. "शासक ग्रह" हा शब्द जोतिष-शास्त्रवर अभ्यास असलेल्यांसाठी नवीन नाही परंतु ज्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग नवीन आहे त्यांनी एवढेच समजून घ्यावे ते म्हणजे "शासक ग्रह" हे प्रश्न विचारलेल्या वेळेचे महत्वाचे ग्रह.
५) सौ जोशींनी जेंव्हा प्रश्न विचारला होता तेंव्हा शासक ग्रह होते : i) बुध ii) राहू iii) शुक्र iv) गुरु हे सर्व ग्रह fast moving किंवा ज्याला आपण जलदगती असणारे ग्रह म्हणतो.
६) Fast Moving ग्रह आहेत ह्याचाच अर्थ धन लाभ होणार आहे आणि तो ही लवकरच.
मग काही गणिते मांडून मी उत्तर सांगितले : तुम्हाला मंगळसूत्र मिळेल. सौ.जोशींचा पुढचा(अपेक्षित) प्रश्न : कधी मिळेल ? उत्तर : आज आहे गुरुवार. आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत मिळायला हवे. प्रश्न : घरीच मिळेल ना? उत्तर : हो घरीच मिळेल.
जोशी काकू निघणार एवढ्यात त्यांना श्री. जोशींचा फोन आला ...त्यांना ताबडतोब पोलिस-स्टेशनात बोलावले होते. मलाही धागधुग होतीच की काय होतेय? संध्याकाळी सौ.जोशींचा फोन..."अनुप्रिया मंगळसूत्र मिळाले. हुश्श...अग आमच्या सुगंधानेच (मोलकरीण) नेले होते. सकाळी मी किचनमध्ये असताना लादी पुसण्यासाठी ती बेडरुममध्ये गेली होती आणि तिथे टेबलवर ठेवलेले मंगळसूत्र तिने नेले. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिने काबुल केले. व मंगळसूत्र घरी आणून दिले. Thanks a Lot "
शास्त्राची प्रचिती पुन्हा एकदा आली.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com