Marriage Date Prediction/
Marriage Astrology
नमस्कार. खूप दिवसांनी भेट होतेय आपली. गेल्या दोन महिन्यात जातकांची सतत रीघ सुरु होती त्यामुळे blog वर काही लिहिण्यास जमले नाही. ह्या दोन महिन्यात धनु लग्न आणि धनु राशीच्याच जातकांनी भविष्यकथनाच्या सल्ल्यासाठी माझी भेट घेतली. ह्याचे एक कारण म्हणजे मंगळ आणि शनि मार्च महिन्यात वक्री झाले दुसरे कारण म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करणारा शनि. वृश्चिकेत शनि २ नोव्हेंबरला प्रवेश करणार म्हणजेच तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला साडेसाती असणार आहे. जरी धनु राशीला नोव्हेंबर महिन्यात साडेसाती सुरु होणार आहे तरीसुद्धा त्याचे परिणाम फेब्रुवारी २०१४ पासूनच दिसू लागलेत. वक्री शनि,मंगळ आणि सुरु होणारी साडेसाती ह्यांचा एकत्रित परिणाम धनु राशीवर दिसू लागला आहे. माझ्याकडे गेल्या दोन महिन्यात आलेल्या जातकांपैकी ९८% जातक हे धनु लग्न आणि धनु राशीचे होते. कोणाला नोकरीत त्रास होतोय,कोणाच्या घरी अचानक आजारपण वाढले आहे. काही जातकांना मंगळ आणि शनि वक्रीचा परिणाम इतका जबरदस्त मिळालेला आहे की त्यांच्या कुटुंबात वाद,कलह होणे रोजच्या Routine सारखे झाले आहे. काही जातकांनी तर कौटुंबिक वादविवादामुळे आत्महत्याच करावीशी वाटतेय हे मला स्पष्ट सांगितले आहे. त्या सर्वांशीच फार जपून Counseling करावे लागतेय. असो तर आजचा मुळ मुद्दा असा आहे की कुंडलीत लग्नाचे योग कधी ? सर्व Bachelors चा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा.
साधारणपणे २०१३ च्या एप्रिल - मे महिन्यात मला निकिताचा फोन आला. ती माझ्या ब्लॉगची नियमित वाचक आहे. तिच्या बहिणीच्या म्हणजेच तनुश्रीच्या लग्नासंदर्भात तिने मला फोन केला होता. म्हणजे तनुश्रीचे लग्न कधी होईल ? ह्या संदर्भात तिला मार्गदर्शन हवे होते. त्याप्रमाणे आमचे discussion झाले पण तिचे समाधान झाले नाही. जलतत्वाच्या ज्या राशी आहेत त्यातल्या कर्क आणि मीन ह्या राशींचे तेच तेच पालुपद सुरु असते आणि त्यांचे समाधान लवकर होत नाही असे माझे Observation आहे. मग त्यानंतर ५-६ दिवसांनी पुन्हा निकिताचा फोन. पुन्हा तेच. मग शेवटी तनुश्रीने माझी भेट घेण्याचे ठरवले आणि आमची भेट १३-०६-२०१3 दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी झाली. (ह्या भेटीची वेळ आणि तारीख सांगण्याचे प्रयोजन मी लेखात पुढे स्पष्ट केले आहे.) त्यावेळेस तनुश्रीने लग्नापेक्षाही Career,Job, Promotional Exams ह्यावर जास्त भर दिला. तिची कुंडली खालील प्रमाणे :
तनुश्रीची कुंडली |
अतिशय समंजस आणि साधी अशी तनुश्री. बोलण्यात लाघवी. आम्ही तिच्या Career Horoscope,Finance Horoscope,Property Horoscope इ. अशा सर्व बाजूने discussion केले. आणि मग तिचा प्रश्न आला माझे लग्न कधी होईल ? लग्न कधी होईल ह्यासाठी मी खालील प्रमाणे कुंडलीचे विवेचन केले.
मकर लग्न आणि तुळ रास. लग्नेश आहे शनि. लग्नाचा सब लॉर्ड आहे शनि आणि तो आहे लाभात. शनि स्वनक्षत्री आहे आणि मंगळाच्या उप नक्षत्रात आहे. पुन्हा मंगळ आहे लाभात तो ही शनि बरोबरच. म्हणजेच ह्या जातकाला आयुष्यात सर्व गोष्टी मिळतील परंतु संघर्षाने आणि विलंबाने. त्यामुळे लग्नासंदर्भातही हा नियम लागू होतो. लग्नासंदर्भात नियम लागू होतो ह्याचा अर्थ लग्न जमण्यापासून ते लग्न होईपर्यंत अत्यंत कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. ह्याचे उत्तर तनुश्रीनेच दिले. माझ्याकडे येण्याआधी तिचे लग्न सतिशशी ठरले होते.लग्नाचा hall,पत्रिका,दागिने सर्व तयारी झालेली असतांना त्याने अगदी ऐनवेळेस नकार दिला. (शनि - संघर्ष ).
तनुश्री ज्यावेळेस माझ्याकडे आली तेंव्हा तिला गुरु महादशा आणि केतू अंतर्दशा सुरु होती. गुरु खालीलप्रमाणे कार्येश :
गुरु - १/ ३, १२
न. स्वा. मंगळ - १०/ ४, ११
उप न. स्वा. बुध १/ ६, ९
उप-उप न. स्वा. चंद्र ९, ७
कुंडलीत लग्नयोग आहेत किंवा नाही ह्यासाठी सप्तमाचा उप. नक्षत्र स्वामी २,७, ११ पैकी चा कार्येश हवा. महादशा स्वामीही २, ७, ११ ह्या स्थानांचा कार्येश असावा. तनुश्रीच्या कुंडलीत सप्तमाचा सब लॉर्ड गुरूच आहे. गुरुचे कार्येशत्व वर नमूद केले आहेच. महादशाही गुरुचीच सुरु आहे. गुरु २, ७, ११ पैकी ११ चा कार्येश आहे.म्हणजेच लग्नाचे योग आहेत. आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्न कधी ? ह्या वेळेस मी शासक ग्रह म्हणजेच Ruling Planets ची मदत घेतली. Ruling Planets ना जादूची कांडी का म्हणतात ते ह्या उदाहरणावरून कळेल. ( हा सर्व प्रपंच एवढ्याकरिता की मला ज्योतिषी आणि नवीन ज्योतिष-अभ्यासकांचीही पत्र येतात. त्यानांही अभ्यासासाठी हे उदाहरण उत्कृष्ट ठरेल. ) शासक ग्रह खालीलप्रमाणे :
L - शुक्र
S - बुध
R - चंद्र
S - गुरु
शासक ग्रहांपैकी गुरु सोडला तर बाकी ग्रह हे Fast Moving Planets आहेत आणि ह्यापैकी कुठलाही ग्रह शनिच्या नक्षत्रात नाही. म्हणजेच लग्नाचे योग फार लांबणार नाहीत. शासक ग्रहांपैकी गुरुची महादशा सुरु आहे. तनुश्री माझ्याकडे आली तेंव्हा तिच्या मूळ कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती. केतू रुलिंग मध्ये नाही त्यामुळे केतूचा विचार करता येणार नाही. केतू नंतर येईल शुक्र अंतर्दशा. शुक्र रुलिंग मध्ये आहे. शुक्राची अंतर्दशा जुलै २०१३ ते मार्च २०१६ पर्यंत आहे. शुक्र खालील प्रमाणे कार्येश :
शुक्र १ / ५, १० न. स्वा. चंद्र ९, ७
शुक्रानंतर रुलिंग मध्ये आहे चंद्र आणि बुध त्यापैकी शुक्र अंतर्दशेत चंद्राची अंतर्दशा बुधाच्या आधी येते.शुक्र अंतर्दशेत चंद्राची विदशा आहे जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१४ पर्यंत आहे.चंद्र खालील प्रमाणे कार्येश :
चंद्र ९ , ७ न. स्व. मंगळ १०, ४, ११
अजून खोलात अभ्यासायचे असेल तर रुलिंग मध्ये असलेला बुध बाकी राहतो. चंद्राच्या विदशेत बुधाच्या प्राण दशेचा कालावधी १६ मार्च २०१४ ते २७ मार्च २०१४ इतका येतो. बुध खालीलप्रमाणे कार्येश :
बुध १, ६, ९ न. स्व. चंद्र ९, ७
म्हणजेच तनुश्रीचे लग्न २०१४ मार्चच्या १६ ते २७ तारखेच्या दरम्यान होईल. परंतु तनुश्रीला तारीख न सांगता फक्त एवढेच सांगितले की लग्न नोव्हेंबर नंतर ठरेल आणि लग्न सोहळा मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान होईल. तनुश्रीला त्याचे tension नव्हतेच. ती खूप खुश झाली कि अजून ८-९ महिने लग्नाला आहेत.
त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मला तिच्या बहिणीचा म्हणजेच निकिताचा फोन आला. "अनुप्रिया अजून काहीच हालचाल नाही. तुमचा ब्लॉग मी नियमित वाचते. एकाचे लग्न तुम्ही जुलै-ऑगस्ट २००८ मध्ये होईल असे सांगितले होते आणि त्याचे लग्न जुलै २००८ मध्येच झाले आहे. तसेच तुम्ही तनुश्रीचेही सांगा ना." मी जे तनुश्रीला सांगितले होते तेच पुन्हा निकिताला सांगितले. त्यांनतर बरेच महिने आमचे बोलणे झाले नाही परंतु नोव्हेंबरच्या दरम्यान Facebook वर तनुश्रीने मला लग्न ठरल्याचे सांगितले. साखरपुडा डिसेंबरला होणार आहे आणि मग लग्नाची तारीख ठरेल असे कळवले. त्यांनतर फेब्रुवारीच्या महिन्यात तिने मला तिची लग्नाची तारीख २२ मार्च ठरली आहे हे सांगितले. तिला अभिनंदन केले आणि मनोमन K. S. KRISHNAMURTY आणि त्यांनी संशोधित केलेल्या कृष्णमुर्ती पद्धतीला दंडवत घातला. लग्नाच्या तारखेपर्यंतचे भविष्यकथन शासक ग्रहांमुळे अचूक करता येते. ( ठरल्याप्रमाणे तनुश्री लग्नाच्या बेडीत २२ मार्च २०१४ ला अडकली. )
प्रतिक्रियांची वाट पहातेय. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा