अंकशास्त्र - Numerology भाग ३
अंक ६ : शुक्राच्या अमलाखाली येणारया ह्या व्यक्तीना छानछोकीची आवड असते। प्रदर्शन केल्याशिवाय त्या वस्तुची महती पोहोचत नाही असे आपणास वाटते. तुमचे वर्णन राजसी, भाग्यवादी, भोगवादी, कलात्मक, संगीत- निसर्ग ह्यांचे प्रेम, नेतृव, प्रेमळ,प्रसंगी एकनिष्ठ, हट्टी परंतु दुराग्रही नव्हेत. स्वतःचा मार्ग युक्तीने गाठणारे, खाण्यापिण्यात रुची चटपटित चमचमीत खाणे आवडते. अंक ५ प्रमाणे सतत शिकत रहाणे आपणास आवश्यक वाटत नाही तर उपयुक्त व्यक्तींचा संच करणे तुम्हाला अधिक उपयुक्त वाटते. सर्वात महत्वाचे स्वप्रसिध्हीची हौस असते. तुम्हाला शक्यतो कफचे विकार असतात. शक्यतो खाण्यापिण्यावर ताबा असणे जरुरी आहे.
प्रसिद्द व्यक्ती : सुनील दत्त ( ६ जून ) रोनाल्ड रेगन ( ६ फेब्रुवरी )
अंक ७ : नेपच्यूनच्या अमलाखाली येणारा हा अंक मला सर्वात जवळचा वाटतो। कारण ज्योतिषशास्त्रीना भविष्यकथन करताना ह्या ग्रहाची मदत मिळते. गूढ़वादी, भावनाप्रधान, संवेदनशील, गोंधळणे, हरवणे व पुन्हा गोंधळणे, व्यवहारात अपयशी, सामान्यतः परावलंबी, निष्ठावान परंतु सातत्याचा अभाव शिस्तबध्ह वा एका चाकोरीतून जाणारया जीवनाचा तुम्हाला नेहेमीच तिटकारा असतो. मनस्वी , चिंतन,अंतःप्रेरणा , प्रवासाची आवड महत्वाचे म्हणजे संम्मोहनशास्त्र तुम्हास लगेच अवगत होते. गूढ़त्वाचे वलय नेहेमीच तुमच्या अवती-भवती असते. आजारपणात तुम्हाला निद्रानाश, वेड लागणे, अतिविचाराने आणि श्रमाने होणारे आजार होऊ शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर ( ७ मे ) जोन. पी. मोर्गन ( ७ सप्टेम्बर )
अंक ८ : जेवढा अंक ५ आणि अंक ७ ला सातत्याचा तिटकारा आहे तेव्हढाच अंक ८ असणारी व्यक्ति एखाद्या गोष्टीचा सतत मागोवा घेत असते. सतत कार्यशील राहून संशोधन करणे, क्लिष्ट गोष्टी सोडवणे, गंभीरणा, कटुता, दीर्घाकालीन योजना रबावणे, अभ्यासू, तत्वाशील, कष्ट करणारे पण कधी कधी कामात आळस नडतो. जीवनात सर्व काही शिस्तबध्हरितीनेच मिळावे असा तुमचा आग्रह असतो. तुम्हाला कोणतीही बंधने आवडत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याच्या सवयीने लोक तुम्हाला टाळतात अर्थात ह्याचा परिणाम असा होतो की तुम्हास एकलकोंडेपणाची सवय होते आणि तुम्हाला निराशेला तोंड द्यावे लागते. आजारपणात तुम्हाला वातविकार, अस्थमा, सांधेदुखी,त्वचाविकार, थंडीताप, दीर्घकालीन आजार असू शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : डिम्पल कपाडिया ( ८ जून ) मोहन वाघ ( ८ डिसेंबर )
अंक ९ : साहसी, कृतीशील,टोकाची भूमिका घेणारे,दूरदृष्टीचा अभाव असणारे, योजना काटेकोरपणे रबावणारे स्वप्रेमी, नेतृत्व संपन्न परंतु लवचिकतेचा अभाव, श्रद्धालु, आक्रमक, धाडसी, आत्मविश्वास पण त्याच बरोबर उतावीळपणा, तडकाफड़की निर्णय घेण हेही गुण दिसतात पण ह्याच गोष्टीने लोकांना तुम्ही हेकेखोर हट्टी समजतात. कोणत्याही कलेत तुम्ही स्वतःला झोकुन देता. तुमचे सर्व निर्णय हे ताबडतोब असतातच पण त्यावर अमल सुद्धा लगेच होतो. मैत्री व शत्रुत्व दोन्ही गोष्टी एकाच पद्धतीने निभावताना आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीना तुम्ही खुप जपता. आजारपणात अंगाची आग होणे, रक्तदोष,मुळव्याध, हार्निया, मेंदूचे विकार, रक्तदाब वाढणे, तिखट खाण्याने अल्सर होणे, शत्रक्रिया इ.
प्रसिद्द व्यक्ती : गुरुदत्त ( ९ जुलै ) सोनिया गांधी ( ९ डिसेंबर)
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा