VAASTU TIPS - वास्तूची निवड कशी करावी ? भाग - २
वास्तूची निवड कशी कराल ह्या माझ्या मागील लेखाला वाचकांनी दिलेल्या उत्सुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ह्या भागात मी बैठकीची खोली कुठे असावी ? स्वयंपाक घर कुठे असल्यास गृहस्वामीस सौख्य लाभेल ? आणि शयनकक्ष कुठे असल्यास आरोग्य लाभेल ह्या बाबत मार्गदर्शन करणार आहे.
१) स्वयंपाक घर - सर्व प्रथम आपण स्वयंपाक घराकडे वळूया. स्वयंपाकघर(KITCHEN) हे वास्तुशास्त्राप्रमाणे नेहेमी आग्नेय(SOUTH-EAST) दिशेत असावे. ह्या वरून मला एक Case आठवली. जातकांपैकी एकाने नुकतेच घर घेतले होते. (घर घेऊन झाल्यानंतर त्याने मला ह्या संदर्भात Consult केले ) घर संपूर्ण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घेतले होते.( ? ).
स्वयंपाक घर आग्नेयेत |
२) शयनकक्ष (BEDROOM) -
(अ) Master Bedroom - सर्वप्रथम आपण MASTER BEDROOM बद्दल जाणून घेऊ. MASTER BEDROOM हे घरातील वयाने मोठ्या व्यक्तीने नव्हे तर कर्त्या पुरुषाने वापरावी असे सांगितले गेले आहे. MASTER BEDROOM ही वास्तूच्या दक्षिण पश्चिम ह्या भागात म्हणजेच नैऋत्य (SOUTH WEST) असावी. घरातील मोठ्या भावाची खोली नैऋत्य दिशेत असावी किंवा छोट्या भावाचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला ती बेडरूम वापरू द्यावी. बेडरूम मधील बेड हा लाकडाचाच असावा. गादी एकसंध असावी.
(ब) लहान मुलांची बेडरूम - लहान मुलांची बेडरूम पूर्व किंवा ईशान्य दिशेत असावी. त्यांच्या बेडरूम मध्ये जर स्टडी टेबल असेल तर ते ईशान्य कोपरयात पूर्वेकडे तोंड करून बसता येईल असे असावे. टेबल आणि खुर्ची शक्यतो लाकडाचीच असावी. फायबरचे मटेरीअल शक्यतो टाळावे. खालील चित्रात जरी फायबरचे मटेरीअल दिसत असले तरी ते प्रतिकात्मक आहे. ईशान्येकडचा सूर्यप्रकाश कसा मुलांच्या टेबलवर यावा हे दर्शवण्यासाठी हा प्रयत्न.
अभ्यासाचे टेबल |
मुलांचा बेड |
(क) वयोवृध्द व्यक्तींची बेडरूम - घरातील वयोवृद्ध (वय वर्षे ६० च्या पुढे ) जोडप्याची झोपण्याची खोली (जरी ते नोकरी/Business करत असले तरी ) ही ईशान्य भागात असणे हितावह.
३) देवघर - मुंबईत देवघरासाठी वेगळी खोली असणे म्हणजे उच्च श्रीमंत वर्गातच शक्य आहे. बाकी मुंबई बाहेर जिथे स्वतःची जमीन घेऊन घर बांधू शकतो तिथे एक ईशान्येकडची खोली देवघरासाठी ठेवू शकतो. देवघरासाठी जरी वेगळी खोली शक्य नसेल तरी घराच्या ईशान्य कोपरयात देव्हारयाची स्थापना करावी.
देव्हारयात गणेश,बाळकृष्ण,अन्नपूर्णा ह्यांच्या स्थापन केलेल्या मुर्त्या असाव्यात. मूर्ती ही कर्त्या पुरुषाच्या अंगठयापेक्षा मोठी असून नये. आणि मूर्ती ही चांदीत घडवलेली असेल तर उत्तम. प्लास्टरच्या मूर्त्या असू नयेत. भेगा पडलेल्या मुर्त्यांचे त्वरीत विसर्जन करावे.
४) बैठकीची खोली - शास्त्राप्रमाणे बैठकीची खोली ही वास्तूच्या वायव्य दिशेत असावी. पश्चिम,उत्तर ह्या दिशाही उत्तम आहेत.
सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे संपूर्ण खोल्यांमध्ये सकाळचा भरपूर सुर्यप्रकाश येईल अशी रचना असेल तर अत्यंत उत्तम. शक्यतो दिवसा घरात ट्युब लाईट लावावी लागू नये एवढा तरी निदान प्रकाश घरात असावा. पुन्हा एकदा सांगते ह्या सर्व गोष्टी मी घर घेताना काय काळजी घ्यावी ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. ह्या मार्गदर्शनाने ज्यांना नवीन घर घ्यायचे आहे त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा