शनिची साडेसाती आणि उपाय
Shani Sadesati,Remedies And You
२ नोव्हेंबरला शनि महाराजांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि त्यामुळे धनु राशीला साडेसाती सुरु झाली आणि कन्या राशीची साडेसाती संपली. मी मागच्या काही लेखात हा उल्लेख केला आहे कि मार्च २०१४ पासून माझ्याकडे जितके जातक आले आहेत त्यातले सगळेच धनु राशी किंवा धनु लग्नाचेच आले. एखादा अपवाद असला तर. ह्याचाच अर्थ साडेसातीचा त्रास खूप आधीच सुरु झालेला जाणवतो. २ नोव्हेंबरला शनिने तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला. शनि ज्या राशीत असतो त्या राशीला,त्या राशीच्या मागच्या राशीला आणि त्याच्या पुढील राशीला साडेसाती सुरु असते. म्हणजे उदा. सध्या शनि वृश्चिकेत आहे त्यामुळे वृश्चिक राशीला, वृश्चिक राशीच्या मागच्या म्हणजेच तूळ राशीला आणि वृश्चिकेच्या पुढील राशीला म्हणजेच धनु राशीला सध्या साडेसाती सुरु आहे.शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे
शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे.....
शुक्र,चंद्र,सूर्य,गुरु,बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे....
साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे....त्याच्या आधीची राशी आहे कर्क.......म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली.
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत.............
ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते....
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी...
Shani Sadesati,Remedies And You
To interpret Sadesati we have to understand Saturn. Saturn is described as the son of the Sun, the king of all planets, by his Queen Chhaya, “the shadow”. The sun is the creator of light, and Chhaya is indicator of darkness. Saturn partakes of the apparent physical characteristics of his mother and remains dark. Saturn, being so opposed in nature to this father, Saturn or Sani is said to be banished by the Sun.
Characteristics of Saturn are -
Saturn is said to be concerned with fairness or justice, (No injustice with anybody)
Saturn makes things slow but stable,(Teaches us Patience)
Saturn is dark complextion,
Saturn is handicap by one leg,
Saturn is Service oriented and hard worker (Teaches us to be with No Ego)
Saturn is deep thinker,Researcher,Scientist,
Saturn is Reserved in character.
What is Sadesati ?
Sadesati is a 7.5 years of Saturn's Transit twelfth,First and Second house from the house where Moon is placed in Natal Chart. (Moon Sign /Chandra Rashi). For Example - If your Moon Sign is Scorpio. The sign before Scorpio is Libra and Sign after Scorpio is Sagittarius. When Saturn enters in Libra Sign your Sadesati will start.
Why 7 1/2 Years ?
Saturn is slow moving planet so to transit from one sign to another it takes 2.5 years. So first Phase for Sadesati is of 2.5 years, Scond Phase of 2.5 years and Third Phase of 2.5 years. If you calculate sum of these 2.5 years total comes to 7.5 years. Thats why it is called Sadesati ( 7.5 years).
Sadesati starts means bad luck starts, now there will be loss in Business, You will loose your Loved ones, Your Career will be ruined,you will be shattered etc. According to me this is all nonsense. I will not deny all points but we have to observe these points from other perspective.
I have explained you the the characteristics of Saturn. Saturn is concerned with fairness and Justice. If you are doing or you have done injustice to anyone, you will get the effects for this Karma during your Sadesati. When First Phase of Sadesati begins Saturn effects Starts like - Saturn makes things happen slowly and person who is going through this phase gets puzzled. He suddenly could not understand why things are being so slow around him. For e.g. if he has given an Interview and waiting for a Call from a Company, he has to wait for really long time to get the Job. So the person thinks this is really very bad thing happening with him and that is because of Sadesati. He started feeling negative about Saturn but please hold on, here Saturn wants to teach us Patience. Patience to wait for your turn.
So basically, you have to be loyal,do your work without corruption, do not lie, don't be greedy, help to needy people to get them Food,Shelter,Education etc. according to your budget. Saturn gets impressed by such things. So next time before blaming this Planet,peek inside you.
Saturn's Gemstone- Blue Sapphire. Do not use Blue Sapphire without consent of Astrologer.
Saturn's Colour - Navy Blue/Black
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा