आजचा विषय आहे राशीबदल करणारा शनि :
९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ ला शनि सिंह राशीतून कन्या ह्या बुध्याच्या अमलाखाली असणारया राशीत प्रवेश करेल..........तर त्याची प्रत्येक राशीला मिळणारी फळे खालीलप्रमाणे :
मेष : बदलणारा शनि हा मेष राशीस सहावा येणार आहे. मेष ही मंगळ ह्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी राशी ...शारीरिक ताकदीची..धडाधडीची रास...ह्या राशीला संवेदनाशीलता जास्त काळ मानवत नाही. षष्ठातील शनि हा कर्जासाठी अनुकूल आहे...स्वतःचे घर घेण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही...पण त्याच बरोबर विवाहसंबंधानमध्ये ताणतणाव निर्माण करेल ...कानाची दुखणी संभवतात...लिखाणात अड़चणी...कोर्ट- कचेरी गोष्टींबाबत यश मिळेल ..
वृषभ : वृषभ राशीस शनि पाचवा येत आहे...पंचम स्थान हे संततीकारक मानले जाते.. म्हणजेच होणारा शनिबदल संतती संदर्भात त्रासदायक, अनारोग्यकारक अथवा अपघातदर्शक असणारा. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तिंशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू शकाल...प्रेम-प्रकरणात यश..शेअर्स-सट्टा या मार्गाने धनलाभ...भाग्याची मदत
मिळेल..नोकरीत चांगले बदल...वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे. एकंदरीतच होणारा शनि बदल आपल्यासाठी खुशखबर आणेल.
मिथुन : मिथुन राशीस शनि चतुर्थात येणार आहे..मिथुन व कन्या दोन्ही राशी बुधाच्या अधिपत्याखाली येणारया.....त्यात शनि महाराज कन्येत प्रवेश करीत आहेत...बुध व शनि हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. चतुर्थात येणारा शनि हा मातेच्या आरोग्यासंदर्भात त्रास निर्माण करू शकतो.. शनि हा वास्तु-शास्त्राप्रमाणे जमीनीचा कारक आहे...त्यामुळे स्थावरसंबंधी मतभेद वाढतील... कागदोपत्री-व्यवहारात काळजी घ्यावी..
कर्क : कर्क राशी कर्क राशीस शनि महाराज तृतीय स्थानात म्हणजेच पराक्रम स्थानात प्रवेश करीत आहेत...कर्क ही चंद्राच्या अमलाखालची राशी.चंद्र व शनिचा म्हटले तर छत्तीसचा आकडा..चंद्र भावुक तर शनि परखड..चंद्र चंचल तर शनि विलंबाचा कारक...तर ह्या कर्क राशीला शनि बदलाची काय फळे मिळतील ? खर्चावर बरयाच प्रमाणात नियंत्रण येईल...कानाची दुखणी संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.. मातेस त्रास संभवतो. प्रवासात अडचणी येऊ शकतात.. टपाल...किंवा एखाद्या पत्राची (इ-मेल) वाट बघत असाल तर त्याला विलंब होऊ शकतो..वैचारिक मतभेद संभवतात...
सिंह : हुश शनि महाराज जरी आपल्या राशीतून कन्येत प्रवेश करीत असले तरी...आपल्याला विसरलेले नाहीत..हं धावपळ ज़रा कमी होणार आहे...कुटुंब स्थानात येणारे शनि महाराज घरात एखादे मंगल कार्य घडवून आणतील...कमीशन बेसिस उद्योगातून नफा होइल..नोकरीतून लाभ होतील..अवास्तव आश्वासने देऊ नका..कुठल्याही प्रकारची जोखिम घेताना काळजी घ्या..जोड़ीदाराबरोबर मतभेद टाळा..
कन्या : कन्येत येणारा शनि म्हणुन सर्वानी घाबरवून सोडले असेल...पण तसे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तुमच्या राशीत प्रवेश करणारा शनि हा तुम्हाला स्पर्धात्मक यश मिळवून देईल.कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. हाताखालच्या माणसांची मदत मिळाल्यामुळे काम करण्यास उत्साह येइल.व्यवहारात काळजी घ्या.
तुळ : कन्येत प्रवेश करणारा शनि हा तुमच्या राशीला बारावा येत आहे...शनिची उच्च रास म्हणुन तुळ रास ओळखली जाते..संततीच्या दृष्टीने भाग्योदयाचे ग्रहमान...जमिन/ इस्टेट ह्या संदर्भात गुंतवणुकीचे योग... शिक्षणावर खर्च होईल.. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या....राजकारणी लोकाना अपयशास तोंड द्यावे लागेल...
वृश्चिक : आपल्या राशीला शनि अकरावा म्हणजेच शनि लाभ स्थानात प्रवेश करत आहे.. काम करण्याचा अत्यंत आळस वाटेल आणि त्यातच कोणाची कामात मदत मिळणार नाही.मालमत्तेच्या विक्रीतून फायदा होईल...घर बदल फायदेशीर ठरेल. कोणावरही विसंबून राहू नये आणि मोठी जोखीम घेवू नये...
धनु : धनु राशीला शनि दहावा येत आहे...सर्वात जास्त कृपादृष्ट जर शनि महाराज असणार आहेत तर ते धनु राशीवर...दशम स्थान म्हणजेच "कर्म स्थान"...म्हणुनच आपले कर्म करत रहाणे हे जर उद्दिष्ट ठेवलेत तर यश दूर नाही.. कामकाजानिम्मित्त दूरचे प्रवास घडतील..वंश-परंपरागत मालमत्तेत हक्क मिळेल..तब्येतीची काळजी घ्या..
मकर : मकर राशीस शनि भाग्य स्थानात येत आहे..इतके दिवस रेंगाळलेल्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील..थोडक्यात आरोग्य चांगले राहील कोर्ट- कचेरी गोष्टींबाबत यश मिळेल...जबाबदारया वाढतील...आळस झटकून कामाला लागावे लागेल...प्रवासात अडथळे निर्माण होतील..
कुंभ : अष्टमातुन होणारे शनि भ्रमण आपली कसोटी पहाणार आहे...कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका.. परदेशाशी संबंधीत व्यवहारात अडचणी येऊ शकतात ...तेंव्हा सांभाळा..संतती योग आहे.. शेअर्स-सट्टा हयात मोठी गुंतवणुक टाळा...आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका...
मीन : सप्तामात शनि महाराजांचा प्रवेश त्याच बरोबरीने त्यांचा हर्षल ह्या ग्रहाशी होणारा प्रतियोग हा मानसिक तणाव देईल..निरुत्साह जाणवेल...खर्च वाढतील... लग्न जमवताना अडचणी उद्भवतील...प्रवास भरपूर होतील पण तब्येत सांभाळा......तुमच्याकडून समोरच्या व्यक्तींच्या अपेक्षा ह्या काळात वाढतील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा