कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case
दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक विचित्र Case आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच असा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टला आली होती. "मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो Passage आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा."
मी (गेल्या इतक्या वर्षांच्या consultation मध्ये पहिल्यांदा असा प्रश्न मला विचारला गेला) म्हटले," घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचन मध्ये जाताना वास येतो मग passage च्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?" वैशाली," हो बाथरूम आहे. पण बाथरूम मध्ये check केले. हा वास तिथे येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे बरेच महिने Rat kill, Pest Control केले. पण काही फायदा झाला नाही."
"मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?" मी.
वैशाली,"ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळीच ६ ते ७ च्या दरम्यान येतो नंतर पुन्हा सगळे normal."
माझा बापुडा प्रश्न,"मग तुमच्या building मध्ये काही Drainage pipes खराब झालेत का?"
वैशालीचा कंट्रोल सुटला,"नाही हो गेले तीन वर्ष हाच वास ठराविक वेळेस घरात त्या passage मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, Drainage Pipes, सिंक सगळे check करून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास continue राहतो मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे जाणवले आहे. आता बरेचजण घरी येण्यास पण नाकारतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. मला लहान मुलगा आहे. तो शाळेतून घरी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला कि खूप tension येत. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही."
मी म्हटले,"ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?"
वैशाली," तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे Tension दूर होईल."
म्हटले," सर्वात पहिले घरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे आपण समजू. जर तसे आहे तर
१)घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.
२)संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत.
३) सांजवात घरी झालीच पाहिजे.
४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या स्तोत्रात बरीच अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरु ठेवावी.
५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी पायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडणे.
६) दोन - तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ गुरुजींकडून करून घेणे.
हे सगळे करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला."
वैशालीने निट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. " भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग वगैरे."
म्हटले,"ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?"
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू.
ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले.
वैशाली हसत हसत म्हणाली," अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते."
मी म्हटले," ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु आहे ना ?"
वैशाली," उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरु केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेलीये. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरु आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झालीये. thanx to you अनुप्रिया."
"अरे मला काय thanx ??? हे तर त्या स्तोत्रांची कमाल आहे. continue ठेवा म्हणजे झाले."
खूप आनंद झाला हे सर्व ऐकून. आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा कि नाही ह्यात संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले कि हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहीना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.
लोकांना असाच शास्त्राचा फायदा होवो ही सदिच्छा.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com