Cesarean Birth अर्थात - मुहूर्त Baby
पल्लवीप्रमाणे बरयाच लोकांचा असा समज आहे की दिनदर्शिकेत दिवस कुठला आहे ??(काहींच्या दृष्टीने गुरुवार अत्यंत शुभ आणि शनिवार अत्यंत अशुभ वार आहेत. जो चुकीचा समज आहे.) हे पाहिले की झाले काम. त्यादिवशी मग सोईप्रमाणे कधीही बाळाचा जन्म झाला की जमले सगळे. इतके का ते सोप्पे आहे ? ह्यावरून एक गोष्ट आठवली २०१२ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मला काही जातकांनी त्यांच्या होणारया बाळासाठी सिझरिअन मुहूर्तासाठी विचारणा केली होती. ९०% जातकांनी १२-१२-१२ ही तारीख आधीच निश्चित केली होती. कारण काय तर म्हणे,"खूप छान वाटतं ना १२-१२-१२." सर्वांना मी ती तारीख मुहूर्त म्हणून चांगली नाही हे व्यवस्थित समजावले. त्यादिवशी अमावास्या योग आहे,गुरु वक्री आहे,वृश्चिकेचा बुध आहे ( आदरणीय व. दा. भट ह्यांचे वृश्चिकेचा बुध हा ग्रंथ नक्की वाचवा म्हणजे त्याचे काय परिणाम असतात हे वाचकांच्या लक्षात येईल ) त्यामुळे आंधळेपणाने वागू नका.
माझे असे मत आहे कि डॉक्टरांनी जर काही कारणास्तव सिझरिअन डिलिवरीचाच निर्णय घेतला असेल तर दिवसाबरोबरच वेळही तितकीच महत्वाची आहे. पल्लवीने दहा जुन तारीख नक्की केली आहे. परंतु त्यादिवशी चंद्र शनिच्या युतीत आहे. म्हणजेच जन्मतः बाळाला साडेसाती सुरु होईल. चंद्राबरोबर राहू सुद्धा आहे. युती जरी नसली तरी चंद्राबरोबर राहू किंवा केतू असणे बौद्धिक प्रगतीच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. बुद्धीचा कारक ग्रह बुध हा सुद्धा त्यादिवशी वक्री अवस्थेत आहे. म्हणजेच एकंदरीत ह्या दिवशी जन्म घेणारया बाळाची बौद्धिक क्षमता यतातथाच असू शकेल आणि जन्मतः असणारी साडेसाती, बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही फारशी चांगली नाही. म्हणूनच फक्त दिवस चांगला आहे असा तुमचा समज असेल तर तो त्वरीत Rectify करा.
दिवस कसा आहे हे त्यादिवशी चंद्र कुठल्या राशीत कुठल्या नक्षत्रात आहेत ? त्यादिवशी तिथी कुठली आहे ? कुठला योग आहे ? ह्यावरून ठरतो. काही नक्षत्र ही शक्यतो टाळलेलीच बरी. योगांमध्ये अतिगंड योग,वैधृति योग, व्यतिपात योग,व्याघात योग इ. टाळावेत.
दिवस नक्की केल्यानंतर बाळाच्या जन्माची शुभ वेळ सुनिश्चित करणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. संपूर्ण दिवसात १४४० मिनिटांचा काळ आहे. ह्या १४४० मिनिटांमधून सर्वात चांगली वेळ बाळाच्या जन्मासाठी सुनिश्चित करणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. भविष्य वर्तवताना काही मिनिटांचा जरी फरक असेल तर वर्तवलेले भविष्य चुकण्याची शक्यता असते. माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश लोकांनी दिलेली जन्म वेळ ही चुकीची असते. म्हणजे उदारणार्थ सांगतांना जातक सांगतो माझी जन्म वेळ दुपारी ३.२० आहे. ह्या जातकाचा जन्म होताना जर घडयाळात वेळ ३.१८ असेल आणि डॉक्टरांनी सांगतांना ३.२० सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मनुष्य स्वभाव आहे की ३.२०, ३.२५ अशीच वेळ सांगितली जाते. आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस डॉक्टरांचे घड्याळाकडे लक्ष असणे आपण गृहीत धरू शकत नाही. म्हणूच जेंव्हा जातक माझ्याकडे कुंडली विवेचानासाठी येतो तेंव्हा त्याची जन्मवेळ शुद्धी करावी लागते जेणे करून भविष्य अचूक वर्तवता येते.
जेंव्हा स्त्रीला ती गरोदर आहे हे समजते त्यावेळेस लागलीच तिने Gynecologist डॉक्टरांची भेट घेणे उचित ठरते. कारण सोनोग्रफीमुळे बाळाची गर्भाशयातच वाढ होतेय ना ह्याची खात्री करून घ्यावी कारण काही वेळेस बाळाची वाढ गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत असते. ( ह्या संदर्भातील एका case ची लिंक वाचकांसाठी - http://astroanupriya.blogspot.in/2013_03_01_archive.html ) गर्भाशयाची स्थिती व्यवस्थित आहे कि नाही ? बाळाची व्यवस्थित वाढ होतेय कि नाही ? साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी बाळाच्या हृदयाचे ठोके समजू शकतात.ह्या सर्व चाचण्या करण्यात आळस अजिबात करू नये. हे सांगण्याचे कारण असे कि बरीचशी जोडपी काही गरज नाही म्हणून टाळाटाळ करतात आणि मग अगदी शेवटच्या क्षणी धावपळ होते.
एका रात्री दहा वाजता एका जातकाच्या पत्निला ( जी नऊ महिन्यांची गरोदर होती ) हॉस्पिटलमध्ये तपासणीकरिता नेले असता डॉक्टरांनी emergency मध्ये सिझरिअन करावे लागेल असे सांगितले. जातकाने मला फोन केला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. एवढ्या emergency मध्ये काय मुहूर्त काढणार ? तरी सुद्धा ज्यावेळेस जातकाने फोन केला होता त्यावेळेस मीन लग्न १५ अंशावर होते आणि चंद्र कर्क राशीत होता. मीन लग्न आणि कर्क रास म्हणजे जल तत्वाचा आणि द्विस्वभाव तत्वाचा अतिरेक. अशा योगावर जन्म घेणारे बाळ अत्यंत भावूक असते,अशा व्यक्तीची निर्णयक्षमता क्षीण असते आणि जगाशी स्पर्धा करण्यासाठी ह्यांना स्वतःला स्वतःशी खूप झगडावे लागते. त्यामुळे मीन लग्न शक्यतो टाळावे. मीन लग्नानंतर मेष लग्न सव्वा बारा वाजता सुरु होत होते. मी जातकाला रात्री बारा दहा ते सव्वा बाराच्या दरम्यान बाळाच्या जन्माचा मुहूर्त काढून दिला. अर्थात हा मुहूर्त देताना मात्र त्याला मी त्याला बजावले होते कि आता वाजताहेत साडे अकरा म्हणजेच सव्वा बाराला अजून पाऊण तास वेळ आहे. ह्या वेळेत जर डॉक्टरांनी बाळाच्या आणि आईच्या हितासाठी इतका वेळ थांबू शकत नाही असे सांगितले तर मात्र मुहूर्त लक्षात घेऊ नये. बाळाच्या आणि आईच्या जिवापेक्षा बाकी काही महत्वाचे नाही. त्यामुळे डॉक्टरांची परवानगी घेऊनच हा निर्णय घ्यावा. बाळाचा जन्म ठरल्येल्या मुहूर्तावर झाला. बाळ आता दोन वर्षाचे असून अत्यंत गुटगुटीत आणि गोड आहे.त्याच्याबरोबरीच्या मुलांपेक्षा Active आहे,ग्रहणशक्ती,स्मरणशक्ती उत्तम आहे आणि त्याहीपेक्षा मेष लग्नावर जन्म झाल्यामुळे मीन लग्नासारखे खूपच भावूक नाही आणि मेष लग्नासारखे प्रयत्नवादी दिसते.
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. पुढच्या वीस वर्षात अजून काय बदल होणार आहेत त्याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे माझे तरी मत असे आहे कि बाळाची जन्म वेळ निश्चित करताना पुढील वीस वर्षात होणाऱ्या बदलाचा विचार करतांनाच खालील गोष्टींचीही काळजी घ्यावी -
१) शक्यतो स्थिर लग्न असावे. म्हणजे व्यक्ती स्थिर मनाची असेल आणि निर्णयक्षमता चांगली लाभेल.
२) बाळाच्या आरोग्याला सर्व प्रथम प्राधान्य द्यावे. आरोग्यकारक योग कुंडलीत असावेत.
३) बौद्धिक/शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने बुध आणि गुरु हे सुस्थितीत असावेत. किमान हे ग्रह वक्री/स्तंभी असू नयेत.
४) आर्थिक दृष्टया कुंडलीत योग चांगले असावेत.
५) चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे चंद्र कुंडलीत सुस्थितीत असावा.
६) चंद्राच्या युतीत/योगात पापग्रह नसावेत.
७) चंद्रावर पाप ग्रहांची दृष्टी नसावी.
८) षष्ठ,अष्टम आणि व्यय स्थानात पापग्रहांची युती असु नये.
९) कृष्णमुर्ती पद्धतीने लग्नाचा सब लॉर्ड ६,८,१२ चा शक्यतो निर्देशक होऊ नये. इ.
म्हणजेच पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्हीही पद्धतीने होणारया बाळासाठी शुभ योग जुळवून आणता येतील तेवढे उत्तम. पण वाचकांनी हे लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टी तेंव्हाच जमू शकतील जेंव्हा ज्योतिषाला साधारणपणे एक ते दोन आठवड्याचा तरी वेळ हा मुहूर्त ठरवण्यासाठी मिळू शकेल. काही वेळेस गरोदरपणाच्या सातव्या महिन्यातच केलेल्या सोनोग्राफीत डॉक्टर बाळाच्या गर्भात असलेल्या स्थितीवरून बाळ Natural Birth ने की Cesarean Birth ने जन्म घेणार ह्याची कल्पना देतात त्यामुळे तेवढा वेळ ज्योतिषाला मिळतो आणि नऊ महिने पुर्ण झाल्यानंतरचा शुभ दिवस आणि शुभ वेळ मुहूर्त म्हणून सुनिश्चित करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस अगदी शेवटच्या क्षणी समजते कि आता दोन दिवसात किंवा अगदी चार- पाच तासांचाच कालावधी उपलब्ध आहे. त्या दोन दिवसांपैकी किंवा चार तासांपैकी सर्वात चांगला दिवस किंवा चांगली वेळ निवडण्याची संधीच मिळू शकते. II शुभं भवतु II
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा