नमस्कार,
आज श्रीलंकेत सकाळी ८.४५ च्या दरम्यान सिरीयल ब्लास्ट झाले. अतिशय दुःखदायक घटना आहे. दुःखाबरोबरीनेच धक्कादायक सुद्धा आहे. का आणि कशासाठी हे प्रश्न मनात येतातच. मुख्य म्हणजे हे ब्लास्ट मानवी बॉम्बद्वारे घडवून आणण्यात आले. लवकरच पुढील माहिती समोर येईल. ही घटना घडल्यावर माझ्या व्हिडिओच्या दर्शकांनी ताबडतोब मला मेसेजेस पाठवायला सुरवात केली. २० मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या माझ्या व्हिडिओमध्ये तत्सम गोष्टींचे अंदाज दिले होते. ह्या काही महिन्यांत अशाच काहीशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि घटना एकाच व्यक्तिवर परिणाम करणार नसून एक साथ बऱ्याच व्यक्तिंवर ह्याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ह्यातील तीन ब्लास्ट हे चर्चमध्ये झालेत. ह्या दोन्ही गोष्टी मी त्यात नमूद केल्या होत्या. पुन्हा एकदा ग्रहांनी दर्शविलेला धोका खरा ठरला.
त्या व्हिडिओची लिंक देत आहे -
ज्योतिष प्रेमींसाठी वि. टी. - आज गुरु वक्री असून,नक्षत्रसुद्धा गुरुचेच आहे - विशाखा. ह्या पुढे शनिवार,गुरुवार, शनि -गुरूच्या नक्षत्रात चंद्र असतांना अशा घटना घडतील. लक्ष ठेवा.
अनुप्रिया देसाई - ज्योतिष वास्तू विशारद
www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा