Medical Astrology - My Fav. Subject
मला मात्र Medical Astrology मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच आज मी नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली explain करणार आहे. सध्या मंडेलांना फुफ्फुसाचे Infection झालेले आहे. फुफ्फुस हा अवयव कर्क राशीवरून पहिला जातो. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी, प्रत्येक रास ही व्यक्तीचे वेगवेगळे अवयव दर्शवते. जसे मेष रास मेंदू/डोक्याचा भाग, वृषभ रास घसा/गळा/डोळे इ. फुफ्फुस/छातीचा भाग हा कर्क राशीवरून आणि चतुर्थ व दशम स्थानावरून check केला जातो. आता कर्क रास म्हणजे कुंडलीत जिथे "4" आकडा लिहिला आहे.
चतुर्थ स्थानात म्हणजेच जिथे १२ लिहिले आहे तिथे एकही ग्रह नाही. दशम स्थानात म्हणजेच जिथे ६ आकडा आहे तिथे मंगळासारखा उष्ण ग्रह आहे. द्शमचा स्वामी बुध अष्टमात आहे आणि तो ही शनि सारख्या ग्रहाच्या युतीत.
जिथे ४ आकडा लिहिला आहे ते कुंडलीतील अष्टम स्थान आहे. अष्टम स्थानावरून व्यक्तीला होणारे त्रास/मृत्यु ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मंडेलांच्या कुंडलीत अष्टम स्थानातच आणि कर्क राशीतच रवि,शनि,बुध आणि नेपच्यून सारखे ग्रह आहेत त्यामुळे Lungs Infection होणे स्वाभाविक आहे.
ह्या कुंडलीला सध्या राहू महादशा सुरु आहे. राहू - १२, ६ न. स्वा. बुध ९, ७, ८,११
राहू अंतर्दशा आणि शुक्र विदशा सुरु आहे. शुक्र - ६, १२ न. स्वा. मंगळ ११, ६ (२६ जुलै पर्यंत)
त्यामुळे Hospitalisation/Medicines इ. स्पष्ट दिसतेच आहे. सध्या प्रकरण खूप serious आहे. २३ जूनला बुध प्राण दशा सुरु झाली आहे ती १६ जुलै पर्यंत आहे. बुध ९,७, ८, ११ न. स्वा. बुध ९,७, ८, ११ त्यामुळे मंडेला ह्यांची प्रकृती जरी सुधरली तरी पुन्हा खालावण्याचे chances आहेत.
माझ्या बुद्धीने जितके जमेल तितके सोप्पे करून वाचकांसाठी ही कुंडली explain केली आहे. अभिप्राय नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com वर
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा