मंगळवार, ८ जुलै, २०१४

स्वयंपाकघर कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३

 स्वयंपाकघर  कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३ 

नमस्कार,

वास्तू-टिप्स संदर्भात लिहिलेल्या मागील दोन्ही लेखांनंतर वाचकांची भरपूर ई- पत्र आली. काहींनी वास्तूवर लेख लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत,काहींनी वास्तू परिक्षणासाठी बोलावले आहे,काहींनी त्यांच्या राहत्या  वास्तुसंदार्भात प्रश्न विचारले आहेत. पुन्हा एकदा ह्या लेखाच्या निमित्ताने मी इथे नमूद करते कि ह्या सर्व टिप्स ह्या घर घेतांनाच उपयोगी पडतील. ज्यांची वास्तू शास्त्राप्रमाणे नाही त्यांच्यावर फार मोठ संकट कोसळणार असे अजिबात नाही. जर काही Major Defects असतील तर मात्र वास्तू संदर्भात उपाय योजना करावी. म्हणजेच समजा तुमचे स्वयंपाक घर ईशान्येला असणे,Toilets उत्तर दिशेत असणे ह्यासाठी मूळ बांधकामाला धक्का न देता (तोडफोड न करता) उपाय शास्त्रात आहेत. तेंव्हा फार घाबरून जाऊ नका.  
[सूचना - हा ब्लॉगच्या इतर भाषिक वाचकांनी मला हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करण्याची सूचना दिली आहे. परंतु वेळेअभावी ते सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे ब्लॉगच्या वरती TRANSLATE म्हणून एक  बटण आहे.  त्याचा वापर करावा.  ] 

तर आज वळूया स्वयंपाक घराकडे. स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाचा घटक. भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घर छोटे असले अगदी झोपडे असले तरी खोपट्यात चूल ही मांडलेलीच असते. भारतीय संस्कृती आणि वास्तू शात्राप्रमाणे बाहेरील प्रज्वलीत अग्नि आणि पोटातील अग्नि ह्याचा संबंध आहे. पोटातील अग्नीचे प्रमाण हे समतोल असावे. म्हणजेच अग्नि योग्य प्रमाणात असेल तर अन्न व्यवस्थित पचते आणि शरीरात वायू धरत नाही. आणि जर अग्निचा समतोल बिघडून त्याचे प्रमाण वाढले तर पूर्ण शरीरास हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वास्तूत ही आग्न्येय दिशेत स्वयंपाक घर असेल तर उत्तम आरोग्य लाभते.  


१) ओटा कुठे असावा - ओटा पूर्व दिशेला आणि दक्षिणेला असावा. ( L - Shape ) शेगडी कुठे असावी - शेगडी ही आग्न्येय दिशेत असावी परंतु गृहिणीचे मुख स्वयंपाक करतांना पूर्व दिशेत येईल अशी व्यवस्था असावी. 
२)खिडकी कुठे असावी - स्वयंपाक घरात खिडकीची रचना पूर्व दिशेत असेल तर उत्तम. 
३) सिंक कुठे असावे - सिंकची रचना ईशान्य दिशेत असावी. 
४) पाण्याचा माठ किंवा पाणी साठवण्याची जागा - पाण्याचा माठ ईशान्य दिशेत उत्तम. पाण्याचा साठा ईशान्य आणि उत्तर दिशेत असावा. 
५) फ्रीज - फ्रीज नैऋत्य दिशेत असावा. नैऋत्य दिशेत नसेल तर किमान दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावा. 
६) Microwave/Mixer - ह्या सारखी तत्सम बाकी उपकरणे पूर्व -दक्षिण भागात ठेवावीत. 
७) धान्य साठा -  साठवणीची धान्य जसे, गहू,तांदूळ वगैरे ह्यांची साठवण दक्षिण ओट्या खाली असावी. 
८) रंग - स्वयंपाक घरात फरशीचा रंग हा फिक्कट असावा. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातील छटा चालतील. भिंतींचा रंग फिक्कट हिरवा,भगवा पिवळा ह्यांच्या छटेत असावा. फार गडद लाल,भगवा शक्यतो असून नये. 

सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात स्वच्छता असावी. रात्री उष्टी भांडी ठेवू नयेत. मुंबईत Working Women चा इलाज नसतो कारण कामवाली बाई येतेच सकाळी. त्यामुळे उष्टी भांडी रात्री ठेवावी लागली तरी शक्यतो विसळून तरी ठेवावीत. 

जेवढी महत्वाची माहिती देत येईल तेवढी इथे नमूद केली आहे. वाचकांना ह्याचा जरूर फायदा होईल अशी अपेक्षा. 

प्रतिक्रियांची वाट पाहतेय. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, १ जुलै, २०१४

VAASTU TIPS - वास्तूची निवड कशी करावी ? भाग - २

VAASTU TIPS - वास्तूची निवड कशी करावी ? भाग - २

वास्तूची निवड कशी कराल ह्या माझ्या मागील लेखाला वाचकांनी दिलेल्या उत्सुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ह्या भागात मी  बैठकीची खोली कुठे असावी ? स्वयंपाक घर कुठे असल्यास गृहस्वामीस सौख्य लाभेल ? आणि  शयनकक्ष कुठे असल्यास आरोग्य लाभेल ह्या बाबत मार्गदर्शन करणार आहे.
१) स्वयंपाक घर - सर्व प्रथम आपण स्वयंपाक घराकडे वळूया. स्वयंपाकघर(KITCHEN) हे वास्तुशास्त्राप्रमाणे नेहेमी आग्नेय(SOUTH-EAST) दिशेत असावे. ह्या वरून मला एक Case आठवली. जातकांपैकी एकाने नुकतेच घर घेतले होते. (घर घेऊन झाल्यानंतर त्याने मला ह्या संदर्भात Consult केले ) घर संपूर्ण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घेतले होते.( ? ).  
स्वयंपाक घर आग्नेयेत 
स्वयंपाकघर आग्नेय दिशेत असावे असे म्हटले आहे म्हणून घर घेताना त्याने ह्या गोष्टीची काळजी घेतली. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत परंतु ओटा मात्र दक्षिण दिशेत होता. म्हणजेच स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख दक्षिण दिशेत येणार. जे अत्यंत चुकीचे होते. स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख हे पूर्व दिशेत असावे. सकाळची सूर्याची किरणे गृहिणीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. त्याला हे शास्त्र नीट व्यवस्थित समजावून सांगितले. आणि त्यालाही ते पटले. त्याने लगेचच बदल करून घेतले. वरील फोटोवरून  तुमच्या लक्षात येईल. KITCHEN SHOULD IN IN SOUTH EAST CORNER.

२) शयनकक्ष (BEDROOM) - 

(अ) Master Bedroom - सर्वप्रथम आपण MASTER BEDROOM बद्दल जाणून घेऊ. MASTER BEDROOM हे घरातील वयाने मोठ्या व्यक्तीने नव्हे तर कर्त्या पुरुषाने वापरावी असे सांगितले गेले आहे. MASTER BEDROOM ही वास्तूच्या दक्षिण पश्चिम ह्या भागात म्हणजेच नैऋत्य (SOUTH WEST) असावी.  घरातील मोठ्या भावाची खोली नैऋत्य दिशेत असावी किंवा छोट्या भावाचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला ती बेडरूम वापरू द्यावी. बेडरूम मधील बेड हा लाकडाचाच असावा. गादी एकसंध असावी.

(ब) लहान मुलांची बेडरूम - लहान मुलांची बेडरूम पूर्व किंवा ईशान्य दिशेत असावी. त्यांच्या बेडरूम मध्ये जर स्टडी टेबल असेल तर ते ईशान्य कोपरयात पूर्वेकडे तोंड करून बसता येईल असे असावे. टेबल आणि खुर्ची शक्यतो लाकडाचीच असावी. फायबरचे मटेरीअल शक्यतो टाळावे. खालील चित्रात जरी फायबरचे मटेरीअल दिसत असले तरी ते प्रतिकात्मक आहे. ईशान्येकडचा सूर्यप्रकाश कसा मुलांच्या टेबलवर यावा हे दर्शवण्यासाठी हा प्रयत्न. 
अभ्यासाचे टेबल 

मुलांचा बेड 

(क) वयोवृध्द व्यक्तींची बेडरूम - घरातील वयोवृद्ध (वय वर्षे  ६० च्या पुढे ) जोडप्याची झोपण्याची खोली (जरी ते नोकरी/Business करत असले तरी ) ही ईशान्य भागात असणे हितावह.

३) देवघर - मुंबईत देवघरासाठी वेगळी खोली असणे म्हणजे उच्च श्रीमंत वर्गातच शक्य आहे. बाकी मुंबई बाहेर जिथे स्वतःची जमीन घेऊन घर बांधू शकतो तिथे एक ईशान्येकडची खोली देवघरासाठी ठेवू शकतो. देवघरासाठी जरी वेगळी खोली शक्य नसेल तरी घराच्या ईशान्य कोपरयात देव्हारयाची स्थापना करावी. 
देव्हारयात गणेश,बाळकृष्ण,अन्नपूर्णा ह्यांच्या स्थापन केलेल्या मुर्त्या असाव्यात. मूर्ती ही कर्त्या पुरुषाच्या अंगठयापेक्षा मोठी असून नये. आणि मूर्ती ही चांदीत घडवलेली असेल तर उत्तम. प्लास्टरच्या मूर्त्या असू नयेत. भेगा पडलेल्या मुर्त्यांचे त्वरीत विसर्जन करावे. 

४) बैठकीची खोली - शास्त्राप्रमाणे बैठकीची खोली ही वास्तूच्या वायव्य दिशेत असावी. पश्चिम,उत्तर ह्या दिशाही उत्तम आहेत. 

सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे संपूर्ण खोल्यांमध्ये सकाळचा भरपूर सुर्यप्रकाश येईल अशी रचना असेल तर अत्यंत उत्तम. शक्यतो दिवसा घरात ट्युब लाईट लावावी लागू नये एवढा तरी निदान प्रकाश घरात असावा. पुन्हा एकदा सांगते ह्या सर्व गोष्टी मी घर घेताना काय काळजी घ्यावी ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. ह्या मार्गदर्शनाने ज्यांना नवीन घर घ्यायचे आहे त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.  

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय. 


     

READERS ALL OVER THE WORLD