ब्रम्हांडातील रत्ने
तुम्हां सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की माझे ज्योतिष शास्त्रावरील पहिले पुस्तक ३१ जानेवारी २०१७ रोजी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. पुस्तकात ज्योतिष- शास्त्रावरील आणि वास्तू शास्त्रावरील लेख आहेत. लेख सोप्या भाषेत लिहिलेले आहेत त्यामुळे सामान्य लोकांनाही पुस्तक वाचता येईल. प्रसिद्ध केल्यापासून अवघ्या १२ दिवसांत जातकांनी,मित्र -मैत्रिणींनी,नातेवाईकांनी फोन करून ,प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांनी उदंड उत्साह मिळाला आहे. सर्वांना मनः पूर्वक धन्यवाद.
ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी www.bookganga.com ह्या वेबसाईटवर संपर्क करणे. तुम्हांला येथून पुस्तकाची प्रत मागवता येऊ शकेल. पुस्तक घरपोच मिळेल.