मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही


ज्योतिष आणि वास्तू ह्या शास्त्राचा अभ्यास करताना जस जसे त्यात संदर्भ येत गेले त्या अनुसार मी आपल्या  धार्मिक ग्रंथांचेही वाचन केले. आपली भारतीय संस्कृती महान आहेच परंतु आपल्या शास्त्रकारांनी/संतांनी  लिहिलेल्या ग्रंथांवरून ते काळाच्या कितीतरी पुढे होते ह्याची जाणीव होते. ज्ञानेश्वरांनी तेंव्हा लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी,रामदास समर्थांनी लिहिलेला दासबोध आता वाचतांना ज्ञानेश्वर,समर्थ आजच्या काळाबद्दलच बोलत आहेत कि काय असे वाटते. ज्योतिषशास्त्र म्हणजे प्रत्येक ग्रह आणि त्याचा मानवावर होणारया परिणामांचे शास्त्र. काहीजण त्याला Scientific मानतात तर काहीजण नाही. परंतु आज जेंव्हा चंद्राच्या  मानवी जीवनावर होणारया परिणामला सर्वच शास्त्रात मान्यता मिळालेली आहे तर बाकी ग्रहांबद्दलही लवकरच मतं बदलतील अशी मला खात्री आहे. अगदी अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास होणारे जन्म- मृत्युचे प्रमाण हे बाकीच्या दिवसात होणारया जन्म -मृत्युच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. (This is Scientific). म्हणजेच चंद्राचा मानवी जीवनावर बरयाच मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. ह्या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या Municipal Corporation मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारू शकता किंवा आयुर्वेदिक वैद्यांना.  असो तर आपला आजचा मुद्दा आहे वास्तू.

वास्तुसंदार्भात आपल्या वास्तु-शास्त्रकारांनी ब्रम्हस्थान हे नेहेमी मोकळे असावे असा उल्लेख केलेला आहे.वास्तूसंदर्भात लिहिलेल्या मागच्या एका लेखात मी ब्रम्हस्थानाचा उल्लेख केला आहे. ब्रम्हस्थान म्हणजेच आपल्या वास्तूचे मध्यवर्ती स्थान. शास्त्रात अशी मान्यता आहे की वास्तूदेवतेचे मुख हे ईशान्य दिशेस तर पाय हे नेऋत्य दिशेस आहेत. त्या अर्थाने वास्तुदेवतेचा पोटाचा भाग हा वास्तूच्या मध्यवर्ती येतो.  ब्रम्हस्थान जर सदोष असेल तर त्याचा कितीतरी विपरीत परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर होतो. त्याच संदर्भात माझ्याकडे ह्या वर्षीच्या मे महिन्यात एक वास्तूची Case आली. कुंडलीसंदर्भात चर्चा झाली आणि त्यांनीच त्यांच्या वास्तूसंदर्भात विषय काढला. स्वतःचा गेले दीड वर्ष न चालणारा व्यवसाय आणि घरातील सततच्या आजारपणामुळे ते कंटाळले होते. मग वास्तू-परिक्षणाचा दिवस ठरला. 

बरं एक नवीन गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे जसे प्रत्येक शास्त्रात दररोज नवनवीन गोष्टींबाबत संशोधन होत असते तसेच वास्तूशास्त्रातही संशोधन सुरूच आहे.तर ते संशोधन असे की वास्तू आणि ज्योतिष ह्यांची सुंदर सांगड म्हणजे वास्तू-ज्योतिष शास्त्र. हे नवीन नाही पण ह्याचा उपयोग करणारे मात्र खूप कमी आहेत. हे वास्तू-ज्योतिष शास्त्र म्हणजे एखादी व्यक्ती जेंव्हा तुम्हांला त्यांच्या वास्तूबद्दल काही सांगत असते तेंव्हा त्यावेळेची कुंडली वास्तूतज्ञाला अधिक उपयोगी माहिती देवू शकते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे कि जेंव्हा जातक मला त्यांच्या वास्तू बद्दल सांगतो तेंव्हाची कुंडली मांडल्यानंतर घराचे मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ? घरात पाण्याचासाठा कुठे आहे ? घरात मुख्य दोष कुठे आहे ? कशामुळे जातकाला नक्की त्रास होतोय ? ह्याची कल्पना होरा कुंडली देवू शकते.

होरा कुंडलीवरून ह्या जातकाला मी (वास्तू Visit करण्याआधी) घरात पूर्व दिशेला रद्दी,चपला बरेच वापरात नसलेले सामान किंवा अडगळीत पूर्वजांचे फोटो ठेवले आहेत का ? घराच्या मध्य ठिकणी काही अवजड वस्तू ठेवल्यात आहेत का ?? असे विचारले तेंव्हा बरयाच जातकांप्रमाणे त्याने  उत्तर दिले,"मला घरातून पूर्व दिशा कशी बघतात माहीत नाही. पण स्वयंपाक घरात एका ठिकाणी रद्दी ठेवलेली आहे. घराच्या मध्ये तर काहीच नाही मोकळी जागा आहे". मी म्हणाले,"ठीक आहे मी येतेच आहे मग पहाते."

जेंव्हा वास्तू परीक्षणासाठी ह्या वास्तूत गेले असता स्वयंपाक घरात पूर्व दिशेला फ्रीज होता. त्याखाली जाते (धान्य दळण्यासाठी पूर्वीच्याकाळी वापरात असलेले साधन )ठेवलेले. फ्रीजच्याच बाजूला रद्दी रचून ठेवलेली. रद्दीच्या थोडं वरती फळकुट बनवलेले आणि त्यात चादरीने काहीतरी झाकून ठेवलेले. मी विचारल्यावर घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेले उत्तर," अहो काही नाही …ते तुमच्या वास्तूवगैरेची पुस्तके मी ही वाचतो. घरात मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत असे म्हणतात ना ?? मग आम्ही ते चार-पाच  वर्षांपूर्वी भिंतीवरून काढून तिथे ठेवले आहेत."  मला उत्तर मिळाले. पूर्व दिशेला शक्य तितके स्वच्छ,मोकळे ठेवावे हे ही बरयाच पुस्तकांत लिहिलेले असते पण आजोबांनी आपल्या सोयीप्रमाणे वास्तूतील मृत व्यक्तींचे भिंतीवरचे फोटो काढले आणि त्यांना अडगळीत ठेवून दिले आणि ते ही पूर्वेला. आधीच पूर्वेला त्यांनी फ्रीज ठेवलेला त्याखाली जाते बाजूला रद्दी, त्यावर पूर्वजांचे फोटो. म्हणजे एकाच जागी किती दोष निर्माण झाला. 

 स्वयंपाक आणि बैठकीची खोली ह्यांच्या मध्ये एक दार आहे आणि त्या दारालाच लागून पूर्वेला घराचे मुख्यद्वार. शक्यतो जिथे मुख्यदार असते तिथेच चपलां ठेवण्याची जागा असते. हे घर चाळीतले त्यामुळे घराबाहेर फार जागा नव्हती. त्यांना तुम्ही चपला कुठे ठेवता असे विचारल्यावर त्यांनी मुख्यादाराकडे बोट दाखवले. मुख्य दारावरती एक खिडकीची झडप होती तिथे त्यांनी एक लाकडी Box बनवला होता आणि त्यावरच सर्वांच्या चपला ठेवण्यात येत होत्या. म्हणजे मुख्यादारावरच चपला. ज्या पूर्व दिशाकडून चांगल्या उर्जेचा प्रवेश होत होता तिथेच वरती चपला ठेवण्यात आलेल्या.  पूर्व दिशा पूर्णपणे दुषित झालेली दिसत होती. मग गेल्या दीड वर्षापासून त्या जातकाचा व्यवसाय का व्यवस्थित चालत नव्हता ह्याचे कारण कळले.

ह्या जातकाचा अजून एक प्रॉब्लेम होता आणि तो त्याने मला वास्तू परीक्षणासाठी गेले असतां सांगितले. तो म्हणजे त्याला एकच मुलगी होती आणि दुसऱ्या अपत्याची अपेक्षा होती. चार वर्षापूर्वी ह्याला स्वतःला नोकरीनिमित्ताने आफ्रिकेत जावे लागले. तेंव्हा जातकाची पत्नी गरोदर होती. दीड महिनाच झाला होता. ह्याच काळात घरात बरेच बदल करण्यात आले होते. पूर्वजांचे फोटो काढून ठेवण्यात आले होते आणि नवीन फ्रीज घरी आला होता. सर्वजण खुश होते. परंतु आठवा  महिना संपता संपता हिला रात्री दोन वाजतां दुखू लागले. हॉस्पिटल घराच्या अगदी खालीच होते परंतु बाळ वाचू शकले नाही. डॉक्टरांनी सांगितले हिच्या गर्भाशयाला भरपूर इजा झाली असून आता हिला पुन्हा बाळ होऊ शकणार नाही. आणि तिचे गर्भाशय काढून टाकावे लागेल अन्यथा  Infection वगैरे होऊन पुढे Cancerचाही धोका आहे.  ह्या घटनेनंतर दोनच दिवसात जातकाच्या वडिलांना छातीत अचानक कळ आली. तपासणी करण्यास गेले असता आन्जीयोप्लास्टी करावी लागेल असे सांगण्यात आले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जातकाला मात्र इथे येता आले नाही कारण त्यांचे काही Contract वगैरे असते तेंव्हा असे मध्येच सुट्टी घेऊन येता येत नाही. घरात आनंद नांदू पाहत असतानाच तो पाठ फिरवून निघून गेला.

ह्या प्रोब्लेमसाठी घरातील सदोष ब्रम्ह्स्थान कारणीभूत असते. म्हणून मी माझा मोर्चा घराच्या ब्रम्हस्थानाकडे वळवला. कधी कधी घराची रचनाच अशी असते की ब्रम्ह्स्थान कुठले ह्याबाबतीत घरातील व्यक्तींनाच संभ्रम असतो. ह्या घराच्या ब्रम्हस्थानावर बाथरूम आणि टोयलेट होते. मी पूर्ण घराचे परीक्षण आणि मोजमाप केल्यानंतर जातकाच्या तसे लक्षात आणून दिले. घराचे ब्रम्ह्स्थान म्हणजे घराचा Backbone. त्यावरच तुम्ही हल्ला केलात तर घर तुटण्यास वेळ कसला ?? तुमची पाठ जराजरी दुखत असेल तर तुम्ही ना धड बसू शकत ना उभे राहू शकत. मग घराच्या पाठीवरचे ओझे घर किती काळ सहन करणार. सहनशक्ती संपली कि मग घरतील व्यक्तींना हृदयरोग,मणक्याचे त्रास, पोटाचे त्रास,गर्भपात इ. होणारच. अर्थात ह्यासाठी फक्त वास्तूतील दोषच कारणीभूत नसून कुंडलीही तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड झाली की मग एके दिवशी त्याचा स्फोट होतो आणि त्याचे परिणाम दिसायला लागतात. मग आपल्याला वाटते हे असे अचानक काय झाले??  हे अचानक होत नसते. त्याची सुरवात हळूहळू होत असते फक्त आपल्याला तेंव्हा त्याचे परिणाम जाणवत नाहीत एवढेच. 

ह्या जातकाला घरातील पूर्व दिशा मोकळी करून तिथले सामान दक्षिण दिशेस ठेवण्यास सांगितले. चपलांसाठी पश्चिमेला एका ठिकाणी जागा ठरवून दिली. पूर्वजांच्या फोटो संदर्भातील गैरसमज दूर करून दक्षिण भिंतीवर त्यांना स्थान दिले. 

ब्रम्ह्स्थानातील दोषासाठी ठराविक दिवशी काही ठराविक मंत्रोक्त रत्ने पुरावी लागतील असा सल्ला दिला. कारण बाथरूम आणि टोयलेट तर दुसरीकडे हलवणे शक्य नाही.

बाकीही काही सूचना दिल्या जसे त्यांची मुलगी चवथी इयत्तेत शिकत आहे त्यामुळे तिने अभ्यासासाठी कुठल्या दिशेस बसावे ? कुठल्या देवतेचे स्मरण करावे ? जातकाचा व्यवसाय गेले दीड वर्ष थंड होता. त्यालाही काही स्तोत्रे वाचण्यास सांगितली. व्यवसाय घरातूनच करत असल्याने घरात व्यवसायाचे सामान कुठे ठेवावे ? पैसे कुठे ठेवावेत ? जातकाची बसण्याची दिशा कोणती असावी ? इ. संदर्भात आमची चर्चा झाली. त्यांनतर काल जातकाचा फोन आला. गेल्या चार महिन्यात व्यवसाय नुसता सुरु झाला नाही तर व्यवस्थित धावतोय. एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीचेही contract मिळाले तेंव्हा त्याने  दुकानासाठी एक जागा पसंत केली आणि त्याच्या परीक्षणासाठी मला फोन केला. त्याच्या आनंद मला ऐकू येत होता. परीक्षणाचा दिवस ठरला. फोन ठेवताठेवता तो म्हणालाच,"मैडम हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. घरी सगळे खुश आहेत. त्यांचा आनंद बघून कामासाठी खूप उत्साह आला आहे."  मी म्हटलं,"नाही अजिबात नाही. ही शास्त्राची कमाल आहे. आभार शास्त्राचे मान. बाकी तुझीही मेहनत आहेच ना."

इथे काही गोष्टी वाचकांनी लक्षात घ्याव्यात : १) प्रामुख्याने घरात धन-संपत्ती असणे,येणे आणि ती टिकणे हे घराच्या निर्दोष पूर्व आणि उत्तर दिशेवर अवलंबून आहे. इथे जातकाला सोपा उपाय म्हणजे पूर्व दिशा मोकळी आणि स्वच्छ करण्यास सांगितले. त्याचे चांगले परिणाम म्हणजे त्याचे अर्थार्जनाचे मार्ग मोकळे झाले.  

२) जातक स्वतः चाळीत राहणारा. तरीही त्याने ब्रम्ह्स्थानावर रत्नाध्याय करून घेतला. बरेच लोक खर्च होतो… नको…. बघु… नंतर अशी टाळाटाळ करतात. परंतु जातक तत्काळ तयार झाला आणि त्याचे चांगले परिणाम म्हणजे बाबांच्या तब्येतीत चांगलाच सुधार आहे.  

आज त्याचा आनंद पाहून माझा शास्त्रावरचा विश्वास द्विगुणीत होतो. शास्त्राला कोटी कोटी प्रणाम. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
  

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 


गेल्या महिन्यात चैतालीचे आलेले हे पत्र. ती माझ्याकडे आली होती तेंव्हा लग्न होऊन चार वर्ष झाली होती परंतु बाळाची चाहूल नव्हती. तेंव्हा कुंडलीत काय योग आहेत हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. त्यांनतर तिला ज्योतिष- शास्त्राचा अनुभव कसा वाटला ह्याबद्दल तिने लिहिले आहे.  



श्री स्वामी समर्थ 

माझ्या लग्नाला चार वर्षे झाली होती परंतु मला अपत्य होत नव्हते. मी बरेच उपाय केले, बरयाच जाणकार ज्योतिषांना विचारले पण सगळ्यांनी सांगितले की बाळ होईल पण कधी होईल ह्याबद्दल नक्की कोणीच सांगत नव्हते. ऑफिसमधल्या एका colleague बरोबर चर्चा करत असतना त्यांनी मला सांगितले कि अनुप्रिया देसाई म्हणून एक ज्योतिषी आहेत त्या तुम्हाला ह्याबाबतीत मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे मी त्यांची appointment घेतली.  


आमची ही पहिलीच भेट. परंतु त्यांनी माझ्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही गोष्टींबद्दल अचूक सांगितले. माझ्या लग्नात बरीच विघ्ने आली होती त्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. 

त्यांनी आमच्या दोघांचीही कुंडली संततीच्या संदर्भात अभ्यासली.
 त्यांनी मला सांगितले की तुमच्या दोघांच्याही कुंडलीत २०१२ च्या ऑगस्टनंतर संततीप्राप्तीचे योग आहेत परंतु काही complications आहेत त्यामुळे Pregnancy राहिल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी मला त्यासंदर्भात काही स्तोत्रे आणि मंत्र सांगितले. त्यात स्वामींचा तारक मंत्राचाही समावेश होता. बाकी उपायांबरोबरच तारकमंत्रचा ११ वेळा जप मी करत होते. 

दिलेले उपाय तर करतच होते आणि मला फेब्रुवारीच्या २०१२च्या शेवटच्या महिन्यात मला प्रचीती आली. मला गोड बातमी मिळाली. अनुप्रियाला सांगितल्यानंतर त्यांनी उपाय सुरु ठेवायला सांगितले आणि काळजी घ्यायला सांगितली. दिलेल्या स्तोत्रांचे वाचन चालू होते. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी Regular Check-up साठी गेले असता डॉक्टरांनी मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये Admit होण्यास सांगितले. काही Complications आहेत असे सांगण्यात आले. १४ ते १५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. अक्षरशः कंटाळले होते. हॉस्पिटलच्या वातावरणाचा उबग आला होता. अनुप्रियाच्या सतत Contact मध्ये होतेच. डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगितल्यावर खूप निराश झाले होते. अनुप्रियाला विचारल्यावर तिने मला समजावले की Complications तर आहेत त्यामुळे उगीच risk घेण्यापेक्षा C- Section चा  मार्ग बरा. आणि १६ ऑक्टोबर २०१२ला आम्हांला मुलगी झाली.  

आमचा त्यांच्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला आहे.  मला महत्वाचा निर्णय घ्याचा असेल तर त्यांना जरूर विचारते. आज त्या माझ्या friend आणि Guide दोन्ही आहेत. त्यांचे खूप खूप आभार. 


चैताली जोशी 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

गर्भधारणा झाली पण …….

गर्भधारणा झाली पण …….



आई होणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. काहीं जोडप्यांना ते खूप सहज आहे तर काही जोडप्यांना ह्यासाठी संघर्ष आहे. बरीच जोडपी माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की  लग्न होऊन बरीच वर्ष झाली पण बाळ होत नाहीये, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सगळे झालेत पण यश नाही. पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांना गर्भधारणा झाली पण गर्भपात झाला. दोन्ही Cases मध्ये फरक हा आहे कि पहिल्या case मध्ये Conceive होत नाहीये आणि दुसरया Case मध्ये गर्भाची पूर्ण वाढ होण्याआधीच गर्भपात होतोय. आज मी ह्याच संदर्भातील सोनालीची Case तुम्हाला सांगणार आहे.

सोनाली माझ्याकडे २०११च्या मे महिन्यात आली होती. तेंव्हा लग्न होऊन ४ वर्ष झाली होती. त्यामुळे सगळीकडून बाळाबद्दल विचारणा होत होती. बारसे,डोहाळजेवण,लग्न कुठेही सोनाली गेली कि सगळे नातलग तोच प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. सोनालीने कुठल्याही कार्यक्रमाला जायचे सोडून दिले. कुंभ लग्न आणि मेष राशीची कुंडली. कुंभ लग्नाप्रमाणेच सावळी,शांत अशी सोनाली. पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्ही पद्धतीने कुंडलीचे केलेले विवेचन खालीलप्रमाणे : 

पारंपारिक : 
  •  कुंभ लग्न त्यामुळे पंचमेश आहे बुध. बुध स्वतः मेष राशीत आणि शुक्राच्या नक्षत्रात. 
  • शुक्र चतुर्थात. चतुर्थ हे पंचमाचे व्यय स्थान म्हणजे पंचमेश बिघडलेला आहे. 
  • संततीसाठी पारंपारिक ज्योतिष-शास्त्रात गुरु ह्या ग्रहाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. इथे गुरु आहे लाभत आणि त्याची संपूर्ण दृष्टी जरी पंचमावर असली तरी गुरु वक्री असून शुक्राच्याच नक्षत्रात आहे. 
  • सोनाली मला भेटण्यास आली तेंव्हा तिला रवि महादशा आणि बुध अंतर्दशा सुरु होती. बुध पंचमेश आहे आणि रवि चतुर्थात. ह्याचा अर्थ सोनालीला "Pregnancy" राहिली असणार परंतु गर्भ जास्त वेळ राहिला नसणार. सोनालीला तसे विचारल्यानंतर सोनालीने सांगितले ते असे," हो लग्नानंतर मला दोन वेळेस दिवस गेले होते परंतु २-३ महिन्यातच माझा गर्भपात झाला. डॉक्टरांनाही कारण समजले नाही. आता तर डॉक्टरांकडे जायची भीतीच वाटते. माझ्या एका मैत्रिणीला तुमच्यावर खूप विश्वास आहे. तिनेच तुम्हाला कुंडली दाखवण्यास सांगीतली. आता जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी."
  • पंचम स्थानाबरोबरच द्वितीय आणि लाभ ह्या स्थानांचाही संततीप्राप्तीसाठी विचार होतो. ह्या कुंडलीत द्वितीय स्थानात गुरुची मीन राशी आहे. आणि लाभ स्थानात गुरु स्वतः आहे. मग तर संतती होणारच असे जरी वरवर वाटत असले तरी कुंडलीला पुढे येणाऱ्या दशा-अंतर्दशांचाही विचार व्हावा. येणाऱ्या दशा चतुर्थ स्थानाचीच फळे देत आहेत.   
कृष्णमुर्ती (के.पी.) पद्धतीने : 
  • पंचम स्थानाचा सब लॉर्ड आहे रवि. आणि तो पुढीलप्रमाणे कार्यरत आहे :                                                                               
  •   रवि    ४   ७                                                                                                                                   
  •   न. स्वा. चंद्र  २  ६                                                                                                                          
  •  सब लॉर्ड राहू  ४  ४  ९                                                                                                                     म्हणजे कुठेही पंचम स्थानाचा लवलेश नाही. चंद्र जरी द्वितीय स्थानाचा कार्येश होत असला तरी तो बलवान कार्येश ग्रह नाही. 
  • तीच गात द्वितीय आणि लाभ स्थानाच्या सब लॉर्डची आहे. कुठेही पंचम,द्वितीय आणि लाभ स्थानाचे बलवान कार्येश कोणतेही ग्रह नाहीत. 
  • येणारया दशा- अंतर्दशा,सब period कुठेही संतती होण्यासाठी मदत करत नाहीये. 

सोनाली अगदी आशेने माझ्याकडे पाहत होती. खोटे सांगावे तर व्यक्तीच्या आशा/अपेक्षा वाढतात आणि खरे सांगावे तर ते कसे ? शेवटी तिला म्हणाले,"तुझ्या कुंडलीत मला संततीबाबत जे चित्र दिसतंय ते असं आहे की तुला गर्भधारणा २०१२ला पुन्हा होईल परंतु खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरी सोडावी लागेल. Bed Rest compulsory आहे. डॉक्टरांनी दिलेले पथ्य -औषधे काटेकोरपणे सांभाळावे लागतील. त्याच बरोबर मी तुला काही स्तोत्र आणि जप देते ते regular करत रहा. आणि माझ्याही contact मध्ये रहा." ती खूप खुश झाली. "हो नक्की हे सगळे मी व्यवस्थित लक्षात ठेवेन. कळवते तुम्हाला."

 त्यानंतर  ऑगस्टमध्ये तिचा फोन आला. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करतेय. आणि मला  शंका आहे कि मी गरोदर आहे. माझी डॉक्टर दोन दिवसांनी येणार आहे बाहेरगावहून. तपासणीनंतर बातमी confirm  होईल."  सोनालीचा आनंद ओसंडून वाहत होता पण मला खूप tension आलं. तिला म्हटले," Congrats. पण काळजी घे. जे जे सांगितले आहे ते सोडून देऊ नकोस. स्तोत्र वाचत रहा. आणि जमल्यास नोकरीत रजा घेतलीस तर बरे होईल. आणि मला कळवत रहा." "हो हो नक्की" असे म्हणून सोनालीने फोन ठेवला. 

सप्टेंबरच्या गौरी- गणेश उत्सवात एक दिवस मला सोनालीचा फोन आला. फोनवर बोलण्यापेक्षा सोनालीचे नुसते हुंदकेच ऐकू येत होते. मी समजले. तिला म्हटले, "सोनाली शांत हो. आणि …… "  मी काही म्हणण्याआधी सोनालीचे,"पण असे कसे झाले…. मी कोणाचे काय बिघडवले आहे ? माझ्याबरोबर असे का होतंय  ????". तिला काय समजवणार. 

काही Cases मनाला खूप चटका लावून जातात. पुढच्या आमच्या भेटीत मी सोनालीला ज्योतिष-शास्त्र काय सांगते हे नीट समजावून सांगितले. ती बरीच शांत दिसत होती. "मग असेच होणार असेल तर मग मी मुलं  दत्तक घेतले तर ?"  हा तिचा आशावादी स्वभाव मला खूप आवडला. जे नाहीच मिळणार त्यावर रडत राहण्यापेक्षा तिने नवीन मार्ग स्वीकारला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

वाचकांसाठी काही सूचना

वाचकांसाठी काही सूचना 


 सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात ? दिवाळीची खरेदी सुरु केली कि नाही ??  सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारया वर्षात तुम्हा सर्वाना समृद्धी,बुद्धी आणि भरपूर धन-संपत्ती मिळो ही सदिच्छा.

 सध्या ब्लॉगच्या  वाचकांची संख्या जशी वाढतेय त्याच पटीने मला रोज ई-पत्रातून मला सतत विचारणा होत होती की मैडम तुम्ही article कधी लिहिणार ??? ब्लॉग अत्यंत वाचनीय आहे तुम्ही लिहित रहा वगैरे. काही वाचकांनी मला articles च्या संदर्भात suggestionsही दिले आहेत त्याचा मी जरूर विचार करेन. 

बरे आता मुद्याकडे वळूया. सध्या मला बरयाच ई -पत्राद्वारे "Consultation" साठी सतत विचारणा होत आहे. आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे वाचकांची संख्या वाढते आहे आणि वाचक फक्त मुंबई तलेच नसून मुंबई बाहेरही जसे पुणे,नागपूर, नाशिक,कोल्हापूर,बंगळूरू,दिल्ली,राजस्थान,केरळ कर्नाटक,हैदराबाद आणि भारताबाहेरून ऑस्ट्रेलिया,अमेरिका, इंग्लंड,जर्मनी,आफ्रिका,दुबई,रशिया, फिलिपिन्स इ. देशातूनही आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि त्याचे प्रश्न वेगळे. प्रत्येकालाच समस्या आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यची सर्वांचीच धडपड सुरु आहे. काहीना लग्न जमत नाही म्हणून tension आहे तर काहीना लग्नानंतरच्या घरी होणारया वादविवादांमुळे Tension. काही वाचकांना पैसे हातात टिकत नाही ही समस्या तर काहींना आलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे ही समस्या. काही जोडपी बाळ होत नाही म्हणून चिंताग्रस्त आहेत तर काही आपले बाळ खूप हट्टी आणि मस्तीखोर आहे म्हणून चिंताग्रस्त. 

समस्या आहेत तसे त्याचे समाधानही आहे. बरयाच वाचकांनी ह्याच संदर्भात मला विचारणा केली आहे की आम्हालाही तुमच्याकडून ज्योतिषीय मार्गदर्शन हवे आहे परंतु तुम्ही मुंबईत आणि आम्ही इथे लांब ?? किंवा काही वाचक मुंबईत आहेत परंतु सध्या ऑफिसमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी मिळतेच असे नाही आणि सुट्टी असली तरी त्या दिवशी नेमके घरी पाहुणे यायचे असतात किंवा काहीतरी प्रोग्राम असतोच मग प्रत्यक्षात येऊन कुंडलीबद्दल discussions होऊ शकत नाही तर ह्याला Option काय ? तर आज त्याबद्दलची माहिती देत आहे,


 ज्यांना वेळेअभावी वा दुसरया कुठल्याही कारणामुळे मला प्रत्यक्ष भेटून  ज्योतिषीय मार्गदर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी फोनवरून अथवा facebook chat  इथून ज्योतिषीय मार्गदर्शन मिळू शकेल. 

 ह्या संदर्भातील काही गोष्टी मला इथे नमूद करीत आहे : 

१) फोनवरून मार्गदर्शन हवे असल्यास माझ्या खाली नमूद केलेल्या  इ-पत्त्यांवर मला आपली माहिती पाठवणे. 

२)माझा ई-पत्ता ( E-Mail IDs ) - vaastupriya@gmail.com किंवा anupriyadesai@gmail.com 
3) आपली कुंडली बनवण्यासाठी मला पुढील माहितीची गरज आहे - 
        अ) आपली जन्मतारीख 
        ब) अचूक जन्मवेळ 
        क) जन्म झाले ते ठिकाण 
जन्मवेळेबाबत बरयाचजणांचा नेहेमी होणारा गोंधळ म्हणजे जन्मतारीख आणि जन्मठिकाण सांगता येते परंतु जन्मवेळ लक्षात नसते त्यामुळे मग काहीजण सकाळी ७ आणि ८ च्या दरम्यान किंवा सकाळी ८ कि संध्याकाळी ८ हे लक्षात नाही असही सांगतात. तुमच्याकडे असलेल्या तुमच्या कुंडलीच्या पहिल्याच पानावर जन्मवेळ लिहिलेली असते परंतु त्यातही स्थानिक जन्मवेळ आणिस्टैन्डर्ड जन्मवेळ असे नमूद केलेले असते. कुंडली बनवण्यासाठी स्टैन्डर्ड जन्मवेळच विचारात घ्यावी लागते. त्यामुळे तीच जन्मवेळ तुमच्या माहितीत नमूद करणे. 
अचूक जन्मवेळ मिळाली तर कुंडली तर Perfect बनवता येते आणि भविष्यही अचूक सांगता येते त्यामुळे जन्मवेळ अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. 
[ कृपया मला तुमच्याकडे असलेल्या कुंडलेची Scan Copy पाठवू नका. बरेच वाचक मला Scan Copy पाठवतात. सध्या Technology च्या दरदिवशीच्या होणारया प्रगतीमुळे Computer वर काही सेकंदातच कुंडली बनवता येते.] 
४) आपल्याला काय समस्या आहेत त्याची थोडक्यात माहिती देणे. 
५) आपल्याला फोनवरून मार्गदर्शन हवे आहे/ई-मेल द्वारे/फेसबुक chat वरून हे स्पष्ट करणे. 
६) Technology ने प्रगती केल्यामुळे कुंडली जरी काही सेकंदात बनवता आली तरी अचूक भविष्य वर्तवणे हे ज्योतिषावर अवलंबून आहे. प्रत्येक कुंडलीचा सखोल अभ्यास करून भविष्यात तुमच्या आयुष्यात घडणारया घटना जसे नोकरीत Promotion,नोकरीत होणारी मानहानी,Propertyत गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना?? संतती कधी होणार ?  भाग्योदय कधी होणार ? ह्या गोष्टी वर्तवण्यास ज्योतिषाच्या बुद्धीची कसोटी लागतेच आणि त्यासाठी अमुल्य वेळ द्यावा लागतो त्यामुळे ही "Professional Service" FREE  नाही.   (Fees प्रत्येक case प्रमाणे वेगळी आकारण्यात येईल)
७) प्रत्येक कुंडलीच्या विवेचानासाठी अर्धा तास देण्यात येईल. त्यामुळी शक्यतो तुमचे प्रश्न एका कागदावर लिहून तयार ठेवावेत म्हणजे फोनवर बोलताना तेवढा वेळ वाचेल. 
८) Appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. appointmentचा जो दिवस ठरलेला असेल त्याच्या दोन दिवस आधी Professional Fees, Bank Account मध्ये transfer करावी. बँक details तुमच्या ई-पत्त्यावर पाठवण्यात येतील.  
९) ज्यांना प्रत्यक्ष येऊन भेटणे शक्य आहे त्यांनीही वरील माहिती मला माझ्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. त्यांना appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. 

आता निरोप घ्यायची वेळ झालीये. मधल्या काळात Consultations मध्ये busy असल्यामुळे लेख लिहिता आला नाही. ह्या अनेक cases पैकी बरयाच कुंडल्या मला वेगळ्या आढळल्या. पुढच्या वेळेस एक अत्यंत Interesting अशी Case घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

ज्योतिषाचे भविष्य

ज्योतिषाचे भविष्य 


प्रसंग एक - संध्याकाळची अनुजला भेटण्याची वेळ ठरली होती ४.३० ची. त्यानंतर शिल्पासाठी ५.३० ते ६.३० ची वेळ आणि त्यापुढे अजून कोणीतरी. पावणे पाच वाजले…पाच आणि सव्वा पाचला मी अनुजला फोन लावला पण त्याचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे असा मला मेसेज येत होता. अपघात वगैरे चे योग तर नव्हते कुंडलीत त्यामुळे मला ती शंका नव्हती. साडे पाचच्या ठोक्याला शिल्पा हजर झाली. तिच्या बरोबर कुंडलीचे discussion झाले. appointments संपता संपता रात्रीचे नऊ वाजले तरी त्याचा फोन नाही. म्हटलं जाऊ दे बघू … दुसऱ्या दिवशी ११.०० ला त्याचा फोन आला,"मैडम आज येऊ का मी ४.३० ला ??" काल येऊ शकलो  नाही त्याबद्दल sorry तर नाहीच नाही त्याबद्दल चक्कार शब्द नाही. मीच विचारले,"काय रे काल का नाही आलास ? आणि फोन नाही काही नाही ?? मी फोन केला तर लागला नाही ?? काय झाले ?".  "तसे नाही हो मैडम काल मी सिनेमाला गेलो होतो. मित्रांबरोबर अचानक प्रोग्राम ठरला. म्हटले उद्या करुया फोन आणि भेटू". मी म्हटले," अरे हो ठीक आहे पण ती  वेळ मी दुसऱ्या कोणालातरी दिली असता ना ??".   अनुज,"नाही माझ्या लक्षातच आले नाही".  आता काय बोलणार ह्या बेजबाबदारपणाला ?? 

प्रसंग दोन - बाजारात एकदा मी भाजी घेत असतना एक बाई," अगं तू xxx ची सून नां ? तूच कुंडली वगैरे पाहतेस ना ? तुझा पत्ता दे मी येईन सवडीने मला वेळ असेल तेंव्हा". मी,"हो काकू मीच कुंडली पाहते. माझा नंबर देते तुम्हाला तुम्ही फोन करून या". "अगं मला फोन लावायला वगैरे जमत नाही. (काकुंचे शिक्षण यथातथाच) तू मला संग कुठे येउन भेटायचे मी येईन." इति काकू. आता ह्यांना appointment वगैरे काय समजावणार?? तरी प्रयत्न केला," काकू अहो मी नक्की भेटेनच असे नाही. कारण लोक appointments आधीच book करून ठेवतात आणि मग ठरल्येल्या वेळेला भेटायला येतात मग ती वेळ दुसरया कोणालाही दिली जात नाही मग व्यवस्थित बोलता येतं आणि घाई होत नाही. आणि तसे ही मी वास्तू - परीक्षणासाठी गेले असेन तर तुमची फेरी वाया जाईल." काकुंच्या चेहेरयावरचे मोठे प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होते." अच्छा असे असते काय ? मला वाटले कधीही येउन तुला भेटू शकेन??"

प्रसंग तीन - संध्याकाळची ७.३० ची वेळ मी गार्गीला(नावाजल्येल्या कंपनीत मोठ्या पोस्टवर) दिली होती. बरोबर त्यावेळेला ती हजर झाली. career आणि लग्न ह्या विषयावर चर्चा (प्रश्न -सत्र ) सुरु झाली. गार्गी खूप महत्वाकांक्षी त्यामुळे career बाबतीत तिच्याकडे  प्रचंड प्रश्नांचे भंडार होते. सध्याचा जॉबमध्ये promotion कधी मिळेल ?? दुसरा चांगला जॉब कधी मिळेल ? तो खूप लांब असेल कि घराजवळ ? नवीन जॉब मध्ये पण हाच job- profile असेल का ? कि वेगळा असेल ? abroad जाण्याचे काही chances आहेत का ? कधी ? कुठल्या देशात जाऊ शकेन ? किती काळ असेन मी तिथे ?? 
career बरोबरच तिचे लग्नाचे भरमसाठ प्रश्न होते. लग्न कधी होईल ?? साथीदार कसा असेल ? कुठल्या शहरातून स्थळ येईल ? मुलगा किती शिकलेला असेल ??  job करणारा असेल कि व्यवसाय ? घराची परिस्थिती कशी असेल ? तो ही भविष्यात abroad ला काम करू शकेल का ? (इथपर्यंत ठीक होते तिचा पुढचा प्रश्न ऐकून ब्रम्हदेवही बुचकळ्यात पडला असता.) मला नणंद असेल का ?? जमेल का माझे तिच्याशी ?? सासू कशी असेल ???  प्रश्न उत्तरे चालूच होती. रात्रीचे साडे- दहा वाजले. मैडम निघाल्या. म्हटलं," जेवून जातेस का? भूक लागली असेल तुला ?" "नाही नको… तुमची फी किती झाली ?" मी म्हटले,"xxx". त्यावर गार्गी,"मैडम माझ्याकडे सध्या एवढेच आहेत आणि मला ह्या वेळेला रिक्षेनेच जावं लागेल. तुम्हाला नंतर आणून दिले तर चालतील का ?? नाही तर उद्याच मी बँकेतून पैसे transfer करते. महटले,"अगं ठीक आहे तू घरी पोहोचणे महत्वाचे. पैसे नंतर दे सावकाश."  मैडम ज्या गेल्या त्यानंतर आल्याच नाहीत. ह्या गोष्टीलाही तीन वर्ष झाली. फेसबुकवर असतात मैडम. नवनवीन फोटो update करतात. कधी ह्या हॉटेलात बसून चहा पितांना कधी कॅफे-कॉफी डे मध्ये कॉफी पितांना. एकदा आठवण केली तर म्हणे सध्या वेळच मिळत नाहीये तुमच्याकडे यायला. मी म्हटलं अगं  transfer  कर ना मग??? त्यावर मैडमचे उत्तर,"माझ्याकडे पैसे नाहीयेत सध्या". मनात म्हटले हे बरे आहे. इतका वेळ घ्यायचा एखाद्याचा, आणि मग अशी वागणूक ???  (महिनाभर काम करून घेतल्यानंतर तुम्हाला Boss ने पगारासाठी पैसे नाहीत असे सांगितले तर कसे वाटेल मैडम?) 

प्रसंग चार - (हा प्रश्न तर मला नेहेमी विचारला जातो) हितेशचे त्याच्या कुंडलीचे संपूर्ण विवेचन झाले. निघता निघता त्याचा प्रश्न मैडम मग तुम्ही कुठे Job करता ?? मी म्हटले," अरे हजारच्या वरती माझे Clients आहेत. रोज १५ ते २० फोन येत असतात त्यांचे प्रश्न- कुंडलीवरून  उत्तरे आणि वास्तू ह्यात संपूर्ण दिवस जातो. मला वेळच नाहीये Job  करायला." 
आणि असाच एक प्रश्न ओळखीतल्या व्यक्तीने विचारला होता," अगं  कॉम्पुटरवर एखाद्या व्यक्तीचे आपोआप भविष्य येतेच ना तेच तू वाचून दाखवतेस ?? बरे आहे तुझे Profession."  मी," काका तुम्ही घ्याना कॉम्पुटर. नाही तरी सध्या Retire झाला आहात. तुम्हीही सुरु करा हा BUSINESS. काय ??" माझा खोचकपणा काकांना समजला. 

प्रसंग पाच - एकदा ट्रेन मध्यॆ सतीश भेटला. हाय हेल्लो झाल्यावर त्याचे प्रश्न सुरु झाले. "मैडम आता मला गुरु आठवा येतोय ना ?" माझा प्रश्नार्थक चेहरा बघून सतीशने त्याच्या ज्ञानाचा (अर्धवट ) पेटारा उघडला. "अहो असं काय करताय माझी कर्क रास नाही का ?? साडेसाती सुरु आहे मला ? मला नवीन जॉब शोधायचा आहे. काय करू ?सध्या योग आहेत का माझ्या पत्रिकेत ?"  आता मी काय बोलणार ह्यावर ह्याची पत्रिका  मला पाठ असल्याप्रमाणे तो बोलत होता. मी म्हटले,"अरे तू मला नंतर फोन कर सध्या मला नही आठवत तुझी पत्रिका." त्यावर सतीश," अहो विसरलात ?? लक्षात राहायला हवी तुम्हाला माझी कुंडली ??"  आता ह्याला काय सांगायचे रोज १५ - २० फोन येतात कुंडली बघण्यासाठी. प्रत्यक्ष ६-७ जण  रोज भेटायला येतात म्हणजे averagely रोज २२ कुंडल्या नजरेखालून जातात आता ह्यात ह्याची कुंडली कुठली बाबा ??? तरी काही न म्हणता त्याला म्हटले," नाही रे लक्षात राहत. तू फोन कर"  


ह्या आणि अशा अनेक अनुभवानंतर मला लोकांची चीड येण्यापेक्षा कीव येते. कारण समाज अजुनही बुरसटल्येल्या विचारांचाच आहे. आधी जसे गुरुजी देवळात पूजा आटोपली कि कुंडली वाचनाला बसायचे. मग एकेका श्रद्धाळूंची  कुंडली पाहत त्यांचे प्रश्न सोडवायचे. प्रश्न म्हणजे काय तर फार फार तर मुलाचे किंवा मुलीचे लग्न कधी होईल ?  मंगळ आहे का ? कालसर्प  दोष आहे का ?  एवढेच प्रश्न. मग गुरुजी कुठली तरी शांती सांगायचे आणि मंडळी निघायची, निघताना गुरूजीना ११/- नाही तर काही फळ अथवा धान्य ठेवले जायचे. बस्स एवढेच communication. मी इथे ज्योतिषांना दोष देत नाहीये पण त्यावेळी प्रश्नच मर्यादित होते. जसा जसा समाज प्रगत होतोय प्रश्न वाढत चालयेत ( हास्यास्पद असले तरी हे सत्य आहे) 

पूर्वी ज्योतिषविद्या ही परंपरागत पद्धतीने मिळायची. सध्या गल्लोगल्ली ज्योतिषशास्त्राचे क्लासेस आहेत. ज्यांना आवड आहे ते हे शास्त्र शिकू शकतात. पण आवड म्हणून शिकणे आणि सखोल अभ्यास करून भविष्य वर्तवणे ह्यात फरक आहे. 

परंतु समाज अजूनही ह्याच गैरसमजुतीत आहे ज्यात पूर्वीच्या ज्योतिषाची त्यांच्या मनातील Image तशीच राहिली आहे. ज्योतिष-शास्त्राला महाराष्ट्रात अंधश्रद्धा मानून ह्या शास्त्राला आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही विद्यापीठात शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली नाही. महाराष्ट्राबाहेरून तुम्ही ह्या विषयात Ph.D करू शकता. आहे ना आश्चर्य ??? 

सध्या मला भरपूर E - Mails येत आहेत. कुंडलीबद्दल विचारले जाते. त्यांच्यासाठी सुद्धा खालील माहिती :
१) ज्योतिषाचे ज्ञान घेण्यास फार वेळ लागत नाही पण अचूक भविष्य सांगणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. अनुभवावरूनच अचूक भविष्य सांगता येते. त्याला सतत वाचन मनन चिंतन  ह्याची गरज असते.  (त्यामुळे त्या ज्ञानाचा आणि ज्योतिषाच्या वेळेचा मान ठेवून फुकटात भविष्य ऐकायला मिळेल ह्या भ्रमात राहू नका )
२) नुसते राशीवरून लोकांचे वर्णन करणे सोप्पे आहे त्यांच्या आयुष्यात घडणारया घटना कधी घडतील हे अचूक सांगता येणे म्हणजे खरे ज्योतिष.
३)  सध्या ज्योतिषांकडे जाण्याआधी त्यांची रीतसर appointment घ्यावी. तुम्ही busy आहात तसेच astrologer ही busy असतात ह्याचे स्मरण ठेवा. 
४) ठरलेल्या वेळी तुम्हाला जाता येणार नसेल तर फोन करून ज्योतिषाला तसे सांगा तुम्हला देलेली वेळ दुसऱ्या गरजवंताला देता येईल.  
५) ज्योतिषाकडे सगळे प्रोब्लेम्स घेऊन येणाऱ्यांचा भरणा जास्त असतो त्यामुळे अमुक एका माणसाची appointment cancel करून ती वेळ मला द्या हे सांगणे उचित नाही. 
६)रस्त्यात कोणी ज्योतिषी भेटले तर स्वतःच्या कुंडलीबद्दल चौकशी करू नका. ज्योतिषांना रोज कित्येक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो … प्रत्येक कुंडली लक्षात राहतेच असे नाही.  
७)  तुम्हाला सांगितले गेलेले भविष्य अचूक ठरले किंवा नाही हे त्या ज्योतिषाला नक्की कळवा. काही अभ्यासू ज्योतिषी स्वतःचे Research करतात त्यामुळे ते त्यांना कळवणे जरुरी आहे. 

त्यामुळे please वाचकहो ज्योतिषीकडे आणि त्याच्या professionकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

गुरुवार, २७ जून, २०१३

Medical Astrology - My Fav. Subject


Medical Astrology - My Fav. Subjec

ही आहे नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना मला कुंडलीतील ६ वे स्थान आणि ८ वे स्थान नेहेमी अचंबित करायचे. ह्या स्थानांवरून व्यक्तीला होणारे त्रास/ रोग इ पहिले जातात. ज्यांना ज्योतिष-शास्त्र म्हणजे नेहेमी "राशी भविष्य" इतकेच वाटते त्यांच्यासाठी इथे नमूद करते, जसे Graduation घेताना काही विषयात specialisation करून तुम्हाला Degree मिळते त्याचप्रमाणे ज्योतिष-शास्त्रातही प्रत्येक ज्योतिषाची एक आवड असते त्यानुसार त्याचा अभ्यास आणि भविष्य वर्तवणे असे असते. म्हणजे काही ज्योतिषी Natural -Calamities वर अभ्यास करतात आणि भविष्यात होणारे भूकंप,पूर इ. बद्दल सांगू शकतात.त्यांना मेदनिय ज्योतिष किंवा इंग्लिशमध्ये "Mundane Astrology" असे म्हटले जाते. काही ज्योतिषी फक्त राशी भविष्यच सांगू शकतात, काहींचा जातकाला होणारे रोग त्याची कारणे त्यावरचे इलाज ह्यावरचा अभ्यास असतो त्यांना "Medical astrologer" संबोधले जाते, काहींना जातक काय शिक्षण घेणार आहे,काय Carrier करेल ह्याचा अभ्यास करायला आवडतो, काही ज्योतिषांना सगळ्याच विषयात इंटरेस्ट असतो.

मला मात्र Medical Astrology मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच आज मी नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली explain करणार आहे. सध्या मंडेलांना फुफ्फुसाचे Infection झालेले आहे. फुफ्फुस हा अवयव कर्क राशीवरून पहिला जातो. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी, प्रत्येक रास ही व्यक्तीचे वेगवेगळे अवयव दर्शवते. जसे मेष रास मेंदू/डोक्याचा भाग, वृषभ रास घसा/गळा/डोळे इ. फुफ्फुस/छातीचा भाग हा कर्क राशीवरून आणि चतुर्थ व दशम स्थानावरून check केला जातो. आता कर्क रास म्हणजे कुंडलीत जिथे "4" आकडा लिहिला आहे.

चतुर्थ स्थानात म्हणजेच जिथे १२ लिहिले आहे तिथे एकही ग्रह नाही. दशम स्थानात म्हणजेच जिथे ६ आकडा आहे तिथे मंगळासारखा उष्ण ग्रह आहे. द्शमचा स्वामी बुध अष्टमात आहे आणि तो ही शनि सारख्या ग्रहाच्या युतीत.

जिथे ४  आकडा लिहिला आहे ते कुंडलीतील अष्टम स्थान आहे. अष्टम स्थानावरून व्यक्तीला होणारे त्रास/मृत्यु ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मंडेलांच्या कुंडलीत अष्टम स्थानातच आणि कर्क राशीतच रवि,शनि,बुध आणि नेपच्यून सारखे  ग्रह आहेत त्यामुळे Lungs Infection होणे स्वाभाविक आहे.

ह्या कुंडलीला सध्या राहू महादशा सुरु आहे. राहू - १२, ६   न. स्वा. बुध ९, ७, ८,११
राहू अंतर्दशा आणि शुक्र विदशा सुरु आहे. शुक्र - ६,  १२   न. स्वा. मंगळ ११, ६ (२६ जुलै पर्यंत)
त्यामुळे Hospitalisation/Medicines इ. स्पष्ट दिसतेच आहे. सध्या प्रकरण खूप serious आहे. २३ जूनला बुध प्राण दशा सुरु झाली आहे ती १६ जुलै पर्यंत आहे. बुध ९,७, ८, ११  न. स्वा. बुध ९,७, ८, ११ त्यामुळे मंडेला ह्यांची प्रकृती जरी सुधरली तरी पुन्हा खालावण्याचे chances आहेत. 

माझ्या बुद्धीने जितके जमेल तितके सोप्पे करून वाचकांसाठी ही कुंडली explain केली आहे. अभिप्राय नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com वर 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

रविवार, २३ जून, २०१३

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 

गेल्या आठवडाभरात वाचकांचे सतत e-mails आणि फोन येत होते ब्लॉगवर लिहा म्हणून. पण पावसाला सुरु झाला आणि सर्दी-खोकला झाला त्यामुळे काही लिखाण करता आले नाही. क्षमस्व. एक लेख लिहायचा म्हणजे दोन तास गेले. त्यामुळे आजही लेख लिहिण्यापेक्षा एका आमच्या जातक- मित्राने त्याला आलेला शास्त्राचा अनुभव इथे नमूद करतेय. नाव गुप्ततेच्या कारणास्तव लिहिलेले नाही. अनुभव लिहिताना त्याने मोठेपणा मला दिलाय पण तो मोठेपणा शास्त्राचा आहे. त्यामुळे वाचकांनीही शास्त्रालाच महत्व देत हा अनुभव वाचावा. 


श्री स्वामी समर्थ !!!
माझा भविष्य अथवा पत्रिकेवर कधीच विश्वास नव्हता, मी २००७  साली दुबई मध्ये होतो त्या वेळेला सहज कुतहूल म्हणून मी माझी जन्मतारीख ,जन्म वेळ तसेच जन्मस्थान अशी माहिती अनुप्रिया देसाई यांना दिली ,त्यांना अभ्यास करण्यासाठी माझी माहिती हवी होती ,ती देताना पण मी त्यांना सांगितले की या सगळ्यावर माझा विश्वास नाही माझा स्वामींवर विश्वास आहे, पण एक कुतहूल म्हणून आणि तुम्हाला हवी आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतो. त्यांनी माझी कुंडली /पत्रिका बनवली अभ्यास केला आणि ठळकपणे दोन गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे १)तुझे लग्न जुलै-ऑगस्ट  २००८ मध्ये  होईल, २) तुझा प्रेमविवाह होईल. मला खरतरं थोडा धक्का बसला कारण त्यावेळेला मला एक मुलगी आवडत होती पण ही गोष्ट तेव्हा कोणाला माहिती नव्हती.  त्यामुळे मला हा सुखद धक्का होता. 

त्यांनी माझ्या भूतकाळाविषयीही   सर्व गोष्टी अचूक सांगितल्या ,तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या ज्या कालांतराने शत प्रतिशत खऱ्या  निघाल्या. 
१) जुलै  २००८ मध्ये माझा प्रेम विवाह झाला ,
२)मला त्यांनी पुढील वाट चालीसाठी पण मार्ग दर्शन केले ,माझ्या संपूर्ण कुटुंबाची कुंडली त्यांनी बनवली ,माझ्या अनेक मित्रांना पण त्यांनी अचूक भविष्य सांगितले तसेच मार्गदर्शन पण केले .

शनिवार, ८ जून, २०१३

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती …….

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती ……. 


काल माधुरीचा फोन आला. "Madam मुलाचा बारावीचा रिजल्ट लागला. तुम्ही म्हणला होतात ७० आणि ७५ टक्केच्या दरम्यान मार्क्स मिळतील. त्याला ७४% मिळाले."
मी म्हटले," अरे वाह छान. मग पुढचे काय ? पुढे काय म्हणतोय काय करायची इच्छा आहे ?"
"तुम्ही सांगिल्याप्रमाणे त्यालाही सिव्हिल इंजिनीरिंगच करायचे आहे. ते करू शकेल ना ? पुढे काही अडचणी तर येणार नाहीत ना ? कारण तुम्हाला तर माहीतच आहे तो जराही स्थिर नाही. दहावीपर्यंत कसा अभ्यास करून घेतलाय ते  मलाच माहीत.बारावीचाही त्याने शेवटी शेवटी अभ्यास केलाय. त्यामुळे भीती वाटतेय. करेल ना पुढचे नीट?"
काही वेळेस काही जातक पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारात असतात. काळजी वाटत असल्याने ठीक आहे पण म्हणून कुंडलीचे विवेचन एकदा झालेले असताना पुन्हा पुन्हा तेच तेच विचारले कि मग त्रास होतो. कारण उत्तर तर बदलणार नसते. असो तर मी म्हटले, "गेल्यावेळेस आपले बोलणे झाले आहे ना ? करेल तो व्यवस्थित. तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा मी कुंडली check करते."
  "तसे नाही madam पण काय झालेय की मी मध्ये खूप Tension मध्ये होते अमोदच्या रिजल्टच्या संदर्भात,तेंव्हा माझ्या मैत्रिणीने मला एका ज्योतिषाबद्दल सांगितले. मी गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी तर स्पष्ट सांगितले कि हा मुलगा नापास होणार. मंगळ आणि राहूची युति आहे. ह्याला शिक्षणात खूप अडचणी आहेत. पुढे जास्त शिकू शकणार नाही.
मी खूप घाबरले हो. मी म्हटले मग काय करायचे? एकुलता एक मुलगा आहे तो पण नाही व्यवस्थित शिकला तर मग झालेच. त्यावर ते म्हणाले ह्यावर एक उपाय आहे. तो केल्याने तो पासच नाही तर मार्कही तुम्हाला हवे तसे मिळतील. आहे का तयारी ? मी विचारले काय उपाय आहे ? त्यावर त्यांनी मंगळ आणि राहुच्या शांतीचा उपाय सांगितला. ३०,०००/- रु. खर्च होईल पण तो उपाय केल्याने  फरक पडेल असे सांगितले. मला काय करावे काय कळतच नव्हते. मग पुन्हा आमची वारी माझी मैत्रीण दुसऱ्या ज्योतिषाकडे घेऊन गेली. खूप प्रसिध्द आहेत ते. त्यांनी ही तेच सांगितले आणि शांतीचा खर्च ३५०००/- रु.  सांगितला. इतकी घाबरली होते ना  madam घरी आल्यावर मी ह्यांना सांगितले. ते तर इतके रागवले. मला म्हणाले काय गरज होती तिथे जायची? एकदा आपल्याला अनुप्रियाने सांगितलेय ना ?? आणि ही शांती बिंती काही करायची गरज नाही. मी हा खर्च करणार नाही. 
रिजल्ट लागेपर्यंत मी इतकी tension मध्ये होते ना  madam. काय सांगू ?? आणि जिने मला त्या ज्योतिषांकडे नेले होते तिचाही सारखा फोन येत होता. ते ज्योतिषी सारखे तिला फोन करून विचारात होते कि लवकर करा शांती मग मुहूर्त नाहीत आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मग आपल्या हातात काहीच नाही वगैरे. पण ह्यांनी नाहीच सांगितलेले त्यामुळे मी तिला तसे सांगितले. 

आणि रिजल्टच्या  दिवशीतर मी सगळे फोन बंद केले होते. सगळ्या नातेवाईकांना काय सांगायचे ह्याची भीती. मुलगा घरी आला तेंव्हा रिजल्ट कळला आणि इतका आनंद झाला ना. हे पण म्हणाले बघ उगीचंच tension घेतलं होतीस. अनुप्रियाने ७० आणि ७५ च्या दरम्यान सांगितलं होत ७४%मिळाले आणि ते ही कुठलीही शांती बिंती न करता."

एका दमात माधुरी बाईनी आपली कहाणी सांगितली. ऐकून रागही आला आणि समाधानही वाटले.  माधुरीच्या ह्यांनी शास्त्रावर दाखवलेला विश्वास मला नवी स्फूर्ती देऊन गेला. माधुरीला सांगितले,"चला बरे झाले त्या निमित्ताने तुम्हालाही कळले ढोंगी लोक कसे असतात ते. आता लक्षात ठेवा आणि काळजी करू नका. अमोदची कुंडली व्यवस्थित आहे. काहीही अडचणी नाहीत. पुढचेही सगळे व्यवस्थित होईल."

ह्या शास्त्राचा वापर बरेच लोक आपल्या फायद्यासाठी करतात. लोकांना घाबरवून,खोटे सांगून पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग असतात ह्यांच्या कडे. पण लोकांनी सद्सदविवेकबुद्धीने विचार करावा म्हणून ही Case आज इथे Publish करतेय. चार दिवसांनी रिजल्ट लागणार आहे आणि त्याची आज शांती करून मार्क्स वाढतील असा विश्वास बरयाच ज्योतिषांकडून (ढोंगी) दिला जातो आणि भरगच्च रक्कम सांगितली जाते. चार दिवसात शांतीने रिजल्ट बदलू शकतो का ?? ह्याचा विचार पालकांनी करावा आणि अशा सगळ्या लोकांना थारा देऊ नये. कारण माधुरीने एकदा का शांती करून घेतली असती आणि रिजल्ट चांगला लागला आहेच तर ह्या ढोंगी लोकांनी त्याचे सर्व credit स्वतःला घेतले असते आणि भविष्यात अजून घाबरवून शांती वगैरेचा खर्च उकळला असता. पण अशा लोकांमुळे समाजाचे नुकसान तर होताच आहे त्याचबरोबरीने ह्या शास्त्राचा प्रांजळपणे अभ्यास करणारया लोकांवर(ज्योतिषांवर) मग समाज विश्वास ठेवत नाही आणि मार्गदर्शनापासून वंचित रहातो. 

तुम्हीही नीट विचार करा आणि माधुरीसारखे कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका.
प्रतिक्रिया नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com

 

सोमवार, ३ जून, २०१३

घे भरारी


घे भरारी 

"मला आणि आईला तुम्हाला भेटायचे आहे कधी येऊ ?" समिधाचा २०१०च्या  ऑक्टोबर महिन्यात फोन. कधी भेटायचे तो दिवस आणि वेळ ठरली. ठरल्या दिवशी दोघी आल्या. आईनेच सुरवात केली,"हिचे लग्नाचे योग कधी आहेत ? ते बघा जरा.  आता स्थळ येतात तर ही लगेच नाही म्हणते. अजून शिकायचं म्हणते. आमच्या समाजात मुलीना जास्त शिकवत नाहीत. नोकरी तर करू देत नाहीत त्यामुळे शिकवून काय फायदा ? आणि शिकलेल्या मुलींची लग्न लवकर होत नाहीत हो madam.  B.com. तर झाली त्यानंतर MBA करतेय.  मला तर काही समजत नाही काय करायचं ते. तुम्हीच समजावा."

मी समिधाच्या कुंडलीचा आढावा घेण्यास सुरवात केली. आजकालच्या मुला-मुलींना लग्नाची घाई नसते आणि लग्ना आधी "settle"  व्हायचे असते. त्यामुळे किंवा मग साथीदाराची निवड झालेली असते परंतु सध्या घरी सांगायचे नसते अशा काही कारणांमुळे मग आलेल्या स्थळांना नकार देणे असे प्रकार सुरु असतात. असेच काहीसे मला समिधाच्या बाबतीत वाटले. परंतु तिच्या कुंडलीचा आढावा घेत असतानांच मला जाणवले कि माझा अंदाज साफ चुकीचा आहे. समिधाची कुंडली खालीलप्रमाणे :

समिधाची कुंडली 

वैदिक पद्धतीने :  १) वृषभ लग्न आणि मकर राशीची कुंडली. दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी.
२) मकर राशीचा चंद्र म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या कर्माबद्दल नेहेमीच सतर्क असा माझा अनुभव आहे.  
३) लग्नेश शुक्र जो  षष्ठेशही आहे तो स्वतः धन स्थानात बुधाच्या राशीत. बुध म्हणजे व्यापारीवृती. ज्यांचा बुध चांगला ते मातीही सोन्याच्या भावात विकू शकतील. इथे लग्नेश स्वतः बुधाच्या राशीत.
४) दशम स्थान - ज्यावरून व्यक्ती नोकरी करणार कि व्यवसाय हे समजते. इथे दशमाचा स्वामी शनि सप्तमात  वृश्चिक राशीत. दशमाचा संबंध साप्तमाशी. गेल्या एका लेखात(योगेश पाटील) - आपण पहिलेच दशम आणि सप्तम ह्यांचा संबंध म्हणजे व्यक्ती मुळातच व्यापारीवृत्तीची असते.

कृष्णमुर्तीपद्धतीने :  १) लग्नाचा SL - गुरु - १०, ८, ११   NL -  गुरु - १०, ८, ११  म्हणजेच लग्नाचा सबलॉर्ड सुद्धा दशमाचा कार्येश. ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे निश्चित.

२) षष्ठ स्थानाचा SL - बुध - १२, २, ५  NL - चंद्र - ८  ३)षष्ठाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश म्हणजे नोकरी करणार नाहीच आणि केली तरी फार काळ टिकणार नाही.

मी आईना म्हटलं," ही काही नोकरी करणार  नाही."

मी पुढे काही बोलण्याच्या आधीच आई," मग तेच तर म्हणते मी. नोकरीसाठी आम्ही काही बोलत नाही पण मग लग्नाचं तरी बघावं."

जेंव्हा समिधा माझ्याकडे आली होती तेंव्हा तिला राहू महादशा आणि  बुधाची अंतर्दशा सुरु होती. बुध - १२, २, ५  NL - चंद्र ८ ३. बुध अंतर्दशा संपणार ऑक्टोबर २०१२ला. म्हणजे तोपर्यंत तरी MADAM बोहल्यावर चढणार नाहीत हे नक्की. आईना तसे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड झाला.
आता समिधाची कळी खुलली. समिधा," तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी दोन ते तीन ठिकाणी नोकरीसाठी गेले होते परंतु प्रत्येक ठिकाणी ३ दिवसापेक्षा जास्त राहूच शकले नाही. मला नोकरी करायची नाही हे मी निश्चित केले आहे आणि दोनच दिवसापूर्वी मी एका सेमिनारला गेले होते तिथे एका BUSINESS बद्दल सांगत होते. मला त्यांचा CONCEPT आवडला. त्यांनी खूप छान EXPLAIN  केले. त्यांची FRANCHISEE घ्यायची आणि BUSINESS पुढे चालवायचा. सुरवातीला सगळी मदत ते करणार. जागा आपली आणि ७ ते ८ जण आपल्याला ह्या कामासाठी लागतील."
मी म्हटले,"O.K. पण हा CONCEPT काय आहे ?"
समिधा,"आपल्याला जे MOBILE वर एखाद्या ऑफरबद्दल SMS येतात जसे hmmmm तुम्हाला car loan हवे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा किंवा astrology consultation हवे असेल तर ह्या नंबरवर फोन करा. हे असे sms आपण bulk मध्ये पाठवतो म्हणजेच थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या business बद्दल आपण advertise करायची. ह्यासाठी लागणारा Database (फोन नंबर) ज्यांच्याकडून franchisee घेऊ त्यांच्याकडून मिळणार."

वरती आपण पाहिलेच बुध म्हणजे व्यापार. बुध एखादी गोष्ट खुलवुन सांगू शकतो. बुधाकडे convincing power आहे.  कुंडलीत लग्नात बुध, लग्नेश शुक्र बुधाच्या राशीत आणि षष्ठ स्थानाचा सबलॉर्ड पण बुधच.अंतर्दशाही बुधाचीच.  काय ? काही लक्षात आले का वाचकांच्या ?? 
समिधाला म्हटले,"बिनधास्त सुरु कर."  बाकीचे औपचारिक बोलणे झाले आणि आई आणि समिधा निघणार तेवढ्यात पुन्हा आईंचा प्रश्न,"आमच्याकडे मुली शिकतच नाहीत तर नोकरी कुठून करणार ? हि हुशार म्हणून शिकली पण आता ही म्हणते business करायचा. कस काय व्हायचं हीच पुढे?? पुढचं जाऊदे आता हिच्या बाबांना काय सांगायचं ?? ते तर नाहीच म्हणतील. ही तर म्हणते businessला जागा पाहिजे. मग जागा वगैरे कशी काय होईल ??  कोण देईल जागा ??"
समिधा संपूर्ण गृहपाठ करून आली होती. तिला आई- बाबांच्या विरोधाची कल्पना होती. समिधा,"madam मी जागा बघून ठेवली आहे. सध्या भाडे तत्वावर घेईन. भाडं सुद्धा कमी आहे. सध्या त्या जागेत एक भाडेकरू आहेत. त्यामुळे ती जागा आपल्याला कधीपर्यंत मिळू शकेल हे कळू शकेल का ?"
समिधाच्या कुंडलीत चतुर्थेश आहे रवि. रविची विदशा सुरु होणार मार्चच्या एक तारखेला. तिला म्हटले,"मार्चच्या पहिल्या तारखेला जागा मिळेल".  समिधा खुश झाली.

 मार्चच्या पहिल्या तारखेला आठवणीने तिने फोन केला. जागा ताब्यात आली आणि उद्यापासून म्हणजेच दोन तारखेपासून office सुरु करणार. तिला शुभेच्छा दिल्या. पण एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे बुधाच्या अंतर्दशेत ह्या गोष्टी घडल्या. बुध म्हणजे Duality. आता Dualityचा संदर्भ लागत नव्हता. 

मधल्या काळात ती माझ्या Continuous Contact मध्यॆ होती. तिची प्रगती पाहून आई- बाबांचा विरोध मावळला होता. अत्यंत खुश होती पण बोलता बोलता नेहेमी म्हण्याची मला अजून काहीतरी करायचे आहे पण काय ते काळात नाही. हा business सध्या व्यवस्थित settle होतोय मग अजून एखादा business option चा विचार करतेय. पण options मिळत नाहीयेत. 
आणि २०१२ च्या सप्टेंबरला ती भेटायला आली."madam business तर व्यवस्थित सुरु आहे आणि अजून एक (बुध - duality - दोन business )  संधी मला मिळतेय. माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे त्यांचा घरगुती पापडाचा business आहे. त्यांचे स्वतःचे पापड बनवण्याचे machine आहे. पण सध्या त्यांना त्यांच्या आजारपणामुळे लक्ष देत येत नाही. तर ते machine मला विकण्याची त्यांची इच्छा आहे. रक्कम खूप मोठी आहे आणि machine ठेवायला जागा पण लागेल. जागेसाठी शोधाशोध सुरूच आहे आणि machine साठी लागणारे पैसे आहेत माझ्याकडे. आता प्रश्न एवढाच आहे की  हा business माझ्या कुंडलीला suit होतो का ? आणि पुढे व्यवस्थित होईल ना सगळे ?"
कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. मंगळाच्या अंमलाखाली पापड-लोणची हे पदार्थ येतात. म्हटले,"कर business. हा business suit  होतोय. मंगळाची विदशा सुरु होतेय फेब्रुवारी २०१३ ला. म्हणजेच फेब्रुवारीनंतर business settle होण्यास सुरु होईल." तिला धीर तो कसला ?? जागेची शोधाशोध सुरु होतीच. 

जागा मिळाली जानेवारी २०१३ ला आणि ती सुद्धा आधीच्या जागेला लागुनच. (Duality ) (पुन्हा रवि विदशेतच जागा मिळाली.) machine मिळाली. पापड कारखाना सुरु झाला. पण पापडाच्या business ने उंच भरारी घेण्यास सुरवात केली मार्च महिन्यापासूनच. गेल्याच आठवड्यात समिधा भेटायला आली होती. आधीचा business व्यवस्थित सुरु होताच आणि पापड व्यवसायसुद्धा वेग घेतोय. catering business करणाऱ्या संस्थांशी समिधा contract करतेय. पुढील सहा सात महिन्यात तिला ह्या business कडून बरयाच अपेक्षा आहेत.  

शहरात राहून, खूप शिकून आई-वडिलांचा support घेऊन business करणे  कठीण नाही परंतु एखाद्या गावात राहून शिकून,तिथे एक नाही दोन वेगळ्या पद्धतीचे business करणे तेही घरच्यांचा विरोध असतांना…. हे सोप्पे नाही. समिधा जेंव्हा भेटते तेंव्हा हेच बोलते,"madam हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही कुंडलीवरून माझ्या carrier बद्दल स्पष्टपणे सांगितले आणि मी ठामपणे निश्चय घेऊ शकले."  माझे तिला हेच उत्तर असते,"मी तर फक्त मार्ग दाखवला. मेहनत आणि destiny ही पूर्णतः तुझीच." 

येणारा पुढील काळातही समिधाने अशीच प्रगती साधावी व उंच भरारी घ्यावी ही इच्छा.  
 तिला खूप खूप शुभेच्छा देऊन हा लेख इथे थांबवते.   

Note : बुध हा communication शी संबंधीत आहे म्हणजे computer,mobile इ. पहिला व्यवसाय हा mobile/sms संदर्भात होता आणि त्याचवेळी बुध अंतर्दशा असल्याने हा व्यवसाय खूपच चांगला चालेल ह्या बद्दल कुंडलीने खात्रीच दिली आणि त्याचा प्रत्यय समिधाला मिळाला. दुसरा व्यवसाय हा पापडाशी निगडीत होता आणि त्यावेळी केतू अंतर्दशा आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. पापड व्यवसाय मंगळाच्या अंमलाखाली येतो त्यामुळे तिथेही तिला प्रगती साधता येईल याबद्दल खात्री आहे. 

बुधवार, २२ मे, २०१३

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case 

दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक विचित्र Case आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच असा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टला आली होती. "मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो Passage आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा." 
मी (गेल्या इतक्या वर्षांच्या consultation मध्ये पहिल्यांदा असा प्रश्न मला विचारला गेला)  म्हटले," घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचन मध्ये जाताना वास येतो मग passage च्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?" 
वैशाली," हो बाथरूम आहे. पण बाथरूम मध्ये check केले. हा वास तिथे येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे बरेच महिने Rat kill, Pest Control केले. पण काही फायदा झाला नाही."
"मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?" मी. 
वैशाली,"ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळीच ६ ते ७ च्या दरम्यान येतो नंतर पुन्हा सगळे normal."
माझा बापुडा प्रश्न,"मग तुमच्या building मध्ये काही Drainage pipes खराब झालेत का?"
वैशालीचा कंट्रोल  सुटला,"नाही हो गेले तीन वर्ष हाच वास ठराविक वेळेस घरात त्या passage मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, Drainage Pipes, सिंक सगळे check  करून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास continue राहतो मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे जाणवले आहे. आता बरेचजण  घरी येण्यास पण नाकारतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. मला लहान मुलगा आहे. तो शाळेतून घरी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला कि खूप tension येत. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही."
मी म्हटले,"ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?" 
वैशाली," तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे Tension दूर होईल." 
म्हटले," सर्वात पहिले घरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे आपण समजू. जर तसे आहे तर
 १)घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे  घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.  
२)संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत. 
३) सांजवात घरी झालीच पाहिजे. 
४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या स्तोत्रात बरीच अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरु ठेवावी. 
५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी पायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडणे. 
६) दोन - तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ गुरुजींकडून करून घेणे. 
हे सगळे करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला."

वैशालीने निट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. " भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग वगैरे." 
म्हटले,"ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?" 
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू. 
ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले. 
वैशाली हसत हसत म्हणाली," अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते."
मी म्हटले," ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु  आहे ना ?"
वैशाली," उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरु केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेलीये. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरु आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झालीये. thanx to you अनुप्रिया."
"अरे मला काय thanx ??? हे तर त्या स्तोत्रांची कमाल आहे. continue ठेवा म्हणजे झाले."
खूप आनंद झाला हे सर्व ऐकून. आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा कि नाही ह्यात संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले कि हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहीना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.

लोकांना असाच शास्त्राचा फायदा होवो ही सदिच्छा.                 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD