ज्योतिषाचे भविष्य
प्रसंग एक - संध्याकाळची अनुजला भेटण्याची वेळ ठरली होती ४.३० ची. त्यानंतर शिल्पासाठी ५.३० ते ६.३० ची वेळ आणि त्यापुढे अजून कोणीतरी. पावणे पाच वाजले…पाच आणि सव्वा पाचला मी अनुजला फोन लावला पण त्याचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे असा मला मेसेज येत होता. अपघात वगैरे चे योग तर नव्हते कुंडलीत त्यामुळे मला ती शंका नव्हती. साडे पाचच्या ठोक्याला शिल्पा हजर झाली. तिच्या बरोबर कुंडलीचे discussion झाले. appointments संपता संपता रात्रीचे नऊ वाजले तरी त्याचा फोन नाही. म्हटलं जाऊ दे बघू … दुसऱ्या दिवशी ११.०० ला त्याचा फोन आला,"मैडम आज येऊ का मी ४.३० ला ??" काल येऊ शकलो नाही त्याबद्दल sorry तर नाहीच नाही त्याबद्दल चक्कार शब्द नाही. मीच विचारले,"काय रे काल का नाही आलास ? आणि फोन नाही काही नाही ?? मी फोन केला तर लागला नाही ?? काय झाले ?". "तसे नाही हो मैडम काल मी सिनेमाला गेलो होतो. मित्रांबरोबर अचानक प्रोग्राम ठरला. म्हटले उद्या करुया फोन आणि भेटू". मी म्हटले," अरे हो ठीक आहे पण ती वेळ मी दुसऱ्या कोणालातरी दिली असता ना ??". अनुज,"नाही माझ्या लक्षातच आले नाही". आता काय बोलणार ह्या बेजबाबदारपणाला ??
प्रसंग दोन - बाजारात एकदा मी भाजी घेत असतना एक बाई," अगं तू xxx ची सून नां ? तूच कुंडली वगैरे पाहतेस ना ? तुझा पत्ता दे मी येईन सवडीने मला वेळ असेल तेंव्हा". मी,"हो काकू मीच कुंडली पाहते. माझा नंबर देते तुम्हाला तुम्ही फोन करून या". "अगं मला फोन लावायला वगैरे जमत नाही. (काकुंचे शिक्षण यथातथाच) तू मला संग कुठे येउन भेटायचे मी येईन." इति काकू. आता ह्यांना appointment वगैरे काय समजावणार?? तरी प्रयत्न केला," काकू अहो मी नक्की भेटेनच असे नाही. कारण लोक appointments आधीच book करून ठेवतात आणि मग ठरल्येल्या वेळेला भेटायला येतात मग ती वेळ दुसरया कोणालाही दिली जात नाही मग व्यवस्थित बोलता येतं आणि घाई होत नाही. आणि तसे ही मी वास्तू - परीक्षणासाठी गेले असेन तर तुमची फेरी वाया जाईल." काकुंच्या चेहेरयावरचे मोठे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होते." अच्छा असे असते काय ? मला वाटले कधीही येउन तुला भेटू शकेन??"
प्रसंग तीन - संध्याकाळची ७.३० ची वेळ मी गार्गीला(नावाजल्येल्या कंपनीत मोठ्या पोस्टवर) दिली होती. बरोबर त्यावेळेला ती हजर झाली. career आणि लग्न ह्या विषयावर चर्चा (प्रश्न -सत्र ) सुरु झाली. गार्गी खूप महत्वाकांक्षी त्यामुळे career बाबतीत तिच्याकडे प्रचंड प्रश्नांचे भंडार होते. सध्याचा जॉबमध्ये promotion कधी मिळेल ?? दुसरा चांगला जॉब कधी मिळेल ? तो खूप लांब असेल कि घराजवळ ? नवीन जॉब मध्ये पण हाच job- profile असेल का ? कि वेगळा असेल ? abroad जाण्याचे काही chances आहेत का ? कधी ? कुठल्या देशात जाऊ शकेन ? किती काळ असेन मी तिथे ??
career बरोबरच तिचे लग्नाचे भरमसाठ प्रश्न होते. लग्न कधी होईल ?? साथीदार कसा असेल ? कुठल्या शहरातून स्थळ येईल ? मुलगा किती शिकलेला असेल ?? job करणारा असेल कि व्यवसाय ? घराची परिस्थिती कशी असेल ? तो ही भविष्यात abroad ला काम करू शकेल का ? (इथपर्यंत ठीक होते तिचा पुढचा प्रश्न ऐकून ब्रम्हदेवही बुचकळ्यात पडला असता.) मला नणंद असेल का ?? जमेल का माझे तिच्याशी ?? सासू कशी असेल ??? प्रश्न उत्तरे चालूच होती. रात्रीचे साडे- दहा वाजले. मैडम निघाल्या. म्हटलं," जेवून जातेस का? भूक लागली असेल तुला ?" "नाही नको… तुमची फी किती झाली ?" मी म्हटले,"xxx". त्यावर गार्गी,"मैडम माझ्याकडे सध्या एवढेच आहेत आणि मला ह्या वेळेला रिक्षेनेच जावं लागेल. तुम्हाला नंतर आणून दिले तर चालतील का ?? नाही तर उद्याच मी बँकेतून पैसे transfer करते. महटले,"अगं ठीक आहे तू घरी पोहोचणे महत्वाचे. पैसे नंतर दे सावकाश." मैडम ज्या गेल्या त्यानंतर आल्याच नाहीत. ह्या गोष्टीलाही तीन वर्ष झाली. फेसबुकवर असतात मैडम. नवनवीन फोटो update करतात. कधी ह्या हॉटेलात बसून चहा पितांना कधी कॅफे-कॉफी डे मध्ये कॉफी पितांना. एकदा आठवण केली तर म्हणे सध्या वेळच मिळत नाहीये तुमच्याकडे यायला. मी म्हटलं अगं transfer कर ना मग??? त्यावर मैडमचे उत्तर,"माझ्याकडे पैसे नाहीयेत सध्या". मनात म्हटले हे बरे आहे. इतका वेळ घ्यायचा एखाद्याचा, आणि मग अशी वागणूक ??? (महिनाभर काम करून घेतल्यानंतर तुम्हाला Boss ने पगारासाठी पैसे नाहीत असे सांगितले तर कसे वाटेल मैडम?)
प्रसंग चार - (हा प्रश्न तर मला नेहेमी विचारला जातो) हितेशचे त्याच्या कुंडलीचे संपूर्ण विवेचन झाले. निघता निघता त्याचा प्रश्न मैडम मग तुम्ही कुठे Job करता ?? मी म्हटले," अरे हजारच्या वरती माझे Clients आहेत. रोज १५ ते २० फोन येत असतात त्यांचे प्रश्न- कुंडलीवरून उत्तरे आणि वास्तू ह्यात संपूर्ण दिवस जातो. मला वेळच नाहीये Job करायला."
आणि असाच एक प्रश्न ओळखीतल्या व्यक्तीने विचारला होता," अगं कॉम्पुटरवर एखाद्या व्यक्तीचे आपोआप भविष्य येतेच ना तेच तू वाचून दाखवतेस ?? बरे आहे तुझे Profession." मी," काका तुम्ही घ्याना कॉम्पुटर. नाही तरी सध्या Retire झाला आहात. तुम्हीही सुरु करा हा BUSINESS. काय ??" माझा खोचकपणा काकांना समजला.
प्रसंग पाच - एकदा ट्रेन मध्यॆ सतीश भेटला. हाय हेल्लो झाल्यावर त्याचे प्रश्न सुरु झाले. "मैडम आता मला गुरु आठवा येतोय ना ?" माझा प्रश्नार्थक चेहरा बघून सतीशने त्याच्या ज्ञानाचा (अर्धवट ) पेटारा उघडला. "अहो असं काय करताय माझी कर्क रास नाही का ?? साडेसाती सुरु आहे मला ? मला नवीन जॉब शोधायचा आहे. काय करू ?सध्या योग आहेत का माझ्या पत्रिकेत ?" आता मी काय बोलणार ह्यावर ह्याची पत्रिका मला पाठ असल्याप्रमाणे तो बोलत होता. मी म्हटले,"अरे तू मला नंतर फोन कर सध्या मला नही आठवत तुझी पत्रिका." त्यावर सतीश," अहो विसरलात ?? लक्षात राहायला हवी तुम्हाला माझी कुंडली ??" आता ह्याला काय सांगायचे रोज १५ - २० फोन येतात कुंडली बघण्यासाठी. प्रत्यक्ष ६-७ जण रोज भेटायला येतात म्हणजे averagely रोज २२ कुंडल्या नजरेखालून जातात आता ह्यात ह्याची कुंडली कुठली बाबा ??? तरी काही न म्हणता त्याला म्हटले," नाही रे लक्षात राहत. तू फोन कर"
प्रसंग पाच - एकदा ट्रेन मध्यॆ सतीश भेटला. हाय हेल्लो झाल्यावर त्याचे प्रश्न सुरु झाले. "मैडम आता मला गुरु आठवा येतोय ना ?" माझा प्रश्नार्थक चेहरा बघून सतीशने त्याच्या ज्ञानाचा (अर्धवट ) पेटारा उघडला. "अहो असं काय करताय माझी कर्क रास नाही का ?? साडेसाती सुरु आहे मला ? मला नवीन जॉब शोधायचा आहे. काय करू ?सध्या योग आहेत का माझ्या पत्रिकेत ?" आता मी काय बोलणार ह्यावर ह्याची पत्रिका मला पाठ असल्याप्रमाणे तो बोलत होता. मी म्हटले,"अरे तू मला नंतर फोन कर सध्या मला नही आठवत तुझी पत्रिका." त्यावर सतीश," अहो विसरलात ?? लक्षात राहायला हवी तुम्हाला माझी कुंडली ??" आता ह्याला काय सांगायचे रोज १५ - २० फोन येतात कुंडली बघण्यासाठी. प्रत्यक्ष ६-७ जण रोज भेटायला येतात म्हणजे averagely रोज २२ कुंडल्या नजरेखालून जातात आता ह्यात ह्याची कुंडली कुठली बाबा ??? तरी काही न म्हणता त्याला म्हटले," नाही रे लक्षात राहत. तू फोन कर"
ह्या आणि अशा अनेक अनुभवानंतर मला लोकांची चीड येण्यापेक्षा कीव येते. कारण समाज अजुनही बुरसटल्येल्या विचारांचाच आहे. आधी जसे गुरुजी देवळात पूजा आटोपली कि कुंडली वाचनाला बसायचे. मग एकेका श्रद्धाळूंची कुंडली पाहत त्यांचे प्रश्न सोडवायचे. प्रश्न म्हणजे काय तर फार फार तर मुलाचे किंवा मुलीचे लग्न कधी होईल ? मंगळ आहे का ? कालसर्प दोष आहे का ? एवढेच प्रश्न. मग गुरुजी कुठली तरी शांती सांगायचे आणि मंडळी निघायची, निघताना गुरूजीना ११/- नाही तर काही फळ अथवा धान्य ठेवले जायचे. बस्स एवढेच communication. मी इथे ज्योतिषांना दोष देत नाहीये पण त्यावेळी प्रश्नच मर्यादित होते. जसा जसा समाज प्रगत होतोय प्रश्न वाढत चालयेत ( हास्यास्पद असले तरी हे सत्य आहे)
पूर्वी ज्योतिषविद्या ही परंपरागत पद्धतीने मिळायची. सध्या गल्लोगल्ली ज्योतिषशास्त्राचे क्लासेस आहेत. ज्यांना आवड आहे ते हे शास्त्र शिकू शकतात. पण आवड म्हणून शिकणे आणि सखोल अभ्यास करून भविष्य वर्तवणे ह्यात फरक आहे.
परंतु समाज अजूनही ह्याच गैरसमजुतीत आहे ज्यात पूर्वीच्या ज्योतिषाची त्यांच्या मनातील Image तशीच राहिली आहे. ज्योतिष-शास्त्राला महाराष्ट्रात अंधश्रद्धा मानून ह्या शास्त्राला आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही विद्यापीठात शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली नाही. महाराष्ट्राबाहेरून तुम्ही ह्या विषयात Ph.D करू शकता. आहे ना आश्चर्य ???
सध्या मला भरपूर E - Mails येत आहेत. कुंडलीबद्दल विचारले जाते. त्यांच्यासाठी सुद्धा खालील माहिती :
१) ज्योतिषाचे ज्ञान घेण्यास फार वेळ लागत नाही पण अचूक भविष्य सांगणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. अनुभवावरूनच अचूक भविष्य सांगता येते. त्याला सतत वाचन मनन चिंतन ह्याची गरज असते. (त्यामुळे त्या ज्ञानाचा आणि ज्योतिषाच्या वेळेचा मान ठेवून फुकटात भविष्य ऐकायला मिळेल ह्या भ्रमात राहू नका )
२) नुसते राशीवरून लोकांचे वर्णन करणे सोप्पे आहे त्यांच्या आयुष्यात घडणारया घटना कधी घडतील हे अचूक सांगता येणे म्हणजे खरे ज्योतिष.
३) सध्या ज्योतिषांकडे जाण्याआधी त्यांची रीतसर appointment घ्यावी. तुम्ही busy आहात तसेच astrologer ही busy असतात ह्याचे स्मरण ठेवा.
४) ठरलेल्या वेळी तुम्हाला जाता येणार नसेल तर फोन करून ज्योतिषाला तसे सांगा तुम्हला देलेली वेळ दुसऱ्या गरजवंताला देता येईल.
५) ज्योतिषाकडे सगळे प्रोब्लेम्स घेऊन येणाऱ्यांचा भरणा जास्त असतो त्यामुळे अमुक एका माणसाची appointment cancel करून ती वेळ मला द्या हे सांगणे उचित नाही.
६)रस्त्यात कोणी ज्योतिषी भेटले तर स्वतःच्या कुंडलीबद्दल चौकशी करू नका. ज्योतिषांना रोज कित्येक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो … प्रत्येक कुंडली लक्षात राहतेच असे नाही.
६)रस्त्यात कोणी ज्योतिषी भेटले तर स्वतःच्या कुंडलीबद्दल चौकशी करू नका. ज्योतिषांना रोज कित्येक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो … प्रत्येक कुंडली लक्षात राहतेच असे नाही.
७) तुम्हाला सांगितले गेलेले भविष्य अचूक ठरले किंवा नाही हे त्या ज्योतिषाला नक्की कळवा. काही अभ्यासू ज्योतिषी स्वतःचे Research करतात त्यामुळे ते त्यांना कळवणे जरुरी आहे.
त्यामुळे please वाचकहो ज्योतिषीकडे आणि त्याच्या professionकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com