आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती
दिनांक २५ मार्च रोजी माझ्या ह्याच ब्लॉगवर मी शनि आणि मंगळाच्या युतीचे काय परिणाम होऊ शकतील ह्यांवर लेख लिहिला होता. (आपण वाचला नसल्यास लिंक देत आहे -http://astroanupriya.blogspot.in/2018/03/blog-post_25.html ) १) त्यात शनी मंगळाच्या युतीमुळे मोर्चे निघणे, जातीय अथवा धार्मिक दंगली होऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच भारत बंदला हिंसक वळण लागले त्यात बऱ्याच राज्यात जीवितहानी सुद्धा झाली. उद्या(मंगळवार दिनांक - ३ एप्रिल रोजी ) ह्या बंदला भडकावण्यासाठी राजकीय वर्तुळातून काही हालचाली होऊ शकतील.
२) ह्या लेखात लोकांनी मोर्चे काढणे-चर्चेतून गैरसमज होणे हे शक्यता वर्तवण्यात आली होती. आज मुंबईत होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.
३) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे - अ) केजरीवाल ह्यांनी अरुण जेटली ह्यांची माफी मागितली.
४) मोठाली जहाजं/रेल्वे ह्यांचा अपघात होणे - आज पहाटे चीनचे स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळले.
५) मंगळ आणि शनिच्या युतीमुळे अपघात होणे,आगी लागणे - आज महाराष्ट्रात पाच ठिकाणी अग्नितांडव झाले. अ) भिवंडीत "तेलाच्या"(तेल किंवा पेट्रोल हे शनिच्या अधिपत्याखाली येते.) १२ ते १३ गोदामांना आग लागली. आग(आग - मंगळाच्या अधिपत्याखाली ) शांत होण्यास १० तांस लागले. म्हणजे आगीची तीव्रता लक्षात येते. ब) मुंबईत अंधेरीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटला आज दुपारी आग लागली. क) पुणे इथे महालक्ष्मी मार्केट यार्डला आग लागली. ड) औरंगाबादच्या माणिक इस्पितळाच्या पहिल्या मजल्याला आगीमुळे नुकसान झाले. इ) प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे ह्यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला.
खाली आज घडलेल्या काही घडामोडींबद्दल सविस्तर लिहिले आहे. पुणे आणि भिवंडी इथे लागलेल्या आगीच्या वेळेची कुंडल्या दिलेल्या आहेत.
भारत बंद - ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या वादातून आज एप्रिल २ रोजी भारत बंद पुकारण्यात आला. विविध संघटनांनी आंदोलन करत नारेबाजी केली. दुपारपर्यंत ह्या बंदला हिंसक वळण लागले. मध्यप्रदेशात एका व्यक्तिने गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या,त्यात एका व्यक्तिचा मृत्यु झाला. उत्तरप्रदेशातील हपूर स्टेशनजवळ २००० च्या संख्येने आलेल्या जमावाने रेल रोको आंदोलन केले ज्यामुळे ४-५ तास रेल्वे सेवा ठप्प होती.
खाली आज घडलेल्या काही घडामोडींबद्दल सविस्तर लिहिले आहे. पुणे आणि भिवंडी इथे लागलेल्या आगीच्या वेळेची कुंडल्या दिलेल्या आहेत.
भारत बंद - ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या वादातून आज एप्रिल २ रोजी भारत बंद पुकारण्यात आला. विविध संघटनांनी आंदोलन करत नारेबाजी केली. दुपारपर्यंत ह्या बंदला हिंसक वळण लागले. मध्यप्रदेशात एका व्यक्तिने गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या,त्यात एका व्यक्तिचा मृत्यु झाला. उत्तरप्रदेशातील हपूर स्टेशनजवळ २००० च्या संख्येने आलेल्या जमावाने रेल रोको आंदोलन केले ज्यामुळे ४-५ तास रेल्वे सेवा ठप्प होती.
भिवंडी तेलाच्या गोदामांना आग
रात्री १२ च्या सुमारास आग लागली. आगीत १२ ते १३ गोदामं जाळून खाक. अग्निशामकदलाच्या सहा गाड्या आग १० तासांनंतर आग आटोक्यात आली.
ह्यावेळेची कुंडली मी जिज्ञासू ज्योतिषांसाठी देत आहे -
L - मंगळ - १,५,१२
S - चित्रा नक्षत्र - मंगळ -१,५,१२
R - शुक्र - ४,६,७,११
D - चंद्र - १०,८
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून तो पुढील स्थानांचा कार्येश - १,५,१२
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून तो १,२ आणि ३ ह्या स्थानांचा कार्येश.
अष्टम स्थान हे धोक्याचे/अपघाताचे स्थान आहे. ह्या स्थानाचा सबलॉर्ड मंगळ स्वतः आहे. व्यय स्थान म्हणजे नुकसानीचे स्थान. ह्या स्थानाचा सबलॉर्ड शनि आहे.
पुणे मार्केटयार्ड आग लागली
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका धान्याचे दुकान भीषण आगीत जळून भस्मसात झाले. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
तेंव्हाची कुंडली -
L - बुध (वक्री) ९,१,४
S - स्वाती नक्षत्र - राहू - १,२
R - शुक्र - १०,५,१२
D - चंद्र - ४,२
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून पुढील प्रमाणे कार्येश - ६,६,११.
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून ६,८ आणि ९ ह्या स्थानांचा कार्येश.
औरंगाबाद- इस्पितळाला आग लागली - आज औरंगाबाद शहरातील जवाहर पोलिस स्टेशन समोरील माणिक हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याला आग पसरली होती.अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि 10 खासगी टॅंकरच्या मदतीने आग विझवण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. माणिक हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमध्ये स्क्रॅप जळाल्याने धूर निघाला होता. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अमोनिया गॅस गळती - उत्तरप्रदेशात एका ठिकाणी अमोनिया गॅस गळती झाली. जीवितहानी नाही.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ- आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली.
मोर्चा - होमिओपॅथी डॉक्टरांनी आझाद मैदानात मोर्चा काढला आहे.
आजच्या ज्या घटना घडल्या त्यापैकी दोन घटनांच्या कुंडल्या मी वर दिल्या आहेतच. ह्या कुंडल्यांमधील आढळलेले साम्य म्हणजे - - लग्न बिंदूच्या सर्वात जवळ प्लुटो आणि गुरु हे दोन ग्रह होते.
- प्लुटो ह्या ग्रहाला कुंडली विवेचनात गृहीत धरले जात नसले तरी अशा घटना घडतांना प्लुटो नेहमीच लग्नबिंदूजवळ आढळून येतो.
- प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. लग्न २८ अंशावर असतांना प्लूटो २७ अंश म्हणजेच लग्न बिंदूच्या बरेच जवळ होता. म्हणूनच जेंव्हा घटना घडल्या तेंव्हा कुठल्याही एका व्यक्तिचे नुकसान न होता एकूण समाजव्यवस्थेवर परिणाम झाला. घटना घडवून आणणारे सुद्धा एक-दोघे नव्हते. ह्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे कोणीच नव्हते. घटना घडवून आणणारे समूहाने होते - प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. भारत बंद जाहीर झाल्यानंतर आंदोलनं जी झाली, त्या आंदोलनाचा परिणाम अर्थात वाईट होता. एकूण नऊ लोकांचे बळी ह्या आंदोलनामुळे गेले.
म. टी. - २५ मार्चचा लेख ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांना तो आवडलाच परंतु आज ह्या सर्व घटना घडत असतांना मला त्यांचे अभिनंदनाचे फोन आणि मेसेजेस येत होते. तुम्ही लेखांत लिहिल्याप्रमाणे घडत आहे असा अभिप्राय सर्वांचाच होता. त्या सर्वांना धन्यवाद.
आज घडलेल्या घटना अप्रिय होत्या. ह्यातून एकच गोष्ट सिद्ध होते ग्रहांच्या होणाऱ्या योगांवर दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याचा अजून अभ्यास व्हावा. मी माझ्या बुद्धीला जेवढे समजले तेवढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतिष प्रेमींनी,गुरूंनी ह्यांवर अजून प्रकाश टाकावा. काही मुद्दे माझ्याकडून राहून गेले असावेत ते नक्की नमूद करा.
आजप्रमाणेच १७ तारखेपर्यंत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून रहावे.
अनुप्रिया देसाई
९८१९०२१११९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा