मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 



एका जातकसखीने तिला वास्तूशास्त्राचा आलेला अनुभव आजच मला पाठवलाय. अनुभव तिच्याच भाषेत प्रसिद्ध करतेय - 

माझ्या नवऱ्याचे म्हणजेच महेशचे किराणा मालाचे दुकान होते. परंतु नंतर ते दुकान आणि वडिलोपार्जित मालमत्ता विकून आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झालो. सर्व व्यवस्थित चालले होते,सगळीकडे सुखच सुख होते. त्यानंतर महेशने "Construction" व्यवसायात उडी घेतली.एका बिल्डिंगच्या  बांधकामातून भरपूर फायदा झाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. परंतु तो आत्मविश्वासाचा अतिरेक ठरला कारण त्यांनी सगळीच्या सगळी Savings मुंबईतल्या एका जागेमध्ये बांधकामासाठी गुंतवली. त्यांच्या म्हणण्यानुसार एका वर्षातच ती गुंतवणूक नफ्यासहित परत मिळेल. आणि त्यांचे हे म्हणणे मलाही चुकीचे वाटले नाही. पण दुर्दैवाने त्याच वेळेस आमच्या नशिबाचे फासे उलटे पडायला सुरवात झाली. २००८ साली मंदी आली आणि त्यात आम्ही पूर्णपणे धुतले गेलो. आमच्या गुंतवणुकीची किंमत पावपट देखील उरली नाही. सगळीकडून संकटांचा मारा सुरु झाला. आमचे सगळे सुरळीत सुरु असतांना महेशने ४-५ जणांना मदत केली होती. कोणाला ५  लाख,कोणालातर १३ लाख -१५ लाख. पण आमची खायची भ्रांत असताना सुद्धा ह्यापैकी कोणालाही आमचे पैसे द्यावेसे वाटले नाहीत आणि कोणी दिलेही नाहीत. 

आम्ही मग छोटेखानी खानावळ सुरु केली. घरगुती जेवण मिळते म्हणून खानावळीस लवकरच प्रसिद्धी मिळू लागली. दुर्दैव पाठ सोडत नाही हेच खरे. काही गोष्टी अशा घडल्या कि ज्यामुळे खानावळ एका वर्षातच बंद करावी लागली. असे एक ना दोन बरेच व्यवसाय ह्यांनी करून पाहिले पण त्यात यशच मिळत नव्हते. मेहनत करूनही पदरात निराशाच पडत होती

काही जणांनी आमचे घर दक्षिणमुखी आहे त्यामुळे नुकसान होतेय असे सांगितले. आम्ही घर विकाण्याचा निर्णय घेतला. ह्या कालावधीतच मला अनुप्रियाचे वास्तू आणि ज्योतिष ह्या विषयावरचे विविध लेख इंटरनेटवर वाचायला मिळाले. त्यांची रीतसर appointment घेतली. आम्ही त्यांच्याबरोबर पत्रिकेबद्दल सविस्तर चर्चा केली. घर कुठे असेल ? जागा कशी असावी ? कोणता व्यवसाय चालेल ? कोणाच्या नावाने व्यवसाय चालवावा ? व्यवसाय कुठल्या Location मध्ये चालेल ? म्हणजे मुंबई की नवी मुंबई ? ठाणे ? ह्या सगळ्याप्रश्नांसाठी अनुप्रियाकडून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. त्यांनतरही आमची दोन ते तीन वेळेस गाठभेट झाली आणि त्यांनी अगदी आपलेपणाने प्रत्येकवेळेस मार्गदर्शन आणि सल्ला दिला. आता त्यांचावरचा विश्वास वाढला होता.   

मग नवीन जागेसाठी आमचा शोध सुरु झाला. आम्ही आमच्या बजेटमध्ये बसणारी भरपूर घरे पाहिली आणि अनुप्रियालाही दाखवली परंतु वास्तूशास्त्राप्रमाणे घर मिळत नसल्याने त्या पसंती देत नव्हत्या. त्यानंतर एका घरासाठी त्यांनी लगेच होकार दिला. आतापर्यंत पाहिलेल्या वास्तुपैकी ही वास्तू शास्त्राप्रमाणे चांगली असली तरी आर्थिक परिस्थितीच्या प्रगतीसाठी काही उपाय करावे लागतील असे त्यांचे मत होते. २-३ भेटीत आमचा त्यांच्यावर खूप विश्वास बसला होता त्यामुळे त्या सांगतील ते सर्व उपाय करायला आम्ही तयार झालो. म्हटले सर्व गेलेच आहे आता हे तरी वाचते का ते पाहावे. 

आणि आम्ही ते घर घेतले. अनुप्रियाने एका मुहूर्तावर संपूर्ण घरात वेगवेगळी रत्ने  प्रत्येक दिशेप्रमाणे त्या त्या दिशेत प्रस्थापित केली. ३ ते ४ महिन्यांत नशिबाचे फासे अनुकूल पडायला लागले. अनुप्रियाने आम्हाला जे जे भविष्य वर्तविले होते ते ते त्या प्रमाणेच तेंव्हा घडत गेले. अगदी उदाहरणच सांगायचे झाले तर - अमुक महिन्यात तुम्हाला जमिनीसंदर्भात पैसे येतील, हा व्यवसाय तुम्हाला नफा मिळवून देईल आणि तसेच झाले. आमचे छोट्या छोट्या स्वरूपाचे व्यवसाय सुरु झाले,मनाला उभारी येऊ लागली. आता आमचा अडकलेला प्रोजेक्टही हळूहळू सुरु होण्याच्या मार्गावर आहे. जिथे जिथे आमचे पैसे अडकलेले तिथून पैशांचे येणे सुरु झाले आहे. आमचा नवीन व्यवसायही अपेक्षेपेक्षा जास्त चांगला चालू लागला आहे. एकूण काय तर गाडी रुळावर येतेय. 

अनुप्रियाचे प्रत्येक बाबतीत अचूक ठरलेले भविष्य मार्गदर्शन,त्यांनी दिलेले उपाय ह्यामुळे आमचे आयुष्य व्यवस्थित चाललेले आहे. पैशांची आवक सुधारली आहे, घरातील वादविवाद संपुष्टात आलेले आहेत. सासूबाई अगदी प्रेमाने वागू लागल्या आहेत आणि त्यांचा आम्हांला आधार आहे. अजून काय पाहिजे ?

काळोख्या रात्री एखादी होडी वादळात सापडून वाट चुकलेली असताना त्या होडीचा नावाडी समुद्रात असलेल्या दीपस्थंभाच्या (LIGHT HOUSE ) मदतीने स्वतःची वाट शोधून काढतो. ती वाट शोधतांना आपला देवच आपल्याबरोबर दीपस्थांबाच्या रूपाने असतो अशी त्याची भावना असते. अनुप्रियाही आमच्या आयुष्यात दीपस्थंभाप्रमाणे आहेत. जर त्यांचे मार्गदर्शन मिळाले नसते तर कदाचित आताही आम्ही धडपडतच राहिलो असतो. अनुप्रिया तुमच्याबद्दल एवढेच बोलू शकते की प्रत्येक वेळी तुम्ही जी मदत केलीत त्याचे ऋण आमच्यावर सदैव राहील. 

धन्यवाद  
(सौ. साळवी )

ज्योतिषीय व वास्तू संदर्भातील मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करावा - anupriyadesai@gmail.com किंवा www.kpastrovastu.com   

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

ज्योतिष शास्त्राने शोधून दिले - Location of Shop

ज्योतिष शास्त्राने शोधून दिले - Location of Shop

लंडनमध्ये पाच वर्ष नोकरी केलेल्या वृशंकला मुंबईत स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा अशी तीव्र इच्छा होती. दुसऱ्यांची गुलामी बसं झाली म्हणे. मार्च महिन्यात मुंबईत आल्या आल्या त्याने कुंडली मार्गदर्शनासाठी माझी appointment घेतली. कुठला व्यवसाय करावा ? त्याला स्वतःला कुठला व्यवसाय करावासा वाटतोय ?कुठला व्यवसाय कुंडलीप्रमाणे फायदेशीर ठरेल ? कुठे व्यवसाय करणार म्हणजे मुंबई की मुंबईबाहेर ह्या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आणि वृशंक व्यवसायासाठी जागेच्या शोधाला लागला. 

जन्म कुंडलीच्या  गणितावरून ठळकपणे खालील गोष्टी कळण्यास मदत झाली - 

१) भर बाजारात दुकान असण्याची शक्यता आहे. 
२) ज्या भागात दुकान असेल तिथे मुख्यत्वे शाळा आणि बगीचा असेल. 
३) २४ ऑगस्टच्या आसपास व्यवसाय सुरु होईल. 

त्यांनतर वृशंकची व्यवसायासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरु झाली. चार ते पाच महिने जागा शोधण्यात गेले होते. घरच्या मंडळींना टेंशन आले होते. नामांकित IT कंपनीची नोकरी सोडून वृशंकला हे कसले डोहाळे लागलेत ह्याची टीकाही झाली परंतु तो निश्चयी होता आणि आहे. अखेर त्याच्या दृढनिश्चयाचे फळ त्याला मिळाले. कालच त्याचा फोन आला आणि व्यवसायासाठी एक जागा आवडल्याचे त्याने सांगितले. इतके महिने शोध घेतल्याचा चांगला परिणाम झाला. त्यासंदर्भात अधिक चौकशी करता त्याने दिलेली माहिती, 


  • जागा भर बाजारात आहे. 
  •  जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावर शाळा आहे. 
  • दुकानापासून काहीच अंतरावर बगीचाही आहे. 
  • आणि येत्या आठवड्यात व्यवसाय सुरु होईल. 


ज्योतिषशास्त्राच्या मदतीने इतके खोलात जाऊनही मार्गदर्शन करता येते. 

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी इथे संपर्क साधावा - www.kpastrovastu.com

  

READERS ALL OVER THE WORLD