रविवार, २१ एप्रिल, २०१३

परदेशगमन योग

परदेशगमन योग 


आजकाल चांगली नोकरी कधी मिळेल हा प्रश्न विचारला तर जातोच त्याचबरोबर नोकरीनिमित्ताने परदेशात रहायचे योग आहेत का माझ्या कुंडलीत ???? हा प्रश्न सर्रास विचारला जातो. 

दिनेश प्रसिध्द अशा IT कंपनीत नोकरीला आहे. मागच्या सहा वर्षापैकी ३ वर्षे तो अमेरिकेला राहिला आहे. त्यानंतर काही कौटुंबिक कारणामुळे त्याला भारतात परतावे लागले.  भारतात परतल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा त्याला अमेरिका ,तेथील राहणीमान याची आठवण येऊ लागली. बरयाचदा मी हे ऐकते आणि पाहिले आहे कि एकदा अमेरिकेला गेल्यावर तिथल्या राहणीमानाची लोकांना सवय होते. मग त्यांना भारतात करमेनासे होते. दिनेशलाही आता अमेरिकेचे वेध लागले होते परंतु गेल्यावेळेस तडकाफडकी भारतात निघून आल्याने वरिष्ठ त्यावर नाराज होते. आता करायचे काय ? जायचे तर अमेरिकेला आणि वरिष्ठ जाऊ देत नाहीत आणि त्यात त्याने जाऊ नये म्हणून इथले म्हणजे भारतातले काही Projects त्याला देण्यात आले. आता ही गुगली होती कारण एकदा हा Project हातात घेतला कि वर्षभर तरी त्याची रवानगी अमेरिकेला नाही आणि Project वर काम करणार नाही असे म्हणूनही चालणार नाही. कारण त्याने Ratings वर परिणाम झाला असता. मग आता ????? 

दिनेश अगदी बारीकसा चेहेरा करून मला विचारात होता …मी  कधी जाऊ शकेन ? मी इथे आता जास्त काळ नाही राहू शकत. काय सांगतेय माझी कुंडली?? कुंडलीवरून ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्नकुंडलीवरून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी प्रश्नकुंडली मांडली. 

तूळ लग्नाची कुंडली. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी :  जेंव्हा जातक मनापासून प्रश्न विचारतो तेंव्हा कुंडली तसे Reflect करते. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे जातकाने जरी काही प्रश्न स्पष्टपणे ज्योतिषाला नाही विचारले तरी चंद्र प्रश्नकुंडलीत व्यवस्थितपणे जातकाच्या मनाचे प्रतिबिंब दाखवतो. तर इथे तुळ लग्न. चंद्र स्वतः षष्ठ स्थानात (नोकरीचे स्थान ) चंद्राची कर्क राशी लाभ स्थानात. म्हणजेच नोकरीत त्याला अपेक्षित आहे त्याचा त्याला लाभ होणार आहे. खाली त्यादिवशीचे रूलिंग मांडतेय. रूलिंग म्हणजेच प्रश्न विचारल्येला दिवशीचे Dominating Planets. तर रूलिंगज़   खालीलप्रमाणे :

L  - शुक्र ८, १, ८          न. स्वा. चंद्र ५, १० 

S  - शनि १२, ४, ५      न.स्वा. मंगल १०, २, ७ 

R  - गुरु ७, ३, ६          न.स्वा. शुक्र ८, १, ८ 

D  - बुध  ५, ९, १२       न. स्वा. शनि १२, ४, ५ 

कुंडलीतील बारावे स्थान हे जन्मठिकाणापासून दूर जाण्याचे योग दर्शवतो. जर जातकाला भारताबाहेर जायचे आहे तर बारावे स्थान हे बलवान हवे. [फार ज्योतिषशास्त्राचे "किचकट" गणित इथे संपूर्णपणे उलगडत नाहीये कारण त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास नसलेल्यांचा Interest जाईल.]  इथे बुध १२ व्या स्थानाचा निर्देशक आहे आणि तो शनिच्या नक्षत्रात आहे. शनि सुद्धा १२व्या स्थानाचा निर्देशक. 

हा प्रश्न मला दिनेशने गेल्या एप्रिलमध्ये विचारला होता. येणारया दशा सप्टेंबर व ऑक्टोबर ह्या काळात अमेरिकेला दिनेश जाईल असे चित्र होते. आता हे दिनेशला सांगायचे म्हणजे पंचाईत कारण दिनेशला उद्याच जा असे Managerने म्हटले असते तरी त्याची तयारी होती. अशा व्यक्तीला सांगायचे अरे तुला पाच महिने तरी निदान थांबावे लागेल. शास्त्राचे नियम चुकत नाहीत. त्याला स्पष्टपणे सांगितले, "दिनेश तुला जरी घाई असली तरी नियतीने तुझे अमेरिकेला जाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान ठरवलेले आहे." चेहेरा हिरमुसलेला झाला पण इलाज नाही. "ठीक आहे बघू ", असे म्हणून दिनेश निघाला त्याला काही मंत्र व उपाय दिले. 

मे व जुन महिना दिनेश अथक प्रयत्न करत होता पण त्याला दाद मिळत नव्हती. तोपर्यंत त्याच्या managerने त्याची वरती तक्रार केली होती ती न जुमानता दिनेशचे प्रयत्न सुरूच राहिले. ह्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्याला अमेरिकेचा Project मिळाला आणि तोही जुलैच्या पहिल्या आठवड्यात. दिनेशचा आनंदाने मला फोन आला पण एक गडबड होती. आता Project तर मिळाला परंतु तोपर्यंत दिनेशचा Visa संपला. [शक्यतो ज्यांचा Visa  आहे त्याच व्यक्तीला Project दिला जातो परंतु इथे दिनेशने काही प्यादी वेगळ्या पद्धतीने हलवली होती.] आता Visaची वाट बघा. Visaसाठी दिनेशला मद्रासला जावे लागले तिथे सगळ्या तांत्रिकी गोष्टी झाल्या आणि काही दिवसातच Visa मिळेल म्हणून सांगण्यात आले. सप्टेंबर उजाडला. दिनेशला धाकधूक होती. सप्टेंबर आला तसा गेला आणि दिनेशचा Patience संपला. कारण Project Manager चा सतत फोन येत होता. 

ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला दिनेशशी  माझे बोलणे झाले त्याला म्हटले जरा थांब. सांगितलेली उपासना सुरूच ठेव. ऑक्टोबर गेला नाहीये. त्याला कसला धीर,"ताई ही संधी गेली तर माझे Rating खूप कमी होईल. इथे मला त्रास देतील तो वेगळाच कारण इतके महिने इथल्या कुठल्याही Project ला मी हात लावलेला नाही." मी जास्त काही म्हणाले नाही कदाचित काळ उत्तर देईल. आठ ऑक्टोबर उजाडला आणि सकाळी सकाळी मला दिनेशचा फोन आला ती खुशखबर देण्यासाठी. त्याला Visa ही मिळाला आणि १४ ऑक्टोबरचे तिकीटही मिळाले. खूप खुश होता दिनेश आकाश ठेंगणे झाले होते त्याला त्यादिवशी. 

नेहेमीप्रमाणे शास्त्राने आपले काम चोख बजावले. मी संपूर्णपणे नतमस्तक आहे आणि तुम्ही ????
 कळवा मला इथे नक्की  : anupriyadesai@gmail.com 

NOTE : Ruling मध्ये शनि आहे. जरी तो १२ स्थानाचा कार्येश होतोय तरी शनिचे नैसर्गिक गुणधर्म "विलंब करणे" हा आहे त्यामुळे दिनेशला Visa मिळण्यास विलंब झाला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा  



सकाळी ११. ३० ची appointment आवरली आणि मी नेहेमीचे वाचन सुरु केले तेवढ्यात शीतलचा फोन. " मला तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही कुंडली पाहता ना ? मला तुम्हाला भेटायचे आहे … कधी येऊ शकते ?"  तिला दोन दिवसांनंतरची appointment दिली. ठरल्यावेळी शीतल आली आणि तिच्या चेहेऱ्यावरचे tension बघून मी समजले काहीतरी मोठा Problem आहे. (आणि Problem नसेल तर ती माझ्याकडे आली कशाला असती ??) उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे गार पाणी दिले थोडा वेळ जाऊ दिला. ती जरा शांत झाली.


तिच्या पत्रिकेवर दृष्टीक्षेप टाकला असता दशमातील तुळ  राशीतील शुक्र व राहू युति कुंडलीचा वेगळेपणा  सांगून गेली. तिला विचारले तुझे काही सौंदर्यप्रसाधना संदर्भात कामकाज आहे का ? ती हसली आणि म्हणाली ,"हे समजते कुंडलीवरून ????"  म्हटलं …"त्यालाच कुंडली म्हणतात." तर तिची नोकरी ही अत्तराशी संबंधात होती. अत्तर म्हणजेच आताच्या भाषेत "Perfume"च्या  कंपनीत हिचे काम चांगल्या दर्जाचे सुगंध निवडणे. पुढे त्यावर Processing होऊन Brand Name वगैरे वगैरे…सप्तमात असलेला कर्केचा शनि बुधाच्या नक्षत्रात. सप्तम स्थान प्रत्येकाच्या Married Life ची Story सांगते.फक्त शनि आला म्हणून वाईट नाही परंतु कुंडली बघितल्यावर हे लक्षात आले का सप्तमाचे जे अष्टम स्थान आहे म्हणजे जिथे कुंभ ही राशी आहे आणि त्याचा स्वामी शनि सप्तमात आला आहे. शनि स्वतः बुधाच्या नक्षत्रात. (बुध म्हणजे Duality. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दोनदा effect मिळणे. ज्यांच्या कुंडलीत बुधाचा सप्तम स्थानाशी संबंध येतो व बाकी ग्रहही पूरक असतील तर व्यक्तिचा दोनदा विवाह होतो.) सप्तम स्थानात कर्क रास. कर्केचा स्वामी चंद्र हा कुंभ राशीत आहे व कुंभेचा स्वामी शनि आत्ताच पाहिले …. बुधाच्या नक्षत्रात.

आत्ता पारंपारिक ज्योतिषीय पध्दतीने मला तिची व्यथा समजली परंतु म्हटले कृष्णमुर्ती पध्दतीनेसुद्धा बघू. म्हणून कृष्णमुर्ती पध्दतीचे Significator Page काढले आणि इथे मी ठाम झाले कि इथे ती तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलयला आली आहे. सप्तमाचा सब लॉर्ड रवि आणि तो अष्टम स्थानाचा बलवान कार्येश.  मागच्या एका लेखात मी सांगितले होते अष्टम स्थान म्हणजे अडथळे,अपघात,प्रचंड मनःस्ताप कधीतर मृत्यूच.  मृत्यू म्हणजे काय?? एखाद्या गोष्टीचा अंत म्हणजे मृत्यू. इथे वैवाहिक जीवनात बरीच वादळे येऊन शीतलला प्रचंड मानसिक त्रास झालेला असण्याची शक्यता आहे. बरे हा मानसिक त्रासाचे कारण काय ते तरी बघुया म्हणून तिच्या पंचम स्थानावर दृष्टी टाकली आणि उत्तर सापडले. पंचम स्थान म्हणजेच संतत्ती स्थान. लग्नानंतर काही वर्षात होणारया बाळाची सर्वचजण वाट बघत असतात. हिच्या पंचम स्थानात गुरु तोही वक्री. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाची फळे नष्ट करतो. पंचम स्थानावर मंगळासारख्या ग्रहाची आठवी दृष्टी. कृष्णमुर्ती पध्दतीने पंचमाचा सब लॉर्ड सुद्धा गुरुच असून तो चतुर्थ व व्यय म्हणजेच प्रतिकूल भावांचा कार्येश आहे. तेंव्हा हिला Pregnancy राहिली तरी पुढे धोका आहे. म्हणजेच Miscarriageचे योग आहेत. सगळी कहाणी लक्षात आल्यावर तिला तसे विचारले आणि ती स्तब्ध झाली. मला उत्तरे मिळाली. 

लग्नाला ९ वर्षे झाली तरी शीतलच्या घरी बाळाचे आगमन झाले नव्हते. मधल्याकाळात तिला दोनदा Pregnancy राहिली परंतु दोन्ही वेळेस Miscarriage झाले. डॉक्टरांनी तिला पुढे कधीही बाळ होणार नाही हे सांगितले. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.परंतु माणूस आशेवर जगतो. पुढे काही आशा आहे का हा तिचा प्रश्न होता. येणाऱ्या पुढील दशा- अंतर्दशा ह्या संततीसाठी पूरक नाहीत ह्याची तिला स्पष्ट कल्पना दिली.  काही वेळेस खूप स्पष्ट बोलावे लागते कारण जातकाला त्या स्पष्टपणाची गरज  असते.  

तिला बाळ होत नाहीये म्हणून तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली गेली होती. भविष्यात काय लिहिले आहे हे जाणून घेऊन तिला निर्णय घ्यायचा होता. तिला तिचे उत्तर मिळाले आणि मला ग्रहांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. धन्य ते शास्त्र आणि धन्य ते के एस कृष्णमुर्ती  ज्यांच्यामुळे इतके अचूक भविष्य सांगता येते आणि त्यामुळे आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होते. 

Note : सप्तम स्थानही बिघडलेले असल्याने इथे घटस्फोट मिळणार हे निश्चित आहे. 

तिची कहाणी ऐकल्यावर मनात आले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 

कशी वाटली ही Case?? नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष


कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष 

बरेच दिवस वास्तूवर काही लिहिले नाही म्हणून वाचकांकडून विचारणा होत होती. आजचा प्रपंच त्यासाठीच. 
एकदा एक जोडपे मला भेटण्यासाठी आले होते. नील स्वतः डॉक्टर आणि परी इंजिनीअर . लग्नाला तीन वर्षे झाले तरी बाळाची चाहुल लागली नव्हती. घरचे,मित्रमंडळी, नातेवाईक सगळे विचारणा करत होते.  "Planning" आणि "Carrier" च्या नावाखाली नील व परी पुढचे बोलणे टाळत. परंतु आतल्याआत दोघांनाही ही गोष्ट खात होती. सगळ्या चाचण्या झाल्या. दोघांचे "Reports" अगदी Normal. मग असे का होतेय ते काळात नव्हते. त्यासाठी दोघे आले होते.

दोघांच्या कुंडल्या व्यवस्थित अभ्यासल्यानंतर मला जाणवले की दोघांच्या कुंडलीत तर काहीही दोष नाही मग… .? ? मग मी हा प्रश्न  "प्रश्नकुंडलीप्रमाणे" सोडवण्यासाठी त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली. माझ्याकडे आज त्याचे Records नाहीत. परंतु एक गोष्ट ठळकपणे त्या कुंडलीत जाणवली होती ती म्हणजे पूर्व दिशा व आग्नेय दिशा ह्यात दोष असावा. "तुमच्या घरी पूर्वेला काही जड वस्तू आहे का? मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ?" असे प्रश्न विचारल्यानंतर कोणाकडूनही उत्तर नाही. आज डॉक्टर आणि इंजिनीअर असलेल्या जोडप्याला पूर्व दिशा सांगता न यावी ???? कमाल आहे …..  त्यावर नील उत्तरला,"तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का ?"   मग वास्तू परिक्षणाचा दिवस ठरला.


ईशान्य दिशेत असलेले प्रवेशद्वार, पूर्णपणे बंद असलेली पूर्व दिशा व आग्नेय कट अशी नीलची वास्तू. 


१) पूर्व दिशा म्हणजे उर्जेचं स्त्रोत. सुर्य ह्या दिशेने उदय होतो व समस्त जगाला जगण्याची ऊर्जा,उर्मी व उत्साह देतो. अशी पूर्व दिशा नीलच्या घरी पूर्णपणे बंद होती म्हणजेच ह्या दिशेत एकही खिडकी नव्हती. पूर्व दिशेत जर दोष असेल तर घरातील पुरुषांचे वर्चस्व कमी होते,ठाम Decision घेत येत नाही, अत्यंत मानसिक गोंधळ होतो. 

२)ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा. ईश्वर सर्व दिशेस असतो परंतु इथे ईशान्य दिशेत "Positive Energy" च्या संदर्भात आपण ही दिशा विचारात घेतो. साहजिकच इथे देवघर किंवा तत्सम चांगल्या गोष्टी असल्या तर घरातील चांगल्या उर्जेचा प्रवाह वाहण्यास मदत होते. नीलच्या घराचे प्रवेशद्वार नेमके ईशान्य दिशेत. आता तुम्ही म्हणाल ईशान्य दिशेत प्रवेशद्वार चांगली गोष्ट आहे ना Boss. वरकरणी चांगली वाटत असली तरी प्रवेशद्वार म्हणजेच वास्तूला त्या दिशेत कट आला असे वास्तुशास्त्र सांगते. ईशान्य दिशेत आलेल्या ह्या कटमुळे कर्त्या पुरुषाच्या प्रगतीत अडथळे येतात. 

३)आग्नेय दिशेत मोठी खिडकी होती. इथेच मोठी गोम होती. आग्नेय दिशेत जर कट असेल म्हणजेच खिडकी/मुख्य-प्रवेशद्वार असेल तर वंश वाढण्यास बरेच अडथळे निर्माण होतात. आग्नेय म्हणजेच अग्नि. ह्या दिशेतल्या दोषांचे परिणाम घरातील स्त्रियांना भोगावे लागतात. स्त्रीला पोटाचे विकार/तक्रारी सुरु होतात. 

ह्या सर्व गोष्टी मी नीलला विचारल्यानंतर त्याने हे मान्य केले कि ह्या वास्तूत आल्यापासून त्याला नोकरीत खूप त्रास होत होता. सात महिन्यांपुर्वीच त्याला परदेशात नोकरी मिळाली होती. पगार चांगला व इतर सुविधाही होत्या परंतु दोन वर्षांसाठी तिथे गेलेल्या नीलला चार महिन्यातच करमेनासे झाले व तो तडकाफडकी इथे निघून आला. इथे आल्यानंतरही त्याला काही ठरवता येईना. ( पूर्व दिशा दोष - निर्णयक्षमता कमकुवत), परीला नुकतीच नवीन नोकरी लागली होती परंतु तब्येतीच्या वारंवार तक्रारीमुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करता येईना. तब्येतीच्या काय तक्रारी आहेत असे विचारल्यावर परीने सांगितले तिला गर्भाशयात "Fibroids" आहेत व त्याची Treatment चालू आहे. ( आग्नेय दोष  - स्त्रियांना पोटाचे विकार/ तक्रारी) सर्व कहाणी लक्षात आल्यानंतर नील व परीला वास्तुदोष नीट समजावले. त्यावरील उपाय काय आहेत ? कसे करायचे इ. त्यांना explain केले. त्यांनाही ते पटले. 

वास्तू-दोष परिहाणार्थ  काढलेल्या मुहूर्तावर काही ठराविक धातू - रत्ने दोष असलेल्या ठिकाणी मंत्रोच्चार करून पुरण्यात आली. नील व परीला काही स्तोत्रे दररोज वाचण्यास सांगितली. 

त्यानंतर दोन महिन्यांनी परीच मला भेटण्यास आली. काही बोलण्याच्या आधीच तिच्या चेहेरयावरील तेजस्वीपणा व टवटवीतपणा गोड बातमी सांगत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नील भेटायला आला तोच पेढे घेऊन… "मुलगा झालाय …. बारसे आहे ३० नोव्हेंबरला.. तुम्ही यायचेच… कुंडली तुमच्याकडून बनवून घ्यायची आहे."  त्याला कुंडली बनवून दिली व बाळासाठी काही नावेही सुचवली. त्याला बारश्याला येण्याचे आश्वासन दिले व मनोमन शास्त्राला दंडवत घातला. 

काय ?? तुम्हीही मानले कि नाही ? मग कळवा मला ह्या ई-मेल ID वर - anupriyadesai@gmail.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, २६ मार्च, २०१३

कधी होणार मी आई ??

कधी होणार मी आई ??


नोकरी - व्यवसाय ह्यावर आपण मागील लेखात काही उदाहरणे पहिली आज आपण कुंडलीतल्या "पंचम स्थानावर" अभ्यास करणार आहोत. पंचम स्थानावरून खालील गोष्टी कळू शकतात  : 
१) पंचम स्थान म्हणजे प्रेम (निःस्वार्थी प्रेम) २) संतत्ती होणार की नाही ? ३) होणारी संतत्ती कशी असेल ? मतिमंद तर नसेल ना ?  इ. गोष्टी पाहता येतात. 

पण ह्या पंचम स्थानाचा संबंध जर "लाभ" स्थानाशी असेल तर संतत्ती होण्यास काही त्रास नसतो. परंतु पंचमाचा संबंध जर "अष्टम", "चतुर्थ" किंवा "व्यय" स्थानाशी आला तर मात्र संतत्ती होण्यास त्रास असतो. आता हा त्रास म्हणजे नक्की काय तर, 
१) काही वेळेस कुंडलीतल्या बाकी योगांबरोबर पंचम स्थान जर अष्टमाशी व लाभ स्थानाशी निगडीत असेल तर संतत्ती होते परंतु पाहिल्यावेळेस "Miscarriage" होण्याची शक्यता असते किंवा संतत्ती होते परंतु "सिझरियान" पद्धतीने.  
२) जर पंचमाचा चतुर्थ व व्यय स्थानाशी संबंध आला तर "Miscarriage" तर होतेच परंतु पुन्हा "Conceive" होण्यासाठी व झाल्यावर प्रचंड काळजी घ्यावी लागते.  

आज आपण अश्याच एका कुंडलीचा आढावा घेणार आहोत ज्या कुंडलीत पंचम स्थानाशी निगडीत चतुर्थ व व्यय स्थाने असून एकदा "Abortion" करावे लागले व नंतर संतती झाली आहे. आज पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करणार आहोत : 

ज्योतीची कुंडली 

पारंपारिक पद्धतीने : मिथुन लग्न व कुंभ राशीची ही कुंडली आहे. ह्या कुंडलीत पंचम स्थानात शनि व रवि सारखे ग्रह आहेत. पंचमात तुळ रास व त्या राशीचा मालक शुक्र स्वतः "चतुर्थ" स्थानात. (वरती आपण पहिलेच कि पंचमाचा जेंव्हा चतुर्थाशी संबंध येतो तेंव्हा संतत्ती होण्यास त्रास असतो.) 

कृष्णमुर्ती पद्धतीने : पंचम स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी  (Sub Lord) हा शनि आहे व शनि पुढीलप्रमाणे कार्येश : शनि - ४,८,९ . शनि स्वतः राहूच्या नक्षत्रात व राहू - १ ,५,१२. तुमच्या लक्षात आलेच असेल इथेही पंचमाचा चतुर्थ व अष्टम स्थानाशी संबंध आला आहे. 

 वरील नमूद केलेल्या योगांमुळे ह्या स्त्री जातकाला( नाव : ज्योती) गर्भधारणा झाली परंतु ही गोड बातमी तिला स्वतःला कळण्या आधी एक घटना घडली. ज्योती नेहेमीप्रमाणे कामावर जात असताना तिला पोटात दुखू लागले परंतु फारसे दुखत नसल्याने तिने दुर्लक्ष केले व नेहेमीचे तिचे Jobचे  Routine सुरु झाले. दुपारी जेवणानंतर तिच्या पोटात जास्तच दुखू लागले. Office मधून सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे जावे असे तिने ठरवले व ललितलासुद्धा  (नवरयाला ) तसे कळवले.  Office मधून निघून रेल्वेचा प्रवास करत(याही परिस्थितीत) ज्योती घरी आली. नेहेमीच्या डॉक्टरनी तपासल्यावर ताबडतोब Hospital मध्ये Admit करण्यास सांगितले. Hospital ला पोहोचेपर्यंत ज्योतीची शुद्ध हरपली. आता सर्वांना गांभीर्याची कल्पना आली व ज्योतीची काळजी वाटू लागली.

तिच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून ललितला धक्का बसला. ज्योती गरोदर होती व दीड महिना उलटून गेला होता. (मुलींना pregnancyची news दीड ते दोन महिन्यानंतर  कळते.) आणि बाळची वाढ ही गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत होती ज्यामुळे बाळ वाढू शकले नाही व अंतर्गत रक्तस्त्राव सुरु झाला व ज्यामुळे ज्योतीच्या जीवालाही धोका निर्माण झाला. वेळीच ज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. काही दिवसांच्या उपचारानंतर ज्योतीला घरी पाठवण्यात आले व पुढचे काही महिने आराम व काळजी घेण्यास सांगितले.

ह्या सगळ्या घटनेनंतर जेंव्हा ज्योती मला भेटण्यास आली तेंव्हा तिला काही उपाय व एका स्तोत्रचे पठण नियमित करण्यास सांगितले. मधल्या काही महिन्यांनतर ज्योतीचा फोन आला तो गोड बातमी देण्यासाठी परंतु बातमी देताना तिच्या आवाजात काळजीही मला स्पष्ट ऐकू येत होती. तिला दिलेल्या स्तोत्राच्या पठणाची  पुन्हा आठवण करून दिली व हे ही सांगितले की तुला संतत्ती होईल, सिझर करावे लागेल त्यामुळे तशी मनाची तयारी ठेवणे.  

म्हणजे पहा ग्रह आपले काम कसे चोख निभावतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ललितचा फोन आला, हसता हसता म्हणाला," मुलगा झाला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सिझर करावे लागले. ज्योतीची तब्येतही व्यवस्थित आहे. बाळाबरोबर भेटायला येऊ नक्की".

कशी वाटली ही Case ? नक्की कळवा मला माझ्या ई-मेलवर - anupriyadesai@gmail.com

Bye


 Note : 

इथे पंचम स्थानाचा सब-लॉर्ड शनि हा  ४,८,९ चा कार्येश असून राहूच्या नक्षत्रात आहे व राहू पंचमाचा कार्येश आहे. त्यामुळे आधी Abortion करावे लागले परंतु नंतर संतत्ती झाली. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


रविवार, २४ मार्च, २०१३

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge 

ह्या शास्त्राचा अभ्यास करताना काही कुंडल्या मनाला चटका लावून जातात तशा काही कुंडल्या खूप हसवून जातात. मागच्याच आठवड्यात सुनीलने फोने केला आणि भेटण्याची वेळ ठरली. जी वेळ ठरली होती त्यावेळी तो आला …. त्याची कुंडली वाचायला सुरु केले आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 

वृश्चिक लग्न व मकर राशीची कुंडली. पण कुंडलीतल्या अष्टम स्थानात असलेली शुक्र,मंगळ आणि राहूची युती  बरेच काही सांगून गेली. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते :
१) अष्टम स्थानावरून तुमच्या शारीरिक संबंधांचा अभ्यास होतो.
२) शुक्र हा मुळातच Romantic आहे. शुक्र प्रधान व्यक्तींना टापटीप राहायला आवडते. सर्वांनी मला पहावे माझ्या मोहात पडावे अशा काही धारणा शुक्र प्रधान व्यक्तींच्या असतात. शुक्र हा कामातुर आहे. 
३) मंगळ आक्रमक,वर्चस्व गाजवणारा,परिणामांचा विचार न करताच एखादी गोष्ट करणे,हट्टी इ. असा ग्रह. तर …. 
४) राहु हा फसवा आहे. खोटे आकर्षण आहे. 
सुनीलची कुंडली 
मग पहा शुक्र जो मुळातच प्रणयी,मंगळ  आक्रमक व हट्टी,राहू खोटे आकर्षण तर अष्टम स्थान हे शारीरिक संबंध दाखवते हे संपूर्ण COMBINATION सुनीलच्या कुंडलीत हजर होते. आता मुळ मुद्याकडे वळूया,

सुनीलने प्रश्न विचारण्यास सुरवात केली : १) माझे पैसे खूप खर्च होतात. SAVINGS होत नाहीत. 
२) माझ्या BUSINESS मध्ये माझी कधी प्रगती आहे?
३) बायकोचे आणि माझे जराही पटत नाही.. ती सारखा संशय घेते.मी खूपच साधा आहे हो तिला पटतच नाही. मी मुलींशी बोलतही नाही हो. बघाना तुम्हालाही पत्रिकेवरून समजलेच असेल. 
सुनीलचे शेवटचे वाक्य ऐकून उडालेच. सरळ सरळ CHALLENGE ?? मी सुनील विचारले," ह्या आधी कुठल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवली आहे का?" अपेक्षित उत्तर आले "नाही". मी म्हटले,"ठीक आहे. आत्ता ऐका …. तुमची पत्रिका मला हे सांगतेय की तुम्ही मुलींपासून जरा सावधान. त्यामुळे तुम्हाला खूप मनःस्ताप होऊ शकतो. तुम्ही मुलींशी बोलतच नाही ही चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने तरी तुम्ही सावधगिरी बाळगावी. येत्या काळात एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही."

आत्ता उडण्याची वेळ सुनीलची होती. चेहरा पूर्णपणे पडला. थोडावेळ शांततेत गेला. आणि सुनील उदगारला," ताई मी एकदा एका मुलीकडून फसवलो गेलो आहे. ती माझ्याबरोबर फिरायची.. खुपदा आम्ही तसेही भेटलो आहे(इथे सुनील शारीरिक जवळीकीबद्दल बोलत आहे) आणि तिने मला माझ्याकडून बरयाचदा पैसेही घेतले होते. तिला सोन्याचे दागिनेही करून दिलेत परंतु नंतर तिचे लग्न झाले आणि ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली."

मी म्हणाले," ठीक आहे जी चूक होऊन गेली ती गेली परंतु ह्यापुढे जरा आवरा स्वतःला …. नाहीतर कोणीही वाचवू शकणार नाही."

सुनीलचा पुढचा प्रश्न," ACTUALLY ताई तिचा मला सारखा फोन येतो. ती आत्ता पुन्हा मुंबईत आली आहे. तिचे तिच्या नवरयाबरोबर जराही पटत नाही. तिच्या नवरयाचे बाहेर संबंध आहेत असा तिला संशय आहे.  त्यामुळे तिने सर्व लक्ष तिच्या carrier वर केंद्रित केले आहे. तिला माझ्याबरोबर BUSINESS करायचा आहे. गुंतवणूक तिचा नवरा करणार आहे… त्यामुळे मला फक्त मेहनत करायची आहे … चालेल का??" (सुनीलने आधी विचारलेले प्रश्नांची उत्तरे ह्या त्याच्या नविन प्रश्नात लपलेली आहेत हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल.)

संतापानेच मी म्हटले," अहो सुनील साहेब आताच मी म्हणाले ना की, एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. मग परत परत तेच काय विचारताय ???? Business म्हटले की तुमचा आणि तिचा पुन्हा संबंध आला म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या……. " 

त्यावर सुनील साहेब गप्प. मी एखाद्याला सल्ला देऊ शकते परंतु हेच करा आणि तेच करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी काही  बोलले नाही. मला माहित होते येणारया काही दशा आणि अंतर्दशा सुनीलसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असणार आहेत त्यामुळे त्याला त्याच्या मैत्रिणीकडून आलेली "Offer" स्वीकारावी लागणार आणि पुढच्या घटना क्रमवार घडणार. 

तर अशी आहे आपली कुंडली. आपल्या जीवनाचा आरसा. त्यामुळे जेंव्हा कधी ज्योतिषाकडे गेलात तर त्याला कधी Challenge करू नकाच परंतु खोटेही बोलू नका कारण चाणाक्ष ज्योतिषी तुमचे खोटे लगेच पकडेल.  लक्षात ठेवा नक्की …. 

भेटू लवकरच …. 




                                                               

गुरुवार, २१ मार्च, २०१३

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

ज्योतिषशास्त्र शिकत असताना एकदा माझ्या गुरु कुंडलीतील सर्व स्थाने समजावून सांगत होत्या. एकूण बारा स्थाने आणि प्रत्येकाचे वेगळेच महत्व ,कारकत्व वगैरे… प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः -तुमचा स्वभाव-तुमचे कसे दिसता वगैरे,द्वितीय स्थान म्हणजे धन स्थान-तुमचे कुटुंब, चतुर्थ स्थानावरून मातृसौख्य ,स्थावर इस्टेट,वाहनसौख्य इ. 
जेंव्हा त्यांनी अष्टम स्थानावर बोलण्यास प्रारंभ केला तेंव्हा पहिलेच वाक्य हे होते : 

" अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थान. ह्या स्थानावरून व्यक्तीला आयुष्य किती लाभले आहे हे विचारात घेतले जाते. अष्टम स्थान म्हणजे अपघात … तडकाफडकी आयुष्यात आलेले बदल,प्रवासातील अडथळे ,प्रवासातील त्रास,नोकरीतील बदल, मानहानी - अपमान वगैरे".   तेंव्हा पासून मला नेहेमी ह्या स्थान बद्दल कुतूहल वाटत आले आहे…(म्हणतात ना माणूस  नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करतो) पण ह्या विचारामुळे मला ह्या स्थानाबद्दलच्या बाकीच्याही बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो असा की, शास्त्रकारांनी जरी अष्टम स्थानाला मृत्यू स्थान संबोधले असले तरी त्याच्या खोलवर अजूनही मोठा अर्थ लपलेला आहे. तो अर्थ आज मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगणार आहे. 

साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रशांतने त्याची कुंडली मला दाखवली होती…. तास.. दीड-तास आम्ही त्याच्या कुंडलीवर चर्चा करत होतो. नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर असलेला प्रशांत खूप खुश होता…. येणारे वर्ष कसे असेल ? नोकरीबद्दलचे, कुटुंबाबद्दलचे प्रश्न इ अनेक प्रश्न आम्ही चर्चिले. 
तूळ रास आणि सिंह लग्नाची प्रशांतची कुंडली. कुंडलीचा अभ्यास करता करता मी त्याला प्रश्न विचारात होते…  कुंडलीत शनि महादशा व शनि अंतर्दशा सुरु आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अष्टम स्थानाची म्हणजेच "गुरुची " विदशा सुरु होत होती. (गुरु कुंडलीत - ३,५,८ ह्यास्थानाचा कारक आणि तो राहूच्या नक्षत्रात. राहू - ११ ,२,११ ) मी म्हटले काय रे नोकरी सोडण्याचा काही विचार आहे का?? तो म्हणाला, "छे छे … चांगले चालले आहे …सध्या तरी तसा काही विचार नाही."  मी मनात म्हटले कमाल आहे… कुंडलीच्या दशा-अंतर्दशा तर काही वेगळेच चित्र दाखवताहेत आणि हा तर म्हणतोय कि नोकरी सोडणार नाही…. काय गौडबंगाल आहे बाबा … असा मी विचार करतानाच मला वेगळीच शंका आली…. मी विचारले " अरे तुझा येत्या वर्षात नोकरीच्या निमित्ताने प्रवास तर भरपूर होणार आहे परंतु तू नोकरी सोडशील असे ग्रह म्हणताहेत. तुला कदाचित तडकाफडकी नोकरी सोडावी लागेल.तेंव्हा काळजी घे"  त्यावर त्याचे उत्तर असे होते, " सध्या माझ्यावर कंपनीतल्या कामांची खूप मोठी जवाबदारी दिली आहे… बघू नंतर काही विचार बदलला तर…".   साडेसाती सुरु आहे तेंव्हा स्तोत्र व काही उपाय त्याला करण्यास सांगितले. 

मधल्या काळात त्याच्याबद्दल तो फोनवरून मला "UPDATES" द्यायचा. ऐकून बरे वाटायचे…. 

आणि मार्च महिन्याच्या दुसरया आठवड्याच्या एका रविवारी त्याचा फोन आला," तुम्हाला भेटायचे आहे. मोठा प्रोब्लेम झाला आहे. कधी येऊ भेटायला ??".  ठरलेल्या वेळी तो आला. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून शॉक बसला. त्याच्या office मधल्या त्याच्याचबरोबर काम करणारया निलेशने प्रशांतची कंपनीच्या V. P. (VICE -PRESIDENT ) कडे तक्रार केली होती . प्रशांत दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीये त्याचबरोबर कंपनीच्या पैशांचा दुरुपयोग करतो,कंपनीतल्या managers ना पार्टी देतो वगैरे. हा निलेश स्वतः  V. P. साहेबांचा चेला. एकाच गावातून दोघेही मुंबईत नोकरीसाठी आले. परंतु निलेश नोकरीत बराच मागे राहिला व V. P. बराच पुढे.  परंतु दोघांमधली मैत्री मात्र घट्ट राहिली. जेंव्हा निलेशला कळून चुकले की प्रशांत असे पर्यंत त्याला ह्या कंपनीत पुढपर्यंत प्रगती साधता येणार नाही त्याने प्रशांतबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली.  व कसेही करून प्रशांत स्वतः नोकरी सोडेल असे कटकारस्थान निलेश व V. P.नी रचले. 
 

मार्चच्या  दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी Office ला सुट्टी असून सुद्धा प्रशांतला  V. P. ने office मध्ये बोलावून घेतले व त्याच्याबद्दलच्या तक्रारी त्याला ऐकवून प्रशांतवर आरोप करत त्याला Resignation देण्यास भाग पाडले. प्रशांतने समजावण्याचे खूप प्रयत्न केले. प्रशांतच्या Managerने सुद्धा V. P. ला खूप समजावले परंतु V. P. चा निर्णय पक्का झालेला होता. त्याच दिवशी प्रशांतला Resignation द्यावे लागले.  

प्रशांतला मी सांगितले जे होणार होते ते होऊन गेले. तुला नोकरी नक्की मिळेल. त्याला काही उपाय व मंत्र दिले. 

ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या?? प्रशांतची अष्टम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला Officeमध्ये मानहानी सहन करावी लागली. नोकरीत तडकाफडकी बदल झाला. नोकरी अचानक गेल्यामुळे आयुष्याच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. म्हणजेच अष्टम स्थानाची  सर्व फळे त्याला मिळाली. मी खूप खुश झाले कारण मला ही सुद्धा भीती होती की प्रशांतचा अपघातही होऊ शकतो …. अर्थात ती भीती त्याला मी बोलून दाखवली नव्हती. त्यामुळे जीवावर बेताण्यापेक्षा नोकरीवर बेतलेले काय वाईट????  
प्रशांतच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा….  

Bye  Bye 


NOTE : १) जातकाची साडेसाती सुरु आहे व जातकाला राजीनामा शनिवारी देण्यास भाग पाडले आहे. 
              २) ह्या जातकाची पंचम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला राजीनामा द्यावा लागला. गेल्या   दोन  CASES मध्ये आपण पहिलेच होते की जोपर्यंत कुंडलीत पंचमाची(पंचम स्थानाची) दशा-अंतर्दशा सुरु होत नाही तोपर्यंत जातकाच्या नोकरीत बदल होत नाही. वरील कुंडलीत पंचम स्थानाची दशा तर सुरु झालीच परंतु अष्टमाचीही दशा सुरु झाल्याने नोकरीत बदल झाला परंतु तो तडकाफडकी, अपमान होउन …. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १ मार्च, २०१३

दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय


दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय 

काल आपण योगेशला नोकरीतून व्यवसायाकडे वळताना पाहिले. ग्रह आपली कामगिरी कशी चोख बजावतात  ह्याचा अनुभव योगेशला आलाच. आज आपण अशी कुंडली बघुया ज्या कुंडलीत ग्रहांनी नोकरी आणि व्यवसाय ह्या दोन्हींचा छान मेळ बसवलेला आहे. ही कुंडली आहे अशा एका जातकाची ज्याच्यावर खूप लहान वयात कौटुंबिक जवाबदारी आली. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अर्चनाने घरचा व्यवसाय व स्वतःची उच्च पदावरची नोकरी ह्यात छान समतोल राखण्यात यश मिळवलं. आज अर्चनाच्या कुंडलीतील महत्वाच्या ग्रहयोगांवर नजर घालू. 

अर्चना प्रभुणे :  मीन लग्न. लग्नेश गुरु दशमात. षष्ठेश रवि स्वतः नवमात. कालच्या लेखात आपण हे समजून घेतलेच असेल की षष्ठेशाचा संबंध जर नवम स्थानाशी असेल तर व्यक्तिला उच्च-अधिकार प्राप्त होतात, मानसन्मान मिळतो. अर्चनाला नोकरीत खूप लहान वयात उच्च-अधिकार मिळाले. Office मध्ये तिच्या शब्दाला मान आहे. 
 

अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थेश- सप्तमेश जो बुध आहे तो आहे दशमात. सप्तमेशाचा दशमाशी जर काही connection असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो हे आपण कालच पाहिले. इथे ह्या कुंडलीत हा नियम चपखल बसतो. अर्चना व्यवसायाची धुराही छान सांभाळते. परंतु  इथे सप्तमेश- दशमेशाबरोबर मी चतुर्थेशाचाही उल्लेख केला आहे. चतुर्थ स्थान म्हणजे आपले घर,घर संबंधातील गोष्टी. अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थ (घर-घरासंबंधातील गोष्टी), दशम (व्यवसाय) सप्तम (व्यवसाय -भागीदारी वगैरॆ ) ह्यांचे connection आहे त्यामुळे घरच्या व्यवसायाची जवाबदारी तिच्यावर आली.  
आज अर्चनाला व्यवसाय व नोकरी ह्यातील ताळमेळ बसवताना पाहिले कि खूप कौतुक वाटते. येणारया पुढच्या काळात तिच्या कुंडलीतल्या दशा-अंतर्दशा व्यवसाय व नोकरी ह्यासाठी अत्यंत पूरक असल्याने तिला यश मिळणार हे नक्की. तिला भविष्याकाळासाठी शुभेच्छा. 
भेटू पुढ्या लेखात अशाच काही कुंडल्या घेऊन. 

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा 


बरेच दिवस BLOG वर काही लिहा म्हणून सगळ्यांचे SMS येत होते. FACEBOOK वरून विचारणा होत होती …पण  म्हणावा तसा विषय मिळत नव्हता. आज विषय मिळाला. 

माझ्या संपर्कातल्या काही लोकांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर अशा कुंडलीत काय योग असावेत बरे? एवढे धाडस करणे सोप्पे नाही. आज अशा एका कुंडलीबद्दल बोलू. 

त्याआधी कुंडलीतील काही स्थानांविषयी तोंडओळख करून देते.

षष्ठ स्थान :  कुंडलीतल्या ह्या स्थानावरून मुख्यत्वे रोग-आजार, नोकरी,नोकरीचा कालावधी,स्पर्धात्मक यश इ  पाहतात. सध्या आपण फक्त नोकरी संबंधी हे स्थान विचारात घेणार आहोत. कुंडलीतील ह्या स्थानावरून  ही व्यक्ती कुठे नोकरी करेल ? नोकरीत ह्या व्यक्तीचा हुद्धा ? ही व्यकी किती मेहनती आहे ?  ह्या गोष्टी पाहता येतात.

पंचम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्तीची आवड-छंद, कला,आध्यात्मिक साधना,ध्यान-स्मरण इ. तर पाहता येतातच परंतु ह्या स्थानावरून व्यक्तीची नोकरी सुटणे,नोकरीतील बदल,नोकरी न मिळणे ह्याही गोष्टींचा पडताळा होतो.

दशम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्ती नोकरी करेल कि व्यवसाय ? व्यवसायाचे साधारण स्वरूप, व्यवसायातील यश-अपयश,उच्च-अधिकार इ . चा विचार केला जातो. 

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत षष्ठ स्थान व षष्ठ स्थानातील ग्रह हे पूरक असतील तर व्यक्ती आयुष्यभर "नोकरी" करते. जर षष्ठ स्थान बरोबर व्यक्तीला  नवम व दशम स्थानाचीही साथ मिळाली तर उच्चाधिकार प्राप्त होतात. मान-सन्मान मिळतो. परंतु जर ह्या षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी असेल तर व्यक्ती नोकरी करू शकणार नाही. कोणाच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. नोकरीत धरसोड होते. एखादी नोकरी ३-४ महिने केल्यानंतर कंटाळा यायला लागतो. तेच तेच काय काम करायचे असे वाटू लागते. 

परंतु जेंव्हा ह्याच " षष्ठ" स्थानाला  "पंचम" स्थानाबरोबर  "दशम" आणि  "सप्तम" स्थानाचाही संबंध येतो तेंव्हा जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो. जेंव्हा तत्सम स्थानांच्या "दशा-अंतर्दशा" सुरु होतात तेंव्हा जातकाला  नोकरीला राम-राम म्हणण्याची हिंमत येते. अशाच एका जातकाच्या कुंडलीचे विवेचन आज मी करणार आहे. हे विवेचन "वैदिक व कृष्णमुर्ती" ह्या दोन्ही पद्धतीने करण्याचा प्रयत्न, 

  योगेश पाटील  ही व्यक्ती IT क्षेत्रातील नामवंत कंपनीत चांगल्या हुद्यावर होती. SAP का काय म्हणतात ते केले होते. पगार चांगला. परंतु नोकरी करताना नेहेमी असमाधानी. कायम दुसऱ्यासाठी काम करतोय ही भावना. पण स्वतःचा काय व्यवसाय सुरु करावा का हा संभ्रम. ह्या जातकाचे "कन्या" लग्न आहे व राशी आहे "वृश्चिक". लहानपणापासून अत्यंत कष्टाचे आयुष्य. स्वतःच्या  IT  शिक्षणाचा खर्च स्वतः छोटी - मोठी कामे करत college करत घेतले व नामवंत कंपनीत छान नोकरी मिळवली. अत्यंत हुशार व खूप मेहनती. काही काळातच  नोकरीत परीक्षा देत देत वरच्या हुद्यावर जागा मिळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाडका. ह्या जातकाच्या कुंडलीत पंचम व षष्ठ ह्या स्थानात अनुक्रमे मकर व कुंभ राशी आहेत. ह्या राशीचा स्वामी शनि हा "नवम" स्थानात आहे. म्हणजेच ह्या कुंडलीत षष्ठ स्थानाचा नवम स्थानाशी संबंध आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरी मिळाली व बढतीही. नवम स्थानामुळे नोकरीच्या ठिकाणी नाव-लौकीकही चांगला प्राप्त झाला. पण आपण हे विसरता कामा नये की इथे षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी सुद्धा आहे. पंचमात शनिचीच मकर राशी आहे आणि शनि आहे मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ स्वतः सप्तमेश गुरु बरोबर पंचमात आहे. म्हणजेच इथे "पंचम,षष्ठ,सप्तम व नवम" स्थानांचा एकमेकांशी संबध आला आहे. पण नुसता कुंडलीत असा संबंध असून काही उपयोग नाही कारण जोपर्यंत पंचम व तत्सम स्थानाच्या दशा सुरु होत नाहीत तोपर्यंत कुंडलीतल्या योगांचे प्रत्यक्ष जीवनात परिवर्तन होत नाही. 

हा जातक माझ्याकडे साधारणपणे जानेवारी २००९ साली आला होता. त्यावेळी त्याची शुक्राची अंतर्दशा सुरु होती. शुक्र कुंडलीत ८,२,९ ह्या स्थानचा कार्येश आहे. शुक्र केतूच्या नक्षत्रात व केतू १०,१ चा कार्येश. "माझी आहे ती नोकरी सोडून मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. असे काही योग आहेत का माझ्या कुंडलीत ?"  हा त्याचा प्रश्न. त्याच्या कुंडलीतील इतर योग सांगत होते हा स्वतःचा व्यवसाय करणार. पण त्याची अंतर्दशा पाहता सध्या हा नोकरी सोडण्याच्या विचारावर तो ठाम नाही हे स्पष्ट दिसतेय… बरोबर ना ??  कारण पंचमाची अंतर्दशा सुरु झालेली नाहीये. जोपर्यंत पंचमाचा संबंध येत नाही तोपर्यंत जातक नोकरी सोडण्याच्या नुसत्या विचारात असतो पण नोकरी सोडू शकत नाही. त्यावेळी त्या जातकाला सांगितले," सध्या तरी तो योग तुझ्या कुंडलीत नाही. २०११ च्या जुलै महिन्यात हे धाडस तू करू शकशील. तुला मार्गही दिसेल. " हे मी कशावरून सांगितले हे तुमच्या लक्षात आलेच असेल. hmmmmmmm बरोबर पंचमातील "मंगळ" ग्रहाची विदशा ह्या कुंडलीला जुलै २०११ ला सुरु होणार होती. बाकीचे ही योग त्याच काळात व्यवसायासाठी पूरक दिसत होते. अत्यंत हिरमुसलेला चेहरा झाला होता त्याचा. परंतु इलाज नाही. ग्रह हेच सांगत होते. 

 नंतरच्या काही काळात त्या जातकाकडून काही कळले नाही. मी ही विसरून गेले. ऑक्टोबर२०११ च्या एका रविवारी स्वारी मला भेटण्यास आली. अत्यंत खुश दिसत होता. मी विचारले,"काय रे बाबा व्यवसाय सुरु केलास वाटते ?" हसत हसत तो म्हणाला," हो २००९ ला तुमच्याकडे आलो होतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जुलै २०११ लाच व्यवसाय सुरु झाला. मधल्या काळात खूप धडपड केली परंतु कधी भांडवल तर कधी जागेचा प्रश्न. पण आता सुरळीत सुरु आहे. त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत."    

म्हणजे ग्रहांनी त्यांचा अंमल दाखवला होता. अशाच काही कुंडल्या घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

महिन्याचे राशी भविष्य

 राशीभविष्य 

मेष 
  • Carrierwise खूप चांगली सुरवात हे वर्ष तुम्हाला देणार आहे.
  • नोकरीच्या चांगल्या Offers तुम्हाला ह्या महिन्यात येण्याची शक्यता आहे.
  • नोकरीत तुमच्या शब्दाला किंमत असेल.तुमचे सल्ले महत्वाच्या गोष्टींसाठी घेतले जातील.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील परंतु सावधतेने त्याचा विचार व्हावा. 
  • व्यवसाय करणारया व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवलेला बरां. प्रत्येक गोष्टीचा पडताळा (cross verification ) करूनच व्यवहार करावा.
  • केतूचा प्रवेश तुमच्या राशीत होत असल्याने Depression/Frustration ...डोकेदुखी जाणवेल.त्यासाठी Meditation/Yog व आध्यात्मिक साधना जमेल तर नक्की करावी.
  • घरात सध्या वाद-विवादाचे वातावरण राहील.सांभाळून घेणे.
  • तीर्थयात्रेचे योग आहेत.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भातील गोष्टी पुढे सरकतील.
  •  विष्णुची उपासना फलद्रूप ठरेल. 
  • हिरवा रंग वापरावा. (हिरव्या रंगाचा रुमाल,एखादी वस्तू जवळ बाळगावी)
वृषभ 
  • शेअर मार्केट मध्ये सध्या तुम्हाला फायदा होईल असे दिसते.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात गोडी लागेल. शैक्षणिक प्रगती साधता येईल.
  • जे विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांना  यश मिळेल.म्हणजेच परदेशात शिक्षणासाठी योग्य काळ आहे.
  • नोकरीत तुमच्या कामावर वरिष्ठ खुश जरी असले तरी त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत.त्यामुळे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल.
  • वाहन सांभाळून चालवणे व प्रवासात तब्येतीची काळजी घेणे.
  • तब्येतीच्या बाबतीत पोट/किडनी विशेष काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्यावे. खाण्यावर ताबा ठेवावा.
  • ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्या रक्तातील साखरचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेंव्हा काळजी घ्या.
  • शनि-स्तुती वाचणे.
  • गडद निळा रंग वापरणे. (निळ्या रंगाची वस्तू/रुमाल जवळ बाळगणे)
मिथुन 
  • तुम्हाला मुळातच गप्पा मारण्याची खूप आवड आहे. परंतु सावधान सध्याचा काळ तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वायफळ बोलणे टाळा. मस्करी वगैरे सध्या नकोच.
  • शेअर मार्केट मध्ये सध्या नुकसान सहन करावे लागेल.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील.
  • संततीच्या आरोग्यास जपणे.
  • नोकरीत सहकारी व वरिष्ठ ह्यांच्या बरोबर जर नरमाईने घ्यावे.
  • नोकरीत झालेल्या वादामुळे नोकरी सोडण्याचा विचार ह्या काळात पक्का होईल.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भात नजीकच्या काळात पैसे गुंतवू नये.
  • पाठदुखी,अपचनाचा त्रास संभवतो.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •  भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
कर्क 
  • कर्क राशीसाठी हा काल अत्यंत सुखकारक ठरेल.
  • नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. 
  • ह्या काळात विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरू शकतील. 
  • विवाहित मंडळीना संततीच्या बाबतीत पोषक ग्रहयोग असल्याने लवकरच खुशखबर मिळेल.
  • Property/नवीन घर घेताना विशेष काळजी घ्यावी.
  • घरात Renovations/ Changes होतील.
  • परदेशात जाण्याचे योग आहेत.
  • आईच्या तब्येतीस जपणे.
  • सर्दी-खफ़ाचा त्रास होईल.
  • गुरुची उपासना करणे. (दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  •   पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
सिंह 
  • नोकरीचा-कामचा कंटाळा जरी आला असला तरी होणारा खर्च बघत कामाचा आळस करता येणार नाहीये. नजीकच्या काळात कामाचे ओझे जरा कमी होणार आहे.
  • मनावरचा ताण कमी झाल्याने  कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. बाहेरगावी जाण्याचे योग संभवतात.
  • धनार्जनाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे.
  • १५ तारखेनंतर वरिष्ठांकडून तुमची मर्जी राखली जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत दाढदुखी,खांदे-मानदुखी डोके वर काढणार आहे.
  • प्रवासात तब्येत सांभाळ.
  • बाळकृष्णाची उपासना करावी. 
  • हिरवा रंग वापरणे 
कन्या 
  • शिकणे-शिकवणे ही तुमची आवड. सध्याचा काळ नवीन काही शिकण्यासाठी पोषक आहे.
  • अध्यात्म-उपासना ह्यासाठी उत्तम काळ.
  • नोकरीत बदल करावासा वाटेल.
  • विवाहित व्यक्तीना ह्यावर्षी येणारया नवीन छोट्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करावी लागेल. पण ह्या तयारीत तब्येतीची काळजी घेणे.
  • डोळ्यांची विशेष काळजी घ्या. डोळ्यांना allergy होऊ शकते. बाहेरचे खाणे जर जपून. अपचनाचा त्रास संभवतो.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे लागेल.
  • घराचे Interior बद्लावेसे वाटेल.
  • शिवाची उपासना करावी.
  • फिकट नारिंगी (Light Orange) रंग वापरावा. (त्या रंगाची वस्तू बाळगावी)

तुळ 

  • वर्षाची सुरवात थोडी अडथळ्यानी  होणार आहे. साडेसाती सुरु आहेच त्यातच तुमच्या राशीत राहूचेही  आगमन होणार आहे.
  • कामात उत्साह वाटणार नाही.वरिष्ठांचे बोलणे जाच वाटू लागेल.
  • घरी वातावरण तप्त राहील. सध्या मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. वाद-विवाद टाळलेलाच बरा .
  • ह्या महिन्यात खर्च वाढणार आहे. Property किंवा गाडीवर खर्च होऊ शकतो.
  • बोलताना शब्द जपून वापरा कारण बोलण्यामुळे तुमच्या व समोरच्या व्यक्तीमध्ये गैरसमज वाढून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • मित्र-मंडळीसमेवत वेळ छान जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी,घसा खराब होईल.
  • सूर्याची उपासना फलद्रूप ठरेल.
  • भडक भगवा रंग वापरावा.(त्या रंगाची वस्तू बाळगावी) 

       वृश्चिक 
  • जेवढी मिळकत तेवढाच खर्च असे ग्रहांचे गणित तुमच्याबाबतीत सुचवते. त्यामुळे खर्च विचार करून करणे. 
  • Life Partner साठी खरेदी होईल.
  • विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जमण्यास अतिशय उत्तम काळ.
  • सध्या दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
  • जमीन-गाडी-घर  खरेदीसाठी ग्रहयोग छान जुळून आलेत.
  • मनावरचा ताण वाढल्याने निद्रानाश संभवतो त्यामुळे योगासने,ध्यान-धारणा इ. गोष्टींचा अवलंब करावा.
  • नोकरीत तुमचा वरचष्मा राहील. तुमच्या निर्णयामुळे कंपनीला फायदा झाल्याने वरिष्ठांची तुमच्यावर खास मर्जी राहील.
  • तब्येतीच्या बाबतीत अपचनचा व Throat Infection चा त्रास होईल.
  • गणेश उपासना फलद्रूप ठरेल.

  • भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     धनु 
  • मुळातच अधिकार गाजवण्याचा तुमचा स्वभाव. ह्या महिन्यात त्याला खत-पाणीच मिळणार आहे. 
  • नोकरीत/व्यवसायात कॉलर ताठ होणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. त्यामुळे सढळ हाताने खर्चही होणार आहे. 
  • ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना धनार्जनाच्या दृष्टीने खूपच लाभदायक ठरणार आहे.
  • तब्येतीच्या बाकी काही तक्रारी नसल्या तरी पाठदुखी - मानदुखीचा त्रास होईल.
  • कुटुंबाबरोबर बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. प्रवासात पाठदुखीचा त्रास अजून वाढेल त्यामुळे काळजी घेणे.
  • तापटपणावर नियंत्रण ठेवा. 
  • शेअर बाजारातून फायदा झाला असला तरी Short Term Investment करू नये. पैसा मेहनतीने आहे Short -Cut ने नाही.
  • देवीची उपासना करावी. श्री सुक्त वाचावे.

  • गुलाबी रंग वापरावा. (गुलाबी रंगाची वस्तू/रुमाल बाळगावा)
 मकर 
  • प्रचंड आळस वर्षाच्या सुरवातीलाच जाणवणार आहे.  
  • नोकरीत वरिष्ठांचे आदेश पाळणे महाकठीण जाणार आहे त्यामुळे नोकरीतील बदल आत्ता जरुरी वाटायला लागेल. 
  • वाचन-मनन-चिंतन वाढेल.
  • घरातील तप्त वातावरण सध्या निवळले असले तरी तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • राहती वास्तू जर जुनी असेल तर "Redevelopment" होऊ शकेल.
  • घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेणे.
  • विवाहित मंडळीना "संतत्ती योग" आहे.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी व पायाचे दुखणे संभवते.
  • विष्णुची उपासना करावी.
  • हिरवा रंग वापरावा.

                                                  कुंभ 
  • मुळातच हुशार व ज्ञानलालसा असणारया ह्या व्यक्तींना ह्या काळात ग्रहांनी सढळ हाताने "शिका व शिकवा आणि त्यातून धनार्जन" असे ग्रह योग दिले आहेत. त्यामुळे भरपूर वाचा शिका आणि शिकवा.
  • ज्यांचा इस्टेटी संदर्भातील व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ह्या महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे.
  • शेअर-मार्केट Trading साठी हा महिना तुम्हाला काही देऊ शकणार नाही.
  • वाहन-घर  खरेदीसाठी ग्रह योग चांगले जुळून आलेत.
  • संततीची तब्येत सांभाळणे.
  • लांबचे प्रवास संभवतात.
  • जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.
  • गुरुची उपासना फलदायी ठरेल.(दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  • पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
                                      

मीन 

  • व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनत आणि अडथळ्यानीयुक्त जरी असला तरी धनलाभ होणार आहे.
  • नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
  • कुटुंबासमेवत वेळ चांगला जाण्यास योग पोषक आहेत.
  • कविता-लेखन-वाचन हे मुळातच तुमची आवड. हा महिना नवीन पुस्तके -ग्रंथ तुमच्या वाचनात येतील.
  • वाहन जपून चालवणे.
  • ज्यांचा Marketing /Consultancy संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना हा महिना लाभदायक ठरेल.
  • आधीच पोट नाजूक त्यात अष्टमातील शनि आणि राहूचे भ्रमण त्यात भर घालू शकतील त्यामुळे किडनीचा त्रास संभवतो.पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये.पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •   भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     
                                       

READERS ALL OVER THE WORLD