मंगळवार, २६ मार्च, २०१३

कधी होणार मी आई ??

कधी होणार मी आई ??


नोकरी - व्यवसाय ह्यावर आपण मागील लेखात काही उदाहरणे पहिली आज आपण कुंडलीतल्या "पंचम स्थानावर" अभ्यास करणार आहोत. पंचम स्थानावरून खालील गोष्टी कळू शकतात  : 
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ?  इ. गोष्टी पाहता येतात. 

पण ह्या पंचम स्थानाचा संबंध जर "लाभ" स्थानाशी असेल तर संतत्ती होण्यास काही त्रास नसतो. परंतु पंचमाचा संबंध जर "अष्टम", "चतुर्थ" किंवा "व्यय" स्थानाशी आला तर मात्र संतत्ती होण्यास त्रास असतो. आता हा त्रास म्हणजे नक्की काय तर, 
१) काही वेळेस कुंडलीतल्या बाकी योगांबरोबर पंचम स्थान जर अष्टमाशी व लाभ स्थानाशी निगडीत असेल तर संतत्ती होते परंतु पाहिल्यावेळेस "Miscarriage" होण्याची शक्यता असते किंवा संतत्ती होते परंतु "सिझरियान" पद्धतीने.  
२) जर पंचमाचा चतुर्थ व व्यय स्थानाशी संबंध आला तर "Miscarriage" तर होतेच परंतु पुन्हा "Conceive" होण्यासाठी व झाल्यावर प्रचंड काळजी घ्यावी लागते.  

आज आपण अश्याच एका कुंडलीचा आढावा घेणार आहोत ज्या कुंडलीत पंचम स्थानाशी निगडीत चतुर्थ व व्यय स्थाने असून एकदा "Abortion" करावे लागले व नंतर संतती झाली आहे. आज पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करणार आहोत : 

ज्योतीची कुंडली 

पारंपारिक पद्धतीने : मिथुन लग्न व कुंभ राशीची ही कुंडली आहे. ह्या कुंडलीत पंचम स्थानात शनि व रवि सारखे ग्रह आहेत. पंचमात तुळ रास व त्या राशीचा मालक शुक्र स्वतः "चतुर्थ" स्थानात. (वरती आपण पहिलेच कि पंचमाचा जेंव्हा चतुर्थाशी संबंध येतो तेंव्हा संतत्ती होण्यास त्रास असतो.) 

कृष्णमुर्ती पद्धतीने : पंचम स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी  (Sub Lord) हा शनि आहे व शनि पुढीलप्रमाणे कार्येश : शनि - ४,८,९ . शनि स्वतः राहूच्या नक्षत्रात व राहू - १ ,५,१२. तुमच्या लक्षात आलेच असेल इथेही पंचमाचा चतुर्थ व अष्टम स्थानाशी संबंध आला आहे. 

 वरील नमूद केलेल्या योगांमुळे ह्या स्त्री जातकाला( नाव : ज्योती) गर्भधारणा झाली परंतु ही गोड बातमी तिला स्वतःला कळण्या आधी एक घटना घडली. ज्योती नेहेमीप्रमाणे कामावर जात असताना तिला पोटात दुखू लागले परंतु फारसे दुखत नसल्याने तिने दुर्लक्ष केले व नेहेमीचे तिचे Jobचे  Routine सुरु झाले. दुपारी जेवणानंतर तिच्या पोटात जास्तच दुखू लागले. Office मधून सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे जावे असे तिने ठरवले व ललितलासुद्धा  (नवरयाला ) तसे कळवले.  Office मधून निघून रेल्वेचा प्रवास करत(याही परिस्थितीत) ज्योती घरी आली. नेहेमीच्या डॉक्टरनी तपासल्यावर ताबडतोब Hospital मध्ये Admit करण्यास सांगितले. Hospital ला पोहोचेपर्यंत ज्योतीची शुद्ध हरपली. आता सर्वांना गांभीर्याची कल्पना आली व ज्योतीची काळजी वाटू लागली.

तिच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ललितला धक्का बसला. ज्योती गरोदर होती व दीड महिना उलटून गेला होता. (मुलींना pregnancyची news दीड ते दोन महिन्यानंतर  कळते.) आणि बाळची वाढ ही गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत होती ज्यामुळे बाळ वाढू शकले नाही व अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला व ज्यामुळे ज्योतीच्या जीवालाही धोका निर्माण झाला. वेळीच ज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. काही दिवसांच्या उपचारानंतर ज्योतीला घरी पाठवण्यात आले व पुढचे काही महिने आराम व काळजी घेण्यास सांगितले.

ह्या सगळ्या घटनेनंतर जेंव्हा ज्योती मला भेटण्यास आली तेंव्हा तिला काही उपाय व एका स्तोत्रचे पठण नियमित करण्यास सांगितले. मधल्या काही महिन्यांनतर ज्योतीचा फोन आला तो गोड बातमी देण्यासाठी परंतु बातमी देताना तिच्या आवाजात काळजीही मला स्पष्ट ऐकू येत होती. तिला दिलेल्या स्तोत्राच्या पठणाची  पुन्हा आठवण करून दिली व हे ही सांगितले की तुला संतत्ती होईल, सिझर करावे लागेल त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवणे.  

म्हणजे पहा ग्रह आपले काम कसे चोख निभावतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ललितचा फोन आला, हसता हसता म्हणाला," मुलगा झाला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिझर करावे लागले. ज्योतीची तब्येतही व्यवस्थित आहे. बाळाबरोबर भेटायला येऊ नक्की".

कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com

Bye


 Note : 

इथे पंचम स्थानाचा सब-लॉर्ड शनि हा  ४,८,९ चा कार्येश असून राहूच्या नक्षत्रात आहे व राहू पंचमाचा कार्येश आहे. त्यामुळे आधी Abortion करावे लागले परंतु नंतर संतत्ती झाली. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


रविवार, २४ मार्च, २०१३

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge 

ह्या शास्त्राचा अभ्यास करताना काही कुंडल्या मनाला चटका लावून जातात तशा काही कुंडल्या खूप हसवून जातात. मागच्याच आठवड्यात सुनीलने फोने केला आणि भेटण्याची वेळ ठरली. जी वेळ ठरली होती त्यावेळी तो आला …. त्याची कुंडली वाचायला सुरु केले आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 

वृश्चिक लग्न व मकर राशीची कुंडली. पण कुंडलीतल्या अष्टम स्थानात असलेली शुक्र,मंगळ आणि राहूची युती  बरेच काही सांगून गेली. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते :
१) अष्टम स्थानावरून तुमच्या शारीरिक संबंधांचा अभ्यास होतो.
२) शुक्र हा मुळातच Romantic आहे. शुक्र प्रधान व्यक्तींना टापटीप राहायला आवडते. सर्वांनी मला पहावे माझ्या मोहात पडावे अशा काही धारणा शुक्र प्रधान व्यक्तींच्या असतात. शुक्र हा कामातुर आहे. 
३) मंगळ आक्रमक,वर्चस्व गाजवणारा,परिणामांचा विचार न करताच एखादी गोष्ट करणे,हट्टी इ. असा ग्रह. तर …. 
४) राहु हा फसवा आहे. खोटे आकर्षण आहे. 
सुनीलची कुंडली 
मग पहा शुक्र जो मुळातच प्रणयी,मंगळ  आक्रमक व हट्टी,राहू खोटे आकर्षण तर अष्टम स्थान हे शारीरिक संबंध दाखवते हे संपूर्ण COMBINATION सुनीलच्या कुंडलीत हजर होते. आता मुळ मुद्याकडे वळूया,

सुनीलने प्रश्न विचारण्यास सुरवात केली : १) माझे पैसे खूप खर्च होतात. SAVINGS होत नाहीत. 
२) माझ्या BUSINESS मध्ये माझी कधी प्रगती आहे?
३) बायकोचे आणि माझे जराही पटत नाही.. ती सारखा संशय घेते.मी खूपच साधा आहे हो तिला पटतच नाही. मी मुलींशी बोलतही नाही हो. बघाना तुम्हालाही पत्रिकेवरून समजलेच असेल. 
सुनीलचे शेवटचे वाक्य ऐकून उडालेच. सरळ सरळ CHALLENGE ?? मी सुनील विचारले," ह्या आधी कुठल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवली आहे का?" अपेक्षित उत्तर आले "नाही". मी म्हटले,"ठीक आहे. आत्ता ऐका …. तुमची पत्रिका मला हे सांगतेय की तुम्ही मुलींपासून जरा सावधान. त्यामुळे तुम्हाला खूप मनःस्ताप होऊ शकतो. तुम्ही मुलींशी बोलतच नाही ही चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने तरी तुम्ही सावधगिरी बाळगावी. येत्या काळात एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही."

आत्ता उडण्याची वेळ सुनीलची होती. चेहरा पूर्णपणे पडला. थोडावेळ शांततेत गेला. आणि सुनील उदगारला," ताई मी एकदा एका मुलीकडून फसवलो गेलो आहे. ती माझ्याबरोबर फिरायची.. खुपदा आम्ही तसेही भेटलो आहे(इथे सुनील शारीरिक जवळीकीबद्दल बोलत आहे) आणि तिने मला माझ्याकडून बरयाचदा पैसेही घेतले होते. तिला सोन्याचे दागिनेही करून दिलेत परंतु नंतर तिचे लग्न झाले आणि ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली."

मी म्हणाले," ठीक आहे जी चूक होऊन गेली ती गेली परंतु ह्यापुढे जरा आवरा स्वतःला …. नाहीतर कोणीही वाचवू शकणार नाही."

सुनीलचा पुढचा प्रश्न," ACTUALLY ताई तिचा मला सारखा फोन येतो. ती आत्ता पुन्हा मुंबईत आली आहे. तिचे तिच्या नवरयाबरोबर जराही पटत नाही. तिच्या नवरयाचे बाहेर संबंध आहेत असा तिला संशय आहे.  त्यामुळे तिने सर्व लक्ष तिच्या carrier वर केंद्रित केले आहे. तिला माझ्याबरोबर BUSINESS करायचा आहे. गुंतवणूक तिचा नवरा करणार आहे… त्यामुळे मला फक्त मेहनत करायची आहे … चालेल का??" (सुनीलने आधी विचारलेले प्रश्नांची उत्तरे ह्या त्याच्या नविन प्रश्नात लपलेली आहेत हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल.)

संतापानेच मी म्हटले," अहो सुनील साहेब आताच मी म्हणाले ना की, एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. मग परत परत तेच काय विचारताय ???? Business म्हटले की तुमचा आणि तिचा पुन्हा संबंध आला म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या……. " 

त्यावर सुनील साहेब गप्प. मी एखाद्याला सल्ला देऊ शकते परंतु हेच करा आणि तेच करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी काही  बोलले नाही. मला माहित होते येणारया काही दशा आणि अंतर्दशा सुनीलसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असणार आहेत त्यामुळे त्याला त्याच्या मैत्रिणीकडून आलेली "Offer" स्वीकारावी लागणार आणि पुढच्या घटना क्रमवार घडणार. 

तर अशी आहे आपली कुंडली. आपल्या जीवनाचा आरसा. त्यामुळे जेंव्हा कधी ज्योतिषाकडे गेलात तर त्याला कधी Challenge करू नकाच परंतु खोटेही बोलू नका कारण चाणाक्ष ज्योतिषी तुमचे खोटे लगेच पकडेल.  लक्षात ठेवा नक्की …. 

भेटू लवकरच …. 




                                                               

गुरुवार, २१ मार्च, २०१३

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

ज्योतिषशास्त्र शिकत असताना एकदा माझ्या गुरु कुंडलीतील सर्व स्थाने समजावून सांगत होत्या. एकूण बारा स्थाने आणि प्रत्येकाचे वेगळेच महत्व ,कारकत्व वगैरे… प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः -तुमचा स्वभाव-तुमचे कसे दिसता वगैरे,द्वितीय स्थान म्हणजे धन स्थान-तुमचे कुटुंब, चतुर्थ स्थानावरून मातृसौख्य ,स्थावर इस्टेट,वाहनसौख्य इ. 
जेंव्हा त्यांनी अष्टम स्थानावर बोलण्यास प्रारंभ केला तेंव्हा पहिलेच वाक्य हे होते : 

" अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थान. ह्या स्थानावरून व्यक्तीला आयुष्य किती लाभले आहे हे विचारात घेतले जाते. अष्टम स्थान म्हणजे अपघात … तडकाफडकी आयुष्यात आलेले बदल,प्रवासातील अडथळे ,प्रवासातील त्रास,नोकरीतील बदल, मानहानी - अपमान वगैरे".   तेंव्हा पासून मला नेहेमी ह्या स्थान बद्दल कुतूहल वाटत आले आहे…(म्हणतात ना माणूस  नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करतो) पण ह्या विचारामुळे मला ह्या स्थानाबद्दलच्या बाकीच्याही बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो असा की, शास्त्रकारांनी जरी अष्टम स्थानाला मृत्यू स्थान संबोधले असले तरी त्याच्या खोलवर अजूनही मोठा अर्थ लपलेला आहे. तो अर्थ आज मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगणार आहे. 

साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रशांतने त्याची कुंडली मला दाखवली होती…. तास.. दीड-तास आम्ही त्याच्या कुंडलीवर चर्चा करत होतो. नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर असलेला प्रशांत खूप खुश होता…. येणारे वर्ष कसे असेल ? नोकरीबद्दलचे, कुटुंबाबद्दलचे प्रश्न इ अनेक प्रश्न आम्ही चर्चिले. 
तूळ रास आणि सिंह लग्नाची प्रशांतची कुंडली. कुंडलीचा अभ्यास करता करता मी त्याला प्रश्न विचारात होते…  कुंडलीत शनि महादशा व शनि अंतर्दशा सुरु आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अष्टम स्थानाची म्हणजेच "गुरुची " विदशा सुरु होत होती. (गुरु कुंडलीत - ३,५,८ ह्यास्थानाचा कारक आणि तो राहूच्या नक्षत्रात. राहू - ११ ,२,११ ) मी म्हटले काय रे नोकरी सोडण्याचा काही विचार आहे का?? तो म्हणाला, "छे छे … चांगले चालले आहे …सध्या तरी तसा काही विचार नाही."  मी मनात म्हटले कमाल आहे… कुंडलीच्या दशा-अंतर्दशा तर काही वेगळेच चित्र दाखवताहेत आणि हा तर म्हणतोय कि नोकरी सोडणार नाही…. काय गौडबंगाल आहे बाबा … असा मी विचार करतानाच मला वेगळीच शंका आली…. मी विचारले " अरे तुझा येत्या वर्षात नोकरीच्या निमित्ताने प्रवास तर भरपूर होणार आहे परंतु तू नोकरी सोडशील असे ग्रह म्हणताहेत. तुला कदाचित तडकाफडकी नोकरी सोडावी लागेल.तेंव्हा काळजी घे"  त्यावर त्याचे उत्तर असे होते, " सध्या माझ्यावर कंपनीतल्या कामांची खूप मोठी जवाबदारी दिली आहे… बघू नंतर काही विचार बदलला तर…".   साडेसाती सुरु आहे तेंव्हा स्तोत्र व काही उपाय त्याला करण्यास सांगितले. 

मधल्या काळात त्याच्याबद्दल तो फोनवरून मला "UPDATES" द्यायचा. ऐकून बरे वाटायचे…. 

आणि मार्च महिन्याच्या दुसरया आठवड्याच्या एका रविवारी त्याचा फोन आला," तुम्हाला भेटायचे आहे. मोठा प्रोब्लेम झाला आहे. कधी येऊ भेटायला ??".  ठरलेल्या वेळी तो आला. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून शॉक बसला. त्याच्या office मधल्या त्याच्याचबरोबर काम करणारया निलेशने प्रशांतची कंपनीच्या V. P. (VICE -PRESIDENT ) कडे तक्रार केली होती . प्रशांत दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीये त्याचबरोबर कंपनीच्या पैशांचा दुरुपयोग करतो,कंपनीतल्या managers ना पार्टी देतो वगैरे. हा निलेश स्वतः  V. P. साहेबांचा चेला. एकाच गावातून दोघेही मुंबईत नोकरीसाठी आले. परंतु निलेश नोकरीत बराच मागे राहिला व V. P. बराच पुढे.  परंतु दोघांमधली मैत्री मात्र घट्ट राहिली. जेंव्हा निलेशला कळून चुकले की प्रशांत असे पर्यंत त्याला ह्या कंपनीत पुढपर्यंत प्रगती साधता येणार नाही त्याने प्रशांतबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली.  व कसेही करून प्रशांत स्वतः नोकरी सोडेल असे कटकारस्थान निलेश व V. P.नी रचले. 
 

मार्चच्या  दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी Office ला सुट्टी असून सुद्धा प्रशांतला  V. P. ने office मध्ये बोलावून घेतले व त्याच्याबद्दलच्या तक्रारी त्याला ऐकवून प्रशांतवर आरोप करत त्याला Resignation देण्यास भाग पाडले. प्रशांतने समजावण्याचे खूप प्रयत्न केले. प्रशांतच्या Managerने सुद्धा V. P. ला खूप समजावले परंतु V. P. चा निर्णय पक्का झालेला होता. त्याच दिवशी प्रशांतला Resignation द्यावे लागले.  

प्रशांतला मी सांगितले जे होणार होते ते होऊन गेले. तुला नोकरी नक्की मिळेल. त्याला काही उपाय व मंत्र दिले. 

ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या?? प्रशांतची अष्टम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला Officeमध्ये मानहानी सहन करावी लागली. नोकरीत तडकाफडकी बदल झाला. नोकरी अचानक गेल्यामुळे आयुष्याच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. म्हणजेच अष्टम स्थानाची  सर्व फळे त्याला मिळाली. मी खूप खुश झाले कारण मला ही सुद्धा भीती होती की प्रशांतचा अपघातही होऊ शकतो …. अर्थात ती भीती त्याला मी बोलून दाखवली नव्हती. त्यामुळे जीवावर बेताण्यापेक्षा नोकरीवर बेतलेले काय वाईट????  
प्रशांतच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा….  

Bye  Bye 


NOTE : १) जातकाची साडेसाती सुरु आहे व जातकाला राजीनामा शनिवारी देण्यास भाग पाडले आहे. 
              २) ह्या जातकाची पंचम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला राजीनामा द्यावा लागला. गेल्या   दोन  CASES मध्ये आपण पहिलेच होते की जोपर्यंत कुंडलीत पंचमाची(पंचम स्थानाची) दशा-अंतर्दशा सुरु होत नाही तोपर्यंत जातकाच्या नोकरीत बदल होत नाही. वरील कुंडलीत पंचम स्थानाची दशा तर सुरु झालीच परंतु अष्टमाचीही दशा सुरु झाल्याने नोकरीत बदल झाला परंतु तो तडकाफडकी, अपमान होउन …. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १ मार्च, २०१३

दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय


दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय 

काल आपण योगेशला नोकरीतून व्यवसायाकडे वळताना पाहिले. ग्रह आपली कामगिरी कशी चोख बजावतात  ह्याचा अनुभव योगेशला आलाच. आज आपण अशी कुंडली बघुया ज्या कुंडलीत ग्रहांनी नोकरी आणि व्यवसाय ह्या दोन्हींचा छान मेळ बसवलेला आहे. ही कुंडली आहे अशा एका जातकाची ज्याच्यावर खूप लहान वयात कौटुंबिक जवाबदारी आली. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अर्चनाने घरचा व्यवसाय व स्वतःची उच्च पदावरची नोकरी ह्यात छान समतोल राखण्यात यश मिळवलं. आज अर्चनाच्या कुंडलीतील महत्वाच्या ग्रहयोगांवर नजर घालू. 

अर्चना प्रभुणे :  मीन लग्न. लग्नेश गुरु दशमात. षष्ठेश रवि स्वतः नवमात. कालच्या लेखात आपण हे समजून घेतलेच असेल की षष्ठेशाचा संबंध जर नवम स्थानाशी असेल तर व्यक्तिला उच्च-अधिकार प्राप्त होतात, मानसन्मान मिळतो. अर्चनाला नोकरीत खूप लहान वयात उच्च-अधिकार मिळाले. Office मध्ये तिच्या शब्दाला मान आहे. 
 

अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थेश- सप्तमेश जो बुध आहे तो आहे दशमात. सप्तमेशाचा दशमाशी जर काही connection असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो हे आपण कालच पाहिले. इथे ह्या कुंडलीत हा नियम चपखल बसतो. अर्चना व्यवसायाची धुराही छान सांभाळते. परंतु  इथे सप्तमेश- दशमेशाबरोबर मी चतुर्थेशाचाही उल्लेख केला आहे. चतुर्थ स्थान म्हणजे आपले घर,घर संबंधातील गोष्टी. अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थ (घर-घरासंबंधातील गोष्टी), दशम (व्यवसाय) सप्तम (व्यवसाय -भागीदारी वगैरॆ ) ह्यांचे connection आहे त्यामुळे घरच्या व्यवसायाची जवाबदारी तिच्यावर आली.  
आज अर्चनाला व्यवसाय व नोकरी ह्यातील ताळमेळ बसवताना पाहिले कि खूप कौतुक वाटते. येणारया पुढच्या काळात तिच्या कुंडलीतल्या दशा-अंतर्दशा व्यवसाय व नोकरी ह्यासाठी अत्यंत पूरक असल्याने तिला यश मिळणार हे नक्की. तिला भविष्याकाळासाठी शुभेच्छा. 
भेटू पुढ्या लेखात अशाच काही कुंडल्या घेऊन. 

READERS ALL OVER THE WORLD