डॉक्टर होण्याचे कुंडलीतील योग
प्रत्येक पालकाला आपले मुल शिकून त्याने खूप प्रगती करावी असे वाटते. त्यापैकी काही पालकांची ही इच्छा असते की आपल्याला मुलाने/मुलीने डॉक्टर व्हावे अथवा इंजिनिअर व्हावे. परंतु काहीच पालकांची ही इच्छा पूर्ण होते. मुलांचा स्वतःचा असलेला कल,अभ्यास -चिंतन -मनन करण्याची तयारी/क्षमता,पालकांची आर्थिक परिस्थिती ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टींवर मुलांचे डॉक्टर होणे अवलंबून असते. कुंडलीतील काही विशिष्ट योगांवरून मुल डॉक्टर होणार का ? ह्याची कल्पना येते. त्याच योगांबद्दलची माहिती ह्या लेखाद्वारे तुमच्या समोर मांडत आहे.
कुंडलीचे एकूण बारा भाग. प्रत्येक भागाचे काही वैशिष्ट्य असते. ह्या प्रत्येक स्थानांचा अभ्यास करूनच व्यक्ति आयुष्यात कोणत्या पद्धतीचे कार्य करणार आहे ह्याची कल्पना येऊ शकते. व्यक्ति डॉक्टर होणार का ह्यासाठी प्रथम स्थान,अष्टम स्थान,षष्ठ स्थान,पंचम,दशम,एकादश स्थान इ. स्थानांचा विचार होतो. स्थानांबरोबरच राशी आणि ग्रहांचे योगही अभ्यासावावे लागतात.
काही राशी ह्या नैसर्गिक "Healers" आहेत असे मला वाटते. वृश्चिक,कन्या,धनु, तूळ आणि मेष ह्या नैसर्गिक "Healers" आहेत. नैसर्गिक "Healers" ह्याचा अर्थ निसर्गतःच त्यांच्यात दुसऱ्या व्यक्तिंना बरे करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता असते. त्याला वैद्यकशास्त्राच्या शिक्षणाची जोड मिळाल्यानंतर तर अशा व्यक्ति काही काळातच प्रसिद्ध होतात. ह्यांच्या फक्त बोलण्याने अथवा समजावण्याने पेशंटला बरे वाटू लागते,आत्मविश्वास वाढतो. ह्या राशी असण्याबरोबरच पत्रिकेत रवि आणि मंगळ ह्या ग्रहांची स्थिती अभ्यासावी. रवि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह वैद्यकशास्त्र शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. हल्ली पालक आमचा मुलगा अथवा मुलगी फक्त डॉक्टर होणार की त्यातही सर्जन होणार की काही स्पेशिअलिटी असेल हे सुद्धा विचारतात. त्यासाठी खालील योग आणि ग्रहस्थिती अहम ठरते.
सामान्य लोकांना मुख्यतः तीन प्रकारची उपचारपद्धती माहिती आहे. १) अलिओपॅथी २) होमिओपॅथी ३) आयुर्वेदिक पद्धती. सध्या काही डॉक्टर नवीन पद्धतीने उपचार करतांना दिसतात. त्यात ते पेशंटच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे (Immune System), मानसिकता psychological pattern ह्याप्रमाणे तीन पद्धतींपैकी दोन पद्धतीचा एकत्रितपणे उपचार करतांना आढळून येतात.
ह्या तीन उपचारपद्धती बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेत. मानसोपचारतज्ञ, कान-नाक-घसा ह्याचे तज्ञ,डोळ्यांचे तज्ञ,हाडांचे तज्ञ (आर्थोपेडिक),प्लॅस्टिक सर्जन,हार्ट स्पेशीआलिस्ट,न्यूरोसर्जन इ. आणि सध्या तर गेल्या ७-८ वर्षात "ऑन्कोलॉजिस्ट" (कॅन्सर तज्ञ आणि सर्जन ) डॉक्टरांची गरज जास्तच भासू लागली आहे. आपले मुलं कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणार हे कुंडलीवरून नक्कीच समजू शकते.
कुंडलीत रवि उच्चीचा असणे,महादशा पूरक लाभणे म्हणजे व्यक्तिचे अलिओपॅथीचे शिक्षण होणार हे निश्चित. शनि आणि गुरुचे कुंडलीतील वर्चस्व म्हणजे आयुर्वेदिक शास्त्राचा अभ्यास. शुक्र,शनि कुंडलीत बलवान असणे म्हणजे होमिओपॅथीचा अभ्यास. ह्याचबरोबर,
१) कुंडलीत रवि अष्टम स्थान,लाभ स्थान चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ति हार्ट सर्जन होऊ शकते.
२) कुंडलीतील चंद्र चांगल्या स्थितीत असणे,चंद्राबरोबर बुध आणि गुरु चांगल्या स्थितीत म्हणजेच व्यक्ति मानसोपचारतज्ञ होऊ शकते.
३) पंचम स्थानाबरोबर अष्टम स्थान आणि रवि,शुक्र,मंगळ ह्यांचा योग गायनॅकोलॉजिस्ट होण्याचे आहेत.
४) शुक्र,बुध,राहू ह्या ग्रहांबरोबर अष्टम स्थान असेल तर व्यक्ति प्लॅस्टिक सर्जन होते.
५) अष्टम स्थानबरोबर केतू,गुरु,मंगळ ह्या ग्रहांचा योग म्हणजे "ऑन्कोलॉजिस्ट" डॉक्टर होणार.
६) रवि ग्रहाबरोबरच शनि ग्रहाची पत्रिकेतील स्थिती आणि स्थान ह्यावरून व्यक्ति आर्थोपेडिक सर्जन होणार हे कळून येते.
७) शुक्र,चंद्र,रवि ग्रह आणि द्वितिय,व्यय स्थान ह्यावरून व्यक्ति डोळ्यांचा तज्ञ हे निश्चित.
८) बुध,शुक्र,शनि ह्यांचा संयोग आणि द्वितीय,तृतीय स्थानांमधील योग म्हणजे ENT Specialist.
९) बुध,मंगळ ह्या ग्रहांचा योग,मेष राशीचे कुंडलीतील स्थान म्हणजे व्यक्ति "न्यूरोसर्जन" होणार.
ह्या सर्व योगांबरोबरच कुंडलीत सुरु असलेल्या महादशा पूरक असाव्या लागतात. त्यावरूनच हे निश्चित करता येते की व्यक्ति कुठच्या पद्धतीने लोकांना बरे करण्यात यशस्वी ठरणार. तुमच्या मुलांच्या कुंडलीत कुठले योग आहेत हे तुम्ही पाहण्याआधी तुम्हांला काही गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात-
तुमच्या मुलाला आधी व्यवस्थित ओळखा. बरेच पालक ह्याच भ्रमात असतात की आम्हांला आमच्या मुलाबद्दल माहिती आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसते. पालकांना त्यांच्या मुलाची बुद्धीची कुवत,अभ्यास करण्याची क्षमता, एका जागी बसण्याची तयारी, मुलं सकाळी अभ्यास करू शकतो की संध्याकाळी ?, मनाची चंचलता, दुसऱ्या व्यक्तिबरोबर सतत आपली बरोबरी करण्याची सवय, Inferiority Complex असणे, अभ्यासापेक्षा खेळांत जास्त प्राविण्य मिळवण्याची क्षमता ह्या सर्वांची अजिबात कल्पनाच नसते. काही वेळेस तुम्हांला मुल हुशार असल्याने डॉक्टरच व्हावे असे जरी वाटत असले तरी मुलाला डॉक्टर होण्यात स्वारस्य नसते. किंवा डॉक्टर होऊनसुद्धा अशा व्यक्ति मग वेगळ्याच क्षेत्रात काम करतांना दिसतात. माननीय डॉक्टर आमटे ह्यांचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहेच. डॉक्टर होऊन दुर्गम ठिकाणी जाऊन आदिवासी लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून बरे करण्यात त्यांना आनंद मिळतो.
म्हणूनच आपल्या मुलांना आधी ओळखा. Three Idiots फिल्ममधील एक सवांद कधीच विसरू नका -
"Success के पिछे मत भागो. Excellence के पिछे भागो. Success पिछे आएगी"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा