VAASTU TIPS- वास्तूची निवड कशी करावी ? भाग - १
वास्तू वरील लेखानंतर मला बरीच वाचकांची ई-पत्र आली. त्यात बहुतांश वाचकांनी वास्तू विषयक टिप्स देऊ शकाल का ? ह्या बद्दल विचारणा केली आहे. वास्तुविषयक टिप्स देण्या अगोदर आपण ज्या वास्तूत राहणार आहोत ती वास्तू असावी कशी ? इथून मी सुरवात करते.१) वास्तूची दिशा : ह्याबाबत सल्ला देतांना सर्वप्रथम मी हे सुचित करेन कि तुमची वास्तू ही शक्यतो दिशांना समांतर असावी. वास्तू विदिशा असू नये.विदिशा वास्तू म्हणजे हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, सुदिशा आणि विदिशा वास्तू खालीलप्रमाणे :
सुदिशा वास्तू (वास्तू अशी असावी ) |
विदिशा वास्तू ( वास्तू अशी असू नये) |
२) घराचे मुख्य प्रवेशद्वार : सर्वसाधारण असा समज आहे कि प्रवेशद्वार पूर्व अथवा पश्चिम दिशेत असावे. दक्षिणेचा प्रवेश चांगला नाही. परंतु शास्त्रात खालील प्रमाणे प्रवेशद्वाराची रचना असावी असे नमूद केले आहे. खालील चित्रात जिथे हिरव्या रंगाने निर्देशित केले गेले आहे तिथे प्रवेशद्वार असावे आणि जिथे गुलाबी रंगाने निर्देशित केले आहे तिथून प्रवेश निषिद्ध मानले गेले आहे. ह्यावरून लक्षात येते कि दक्षिणेचा मुख्य प्रवेश नेहेमीच वाईट नाही परंतु तो नियमाप्रमाणे असावा.
घराचे मुख्य प्रवेशद्वार कुठे असावे |
३) घरातील खिडक्या : वास्तूतील जास्तीत जास्त खिडक्या मुख्यत्वे पूर्व आणि उत्तर दिशेत असतील तर ही वास्तू तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. हल्ली घराला खूप मोठ्या खिडक्यांची रचना असते. उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त प्रकाश आणि हवा घरात खेळती रहावी. परंतु वास्तू शास्त्राप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम दिशेत कमीत कमी खिडक्या असाव्यात किंबहुना असूच नयेत. ह्याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपले संपूर्ण शास्त्र हे चंद्र आणि सूर्य ह्यांच्या भ्रमणावर आधारीत आहे. सूर्य पूर्व दिशेस उगवून पश्चिमेत मावळतो. सूर्याची सकाळ्ची कोवळी किरणे अत्यंत लाभदायक आहेत. परंतु सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंतची किरणे घरात प्रवेश करू नयेत अशी घराची रचना असावी असे शास्त्र सांगते. ह्याला कारण म्हणजे सूर्याची UV किरणे सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंत अत्यंत प्रखर असून आरोग्यासाठी घातक आहेत. आणि सूर्याचे भ्रमण दक्षिणायन असताना पूर्व-दक्षिण-पश्चिम असे असते. आणि ह्या दिशेत खिडक्या असतील तर संपूर्ण वेळ म्हणजेच ११.०० ते ४.३० ह्या वेळेतील सूर्याची(घातक)किरणे घरात येतात. ह्याच अनुभव मला माझ्या बरयाच वास्तू परीक्षणासाठी गेले असता आलेला आहे. ज्या ज्या वास्तूत पश्चिम आणि दक्षिण दिशेत जास्त खिडक्या अथवा French Windows आहेत किंवा दक्षिणेस मोठा व्हरांडा,गच्ची आहे त्या त्या घरात एकतरी Cancer पिडीत रुग्ण असण्याचे निर्दर्शनास आले आहे आणि त्याच बरोबरीने घरातील बाकीही सदस्यांना दर महिन्याला डॉक्टरांची भेट घ्यावीच लागते. त्यामुळे मोठ्या खिडक्या,गच्ची पूर्व व उत्तर दिशेत असावी आणि दक्षिण व पश्चिम दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. शक्यतो पश्चिमेस अथवा दक्षिणेस गच्ची असू नये. ( असल्यास उपाय आहेत )
४) Toilets आणि Bathroom : घरात Toilets आणि Bathroom कुठे असावेत ह्याबाबत खूपच संभ्रम आहे. Toilets आणि Bathroom वास्तूच्या उत्तर आणि पूर्व दिशेत नसावेत. पूर्व आणि उत्तर दिशेत असलेल्या Toilets आणि Bathroom मुळे शिक्षणात आणि अर्थार्जनात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे Toilets आणि Bathroom वास्तूच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेत असावेत. दक्षिण आणि पश्चिम दिशेतही त्यांची रचना विशिष्ट ठिकाणी असावी.
वास्तू निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या संदर्भात काही टिप्स मी ह्या पहिल्या भागात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील मुद्यांमध्ये मी पूर्वेस,उत्तरेस Toilet असू नये असे नमूद केले आहे परंतु जर तुम्ही सध्या राहत असलेल्या वास्तूत जर ह्या दिशेत Toilets असतील तर शास्त्रामध्ये ह्यासाठी आणि बाकी वास्तूतील दोषांसाठी विना तोडफोड उपायही सूचित केले आहेत. त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो.
वास्तू हा विषयावर बोलावे,लिहावे हे कमीच त्यामुळे वाचकांनी मला वास्तूच्या कुठल्या टिप्स बद्दल मी विस्ताराने लिहावे ते जरूर कळवा. मी पुढील लेखात त्याबद्दल लिहिण्याचा विचार करेन.
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा