ब्रह्मांडातील रत्ने
माझ्या ज्योतिष आणि वास्तू शास्त्रावरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या गणेश जयंतीला हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. काल बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. ह्या एका वर्षात लोकांच्या मनातून ज्योतिष शास्त्राबद्दलची भीती कमी करता आली ह्यांत आनंद आहे. मुळातच ह्या पुस्तकांत फार ज्योतिष शास्त्रीय भाषा वापरलेली नाही. सर्वसामान्य जातकांना वाचता येईल अशा पद्धतीने वाक्यरचना आणि केसेस दिलेल्या आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर आवर्जून फोन करून वाचकांनी त्यांना पुस्तक आवडल्याचे कळवले. पुस्तकातील वास्तू शास्त्राच्या टिप्स त्यांना उपयोगी ठरत आहेत. सर्व वाचकांचे आणि जातकांचे आभार !!!
अनुप्रिया देसाई
९८१९०२१११९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा