बुधवार, २० मार्च, २०१९

शनि केतूची युती २०१९

नमस्कार वाचकहो,
शनि केतूची युती २०१९ साठी महत्त्वाची ठरणार आहे. निवणुका जवळ आहेत. होणारी ही युती धनु राशीत रवीच्या नक्षत्रात आहे. रवी हा "Politics" चा कारक. ही युती प्रत्येक राशीला फळ देण्याऐवजी सामूहिकपणे फळ(ह्याला Collective Destiny म्हणतात.)) देणार आहे ह्याचे कारण ह्या युती बरोबर प्लूटो सुद्धा आहे. प्लूटो हा समूहाचा कारक आहे त्यायोगे घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 


अनुप्रिया देसाई (9819021119)
ज्योतिष -वास्तू विशारद 


बुधवार, ६ मार्च, २०१९

अनावश्यक वाढलेले वजन आणि तुमची कुंडली

अनावश्यक वाढलेले वजन आणि तुमची कुंडली

वाढलेल्या वजनाबद्दल सध्याची पिढी ही सजग आहे. दिक्षित आणि दिवेकर ह्यांत काही जण confused आहेत तर काही जण जिममध्ये जाणे पसंत करीत आहेत. काहीजणांसाठी "योगासेही होगा" हे ब्रिदवाक्य चपखलपणे बसतंय. आपण छान दिसावं हे सर्वांनाच वाटतं परंतु त्यासाठी प्रयत्नशील मात्र काहीजणच आहेत. वाढलेले वजन (Fat )आणि लठ्ठपणा (Obese ) ह्यांत फरक आहे. लठ्ठपणाची पहिली पायरी म्हणजे वाढेलेले वजन. ह्या लठ्ठ्पणानंतर शारीरिक व्याधी जडायला सुरवात होते.  त्यामुळे वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे. वाढत्या वजनामुळे हॉर्मोन्स,मधुमेह,हार्निया,हृदयरोग इ. व्याधी जडतात. ह्या वाढलेल्या वजनाचा आणि कुंडलीचा काय संबंध हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. कुंडलीवरून तुमच्या मानसिक आणि शारीरिक जडणघडणाची कल्पना येते. एखाद्या लहान मुलाच्या कुंडलीवरून त्याची शारीरिक चण पुढे कशी असेल हे नक्कीच सांगता येऊ शकते. कालच टी. व्ही.वर एक प्रोमो पाहिला. त्यांत मुलगी म्हणते,"कुंडल्या तर जुळतील पण स्वभाव ?" कुंडली मुळातच आहे तुमचा स्वभाव ओळखण्यासाठी. तुम्ही जे लपवून ठेवू शकता ते सर्व कुंडली विवेचनाने वाचता येऊ शकते. एखादी व्यक्ति पहिल्या -दुसऱ्या भेटीत ते स्वतः किती तापट किंवा रागिष्ट आहेत हे तुम्हांला सांगणार नाहीत पण हेच कुंडलीवरून लगेच सांगता येऊ शकते. स्वभावाप्रमाणेच तुमच्या शरीरस्वास्थ्याबद्दल कुंडली बरेच काही सांगू शकते. तुम्हांला असणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी तुम्ही लपवू शकाल परंतु कुंडली हे लपवू शकत नाही. तुमच्या स्वभावाचा पूर्ण कच्चा-चिठ्ठा म्हणजेच कुंडली. मनाप्रमाणेच शारीरिक ठेवणंही कुंडलीवरून लक्षात येते. ते कसे ते पाहू.


लठ्ठपणा हा तुमच्या वाढत्या चरबीवर अवलंबून आहे. गुरु हा मेदवृद्धीकरक आहे. गुरूचा अंमल यकृत (Liver ),चरबी, रक्तातील साखर आणि cholesterol वर आहे. गुरु ग्रहाचा अभ्यास केल्यास गुरु हा सर्व ग्रहांमध्ये आकारमानाने फार मोठा आहे.

गुरु म्हणजे -  ‘वाक् धोरणी मंत्र याग तंत्र नैतिक गज तुरंग यानिगमबोधकर्मपुत्रसंपन्जीवनोपाय कर्मयोग सिंहासनकारको गुरूः’. 
अर्थात - गुरु हा ज्ञान,  ज्ञानसुख, संपत्ती, वैभव, हत्ती, घोडे वगैरे राजवैभव, संतती, राजकारणकुशलता, शहाणपण, अध्यापकत्व,परमार्थप्राप्ती, दातृत्व, पुण्यकर्म, तीर्ययात्रा,साधु समागम, योगमार्ग, दीक्षा, दीर्घायुत्व, इत्यादी गोष्टींचाही कारक ग्रह मानला गेला आहे. 
अशा ह्या गुरूचा अंमल तुमच्या कुंडलीत कुठल्या स्थानांवर आहे ? तो कुठल्या राशीत आहे ह्यांवरून लठ्ठपणा ठरतो. गुरु जर शुक्राच्या राशीत असेल, शुक्राबरोबर असेल, चंद्राबरोबर असेल तर तुमच्या शरीरात चरबी प्रमाणापेक्षा जास्त असू शकते. तुमची राशी धनु,मीन असून जर तुमचा राशी स्वामी गुरु ह्या ग्रहांबरोबर असेल तर तुम्हांला वजन कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल.
गुरूप्रमाणेच शुक्र हा सुद्धा शरीरातील अतिरिक्त वजन वाढवण्यास मदत करतो. शुक्राचा अंमल असणाऱ्या व्यक्तिंमध्ये आळस असतो. सुख-भोगविलास हा स्वभाव असल्याने जेवल्यानंतर लगेच कामाला सुरवात करणे, चालणे हे टाळले जाते. त्यामुळे जेवणानंतर आहाराचे रूपांतर चरबीत (गुरु)होण्यास शुक्र मदत करतो. शुक्रप्रधान व्यक्तिंनी जेवण हे एकाच वेळीस करू नये. जेवण हे Installment मध्ये केल्यास फायदा होऊ शकेल. ह्यामुळे जेवणानंतर येणारा आळसही येणार नाही. जेवल्यानंतर थोडे चालणे असावे. ह्याचे कारण असे की शुक्र हा वायुतत्वाचा ग्रह आहे. शुक्राच्या दोन राशी आहेत. वृषभ आणि तुळ. वृषभ राशीत जर तुमचा चंद्र,शुक्र किंवा गुरु असल्यास व्यक्ति सडपातळ असणे अपवादात्मकच आहे. अशी स्थिती तुमच्या कुंडलीत असल्यास सडपातळ होणे शक्य नाही. त्यामुळे बारीक होण्यापेक्षा वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवून बांधा योग्य प्रमाणात राहील ह्यांवर लक्ष द्या.
शुक्रप्रधान व्यक्ति म्हणजे ज्यांची राशी वृषभ किंवा तुळ आहे. ज्यांचे जन्मलग्न वृषभ अथवा तुळ आहे. लग्नात शुक,चंद्र,गुरु हे ग्रह आहेत. चंद्र हा शुक्राच्या नक्षत्रात,चंद्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र स्वतःच्याच तुळ अथवा वृषभ राशीत आहे राशीत आहे. अशी कुंडलीतील स्थिती म्हणजे व्यक्ति शुक्रप्रधान असणे. अशा व्यक्तिंना वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असते. गोड आणि दुग्धजन्य( पनीर-चीझ),मांसाहार हा प्रिय असतो. अशा व्यक्तिने वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे. नियमित व्यायाम न केल्यास Obesityचा सामना करावा लागतो. ह्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सायकलिंग,जिम किंवा किमान सूर्य नमस्कार रोजच्या नित्यक्रमात असावेत.
शुक्रानंतर लठ्ठपणासाठी कारक असलेला ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. शरीरातील पाण्यावर चंद्राचा अंमल आहे. शरीरातील हॉर्मोन्सचा कारक ग्रह चंद्र आहे. चंद्र लग्न स्थानात असणे,शुक्राबरोबर असणे, उच्च राशीत असणे म्हणजे चंद्राचा कुंडलीवर असणारा अंमल दर्शवतो. अशी स्थिती वजन वाढवण्यासाठी पूरक ठरते. चंद्र प्रधान व्यक्ति ह्या मुळातच हळव्या स्वभावाच्या असतात. दुसऱ्या व्यक्तिने जराही काही नकारत्मक बोलणे म्हणजे गंगा -जमुना डोळ्यातून उगम पावल्याच म्हणून समजा. स्वतःच्या आयुष्यातील चढ -उताराचा सामना करीत असतांनाच दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःखावर सतत विचार करीत राहणारी व्यक्ति म्हणजे चंद्रप्रधान व्यक्ति. पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवणे आणि मग त्याच व्यक्तिकडून फसवणूक अशामुळे ह्या चंद्रप्रधान व्यक्तिंना  नैराश्य (depression), दुःख,चिंता,anxiety अशा गोष्टींचा सामना सतत करावा लागतो.  मनावर होणाऱ्या परिणामाचे रूपांतर वाढत्या वजनात होऊ शकते. त्यामळे तुमच्या रागावर, नैराश्यावर, anxietyवर त्वरित उपचार करून घेणे. Meditation, योगाभ्यास, Counselling ह्यामुळे अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यांत आणता येईलच परंतु हॉर्मोन्स संदर्भातही तुम्हांला चांगले परिणाम मिळू शकतील.
वजन कमी करण्यासाठी मंगळ ह्या ग्रहाचे उपाय करायला हवेत असं मला वाटतं. मंगळाचे उपाय म्हणजे शारीरिक कसरत. चालणे,धावणे,व्यायाम,सायकल चालवणे हे मंगळाच्या अंमलाखाली येणारे उपाय. परंतु हे उपाय सर्वांनाच जमू शकतील असे नाही त्यामुळे तुमची कुंडली तपासून कुठल्या उपायांचा अवलंब करायला हवा ते व्यवस्थित समजून घ्या. वजन कमी करणे फक्त हेच लक्ष्य न ठेवता कमी झालेले वजन नियंत्रणताही ठेवता आले पाहीजे. त्यासाठी सातत्य हवे. सातत्य म्हणजेच Continuity. व्यायाम,मेडिटेशन,योग ज्या कुठल्या उपायांचा तुम्ही अवलंब केला आहे त्यात सातत्य ठेवा म्हणजे वजनावर नियंत्रण राहील.  

हा लेख सामना मध्ये ०६/०३/२०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 


अनुप्रिया देसाई 

READERS ALL OVER THE WORLD