वास्तू - समज-गैरसमज
नमस्कार,
मधला बराच काळ ब्लॉगवर काही लिहिता आले नाही. दिवसभर जातकांची रीघ,वास्तू visits आणि घरची जवाबदारी ह्यामुळे वेळच मिळत नव्हता. येणारे सगळे जातक सध्या ब्लोगवर नवीन काही लिहिले का नाही म्हणून विचारीत होते. आज योग साधला आहे. मागच्या दोन महिन्यात वास्तू-संदर्भात मला बरयाच ठिकाणी जाण्याचा योग आला. वास्तू संदर्भात मला जेंव्हा जातकांचे फोन येतात तेंव्हा जातकांना बरयाच गोष्टींबाबत संभ्रम असतात. तर त्यातल्या काही गोष्टींबद्दलचे समाज आणि गैरसमज आज मी इथे मांडणार आहे.
घराचे मुख्य दार - अनुकूल दिशा
दक्षिण दिशेस दरवाजा :
घर निवडतांना बरेचजण पूर्व-पश्चिम दार असलेल्या घरालाच प्राधान्य देतांना आढळतात. दक्षिण दिशेस दार असल्येल्या घरांना कोणी वाली नाही. ठाण्यात जेंव्हा एका ठिकाणी मी वास्तू परीक्षणेसाठी गेले असता त्या tower (१५ मजली tower ) मधील दक्षिण दिशेला मुख्य दार असलेले एकही घर विकले गेले नव्हते.
हा असलेला समज अंशतः चुकीचा आहे. जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी,तिचा स्वभाव वेगळा तसेच प्रत्येक वास्तू वेगळी आणि त्याची उर्जा वेगळी. प्रत्येक व्यक्तीसाठी एखादी वास्तू,त्या वास्तूची उर्जा इतकी अनुकूल ठरते कि त्याच घरात त्या व्यक्तीची किंबहुना त्या कुटुंबाची भरभराट होते. किंवा मग काही वेळेस लोक अशी तक्रार करतात मी तर घर पूर्व -पश्चिम दरवाजा पाहूनच निवडले होते मग माझी अधोगती का झाली ? हे वास्तू वगैरेचे मग तुमचे नियम इथे खोटे ठरतात. अशा वेळेस खरे तर मला त्यांची कीव येते. Crocin हे औषध जरी तापासाठी असले तरी प्रत्येक तापासाठी औषध वेगळे असते कारण रोगाची लक्षणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती,त्या व्यक्तीच्या व्यवसायाप्रमाणे आणि त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तू, वास्तूचे मुख्य दार कुठे असणे अनुकूल ? हे ठरवणे महत्वाचे आहे. तेंव्हा दक्षिण दिशेचा दरवाजा नेहेमीच वाईट नाही.
दिशेचा गोंधळ :
हा प्रश्न तर बरयाच जणांना Confuse करतो. अगदी कालची गोष्ट, वेदिकाला तिच्या नवीन घराच्या निवडीसाठी माझी मदत हवी होती. बोरिवलीत एकाच Tower मधली दोन घरे तिने पसंत केली होती परंतु मुख्य दाराच्या दिशेचा गोंधळ होता. एका घराचे मुख्य दार दक्षिण दिशेस तर दुसरया घराचे उत्तरेला. आणि गोंधळ वाढवायला तिचे वास्तू संदर्भातले ज्ञान. वास्तू वरील बरीच पुस्तके,वर्तमान पत्रात येणारी संपूर्ण (?) माहिती ह्यामुळे दक्षिणेस दार म्हणजे वाईट एवढे पक्के अनुमान तिचे झाले होते. त्यामुळे दक्षिण दिशेला असल्येल्या घरास तिची एवढी पसंती नव्हती. पण अभयला (वेदिकाचा नवरा) तेच घर आवडले असल्याने त्यांचा निर्णय होत नव्हता. बर वेदिकला मी विचारले तेंव्हा तिचा पहिला प्रश्न होता कि,"मी घराच्या आतून बाहेरच्या दिशेस पाहिले की उत्तर दिशा येते आणि घराच्या बाहेरून आत पहिले कि समोर दक्षिण दिशा येते. मग ह्याला दक्षिणेचा दरवाजा म्हण्याचा का ?" हा प्रश्न मला असंख्य वेळेस विचारला जातो. साधा नियम असा आहे कि तुम्ही घराच्या आत आहात आणि दारासमोर बाहेरच्या बाजूस जी दिशा येते तीच मुख्य दाराची दिशा.
घराच्या बाजूस असलेले स्मशान/कबरीस्तान :
पूर्वीच्या काळात स्मशान हे गावाच्या बाहेर नदीकाठी असायचे. म्हणजे अगदी दूर,नजरेआड. परंतु सध्या मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात इतकी लोकसंख्या वाढली आहे कि बरेच towers स्मशानाच्या बाजूसच असतात. काही व्यक्तींना स्मशानाच्या आसपास आपले घर असणे खूप negative वाटू शकते आणि काहींना त्यात काहीच तथ्य नसल्याचे मत असू शकते. स्मशानाच्या आसपास आपली वास्तू असू नये ह्याचे एकमेव शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे अंत्यविधीत व्यक्ती पंचतत्वात विलिन होत असते आणि त्यासाठी अग्नि संस्कार सूचित केलेला आहे. हा संस्कार जेंव्हा एखाद्या व्यक्तीवर स्मशानात केला जातो त्यामुळे होणारा धूर,प्रदुषण हे आसपासच्या वातावरणात पसरतो. सध्या तर बरेच असाध्य असे रोग असलेले लोक आसपास आपण पाहतो. जर अशा व्यक्तीला अंत्यसंस्कारच्या वेळेस दिलेल्या अग्नीमूळे हवेत पसरणारे प्रदूषण तुमच्या घरात येत असेल तर घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी कदाचित घातक ठरू शकेल. आणि ह्याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी स्माशान हे गावाबाहेर असण्याची सोय सांगितलेली आहे. एकवेळेस कबरीस्तान वास्तूच्या आसपास असणे चालू शकेल परंतु शक्यतो स्मशानाच्या आसपास वास्तू न घेतलेली बरी. आता किती Risk घायची ते तुम्ही ठरवा.
घराच्या समोर मंदिर :
हे एक नवीन Fad आलेले आहे. हल्ली ९०% सोसायटीच्या Compound मध्येच मोठे मंदिर असते. सोयीचे वाटत असले तरी ते वास्तूच्या नियमांविरुद्ध आहे. ह्यासाठीही मी पुन्हा तुम्हाला आपल्या शास्त्राचेच संदर्भ देईन. पूर्वी बांधलेली बहुतांश मंदिरे ही उंच डोंगरमाथ्यावर बांधली गेली आहेत. उदा. केदारनाथ,गिरनारचे दत्त मंदिर, वैष्णव देवी मंदिर. ही सगळी मंदिरे अगदी उंच ठिकाणी बांधण्यात आली. असे का ? असा प्रश्न तुमच्याही मनात बरयाच वेळेस आला असेल परंतु त्याचे उत्तर ? त्याचे उत्तर असे आहे कि संसारात गढून गेलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला काही वेळ हा ह्या संसारापासून दूर जाऊन मनः शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करावा. मंदिरात हजारो लोक नामस्मरण,देवाचा जयघोष करत असतात त्यामुळे मंदिरात एक वेगळे वातावरण तयार होत असते आणि प्रत्येक मंदिराची एक उर्जा असते. ही उर्जा आणि तयार झालेले वातावरण हे मंदिराच्या वर असणाऱ्या घुमटात/कळसात साठून रहाते. आणि जर हा कळस तुमच्या खिडकीच्या किंवा मुख्य दाराच्या समोर येत असेल तर त्या उर्जेचा स्त्रोत सतत तुमच्या घरी प्रवाहित होतो. ही उर्जा अत्यंत powerful असते. जर सतत तुमच्या घरी हा स्त्रोत प्रवाहित होत असेल तर शास्त्राप्रमाणे तुमच्यासाठी ही वास्तू राहण्यायोग्य नाही. परंतु आज देव इतका स्वस्त झाला आहे कि लोकांना अगदी त्यांच्या घरा समोर मंदिर हवे आहे. अगदी छोटे मंदिर असणे ठीक आहे परंतु घरासमोर/खिडकीसमोर मोठे मंदिर असणे घरातून मंदिराचा कळस दिसणे, घरात मंदिराच्या घंटांचा आवाज घुमणे हे वास्तू शास्त्राच्या नियमांविरुद्ध ठरते.
वास्तू संदर्भातले मला सतत विचारण्यात येणारे समाज-गैरसमज मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तू निवडताना तुम्ही ह्यां सर्व गोष्टी लक्षात ठेवालच त्याच बरोबरीने हे ही ध्यानात असू दे प्रत्येक वास्तू चांगलीच असते. व्यक्तीप्रमाणे,त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तूची निवड करणे हितावह ठरते.
प्रतिक्रियांची वाट पाहतेय : anupriyadesai@gmail.com किंवा vaastupriya@gmail.com वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा