सोमवार, १७ ऑगस्ट, २००९

शनि व शनिची साडेसाती

आत्तापर्यंत आपण राशी आणि अंकशास्त्रा प्रमाणे स्वतःची ओळख करून घेतलीत.... आजच्या लेखात मी शनि ह्या ग्रहाची माहिती लिहित आहे.....
शनि : शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.
ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे
शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...
साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे.....
शुक्र,चंद्र,सूर्य,गुरु,बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे....
साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे....त्याच्या आधीची राशी आहे कर्क.......म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली.
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्रकुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...
शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत.............
ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते....म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी...

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

अंकशास्त्र - Numerology भाग ३

अंकशास्त्र - Numerology भाग ३


अंक ६ : शुक्राच्या अमलाखाली येणारया ह्या व्यक्तीना छानछोकीची आवड असते। प्रदर्शन केल्याशिवाय त्या वस्तुची महती पोहोचत नाही असे आपणास वाटते. तुमचे वर्णन राजसी, भाग्यवादी, भोगवादी, कलात्मक, संगीत- निसर्ग ह्यांचे प्रेम, नेतृव, प्रेमळ,प्रसंगी एकनिष्ठ, हट्टी परंतु दुराग्रही नव्हेत. स्वतःचा मार्ग युक्तीने गाठणारे, खाण्यापिण्यात रुची चटपटित चमचमीत खाणे आवडते. अंक ५ प्रमाणे सतत शिकत रहाणे आपणास आवश्यक वाटत नाही तर उपयुक्त व्यक्तींचा संच करणे तुम्हाला अधिक उपयुक्त वाटते. सर्वात महत्वाचे स्वप्रसिध्हीची हौस असते. तुम्हाला शक्यतो कफचे विकार असतात. शक्यतो खाण्यापिण्यावर ताबा असणे जरुरी आहे.
प्रसिद्द व्यक्ती : सुनील दत्त ( ६ जून ) रोनाल्ड रेगन ( ६ फेब्रुवरी )
अंक ७ : नेपच्यूनच्या अमलाखाली येणारा हा अंक मला सर्वात जवळचा वाटतो। कारण ज्योतिषशास्त्रीना भविष्यकथन करताना ह्या ग्रहाची मदत मिळते. गूढ़वादी, भावनाप्रधान, संवेदनशील, गोंधळणे, हरवणे व पुन्हा गोंधळणे, व्यवहारात अपयशी, सामान्यतः परावलंबी, निष्ठावान परंतु सातत्याचा अभाव शिस्तबध्ह वा एका चाकोरीतून जाणारया जीवनाचा तुम्हाला नेहेमीच तिटकारा असतो. मनस्वी , चिंतन,अंतःप्रेरणा , प्रवासाची आवड महत्वाचे म्हणजे संम्मोहनशास्त्र तुम्हास लगेच अवगत होते. गूढ़त्वाचे वलय नेहेमीच तुमच्या अवती-भवती असते. आजारपणात तुम्हाला निद्रानाश, वेड लागणे, अतिविचाराने आणि श्रमाने होणारे आजार होऊ शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर ( ७ मे ) जोन. पी. मोर्गन ( ७ सप्टेम्बर )
अंक ८ : जेवढा अंक ५ आणि अंक ७ ला सातत्याचा तिटकारा आहे तेव्हढाच अंक ८ असणारी व्यक्ति एखाद्या गोष्टीचा सतत मागोवा घेत असते. सतत कार्यशील राहून संशोधन करणे, क्लिष्ट गोष्टी सोडवणे, गंभीरणा, कटुता, दीर्घाकालीन योजना रबावणे, अभ्यासू, तत्वाशील, कष्ट करणारे पण कधी कधी कामात आळस नडतो. जीवनात सर्व काही शिस्तबध्हरितीनेच मिळावे असा तुमचा आग्रह असतो. तुम्हाला कोणतीही बंधने आवडत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याच्या सवयीने लोक तुम्हाला टाळतात अर्थात ह्याचा परिणाम असा होतो की तुम्हास एकलकोंडेपणाची सवय होते आणि तुम्हाला निराशेला तोंड द्यावे लागते. आजारपणात तुम्हाला वातविकार, अस्थमा, सांधेदुखी,त्वचाविकार, थंडीताप, दीर्घकालीन आजार असू शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : डिम्पल कपाडिया ( ८ जून ) मोहन वाघ ( ८ डिसेंबर )

अंक ९ :
साहसी, कृतीशील,टोकाची भूमिका घेणारे,दूरदृष्टीचा अभाव असणारे, योजना काटेकोरपणे रबावणारे स्वप्रेमी, नेतृत्व संपन्न परंतु लवचिकतेचा अभाव, श्रद्धालु, आक्रमक, धाडसी, आत्मविश्वास पण त्याच बरोबर उतावीळपणा, तडकाफड़की निर्णय घेण हेही गुण दिसतात पण ह्याच गोष्टीने लोकांना तुम्ही हेकेखोर हट्टी समजतात. कोणत्याही कलेत तुम्ही स्वतःला झोकुन देता. तुमचे सर्व निर्णय हे ताबडतोब असतातच पण त्यावर अमल सुद्धा लगेच होतो. मैत्री व शत्रुत्व दोन्ही गोष्टी एकाच पद्धतीने निभावताना आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीना तुम्ही खुप जपता. आजारपणात अंगाची आग होणे, रक्तदोष,मुळव्याध, हार्निया, मेंदूचे विकार, रक्तदाब वाढणे, तिखट खाण्याने अल्सर होणे, शत्रक्रिया इ.

प्रसिद्द व्यक्ती : गुरुदत्त ( ९ जुलै ) सोनिया गांधी ( ९ डिसेंबर)
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २००९

अंकशास्त्र भाग २ Numerology

अंकशास्त्र भाग २ Numerology 



अंक ४ :"हर्षल" ह्या ग्रहाने पूर्णपणे काबूत ठेवलेला अंक म्हणजे "४". सर्वात हुशार आणि सर्वात विक्षीप्त......नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडतात...ह्याना संशोधन करायला आवडते. मी तर म्हणेन आजकाल जेवढे शोध लागत आहेत त्यात हर्षल किंबहुना ह्या अंकाखाली वावरणारया सर्व व्यक्तींचा हातभार आहे....नेहेमीच प्रगतीशील रहाणारया व्यक्ति तुम्ही आहात. पण कधी कधी लोकाना तुमचे वागणे विचित्र वाटू शकते. तुम्हाला रूढी......परंपरा पाळणे कठिण जाते. तुमच्या बाबतीत काही गोष्टी अचानक घडतात.....
प्रसिद्द व्यक्ती : किशोरकुमार (४ ऑगस्ट) जमनालाल बजाज ( ४ नोव्हेंबर)
अंक ५ :"बुध" ग्रहाच्या अमलाखाली येणारा अंक "५". पक्के व्यवहारी...चांगली विनोदबुध्ही, भरपूर बोलणे....कुठलीही गोष्ट पटवून देण्यात हुशार,कोणासाठीही झोकुन काम करण्यापेक्षा उपयुक्त काम करणे तुम्हाला जास्त आवडते. एखादी गोष्ट तुम्ही खुप छान फुलवून सांगू शकता. बोलणे खुप आहे पण सातत्य नाही.. ...म्हणुन जितकी प्रगती व्ह्याला हवी तितकी होत नाही. सतत काहीतरी शिकणे आणि शिकवणे तुम्हाला आवडते.

प्रसिद्ध व्यक्ती : नील आर्मस्ट्रोंग ( ५ ऑगस्ट ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ( ५ सप्टेबर )
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD