कधी होणार मी आई ??
नोकरी - व्यवसाय ह्यावर आपण मागील लेखात काही उदाहरणे पहिली आज आपण कुंडलीतल्या "पंचम स्थानावर" अभ्यास करणार आहोत. पंचम स्थानावरून खालील गोष्टी कळू शकतात :
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ? इ. गोष्टी पाहता येतात.
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ? इ. गोष्टी पाहता येतात.
पण ह्या पंचम स्थानाचा संबंध जर "लाभ" स्थानाशी असेल तर संतत्ती होण्यास काही त्रास नसतो. परंतु पंचमाचा संबंध जर "अष्टम", "चतुर्थ" किंवा "व्यय" स्थानाशी आला तर मात्र संतत्ती होण्यास त्रास असतो. आता हा त्रास म्हणजे नक्की काय तर,
१) काही वेळेस कुंडलीतल्या बाकी योगांबरोबर पंचम स्थान जर अष्टमाशी व लाभ स्थानाशी निगडीत असेल तर संतत्ती होते परंतु पाहिल्यावेळेस "Miscarriage" होण्याची शक्यता असते किंवा संतत्ती होते परंतु "सिझरियान" पद्धतीने.

२) जर पंचमाचा चतुर्थ व व्यय स्थानाशी संबंध आला तर "Miscarriage" तर होतेच परंतु पुन्हा "Conceive" होण्यासाठी व झाल्यावर प्रचंड काळजी घ्यावी लागते.
आज आपण अश्याच एका कुंडलीचा आढावा घेणार आहोत ज्या कुंडलीत पंचम स्थानाशी निगडीत चतुर्थ व व्यय स्थाने असून एकदा "Abortion" करावे लागले व नंतर संतती झाली आहे. आज पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करणार आहोत :
ज्योतीची कुंडली |
कृष्णमुर्ती पद्धतीने : पंचम स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी (Sub Lord) हा शनि आहे व शनि पुढीलप्रमाणे कार्येश : शनि - ४,८,९ . शनि स्वतः राहूच्या नक्षत्रात व राहू - १ ,५,१२. तुमच्या लक्षात आलेच असेल इथेही पंचमाचा चतुर्थ व अष्टम स्थानाशी संबंध आला आहे.
वरील नमूद केलेल्या योगांमुळे ह्या स्त्री जातकाला( नाव : ज्योती) गर्भधारणा झाली परंतु ही गोड बातमी तिला स्वतःला कळण्या आधी एक घटना घडली. ज्योती नेहेमीप्रमाणे कामावर जात असताना तिला पोटात दुखू लागले परंतु फारसे दुखत नसल्याने तिने दुर्लक्ष केले व नेहेमीचे तिचे Jobचे Routine सुरु झाले. दुपारी जेवणानंतर तिच्या पोटात जास्तच दुखू लागले. Office मधून सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे जावे असे तिने ठरवले व ललितलासुद्धा (नवरयाला ) तसे कळवले. Office मधून निघून रेल्वेचा प्रवास करत(याही परिस्थितीत) ज्योती घरी आली. नेहेमीच्या डॉक्टरनी तपासल्यावर ताबडतोब Hospital मध्ये Admit करण्यास सांगितले. Hospital ला पोहोचेपर्यंत ज्योतीची शुद्ध हरपली. आता सर्वांना गांभीर्याची कल्पना आली व ज्योतीची काळजी वाटू लागली.
तिच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ललितला धक्का बसला. ज्योती गरोदर होती व दीड महिना उलटून गेला होता. (मुलींना pregnancyची news दीड ते दोन महिन्यानंतर कळते.) आणि बाळची वाढ ही गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत होती ज्यामुळे बाळ वाढू शकले नाही व अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला व ज्यामुळे ज्योतीच्या जीवालाही धोका निर्माण झाला. वेळीच ज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. काही दिवसांच्या उपचारानंतर ज्योतीला घरी पाठवण्यात आले व पुढचे काही महिने आराम व काळजी घेण्यास सांगितले.
ह्या सगळ्या घटनेनंतर जेंव्हा ज्योती मला भेटण्यास आली तेंव्हा तिला काही उपाय व एका स्तोत्रचे पठण नियमित करण्यास सांगितले. मधल्या काही महिन्यांनतर ज्योतीचा फोन आला तो गोड बातमी देण्यासाठी परंतु बातमी देताना तिच्या आवाजात काळजीही मला स्पष्ट ऐकू येत होती. तिला दिलेल्या स्तोत्राच्या पठणाची पुन्हा आठवण करून दिली व हे ही सांगितले की तुला संतत्ती होईल, सिझर करावे लागेल त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवणे.

म्हणजे पहा ग्रह आपले काम कसे चोख निभावतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ललितचा फोन आला, हसता हसता म्हणाला," मुलगा झाला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिझर करावे लागले. ज्योतीची तब्येतही व्यवस्थित आहे. बाळाबरोबर भेटायला येऊ नक्की".
कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com
Bye
कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com
Bye
इथे पंचम स्थानाचा सब-लॉर्ड शनि हा ४,८,९ चा कार्येश असून राहूच्या नक्षत्रात आहे व राहू पंचमाचा कार्येश आहे. त्यामुळे आधी Abortion करावे लागले परंतु नंतर संतत्ती झाली.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा