गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

महिन्याचे राशी भविष्य

 राशीभविष्य 

मेष 
  • Carrierwise खूप चांगली सुरवात हे वर्ष तुम्हाला देणार आहे.
  • नोकरीच्या चांगल्या Offers तुम्हाला ह्या महिन्यात येण्याची शक्यता आहे.
  • नोकरीत तुमच्या शब्दाला किंमत असेल.तुमचे सल्ले महत्वाच्या गोष्टींसाठी घेतले जातील.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील परंतु सावधतेने त्याचा विचार व्हावा. 
  • व्यवसाय करणारया व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवलेला बरां. प्रत्येक गोष्टीचा पडताळा (cross verification ) करूनच व्यवहार करावा.
  • केतूचा प्रवेश तुमच्या राशीत होत असल्याने Depression/Frustration ...डोकेदुखी जाणवेल.त्यासाठी Meditation/Yog व आध्यात्मिक साधना जमेल तर नक्की करावी.
  • घरात सध्या वाद-विवादाचे वातावरण राहील.सांभाळून घेणे.
  • तीर्थयात्रेचे योग आहेत.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भातील गोष्टी पुढे सरकतील.
  •  विष्णुची उपासना फलद्रूप ठरेल. 
  • हिरवा रंग वापरावा. (हिरव्या रंगाचा रुमाल,एखादी वस्तू जवळ बाळगावी)
वृषभ 
  • शेअर मार्केट मध्ये सध्या तुम्हाला फायदा होईल असे दिसते.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात गोडी लागेल. शैक्षणिक प्रगती साधता येईल.
  • जे विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांना  यश मिळेल.म्हणजेच परदेशात शिक्षणासाठी योग्य काळ आहे.
  • नोकरीत तुमच्या कामावर वरिष्ठ खुश जरी असले तरी त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत.त्यामुळे कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल.
  • वाहन सांभाळून चालवणे व प्रवासात तब्येतीची काळजी घेणे.
  • तब्येतीच्या बाबतीत पोट/किडनी विशेष काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्यावे. खाण्यावर ताबा ठेवावा.
  • ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्या रक्तातील साखरचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेंव्हा काळजी घ्या.
  • शनि-स्तुती वाचणे.
  • गडद निळा रंग वापरणे. (निळ्या रंगाची वस्तू/रुमाल जवळ बाळगणे)
मिथुन 
  • तुम्हाला मुळातच गप्पा मारण्याची खूप आवड आहे. परंतु सावधान सध्याचा काळ तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वायफळ बोलणे टाळा. मस्करी वगैरे सध्या नकोच.
  • शेअर मार्केट मध्ये सध्या नुकसान सहन करावे लागेल.
  • विवाहोत्सुक तरुण-तरुणींना स्थळे येतील.
  • संततीच्या आरोग्यास जपणे.
  • नोकरीत सहकारी व वरिष्ठ ह्यांच्या बरोबर जर नरमाईने घ्यावे.
  • नोकरीत झालेल्या वादामुळे नोकरी सोडण्याचा विचार ह्या काळात पक्का होईल.
  • स्थावर-इस्टेटी संदर्भात नजीकच्या काळात पैसे गुंतवू नये.
  • पाठदुखी,अपचनाचा त्रास संभवतो.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •  भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
कर्क 
  • कर्क राशीसाठी हा काल अत्यंत सुखकारक ठरेल.
  • नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. 
  • ह्या काळात विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरू शकतील. 
  • विवाहित मंडळीना संततीच्या बाबतीत पोषक ग्रहयोग असल्याने लवकरच खुशखबर मिळेल.
  • Property/नवीन घर घेताना विशेष काळजी घ्यावी.
  • घरात Renovations/ Changes होतील.
  • परदेशात जाण्याचे योग आहेत.
  • आईच्या तब्येतीस जपणे.
  • सर्दी-खफ़ाचा त्रास होईल.
  • गुरुची उपासना करणे. (दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  •   पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
सिंह 
  • नोकरीचा-कामचा कंटाळा जरी आला असला तरी होणारा खर्च बघत कामाचा आळस करता येणार नाहीये. नजीकच्या काळात कामाचे ओझे जरा कमी होणार आहे.
  • मनावरचा ताण कमी झाल्याने  कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. बाहेरगावी जाण्याचे योग संभवतात.
  • धनार्जनाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे.
  • १५ तारखेनंतर वरिष्ठांकडून तुमची मर्जी राखली जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत दाढदुखी,खांदे-मानदुखी डोके वर काढणार आहे.
  • प्रवासात तब्येत सांभाळ.
  • बाळकृष्णाची उपासना करावी. 
  • हिरवा रंग वापरणे 
कन्या 
  • शिकणे-शिकवणे ही तुमची आवड. सध्याचा काळ नवीन काही शिकण्यासाठी पोषक आहे.
  • अध्यात्म-उपासना ह्यासाठी उत्तम काळ.
  • नोकरीत बदल करावासा वाटेल.
  • विवाहित व्यक्तीना ह्यावर्षी येणारया नवीन छोट्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करावी लागेल. पण ह्या तयारीत तब्येतीची काळजी घेणे.
  • डोळ्यांची विशेष काळजी घ्या. डोळ्यांना allergy होऊ शकते. बाहेरचे खाणे जर जपून. अपचनाचा त्रास संभवतो.
  • विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे लागेल.
  • घराचे Interior बद्लावेसे वाटेल.
  • शिवाची उपासना करावी.
  • फिकट नारिंगी (Light Orange) रंग वापरावा. (त्या रंगाची वस्तू बाळगावी)

तुळ 

  • वर्षाची सुरवात थोडी अडथळ्यानी  होणार आहे. साडेसाती सुरु आहेच त्यातच तुमच्या राशीत राहूचेही  आगमन होणार आहे.
  • कामात उत्साह वाटणार नाही.वरिष्ठांचे बोलणे जाच वाटू लागेल.
  • घरी वातावरण तप्त राहील. सध्या मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. वाद-विवाद टाळलेलाच बरा .
  • ह्या महिन्यात खर्च वाढणार आहे. Property किंवा गाडीवर खर्च होऊ शकतो.
  • बोलताना शब्द जपून वापरा कारण बोलण्यामुळे तुमच्या व समोरच्या व्यक्तीमध्ये गैरसमज वाढून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • मित्र-मंडळीसमेवत वेळ छान जाईल.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी,घसा खराब होईल.
  • सूर्याची उपासना फलद्रूप ठरेल.
  • भडक भगवा रंग वापरावा.(त्या रंगाची वस्तू बाळगावी) 

       वृश्चिक 
  • जेवढी मिळकत तेवढाच खर्च असे ग्रहांचे गणित तुमच्याबाबतीत सुचवते. त्यामुळे खर्च विचार करून करणे. 
  • Life Partner साठी खरेदी होईल.
  • विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जमण्यास अतिशय उत्तम काळ.
  • सध्या दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
  • जमीन-गाडी-घर  खरेदीसाठी ग्रहयोग छान जुळून आलेत.
  • मनावरचा ताण वाढल्याने निद्रानाश संभवतो त्यामुळे योगासने,ध्यान-धारणा इ. गोष्टींचा अवलंब करावा.
  • नोकरीत तुमचा वरचष्मा राहील. तुमच्या निर्णयामुळे कंपनीला फायदा झाल्याने वरिष्ठांची तुमच्यावर खास मर्जी राहील.
  • तब्येतीच्या बाबतीत अपचनचा व Throat Infection चा त्रास होईल.
  • गणेश उपासना फलद्रूप ठरेल.

  • भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     धनु 
  • मुळातच अधिकार गाजवण्याचा तुमचा स्वभाव. ह्या महिन्यात त्याला खत-पाणीच मिळणार आहे. 
  • नोकरीत/व्यवसायात कॉलर ताठ होणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. त्यामुळे सढळ हाताने खर्चही होणार आहे. 
  • ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना धनार्जनाच्या दृष्टीने खूपच लाभदायक ठरणार आहे.
  • तब्येतीच्या बाकी काही तक्रारी नसल्या तरी पाठदुखी - मानदुखीचा त्रास होईल.
  • कुटुंबाबरोबर बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. प्रवासात पाठदुखीचा त्रास अजून वाढेल त्यामुळे काळजी घेणे.
  • तापटपणावर नियंत्रण ठेवा. 
  • शेअर बाजारातून फायदा झाला असला तरी Short Term Investment करू नये. पैसा मेहनतीने आहे Short -Cut ने नाही.
  • देवीची उपासना करावी. श्री सुक्त वाचावे.

  • गुलाबी रंग वापरावा. (गुलाबी रंगाची वस्तू/रुमाल बाळगावा)
 मकर 
  • प्रचंड आळस वर्षाच्या सुरवातीलाच जाणवणार आहे.  
  • नोकरीत वरिष्ठांचे आदेश पाळणे महाकठीण जाणार आहे त्यामुळे नोकरीतील बदल आत्ता जरुरी वाटायला लागेल. 
  • वाचन-मनन-चिंतन वाढेल.
  • घरातील तप्त वातावरण सध्या निवळले असले तरी तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • राहती वास्तू जर जुनी असेल तर "Redevelopment" होऊ शकेल.
  • घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेणे.
  • विवाहित मंडळीना "संतत्ती योग" आहे.
  • तब्येतीच्या बाबतीत डोकेदुखी व पायाचे दुखणे संभवते.
  • विष्णुची उपासना करावी.
  • हिरवा रंग वापरावा.

                                                  कुंभ 
  • मुळातच हुशार व ज्ञानलालसा असणारया ह्या व्यक्तींना ह्या काळात ग्रहांनी सढळ हाताने "शिका व शिकवा आणि त्यातून धनार्जन" असे ग्रह योग दिले आहेत. त्यामुळे भरपूर वाचा शिका आणि शिकवा.
  • ज्यांचा इस्टेटी संदर्भातील व्यवसाय आहे त्यांच्यासाठी ह्या महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे.
  • शेअर-मार्केट Trading साठी हा महिना तुम्हाला काही देऊ शकणार नाही.
  • वाहन-घर  खरेदीसाठी ग्रह योग चांगले जुळून आलेत.
  • संततीची तब्येत सांभाळणे.
  • लांबचे प्रवास संभवतात.
  • जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.
  • गुरुची उपासना फलदायी ठरेल.(दत्तगुरू/स्वामी समर्थ/साई बाबा)
  • पिवळा रंग वापरणे. (पिवळ्या रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
                                      

मीन 

  • व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनत आणि अडथळ्यानीयुक्त जरी असला तरी धनलाभ होणार आहे.
  • नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
  • कुटुंबासमेवत वेळ चांगला जाण्यास योग पोषक आहेत.
  • कविता-लेखन-वाचन हे मुळातच तुमची आवड. हा महिना नवीन पुस्तके -ग्रंथ तुमच्या वाचनात येतील.
  • वाहन जपून चालवणे.
  • ज्यांचा Marketing /Consultancy संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना हा महिना लाभदायक ठरेल.
  • आधीच पोट नाजूक त्यात अष्टमातील शनि आणि राहूचे भ्रमण त्यात भर घालू शकतील त्यामुळे किडनीचा त्रास संभवतो.पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये.पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
  • हनुमानजींची उपासना करावी - हनुमान चालीसा वाचणे.
  •   भडक लाल रंग वापरणे.(लाल रंगाचा रुमाल/वस्तू जवळ बाळगावी)
     
                                       

सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

शासक ग्रह


प्रश्नकुंडली/शासक-ग्रह अर्थात Ruling Planets (कृष्णमुर्ती पद्धती)


"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गुण-मिलन,नवमांश" ह्या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु "प्रश्नकुंडली" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द. त्याबद्दलच आज मी लिहिणार आहे. जन्मकुंडली बनवताना जर ज्योतिषाला अचूक जन्म वेळ दिली गेली नाही तर सांगितले गेलेले भविष्य हे चुकू शकते. पण काही वेळेस तुमच्याकडे तुमच्या जन्माचा पूर्ण तपशील नसतो. म्हणजे काही वेळेस जन्म तारीख माहिती आहे पण जन्म वेळ नाही. काहींनी तर मला खुपदा "जन्म ६.०० ते ७.०० च्या दरम्यान आहे पण madam सकाळी की संध्याकाळी माहिती नाही", काहीना जन्मवार अगदी पाठ पण जन्म तारीख माहित नाही???
असे जरी असले तरी आयुष्यातील प्रश्न तर प्रत्येकालाच भेडसावतात. मग अशावेळी करायचे का? hmmmmm......आहे... शास्त्रात ह्याला सुद्धा पर्याय आहे तो म्हणजे "प्रश्नकुंडली".
प्रश्नकुंडली म्हणजे ज्यावेळेस जातक ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्या वेळेची ग्रहांची आकाशातील स्थिती कागदावर मांडणे. ही कुंडली ९९%वेळेस ज्योतिषाला जन्मकुंडलीपेक्षा ही अचूक उत्तरं देऊ शकते. काही वेळेला काही प्रश्नांची उत्तरे ही जन्मकुंडली वरून check करू शकत नाही. अशावेळेस प्रश्नकुंडलीचा वापर आपण करू शकतो. ह्यासाठी उदाहरण दिले तर तुमच्या लवकर लक्षात येईल.
नवीन घरी आम्ही नुकतेच shift झालो होतो आणि सोसायटीमध्यॆ जरा ओळख झाली होती. ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजता मला आमच्या सोसायटीतल्या सौ. जोशींनी फोन केला. "अग अनुप्रिया, माझं महत्वाचे काम आहे तुझ्याकडे.जरा urgent आहे आत्ता लगेच येऊ का ग?" झाले असे होते की सौ. जोशीना नुकतीच मुलगी झाली होती त्यामुळे घरी मोलकरीणीचा ताफा राबत होता. एका दुपारी सौ जोशीना लक्षात आले कि आपले मंगळसूत्र नेहेमीच्या जागेवर नाही. तेंव्हा सर्वत्र शोधले गेले,संध्याकाळ उजाडली परंतु मंगळसूत्र काही मिळाले नाही. आत्तामात्र परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात ४-५ नोकर..आत्ता संशय घ्यावा तरी कोणावर? कोणावर संशय घ्यावा आणि कोणी दुखावले गेले तर एखादी  मोलकरीण गमवावी लागेल..मुंबईत नोकर मिळणे सोप्पे आहे पण ते टिकवणे महाकठीण. त्यांनी झाला प्रकार श्री.जोशींना सांगितल्यानंतर सौ जोशीना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल काय काय ऐकावे लागले असेल ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. श्री.जोशींनी सर्वप्रथम पोलिसांत रिपोर्ट करण्याचे ठरवले व त्यांनी सोसायटी समोरच्या पोलिस-स्टेशनात तक्रार नोंदवली सुद्धा....पोलिसांनी त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तपासाला सुरवात केली व  दुसरया दिवशी सकाळी सकाळीच घरातील सर्व नोकरमंडळीना पोलिस-स्टेशनात हजर राहण्यास सांगितले. तेंव्हा घाबरून सौ. जोशीना माझी आठवण झाली. सर्व नोकर-मंडळी आणि श्री.जोशी पोलिस-स्टेशनात तर सौ.जोशी माझ्याकडे.....
माझ्याकडे सर्व कथाकथन झाल्यानंतर मी त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडली.  

१) कन्या लग्नाची कुंडली
२) चंद्र होता तूळ राशीत म्हणजेच धन स्थानात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने प्रश्न जर मनापासून विचारला गेला असेल तर चंद्र त्या संबंधातील स्थान कुंडलीत दशवतो. आणि इथे चंद्र होता "धन स्थानात" म्हणजे किती मनापासून प्रश्न विचारला गेला आहे.
३) चंद्राची "कर्क" राशी होती "लाभ" स्थानात. "लाभ","धन" ह्यावरून काही कळले का?? hmmmm म्हणजेच अपेक्षित "धनाचा लाभ" नक्की होणार. पण पुढचा प्रश्न कधी? सौ.जोशीना त्यांचे मंगळसूत्र मिळणार तरी कधी ?
४) ह्यासाठी "शासक ग्रहांची" मी मदत घेतली.  "शासक ग्रह" हा शब्द जोतिष-शास्त्रवर अभ्यास असलेल्यांसाठी नवीन नाही परंतु ज्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग नवीन आहे त्यांनी एवढेच समजून घ्यावे ते म्हणजे "शासक ग्रह" हे प्रश्न विचारलेल्या वेळेचे महत्वाचे     ग्रह.
५) सौ जोशींनी जेंव्हा प्रश्न विचारला होता तेंव्हा शासक ग्रह होते : i) बुध   ii) राहू    iii) शुक्र   iv) गुरु  हे सर्व ग्रह fast moving किंवा ज्याला आपण जलदगती असणारे ग्रह म्हणतो.
६) Fast Moving ग्रह आहेत ह्याचाच अर्थ धन लाभ होणार आहे आणि तो ही लवकरच.
मग काही गणिते मांडून मी उत्तर सांगितले :  तुम्हाला मंगळसूत्र मिळेल. सौ.जोशींचा पुढचा(अपेक्षित) प्रश्न : कधी मिळेल ?  उत्तर : आज आहे गुरुवार. आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत मिळायला हवे.  प्रश्न : घरीच मिळेल ना? उत्तर : हो घरीच मिळेल.
जोशी काकू निघणार एवढ्यात त्यांना श्री. जोशींचा फोन आला ...त्यांना ताबडतोब पोलिस-स्टेशनात बोलावले होते. मलाही धागधुग होतीच की काय होतेय? संध्याकाळी सौ.जोशींचा फोन..."अनुप्रिया मंगळसूत्र मिळाले. हुश्श...अग आमच्या सुगंधानेच (मोलकरीण) नेले होते. सकाळी मी किचनमध्ये असताना लादी पुसण्यासाठी ती बेडरुममध्ये गेली होती आणि तिथे टेबलवर ठेवलेले मंगळसूत्र तिने नेले. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिने काबुल केले. व मंगळसूत्र घरी आणून दिले. Thanks a  Lot "
शास्त्राची प्रचिती पुन्हा एकदा आली. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com





शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

वास्तू


वास्तू 


"आमचे घर वास्तूप्रमाणे आहे का जरा बघता का?" असा प्रश्न हल्ली मला मी कोणाच्या घरी समारंभाला गेले कि हमखास विचारला जातो.....मग काय हातातील फरसाणाची डीश बाजूला ठेवून घरात एक चक्कर मारायची...आणि घराचे अवलोकन करायचे...मला स्वतःला हे विषय खूप आवडीचे असल्याने ही request मी नाकारू शकत नाही....काहीना ह्या विषयावर विश्वास आहे काहीना विश्वास असूनही तो दाखवायचा नसतो तर काही लोकांच्या मते हे थोतांड आहे.ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांना समजावण्यात मला माझा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. परंतु ह्या भूतलावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये...पण म्हणून त्या नाहीत हा समज चुकीचा आहे असे मला वाटते. 

वास्तू समजणे म्हणजे फार काही कठीण नाहीये. आपण ज्या घरात(वास्तूत) राहतो त्या घरात एक उर्जा असते. त्या उर्जेचा आपल्या जीवनावर negative  किंवा positive परिणाम होत असतो. होणारा परिणाम positive किंवा  negative असणे हे त्या उर्जेवर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी काही नियम आपल्या दैनंदिन जीवनासाठी सूचित केले होते पण सध्या ते कालबाह्य झालेत. पण काही गोष्टी बदल्या नाहीत. सूर्य पूर्वेलाच उगवतोय..आणि पश्चिमेलाच मावळतोय. सूर्याकडून मिळणाऱ्या उर्जेची गृहिणीना अत्यंत गरज असते.त्यामुळे पूर्वेला स्वयंपाकघर असणे...किंबहुना तिथे असणाऱ्या खिडकीतून सूर्याची  किरणे आत यावीत व त्याचा आरोग्यपूर्ण उपयोग गृहिणी तसेच घरातील इतरांना व्हावा असा हेतू. परंतु आज बांधकामात असा विचार दिसत नाही. पूर्वेकडून व उत्तरेकडून  मिळणारी उर्जा ही positive आहे त्यामुळे ह्या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असणे महत्त्वाचे आहे. दक्षिण दिशा ही स्वाभाविकपणे negative उर्जेची मानली जाते. ह्याचाच अर्थ  दिशेकडून मिळणारी उर्जा/flow of energy ही घरात शक्यतो टाळण्यासाठी ह्या दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. ह्या दिशेत खिडक्या नसतील तर उत्तमच.

हा साधा नियम जरी कळला तरी आपल्या आता हे लक्षात येईल कि म्हणूनच घरातील देव्हारा हा "ईशान्य" दिशेत असावा जेणेकरून आपले मुख पूजा करताना "पूर्वेला" असेल.त्याच अनुषंगाने स्वयंपाकघर आग्नेयेत असावे. पूर्वीची जी घरे असायची त्यात "toilets"चा समावेश नसायचा. म्हणजेच toilets ही घराबाहेर असायची. शरीरातील निचरा/ घाण हा घराबाहेरच व्हावा असा हेतू. Toilets आणि बाहेर Ohh My God. सध्याच्या युगात आपण असा विचारही करू शकत नाही.

बिल्डर्सही कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर करू पाहतात. कारण सध्या राजा-राणीचा संसार हा बऱ्याच वेळा पहावयास मिळतो. मग हवे कशाला मोठे घर. Kitchen लहान झाले ....दिशेचा विचार न करता roomsची arrangement असते...म्हणजे जिथे देवपूजेची जागा असावी तिथे असते ह्यांचे Bedroom. जिथे असावे स्वयंपाकघर तिथे Toilets n Bathrooms. 

आता अशा प्रकारचे बांधकाम जवळजवळ ८०% ठिकाणी मी पाहिलेले आहे. ह्यावरून मला तुम्हाला माझी एक "Case" सांगावीशी वाटतेय. मागच्यावर्षी मी ज्या घरात वास्तू-अवलोकनासाठी गेले होते तो होता "One Room Kitchen".  मग त्या लोकांनी जिथे Kitchen होते तिथे Bedroom बनवला आणि Kitchen व Hallच्या मध्ये जिथे passageway होता तिथे बनवले Kitchen. कारण गृहिणी पूर्णवेळ कामावर...सकाळी ८.००ला घरातून निघणार ते थेट रात्री ९.०० ला घरी परतणार. म्हणजे स्वयंपाकघरात उभे राहण्यासाठीही वेळ नाही मग करायची काय आहे ही extra room ??? ह्या विचाराने जिथे Kitchen होता तिथे छान bedroom सजवला. Passageway मध्यॆ Kitchen बसवले गेले. चार चुलींची शेगडी,धूर होऊ नये म्हणून चिमणी ..इ. छानछान आधुनिक सोयींनीयुक्त असे "Kitchen". पण हा आपल्या सोयीचा विचार करताना एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष झाले ते म्हणजे Toilets आणि Bathrooms च्या बरोबर समोर ओटा बांधला होता. आत्ता काय सांगावे?? ज्यांचे घर होते त्यांना माझ्याकडून स्तुतीची अपेक्षा असावी कारण जेव्हा मी त्यांना स्वयंपाकघराबद्दल नाराजी दर्शवली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्यामते त्यांनी कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर केला होता. पण मी माझ्या मतांवर ठाम होते कारण मला माझ्या शास्त्रावर  पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्या घरातील रचनेवरून जेंव्हा मी त्यांना त्यांच्या carrier व health बद्दल भविष्यात होणारया घटनांबद्दल ठामपणे सांगितले तेंव्हा ह्या सूचनांची तितकीशी दाखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही.   

बऱ्याचदा घराच्या पूर्वेला खिडकीच नसते, घराचे मुख्यप्रवेश्द्वार दक्षिण किंवा उत्तरेकडे असते, संपूर्ण घर हे दिशाहीन असते ..म्हणजेच पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण ह्या दिशा घराच्या कोपऱ्यात असतात, ईशान्य दिशेत संपूर्ण बिल्डींगचे Drainage Pipes असतात इ. घरातील ह्या गोष्टींचा विचार करतो तसाच घराबाहेरील वातावरणाचाही विचार केला गेला पाहिजे. कधीकधी घरासमोर मोठा  नाला असतो कधी घरासमोरच स्मशान असते. मग घर असावे तरी कुठे आणि घरातील रचना असावी तरी कशी ?? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

सध्य परिस्थितीचा विचार करता अगदी पूर्वेकडे असणारे मुख्याप्रवेशद्वार,आग्नेयेकडे स्वयंपाकघर, घरासमोर बाग अशी रचना असणारे घर मिळणे दुर्लभ आहे. मग करायचे काय? आपले शास्त्र काळाच्या इतके पुढे आहे कि ह्याचाही विचार आपल्या शास्त्रकारांनी केला होता. त्यामुळे जर शास्त्रप्रमाणे घर नसेल तर काय करावे ह्यासाठी काही उपाय त्यानी सुचवले आहेत. त्याचा उपयोग आपण जरूर करू शकतो व सकारात्मक(positive) उर्जा आपल्या घरात वाहू शकते. 

हळूहळू ह्या शास्त्राचा व मला आलेल्या अनुभवांचा उलगडा मी पुढील काही भागात करणार आहे.       
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२


12-12-12



दोन दिवसापासून नुसतं भंडावून सोडले आहे सगळ्यांनी ...१२ तारीख येतेय काही special होणार आहे का...घर book करू का?? सिझर चा मुहूर्त चांगला आहे का येणाऱ्या बाळासाठी? हे ना ते...१२-१२-१२ काय special आहे? नेहेमीच्या तारखेसारखी तारीख ....काय auspicious ? 
भारतीय वंशाच्या माझ्या बांधवानो आणि भगिनीनो ....आपल्या शास्त्राप्रमाणे आज चंद्र "वृश्चिक" राशीत, अनुराधा नक्षत्रात त्यात आज तिथी चतुर्दशी काय बरे एवढे चांगले पंचांग आहे ??? काहीही नाही ... नुसते तारखेच्या मागे जाऊ नका....भारतीय शास्त्र हे खूप प्रगत आणि अत्यंत सखोल आहे..तेंव्हा हे "auspicious" चे वेड सोडा आणि कामाला लागा...

nothing going to happen special ....dont wait for it...

bye 

शनिवार, ८ डिसेंबर, २०१२



अष्टमातील शुक्र आणि तो ही तूळ राशीतला 



ज्योतिष/कुंडली /ग्रह-तारे हे असे विषय आहेत कि ज्यांच्याबद्दल सर्वांनाच कुतूहलता असते. तशीच कुतूहलता मला माझ्या लहानपणा पासून होती.  दूरवर चमकणारे तारे आणि  आपण ह्यात नक्कीच काहीतरी नाते आहे असे नेहेमी वाटायचे.....ज्योतीशाशास्त्रावर मिळतील ती पुस्तके मी दिवाळीच्या सुट्टीत वाचून काढायचे. मग शाळा सुरु झाली कि मैत्रीणीच्या हातावरील रेषांचा अर्थ समजून घेणे ..व त्याचा काहीबाही अर्थ सांगू लागले..मैत्रिणीनाही त्याचा छंद लागला.....मला ही मज्जा वाटायची. शाळेनंतर college सुरु झाले.  Lecturesला बसण्यापेक्षा groupमध्ये सगळ्यांच्या हातावरील रेषा वाचणे आणि त्याचा अर्थ त्यांना सागणे...ह्यात  जास्त interest वाटू लागला.

College नंतर ज्योतिषशास्त्राचे शास्त्रोक्त शिक्षण घेतांना जगात घडणाऱ्या बऱयाच गोष्टींचा उलगडा होत गेला. लोकांबरोबर घडणाऱ्या गोष्टी आणि ग्रह-ताऱ्यांचा त्यांच्या कुंडलीवरून होणारा फेरा ह्याचा संबंध कळू लागला. ग्रह-तारे,साडेसाती,दशा,गोचर इ. सतत सुरु असायचे. ह्या ग्रहाची दशा सुरु आहे म्हणून का ह्याला हा त्रास झाला असावा?मग त्यावर खोल विचार करून निष्कर्ष काढण्यापर्यंत सराव झाला...आत्ता वेळ आली होती ती थेट अनोळखी माणसाची कुंडली मांडून आपले ज्ञान check करणे. 

एक challenging कुंडली जेंव्हा माझ्याकडे आली...तेंव्हा त्यातील मोजक्यां पण काही ठळक गोष्टी मी सांगितल्या आणि ज्यांची कुंडली होती ते अचंबित झाले. ह्याच कुंडलीचे काही मुद्दे मी इथे मांडणार आहे.: १) जातकाचे मीन लग्न आहे. २)लग्नेश स्वतः लाभ स्थानात  वक्री ३) चंद्र राशी कर्क. ४)तुळेचा शुक्र अष्टमात ?? ह्या व्यक्तीला नक्कीच ""किडनी"चा त्रास असावा. ५)सप्तम स्थानातील कन्या राशीतील हर्षल-बुध उटी पाहिल्यावर माझा निष्कर्ष ठाम झाला. हे मी त्या व्यक्तीला विचारताच तो म्हणाला अग अनुप्रिया एवढे कळते पत्रिके वरून?? मी म्हणाले बरेच काही कळते हे खरे आहे कि नाही ते सांग ....त्यावर त्याने सांगितलं ते असं : त्याला जन्मतः  एक "किडनी'च  नाहीये...आणि हे त्याला त्याच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षी समजले...

एक "किडनी' नसल्यामुळे त्याला त्याच्या day to day life मध्ये बरेच बदल करावे लागले..त्यावर काही उपाय मी त्याला suggest केले जेणे करून त्याला त्याच्या carrier मध्ये प्रगती साधता येईल तर असे हे शास्त्र. ज्या ग्रह स्थितीत व्यक्ती जन्म घेते त्याचा आयुष्यात नक्कीच काही चांगले तर काही वाईट परिणाम दिसून येतात...तेंव्हा ह्याचा सखोल अभ्यास खूप जरुरी आहे...अशाच काही वेगळ्या कुंडल्या तुमच्या समोर पुढच्या वेळेस मी घेऊन येईन...bye 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

राशीबदल करणारा शनि

आजचा विषय आहे राशीबदल करणारा शनि :

९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ ला शनि सिंह राशीतून कन्या ह्या बुध्याच्या अमलाखाली असणारया राशीत प्रवेश करेल..........तर त्याची प्रत्येक राशीला मिळणारी फळे खालीलप्रमाणे :

मेष : बदलणारा शनि हा मेष राशीस सहावा येणार आहे. मेष ही मंगळ ह्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी राशी ...शारीरिक ताकदीची..धडाधडीची रास...ह्या राशीला संवेदनाशीलता जास्त काळ मानवत नाही. षष्ठातील शनि हा कर्जासाठी अनुकूल आहे...स्वतःचे घर घेण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही...पण त्याच बरोबर विवाहसंबंधानमध्ये ताणतणाव निर्माण करेल ...कानाची दुखणी संभवतात...लिखाणात अड़चणी...कोर्ट- कचेरी गोष्टींबाबत यश मिळेल ..

वृषभ : वृषभ राशीस शनि पाचवा येत आहे...पंचम स्थान हे संततीकारक मानले जाते.. म्हणजेच होणारा शनिबदल संतती संदर्भात त्रासदायक, अनारोग्यकारक अथवा अपघातदर्शक असणारा. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तिंशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू शकाल...प्रेम-प्रकरणात यश..शेअर्स-सट्टा या मार्गाने धनलाभ...भाग्याची मदत
मिळेल..नोकरीत चांगले बदल...वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे. एकंदरीतच होणारा शनि बदल आपल्यासाठी खुशखबर आणेल.

मिथुन : मिथुन राशीस शनि चतुर्थात येणार आहे..मिथुन व कन्या दोन्ही राशी बुधाच्या अधिपत्याखाली येणारया.....त्यात शनि महाराज कन्येत प्रवेश करीत आहेत...बुध व शनि हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. चतुर्थात येणारा शनि हा मातेच्या आरोग्यासंदर्भात त्रास निर्माण करू शकतो.. शनि हा वास्तु-शास्त्राप्रमाणे जमीनीचा कारक आहे...त्यामुळे स्थावरसंबंधी मतभेद वाढतील... कागदोपत्री-व्यवहारात काळजी घ्यावी..

कर्क : कर्क राशी कर्क राशीस शनि महाराज तृतीय स्थानात म्हणजेच पराक्रम स्थानात प्रवेश करीत आहेत...कर्क ही चंद्राच्या अमलाखालची राशी.चंद्र व शनिचा म्हटले तर छत्तीसचा आकडा..चंद्र भावुक तर शनि परखड..चंद्र चंचल तर शनि विलंबाचा कारक...तर ह्या कर्क राशीला शनि बदलाची काय फळे मिळतील ? खर्चावर बरयाच प्रमाणात नियंत्रण येईल...कानाची दुखणी संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.. मातेस त्रास संभवतो. प्रवासात अडचणी येऊ शकतात.. टपाल...किंवा एखाद्या पत्राची (इ-मेल) वाट बघत असाल तर त्याला विलंब होऊ शकतो..वैचारिक मतभेद संभवतात...

सिंह : हुश शनि महाराज जरी आपल्या राशीतून कन्येत प्रवेश करीत असले तरी...आपल्याला विसरलेले नाहीत..हं धावपळ ज़रा कमी होणार आहे...कुटुंब स्थानात येणारे शनि महाराज घरात एखादे मंगल कार्य घडवून आणतील...कमीशन बेसिस उद्योगातून नफा होइल..नोकरीतून लाभ होतील..अवास्तव आश्वासने देऊ नका..कुठल्याही प्रकारची जोखिम घेताना काळजी घ्या..जोड़ीदाराबरोबर मतभेद टाळा..

कन्या : कन्येत येणारा शनि म्हणुन सर्वानी घाबरवून सोडले असेल...पण तसे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तुमच्या राशीत प्रवेश करणारा शनि हा तुम्हाला स्पर्धात्मक यश मिळवून देईल.कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. हाताखालच्या माणसांची मदत मिळाल्यामुळे काम करण्यास उत्साह येइल.व्यवहारात काळजी घ्या.

तुळ : कन्येत प्रवेश करणारा शनि हा तुमच्या राशीला बारावा येत आहे...शनिची उच्च रास म्हणुन तुळ रास ओळखली जाते..संततीच्या दृष्टीने भाग्योदयाचे ग्रहमान...जमिन/ इस्टेट ह्या संदर्भात गुंतवणुकीचे योग... शिक्षणावर खर्च होईल.. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या....राजकारणी लोकाना अपयशास तोंड द्यावे लागेल...

वृश्चिक : आपल्या राशीला शनि अकरावा म्हणजेच शनि लाभ स्थानात प्रवेश करत आहे.. काम करण्याचा अत्यंत आळस वाटेल आणि त्यातच कोणाची कामात मदत मिळणार नाही.मालमत्तेच्या विक्रीतून फायदा होईल...घर बदल फायदेशीर ठरेल. कोणावरही विसंबून राहू नये आणि मोठी जोखीम घेवू नये...

धनु : धनु राशीला शनि दहावा येत आहे...सर्वात जास्त कृपादृष्ट जर शनि महाराज असणार आहेत तर ते धनु राशीवर...दशम स्थान म्हणजेच "कर्म स्थान"...म्हणुनच आपले कर्म करत रहाणे हे जर उद्दिष्ट ठेवलेत तर यश दूर नाही.. कामकाजानिम्मित्त दूरचे प्रवास घडतील..वंश-परंपरागत मालमत्तेत हक्क मिळेल..तब्येतीची काळजी घ्या..

मकर : मकर राशीस शनि भाग्य स्थानात येत आहे..इतके दिवस रेंगाळलेल्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील..थोडक्यात आरोग्य चांगले राहील कोर्ट- कचेरी गोष्टींबाबत यश मिळेल...जबाबदारया वाढतील...आळस झटकून कामाला लागावे लागेल...प्रवासात अडथळे निर्माण होतील..

कुंभ : अष्टमातुन होणारे शनि भ्रमण आपली कसोटी पहाणार आहे...कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका.. परदेशाशी संबंधीत व्यवहारात अडचणी येऊ शकतात ...तेंव्हा सांभाळा..संतती योग आहे.. शेअर्स-सट्टा हयात मोठी गुंतवणुक टाळा...आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका...

मीन : सप्तामात शनि महाराजांचा प्रवेश त्याच बरोबरीने त्यांचा हर्षल ह्या ग्रहाशी होणारा प्रतियोग हा मानसिक तणाव देईल..निरुत्साह जाणवेल...खर्च वाढतील... लग्न जमवताना अडचणी उद्भवतील...प्रवास भरपूर होतील पण तब्येत सांभाळा......तुमच्याकडून समोरच्या व्यक्तींच्या अपेक्षा ह्या काळात वाढतील...

सोमवार, १७ ऑगस्ट, २००९

शनि व शनिची साडेसाती

आत्तापर्यंत आपण राशी आणि अंकशास्त्रा प्रमाणे स्वतःची ओळख करून घेतलीत.... आजच्या लेखात मी शनि ह्या ग्रहाची माहिती लिहित आहे.....
शनि : शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.
ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे
शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...
साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे.....
शुक्र,चंद्र,सूर्य,गुरु,बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे....
साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे....त्याच्या आधीची राशी आहे कर्क.......म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली.
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्रकुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...
शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत.............
ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते....म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी...

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

अंकशास्त्र - Numerology भाग ३

अंकशास्त्र - Numerology भाग ३


अंक ६ : शुक्राच्या अमलाखाली येणारया ह्या व्यक्तीना छानछोकीची आवड असते। प्रदर्शन केल्याशिवाय त्या वस्तुची महती पोहोचत नाही असे आपणास वाटते. तुमचे वर्णन राजसी, भाग्यवादी, भोगवादी, कलात्मक, संगीत- निसर्ग ह्यांचे प्रेम, नेतृव, प्रेमळ,प्रसंगी एकनिष्ठ, हट्टी परंतु दुराग्रही नव्हेत. स्वतःचा मार्ग युक्तीने गाठणारे, खाण्यापिण्यात रुची चटपटित चमचमीत खाणे आवडते. अंक ५ प्रमाणे सतत शिकत रहाणे आपणास आवश्यक वाटत नाही तर उपयुक्त व्यक्तींचा संच करणे तुम्हाला अधिक उपयुक्त वाटते. सर्वात महत्वाचे स्वप्रसिध्हीची हौस असते. तुम्हाला शक्यतो कफचे विकार असतात. शक्यतो खाण्यापिण्यावर ताबा असणे जरुरी आहे.
प्रसिद्द व्यक्ती : सुनील दत्त ( ६ जून ) रोनाल्ड रेगन ( ६ फेब्रुवरी )
अंक ७ : नेपच्यूनच्या अमलाखाली येणारा हा अंक मला सर्वात जवळचा वाटतो। कारण ज्योतिषशास्त्रीना भविष्यकथन करताना ह्या ग्रहाची मदत मिळते. गूढ़वादी, भावनाप्रधान, संवेदनशील, गोंधळणे, हरवणे व पुन्हा गोंधळणे, व्यवहारात अपयशी, सामान्यतः परावलंबी, निष्ठावान परंतु सातत्याचा अभाव शिस्तबध्ह वा एका चाकोरीतून जाणारया जीवनाचा तुम्हाला नेहेमीच तिटकारा असतो. मनस्वी , चिंतन,अंतःप्रेरणा , प्रवासाची आवड महत्वाचे म्हणजे संम्मोहनशास्त्र तुम्हास लगेच अवगत होते. गूढ़त्वाचे वलय नेहेमीच तुमच्या अवती-भवती असते. आजारपणात तुम्हाला निद्रानाश, वेड लागणे, अतिविचाराने आणि श्रमाने होणारे आजार होऊ शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर ( ७ मे ) जोन. पी. मोर्गन ( ७ सप्टेम्बर )
अंक ८ : जेवढा अंक ५ आणि अंक ७ ला सातत्याचा तिटकारा आहे तेव्हढाच अंक ८ असणारी व्यक्ति एखाद्या गोष्टीचा सतत मागोवा घेत असते. सतत कार्यशील राहून संशोधन करणे, क्लिष्ट गोष्टी सोडवणे, गंभीरणा, कटुता, दीर्घाकालीन योजना रबावणे, अभ्यासू, तत्वाशील, कष्ट करणारे पण कधी कधी कामात आळस नडतो. जीवनात सर्व काही शिस्तबध्हरितीनेच मिळावे असा तुमचा आग्रह असतो. तुम्हाला कोणतीही बंधने आवडत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याच्या सवयीने लोक तुम्हाला टाळतात अर्थात ह्याचा परिणाम असा होतो की तुम्हास एकलकोंडेपणाची सवय होते आणि तुम्हाला निराशेला तोंड द्यावे लागते. आजारपणात तुम्हाला वातविकार, अस्थमा, सांधेदुखी,त्वचाविकार, थंडीताप, दीर्घकालीन आजार असू शकतात.
प्रसिद्द व्यक्ती : डिम्पल कपाडिया ( ८ जून ) मोहन वाघ ( ८ डिसेंबर )

अंक ९ :
साहसी, कृतीशील,टोकाची भूमिका घेणारे,दूरदृष्टीचा अभाव असणारे, योजना काटेकोरपणे रबावणारे स्वप्रेमी, नेतृत्व संपन्न परंतु लवचिकतेचा अभाव, श्रद्धालु, आक्रमक, धाडसी, आत्मविश्वास पण त्याच बरोबर उतावीळपणा, तडकाफड़की निर्णय घेण हेही गुण दिसतात पण ह्याच गोष्टीने लोकांना तुम्ही हेकेखोर हट्टी समजतात. कोणत्याही कलेत तुम्ही स्वतःला झोकुन देता. तुमचे सर्व निर्णय हे ताबडतोब असतातच पण त्यावर अमल सुद्धा लगेच होतो. मैत्री व शत्रुत्व दोन्ही गोष्टी एकाच पद्धतीने निभावताना आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीना तुम्ही खुप जपता. आजारपणात अंगाची आग होणे, रक्तदोष,मुळव्याध, हार्निया, मेंदूचे विकार, रक्तदाब वाढणे, तिखट खाण्याने अल्सर होणे, शत्रक्रिया इ.

प्रसिद्द व्यक्ती : गुरुदत्त ( ९ जुलै ) सोनिया गांधी ( ९ डिसेंबर)
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २००९

अंकशास्त्र भाग २ Numerology

अंकशास्त्र भाग २ Numerology 



अंक ४ :"हर्षल" ह्या ग्रहाने पूर्णपणे काबूत ठेवलेला अंक म्हणजे "४". सर्वात हुशार आणि सर्वात विक्षीप्त......नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडतात...ह्याना संशोधन करायला आवडते. मी तर म्हणेन आजकाल जेवढे शोध लागत आहेत त्यात हर्षल किंबहुना ह्या अंकाखाली वावरणारया सर्व व्यक्तींचा हातभार आहे....नेहेमीच प्रगतीशील रहाणारया व्यक्ति तुम्ही आहात. पण कधी कधी लोकाना तुमचे वागणे विचित्र वाटू शकते. तुम्हाला रूढी......परंपरा पाळणे कठिण जाते. तुमच्या बाबतीत काही गोष्टी अचानक घडतात.....
प्रसिद्द व्यक्ती : किशोरकुमार (४ ऑगस्ट) जमनालाल बजाज ( ४ नोव्हेंबर)
अंक ५ :"बुध" ग्रहाच्या अमलाखाली येणारा अंक "५". पक्के व्यवहारी...चांगली विनोदबुध्ही, भरपूर बोलणे....कुठलीही गोष्ट पटवून देण्यात हुशार,कोणासाठीही झोकुन काम करण्यापेक्षा उपयुक्त काम करणे तुम्हाला जास्त आवडते. एखादी गोष्ट तुम्ही खुप छान फुलवून सांगू शकता. बोलणे खुप आहे पण सातत्य नाही.. ...म्हणुन जितकी प्रगती व्ह्याला हवी तितकी होत नाही. सतत काहीतरी शिकणे आणि शिकवणे तुम्हाला आवडते.

प्रसिद्ध व्यक्ती : नील आर्मस्ट्रोंग ( ५ ऑगस्ट ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ( ५ सप्टेबर )
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, ३१ जुलै, २००९

अंकशास्त्र भाग १ Numerology

अंकशास्त्र भाग १ Numerology 


आज आपण अंकशास्त्र ह्या विषयावर माहिती घेणार आहोत...
अंक १ : ह्या अंकाला ग्रह मालेतील "रवि" हा ग्रह अमल करतो. स्वतः च्या मनाचे राजे....अत्यंत महत्वाकांक्षी, बेफिकीर, अचूक निर्णयशक्ती, जन्मतःच असलेले नेतृत्व गुण असतात. आर्थिक व्यवहारात थोड़ी उधळी, सतत कुठल्याना कुठल्या गोष्टीत गूंगा असणारे, लगेच राग येणारे, अस्थिर, प्रतिष्टा जपणारे....ह्या व्यक्तीना उष्णतेचे विकार असतात..डोकेदुखीचा त्रास होत असतो.
प्रसिद्द व्यक्ती : मीना कुमारी (१ ऑगस्ट), मेरालीन मान्रो (१ जून)

अंक २ : चंद्राचा अमल ह्या अंकावर आहे. अत्यंत भावुक, प्रेमळ, कोणाचेही दुखः सहन होत नाही, तुम्हाला स्पर्धा आवडत नाही.... चंद्राचा अमल असल्याने मला असे वाटते की ह्या व्यक्ती दुसरया व्यक्तींशी ममत्वाने वागते, भावुक असतातच आणि चटकन दुसरयानवर विश्वास ठेवल्याने लोकांकडून फसवलेही जातात. ह्याना प्रवास आवडतो. शांत, मनस्वी, चिंतन प्रेमी असतात. आक्रमकता आणि क्लिष्टता ह्या गोष्टीनी विचलित होतात. ह्याना सर्दीचा त्रास होत असतो.
प्रसिद्द व्यक्ती : महात्मा गांधी (२ ऑक्टोबर) स्ट्रिव्ह वों आणि मार्क वों

अंक ३ : गुरु ह्या ग्रहाचे अधिपत्य असणारया ह्या अंकाचे गुणधर्मही गुरु ग्रहासारखेच असतात...प्रेमात त्यागी,व्यवहारप्रिय, अध्यात्मवादी, परोपकारी, धोरणी, मुख्यतः मुत्सद्दी, गंभीर, कायदा-व्यवस्थाप्रेमी, पण त्याच बरोबर सर्वाना परमार्थाकडे बरोबर घेउन जाण्याची क्षमता, काही वेळेस दाम्भिकापणाही दिसून येतो. गोड बोलून काम करून घेणे ह्याना बरोबर जमते. ह्या व्यक्तीना अतिरिक्त चरबी व हृदयविकार संभवतो.
प्रसिद्द व्यक्ती : जोर्ज फर्नांडीस ( ३ जून ) जमाशेटजी टाटा ( ३ मार्च )
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

गुरुवार, ३० जुलै, २००९

राशी विचार भाग ३

राशी विचार भाग ३ 


मकर :
शनीच्या अमलाखाली ही रास येते .....ह्या व्यक्ती अतिशय व्यवहारकुशल,राजकारणी, काटकसरी व कंजूस असतात. कोणतीही गोष्ट करताना ..स्वतःचा फायदा पहातात...शानीमुले चिकाटी,सोशिकता दिसून येते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ही माणसे भावनेच्या आहारी जात नाहीत. आणि दुसरयांवर अधिकार गाजवण्याची वृती दिसून येते.

कुंभ :

शनीच्याच अधिपत्याखाली असणारी दूसरी रास ...तीव्र स्मरणशक्ती व उत्कृष्ट बुधिमत्ता यांच्या जोडीने कोणतेही knowledge चटकन ग्रहण करतात...संशोधक वृती...चिकाटी ह्या राशीत प्रखर्शाने जाणवते....आध्यात्मिक व पारमार्थिक दृष्टया ही रास महत्वाची आहे.....स्वतः कुठल्याही शास्त्राचा गधा अभ्यास करून इतराना समाजवणे..हा सुद्धा गुण लक्षात घेण्यासारखा आहे.

मीन :
राशीचक्रातील शेवटची राशी असून गुरु ह्या ग्रहाच्या अमलाखाली येते ....सर्वात जास्त आत्मविश्वास जार कुणाचा कमी असेल तर तो मीन राशी असणाराया राशीवाल्यांचा .....अत्यंत भावुक अशी रास आहे. शालीनता ..प्रेमळपणा, भक्ती, निर्मलता अशी वृती बरयाच वेळेस दिसून येते.. .पण ह्यांच्या बोलणे आणि कृती हयात मेळ नसतो ...

असो तर आज सर्व राशिंबद्दलची माहिती ब्लॉग वर लिहून झाली..
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, २९ जुलै, २००९

राशी विचार भाग २

राशी विचार भाग २ 

कन्या : बुधाच्या स्वामीत्वाची दूसरी राशी ..... प्रमाणापेक्षा जास्त बडबड करणारया....हिशेबी ....चिंता ... नीटनेटकेपणा..... आरोग्याची अवाजवी चिंता...... आत्मविश्वासाचा अभाव .... चिडचिडा स्वभाव ...गोष्टी विसरने .....ह्या राशीवाल्याना पोट्दुखीचा त्रास सतावतो...संशयी वृती सोडल्यास ..जीवनात आनंद मिळेल .....


तुला :राशीचक्रातील सातवी राशी होय...जिचे स्वामित्व "शुक्र " ह्या ग्रहा कड़े आहे.... प्रसन्न व्यक्तीमत्वाने सर्वांवर छाप पडणारे .....आनंदीवृतीने वावरणारे ..... ह्या राशीच्या स्त्री - पुरुष हे कला - नाट्य -संगीत ह्यांची आवड असणारे ..तर आहेतच पण....हे स्वतः कलाकार असतात ......


वृश्चिक :ही राशी मंगल ह्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते......जबरदस्त इच्छा शक्ती .......एखादे काम चिकाटीने कसे पूर्ण करावे हे ह्या राशी कडून शिकवे ......सर्वात चांगले वर्णन करता आले तर " आतल्या गाठीचे " ...फटकल..लवकर राग येणारया व्यक्ती .....मदतीला कायम तयार पण ह्यांच्या वाटेला कोणी गेले मग त्याची खैर नाही......मग जरा जपून...धनु :गुरु सारख्या ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या राशी कड़े मित्र परिवार खुप असतो...प्रवासाची आवड ....शिक्षणाची आवड .....अध्यात्मवादी... उत्तम आध्यापक ...परोपकारी प्रेमळ ...पण त्याच बरोबर अतिविश्वास ...अविचारीवृती .....चंचलता.... जुगारीवृती...जाणवते .....

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

राशी विचार भाग १

राशी विचार भाग १

कर्क- ही राशि चक्रातील चौथी राशी ...ह्या राशीचा स्वामी गुरु हां ग्रह आहे .......

स्वभाव : अतिशय साफ़ मन ..काटकसरी.....क्षणात हसणारी तर क्षणात रडनारी.....अशी रास आहे....उत्तम आकलनशाक्ती...मनमुराद हासंणारया......निर्णयशक्ति थोड़ी कमी ...बोलकी वृती....सेवाभावी..... चिकाटी ....आतिविचाराने कधी कधी हातची संधी गमावून बसतात ....सर्दी...शीत विकार ह्यांचा त्रास होतो......

सिंह - रवीच्या स्वामित्वाची ....असलेल्या ह्या राशीत रविचे आधिकार..सत्तालालसा...तेजस्वी विचारपूर्वक वागणे....संगीत - नाट्य - क्रीडा हयात आवड असणारे .उच्चविचार ...self dependent परखड स्वभाव....इतरांचा सल्ला न घेणे .... स्तुति प्रियता ....egoistic ....Dont trust easily ....

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

राशी विचार

राशी विचार 

नमस्कार ....आज श्रावणी सोमवार दिनांक २७-०७-०९ रोजी ब्लॉग वर लिहायला सुरु करताना खुप खुप आनंद होत आहे...या माध्यमाद्वारे बऱ्याच लोकांशी संपर्क साधता येईल..... बऱ्याच गोष्टी सांगता येतील.....
आज सुरवात करताना.....सर्व गुरुवर्य व गुरुतुल्य व्यक्तिना नमस्कार कऋण सुरवात करते.
मेषमेष ही राशिचाक्रतील पहिली राशी आहे......ह्या राशीचा स्वामी मंगल आहे.....
स्वभाव : मेष राशीच्या व्यक्ति खुप महत्वाकांक्षी,तापट,लवकर राग येणारया, सतत कामात मग्न ,स्पष्टवृतिच्या,अधिकार प्राप्तिसाठी प्रयत्नशील असतात ........उत्साह आणि जोम चांगला असतो ..स्व:ताची मते न घाबरता सांगणारे ....थोडेसे आक्रामक वृतिचे , उत्तम नेता.........
वृषभ - वृषभ ही राशिचाक्रतील दूसरी राशी आहे .......ह्या राशीचा स्वामी शुक्र आहे.....
स्वभाव : फ्याशनची आवड असणारे ....परोपकारी ,आनंदी वृती, आशावादी,गायन...नाटक ह्याची आवड .....सुखा आराम... सौंदर्य प्रेम, प्रत्येक नविन गोष्टींचा हव्यास, वीलासिवृती,शांतपणे काम करने ....त्याचबरोबर विनम्रता सोशिकता दिर्घोद्योग हेही गुन आहेत......
मिथुन - चांगली grasping power विनोदीवृति, शिकण्याची आवड, बोलण्यात चातुर्य ,तसेच अस्थिरता ...गप्पा मारने ....इतराना impress करने ... नेहेमी आचार-विचार व कृतीत बदल करणे ..विषयात खोलवर न जाने ....
बाकी राशि वर्णन पुढील भागात .....
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD