"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे"
"अनुप्रिया मैन बहौत थक गयी हुं. अभी सहेन नही होता. लगता है अब Suicide कर लु." हे धक्कादायक उदगार निशाचे. मला पहिल्यांदाच भेटायला आली आणि हे असे बोलणे. "सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" अशी म्हण मला रोज प्रत्ययाला येते. लोकांना Problems असतील कि अनुप्रिया आठवते जसा Problem संपतो लोक ज्योतिषाला साधा फोन करून सांगण्याची तसदीही घेत नाहीत. फार कमी लोक फोन करून सांगतात, "तुम्ही सांगितलेले तसे झाले ". पण काही लोकांना एवढे एक वाक्य सांगायलाही वेळ उरत नाही. "गरज सरो आणि वैद्य मरो"ज्योतिषी किंवा कुठलाही Professional हा आजीवन विद्यार्थी असतो. एका कुंडलीवर खोल अभ्यास करणे आणि त्या अभ्यासावरून जातकाला अमुक ह्या तारखेला तुझे काम होईल,तू ह्या क्ष्रेत्रात नोकरी कर तुझा फायदा होईल, तू नोकरीपेक्षा Business चांगला करू शकशील,तुझे लग्न ह्या महिन्यात होईल, तुला बाळ होईल पण ही काळजी घे, नॉर्मल कि सीझर इ. हे सांगणे हे सोप्पे मुळीच नाही. त्यामुळे एखादी घटना ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडली हे त्याला सांगणे हे अत्यंत जरुरी आहे. तेंव्हा ज्योतिषाने सांगितलेले भविष्य बरोबर आले किंवा चुकले हे त्याला सांगितले पाहिजे.
बरे आता निशाच्या Case कडे वळूया. निशाचे गेल्याचवर्षी लग्न झाले. ती स्वतः सिंधी आणि लग्न भरतेश ह्या गुजराथी मुलाबरोबर. निशा स्वतः माटुंग्याला रहाणारी आणि नोकरी करायची भायखळ्याला पण लग्न करून आली डोंबिवलीला. सुरवातीला सगळे छान चालले होते. नंतर नंतर निशाला घर आणि ऑफिस जमेना. मग काय नवरयाचा चांगला चालणारा Business होताच. निशाने चांगली लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. घरी राहिल्यापासून निशाला जास्तच त्रास होउ लागला. सासरकडची मंडळी जुन्या वळणाची,डोंबिवलीत पाणी न विजेचा लपंडाव, घरी सासू सतत तिच्या समोर बसून रहायची. निशा दुसरया समाजातली असल्याने आमच्या समजातल्या मुली किती वळणदार, कामसू ह्याचा पाढा रोज ऐकवला जाई. स्वयंपाक,धुणी कधी न केलेले आणि आता ते करावे लागतेय, घरी फोन करायचा झाला तरी निशाला फुरसत मिळायची नाही. आधीच नोकरी सोडलेली, कधी न केलेली कामे करावी लागत होती ,सासू येत जाता टोमणे मारायची,नवरा रात्री उशीरा आल्यानंतर तो तक्रार ऐकण्याच्या स्थितीत नसायचा, निशाचा कोंडमारा होऊ लागला. निशाने आत्महत्येचा विचार मैत्रिणीला सांगितला तेंव्हा निशाला तिच्या मैत्रिणीने माझा नंबर दिला.
निशाची कुंडली |
२)सप्तमात वृश्चिक राशीत बुध,रवि आणि नेपच्यून सारखे ग्रह.
३)सप्तमाचा स्वामी मंगळ अष्टमात धनु राशीत. मागच्या जवळ जवळ सगळ्या लेखात आपण हे पहिलेच आहे की अष्टमाचा संबंध आला की अडथळे आलेच. इथे सप्तमाचा स्वामी अष्टमात आणि तो ही मंगळासारखा ग्रह. म्हणजे ती जे काही वैवाहिक जीवनाबद्दल सांगतेय ते खरे आहे. (ज्योतिषाने नेहेमीच जातकाने सांगीतल्येल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. जातक काही गोष्टी लपवू किंवा खोटेही सांगू शकतो.)
कृष्णमुर्ती पद्धतीने : १) सप्तमाचा सब लॉर्ड गुरु आणि तो ३, ८, ११ चा कार्येश. इथेही अष्टम स्थान आहेच. पण कोणताही ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो त्यामुळे गुरुचा नक्षत्र स्वामी पहावा लागेल. गुरु आहे शनिच्या नक्षत्रात आणि शनि ४, ९, १० चा कार्येश म्हणजे फार Negative नाही. कुरबुरी आहेत त्या सगळ्याच वैवाहिक जीवनात असतात. त्यामुळे निशाला व्यवस्थित समजावणे गरजेचे होते. त्याप्रमाणे तिला समजावताना तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला म्हणजे नोकरीत वेळ जाईल आणि काही काळासाठी ती घरापासून दूर राहील. तिचे म्हणणे आता लगेच नोकरी मिळेल ? म्हटले हे योग आहेत का ते पाहू ?
नोकरी(कृष्णमुर्ती पद्धतीने) : सध्या निशाला गुरु महादशा चालू आहे. २०११ ते २०१४ शनि अंतर्दशा. शनि ४, ९, १० आणि शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ६,१, ६ चा कार्येश. निशा माझ्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आली होती. तेंव्हा तिच्या कुंडलीत चंद्र विदशा ३ मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आहे. चंद्र खालील प्रमाणे :
चंद्र १ ३ न.स्वा. चंद्र १ ३ सब गुरु ३, ८, ११ सब सब शनि ४, ९, १०
म्हणजेच नोकरी एप्रिल -मे च्या दरम्यान मिळायलाच हवी. परंतु अष्टम स्थान विसरून चालणार नाही. नोकरीसाठी काळ अनुकूल असला तरी अष्टम स्थानामुळे काहीतरी तडजोड करावी लागते. म्हणजेच कदाचित कमी पगाराची नोकरी पदरात पडून घ्यावी लागेल. त्याप्रमाणे तिला सांगितले.
आता नाईलाज को क्या इलाज? ह्या उक्तीप्रमाणे तिने ही ते मान्य केले. काही स्तोत्रे आणि उपाय तिला दिले. २४ एप्रिलला संध्याकाळी आनंदी स्वरात निशाचा फोन," अनुप्रिया मुझे Interview के लिये दो अलग अलग कंपनीसे Call आया है. Thanx To You. एक कंपनी मार्केटिंग related कामकाज है और दुसरी मेरेही बँकसे मुझे call आया है.लेकिन बँकमें Package कम मिल राहा है. क्या करू ? बहोत Confusion है." म्हटल," ठीक आहे. मला अर्ध्या तासाने फोन कर".
तिची कुंडली Marketing साठी कि बँकेच्या जॉबसाठी Suitable आहे ते पाहिले पाहिजे. marketing साठी द्वितीय स्थान, द्वितीयाचा सब लॉर्ड check करावा. वृषभ लग्न म्हणजेच द्वितीयात बुधाची मिथुन राशी. हे पाहिल्यावर marketing असे सांगावेसे वाटेल परंतु खोल अभ्यासल्यास बुध स्वतः मंगळाच्या वृश्चिक राशीत आणि शनीच्या नक्षत्रात. marketing ??? शक्यच नाही. षष्ठेश शुक्र तुळ राशीत (तुळ - वजाबाकी no marketing ) वजाबाकी ही बँकेतच होत असते रोज. शुक्र राहूच्या नक्षत्रात आणि राहू शनि बरोबर. (शनि - किचकट कामे,वेळ काढू कामे) . बँकेत तिचा Job लोन Department मध्ये असणार आणि तिथे तिला Documents Verificationचे काम. मग काय ? कळले का तिला कुठला Job Suggest केला मी ????
Note : hmmmm बरोबर. मे महिन्याच्या ६ तारखेपासून निशा तिच्याच बँकेत परंतु घाटकोपरच्या Branch ला जाणार आहे. आणि हो तिला सध्या कमी पगार मान्य करावा लागला. वरती आपण पहिलेच तिला तडजोड करावी लागेल. निशा अत्यंत खुश होती. आयुष्यातले खूप मोठे कोडे सुटल्यासारखा आनंद झाला होता तिला. ज्योतिषशास्त्राचा फायदा आत्महत्येचे विचार घेऊन आलेल्या निशाला अशा प्रकारे झाला.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा