शुक्रवार, १७ मे, २०१३

ईशान्य Toilets - वास्तू महादोष

ईशान्य Toilets - वास्तू महादोष


गेल्या लेखात पंचमहाभूते किंवा पंचतत्व ह्या बद्दल आपण वाचलेत. आज तुम्हाला एक Case सांगणार आहे ज्या वास्तूत ईशान्येला व पूर्वेला  Toilets आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम गृहस्वामिनी तसेच मुलांच्या तब्येतीवर कसा झाला ते पाहू. ह्या वास्तूबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही वास्तू दिशाहीन आहे म्हणजेच पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण ह्या मुख्य दिशा ह्या वास्तूच्या चार कोपरयात निर्देशित आहेत. अशी वास्तू कुठल्याही मुख्य दिशेची सकारात्मक उर्जा वापरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो अशी वास्तू घेणे टाळावे. 

ही Case सांगण्याआधी तुम्हाला background सांगते. जाधव कुटुंब आधी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होत. म्हणजे आई वडील,दोन भाऊ- सत्यम आणि निलेश. मोठया भावाची म्हणजेच सत्यमची बायको,दोन मुले असा परिवार 1BHK मध्ये रहात होता. छोट्या  भावाच्या लग्नाची बोलणी सुरु झाल्याबरोबर सत्यमने दुसरे घर शोधायला सर्वात केली. काही महिन्यातच सत्यमला एक घर आवडले. भावाचे लग्न झाले की रहायला येऊ असा plan होता. निलेशचे लग्न झाले आणि सत्यमही नवीन घरात रहायला आला.

काही दिवसांनी रेश्माला (सत्यमची बायको) पोटात खूप दुखू लागले. तपासणीत समजले तिच्या Appendixचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन झाले रेश्मा घरी आली. एक दोन महिने व्यवस्थित गेले. रेश्माच्या भावाचे लग्न ठरले म्हणून रेश्मा आणि मुले लग्नाला गेले होते. तिथे मुलांच्या मस्तीत रेश्माच्या मुलीचा पाय बाईकच्या चाकात अडकला आणि Fracture झाले. लग्न सोडून हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरु झाल्या. तिचा पाय बरा होतो न होतो तोच मुलाला काविळ झाली. दोन- तीन महिन्यांनी सत्यमला त्याच्या कपाळावर एक गाठ जाणवली. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यातच सासूबाई बाथरूम मध्ये पडल्या आणि त्यांचा हात Fracture झाला. कहाणी वाटत असली तरी हे सत्य आहे. मी जेंव्हा हे ऐकले तेंव्हा मलाही खूप आश्चर्य वाटले. 

ह्यानंतर रेश्मा माझ्याकडे आली होती. सगळे कथाकथन झाल्यानंतर घरातील सगळ्यांच्या पत्रिका मागवून घेतल्या. पत्रिका अभ्यासल्यानंतर मी रेश्माला फोन केला तेंव्हा कळले रेश्माचा पाय Fracture झाला आहे. रेश्माला त्यानंतरच्या भेटीत मी वास्तूबद्दल विचारणा केली. तेंव्हा तिने घराचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पण ती दिशा व्यवस्थित सांगू शकली नाही. मग वास्तू Visit चा दिवस ठरवून तिच्या घरी गेले. 
सत्यमची वास्तू 

अत्यंत स्वच्छ आणि ऐसपैस असे घर. मोठीशी बैठकीची खोली, स्वयंपाक घर, झोपण्याची खोली. पाहताक्षणी आवडावे असे घर. पण दिशेचे काय ?? होकायंत्र काढले आणि खरी गोम लक्षात आली. पूर्व दिशा घराच्या समोर न येता घराच्या एका कोपरयात आली होती त्या अनुषंगाने बाकीच्या दिशा. इथपर्यंत ठीक होते. परंतु घरातील एक Toilet हे ईशान्य दिशेला आहे आणि दुसरे आग्नेय दिशेला. मागच्या दोन- तीन लेखात मी उल्लेख केला होता जर आग्न्येय (South -East ) दिशेत जर दोष असेल तर त्याचे परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे आणि पायाचे विकार. आणि इथे वास्तू नेमके हेच दर्शवत होती. वास्तूचे  खालीलप्रमाणे विश्लेषण :

१) दिशा-हीन वास्तू - मुख्य दिशा वास्तूच्या काटकोनात आहेत
२) ईशान्य दिशेत Toilet  
३) आग्न्येय दिशेत Toilet 
४) पूर्व दिशेला कट 
५) ब्रम्ह स्थानावर भिंत 
६) मुख्यद्वार वायव्य दिशेत. 

ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम घरातील स्त्रीवर होणार हा नियम आहे. आणि परिणाम हा पोट आणि पायावर होणार. त्यामुळे रेश्माबरोबर झालेल्या पहिल्या भेटीच्या चर्चेत मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले होते पण वास्तू निरीक्षणानंतर फार आश्चर्य राहिले नाही. लेख वाचतानाच तुमच्याही हे लक्षात आलेच असेल, पाय आणि पोटासंबंधीचे त्रास जास्त झाले आहेत. आता ह्यावर काय उपाय केले पाहिजेत आणि त्याचे कसे Results मिळतील ह्या संदर्भात रेश्मा आणि सत्यमला व्यवस्थित समजावले. ईशान्य आणि आग्नेय दिशेत असलेले toilet कसे विपरीत परिणाम देत आहेत आणि पुढे काय परिणाम होतील हे सांगितले. दोघांना माझे म्हणणे पटले. परंतु त्यानंतर त्यांचा फोनही नाही की भेटही नाही. 

ह्या त्यांच्या भेटीला दोन- तीन महिने उलटून गेले. मी ही विसरून गेले. आठवण तेंव्हा झाली जेंव्हा रेश्माचा मला फोन आला. मी म्हटले," काय चाललय ?" 
 रेश्मा,"गेल्या वेळेस तुम्ही वास्तूबद्दल समजावले होते तर त्याच संदर्भात बोलायचे आहे."  म्हटलं,"बोला." "काही नाही वास्तूने पुन्हां एकदा प्रत्यय दिला. ५- ६ दिवसांपूर्वी घराची साफ- सफाई करायला घेतली होती. दिवाळी जवळ येतेय ना. पंखा साफ करत होते स्टुलावर चढून. तोल जाऊन पडले आणि हात सध्या गळ्यात आहे. वैताग आलाय हॉस्पिटलच्या वा-या कधी संपणार. ऐन दिवाळीच्या तोंडावर हात मोडून बसलेय. मुलांचा आणि सत्यमचा तर हिरमोड झाला आहे. तुम्हीच सांगा काय करायचे."  
मी रेश्माला म्हटले," जे करायचे आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेय आता तुम्हीच ठरावा."  
रेश्मा," हो ते आहेच लक्षात म्हणूनच call केलाय. पण सत्यमचा वास्तू वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. त्या दिवशी तो तुमच्या समोर काही म्हणाला नाही पण …………… "

मी समजले. रेश्माला सांगितले," ठीक आहे तुम्हाला वास्तूचे उपाय नसतील करायचे तर निदान वास्तू बदला. दुसरी वास्तू घ्या आणि तिथे किमान दिशा काटकोनात नसतील हे नक्की तपासून घ्या."

त्यानंतर तिचा फोन आलेला नाही. आता ते नवीन वास्तूत राहायला गेले किंवा नाही हे माहीत नाही. दिवाळी नंतर आज सहा - सात महिने झालेत परंतु त्यांची काही माहिती नाही. जर वास्तू बदलली असेल तर अत्यंत उत्तम नाहीतर हा सिलसिला कायमच राहणार. 

सत्यमसारखे काही वाचक असतीलही ज्यांचाही ह्या गोष्टींवर विश्वास नसेल. कदाचित हे ही म्हटले जाईल रेश्माने स्वतःची काळजी घेतली तर हे प्रसंग उद्भभवणारच नाहीत. पण एखाद्या वास्तूत राहायला गेल्यानंतर लागोलाग इतक्या वेळेस हॉस्पिटलच्या वा-या झाल्या ???? वास्तूत येण्याच्या आधी रेश्माला किंवा इतर मंडळींना असा त्रास का नाही झाला ??? प्रत्येक एक - दोन महिन्याच्या अंतराने घरातील कोणीतरी आजारी आहे किंवा अपघात झालाय ??  हा निव्वळ योगायोग ???? मला तसे वाटत नाही. जर सत्यमने ही वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञाला विचारले असते तर एवढा मानसिक आणि आर्थिक त्रास झाला नसता. 

म्हणूनच नवीन वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञांची भेट घ्या, चर्चा करा. वास्तू नंतर Rectify करण्यापेक्षा आधीच काळजी घ्यावी. आणि हो वास्तूतज्ञ निवडतानाही काळजी घेणे.    

कशी वाटली ही case ??? जर अशा अजून काही Cases तुम्हाला वाचायच्या असतील तर मला जरूर कळवा : anupriyadesai@gmail.com 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD