शुक्रवार, १० मे, २०१३

वास्तू तथास्तु

वास्तू तथास्तु 

गेल्या महिन्यात मानेंकडे वास्तुपरीक्षणासाठी गेले होते. बैठकीच्या खोलीचे परीक्षण झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकघराकडे वळणार तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि साठे काकूंनी घरात प्रवेश केला."हे कोण आले आहेत ? हे काय ते काय ??" ही विचारणा सुरूच होती त्यांची. शेवटी न राहवून माने काकूंनी त्यांना सांगितले, "ह्या वास्तू परीक्षणासाठी आल्या आहेत". "अच्छा म्हणजे ते वास्तुबिस्तु बघतात ते का ?… आम्हाला नाही हो विश्वास ह्यावर. माणसाने कसे स्वतःवर विश्वास ठेवून चालावे म्हणजे सगळे व्यवस्थित असते. हे असे वास्तू बघून का कधी प्रगती होते? उगीच आपले पैसे उकळायचे." - इति सौ. साठे. त्या त्यांच्याच धुंधीत माने काकुंना  सांगत होत्या आणि त्यांना कल्पनाच नव्हती मी त्यांच्या मागेच उभी आहे. मला पाहिल्यावर बाहेर पळाल्या.

हा माझा अनुभव इथलाच नाही तर नेहेमी मला हे अनुभवाला येते की लोक ह्या शास्त्राला खूप दुषणे देतात. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र हे सगळे बकवास आहे. असे काही नसते. लोकांची Psychology वापरून हे लोक स्वतःचे Bank Balance वाढवतात,लोकांची फसवणूक करतात. एवढेच बोलून हे लोक थांबत नाहीत तर त्याही पुढे कोणाचेतरी उदाहरण देतात…अरॆ त्या अमुकच्या घरी "वास्तुवाले" आले होते … घरात सगळ्या गोष्टींची जागा बदलली,तोडफोड केली,Pyramids ठेवले तरी त्याला काही फायदा झालाय का ??  मला राग येण्यापेक्षा ह्या आणि अशा लोकांची कीव येते. 'कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तर आपण त्यावर भाष्य करू नये' अशी एक नीती आहे. आजारी असल्येल्या व्यक्तीला जेंव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तेंव्हा त्या डॉक्टरचे औषध लागूच पडत नाही. बरयाच लोकांना असा अनुभव आला असेल. मग अश्यावेळी आपण काय करतो ?? डॉक्टर बदलतो की त्या Medical Science ला नावे ठेवतो ??????

विश्वासाचा आणि अविश्वासाचा प्रश्न नसून हे एक शास्त्र आहे आणि हे आपल्या ऋषीमुनीनी (जे काळाच्या बरेच पुढे होते ) लिहून ठेवलेले आहे. त्या शास्त्राचा आपल्याला फक्त फायदा घ्यायचा आहे. हे शास्त्र आहे तरी काय ?? खरेच खूप तोडफोड करावी लागते का ??  ह्याचा खरेच काही फायदा आहे का आणि असेल तर आम्हाला कसा फायदा होईल ?? खूप खर्चिक आहे का ?? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

वास्तू म्हणजे फार काही complicated नसून ज्या घरात आपण राहतो ती जागा व आजूबाजूचा परिसर/वातावरण. इंजिनिअर्स कुठलेही बांधकाम करताना पंचमहाभूतांचा विचार करतात. उदाहरणार्थ फ्लायओवर बांधतानाही वातावरणाचा विचार केला जातो. पाऊस,भूकंप, वादळ इ गोष्टी ध्यानात घेऊन बांधकाम केले जाते. मग ज्या घराची ओढ आपल्याला कायमच असते, ज्या घरातून आपल्याला नेहेमीच चांगल्या उर्जेची अपेक्षा असते, कामावरून घरी कधी एकदा पोहोचतोय असे वाटते त्या घराची, एकदा घरी गेल्यावर relax वाटते. मग ह्या घराची, घरातल्या वातावरणाचाही आपण विचार केला पाहिजे. 

काही घरांमध्ये खूप कोंदट वातावरण असते. तिथे गेल्यानंतर कोंडल्यासारखे कोंडल्यासारखे वाटते. कधी एकदा तिथून निघतोय असे वाटते. काही घरात इतके Friendly वातावरण असते कि तिथे कधीही जा तुमचे स्वागतच असते. वातावरण खेळीमेळीचे आणि घरातील व्यक्ती आपल्याशी इतक्या आपुलकीने वागतात कि आपण त्या घरातीलच आहोत असे वाटू लागते. इथे घर लहान-मोठे, गरीब- श्रीमंत मला अजिबात म्हण्याचे नाही. हे आनंदी वातावरण तुम्हाला एखाद्या चाळीतही अनुभवास येईल आणि गर्भश्रीमंत घरात कोंडल्यासारखे वाटू शकेल. घर म्हणजे चार भिंती आणि त्यातील व्यक्ती.घराचा परिणाम त्या व्यक्तींच्या स्वभावावर,आरोग्यावर तर होतच असतो परंतु घरातील व्यक्तींचाही परिणाम त्या वास्तूवर होत असतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे घरातील सर्वांनी हे वातावरण कसे आनंदी राहील ह्यासाठी प्रयत्नशील असावे असे माझे स्पष्ट मत आहे.

पंचमहाभूते म्हणजेच 'अग्नि,पृथ्वी,वायू,जल  आणि आकाश'  ही पंचमहाभूते जर दुषित झाली नसतील म्हणजेच घरातील त्यांच्या दिशांना काही हानी झालेली नसेल तर ही पंचमहाभूते आपल्याला Positive results देतील अथवा काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतील. ही तत्वे जर बिघडली तर घरातल्या व्यक्तींना त्रास होण्यास सुरवात होते. ही पंचमहाभूते खालीलप्रमाणे स्थित असतात.



१) अग्नितत्व -  पूर्व दिशेच्या आणि दक्षिण दिशेच्या मध्ये ही आग्नेय दिशा असते. अग्नीतत्वाचा संबंध आपल्या पचनशक्तीशी निगडीत आहे. पोटातला अग्नी बिघडला तर काय होईल ? पित्ताचा त्रास,अंगावर उष्णतेचे पुरळ/गांधी इ. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत अपेक्षित आहे. म्हणजेच ह्या आग्नेय दिशेत जर काही दोष असेल जसे की ह्या दिशेत मोठा कट असणे, खिडकी असणे,दरवाजा असणे हा एक वास्तूदोष आहे. ह्याचा परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे विकार किंवा गुडघ्याचा त्रास. पुरुषाला पाठीच्या कण्याचा त्रास असणे. 

२)  पृथ्वीतत्व - नैऋत्य  दिशा ही दक्षिण आणि पश्चिम ह्यांच्या मधली दिशा. तिजोरी किंवा दागिने/ पैसे ह्या दिशेत असावेत. ह्या दिशेत जड वस्तू जसे कपाट , साठवणीच्या वस्तू - धान्य इ. असेल तर ह्या दिशेतून येणारी Negative ऊर्जा आपण Control करू शकतो. ही दिशा कधीही मोकळी असू नये. ह्या दिशेत जर दोष असेल म्हणजेच ह्या दिशेत Toilets असणे, विहीर असणे, underground water tank,गच्ची  असणे  म्हणजे संकटाला आमंत्रण देणे. असे दोष जर असतील तर अचानक आर्थिक संकट,अपघात किंवा आत्महत्या इ. घटना घडतात. (दक्षिण ही यमाची दिशा संबोधीत आहे. यमाची दिशा म्हणजे negative energy / confidence कमी असणे.) ह्या दिशेतील दोष लवकरात लवकर दुरुस्त करणे. 

३) वायुतत्व - वायव्य दिशा. पश्चिम आणि उत्तर ह्या दोन दिशेतील ही दिशा. ह्या दिशेची देवता पवनदेव आहेत. ह्या दिशेत दोष म्हणजे दरवाजा असणे, टेरेस असणे,विहीर असणे. ह्या दिशेतील दोष घरातील व्यक्तींना मानसिक व शारीरिक पिडा दर्शवते. मानसिक चंचलता, घराबाहेर वारंवार रहाणे इ. वायुत्तत्वाचा आणि व्यवसायाचा घनिष्ठ संबंध आहे. ह्या दिशेत वस्तू ठेवल्यास त्यांची लवकर विक्री होण्यास मदत होते. 

४) जलतत्व -  ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर दिशेच्या मधली दिशा. ईश म्हणजे ईश्वर- ईश्वराची दिशा. ह्या दिशेकडून प्राणिक उर्जा मिळते. त्यामुळे ह्या दिशेत जास्तीत जास्त खिडक्या असणे, मोकळी असणे म्हणजेच अडगळ अजिबात असू नये आणि अवजड वस्तू असे नये  हे अपेक्षित आहे. ह्या दिशेत जर दोष असेल तर शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात. चांगला प्रवाह वाहण्यास अजून मदत व्हावी ह्यासाठी ह्या दिशेत देवघर,देवांच्या तसबिरी ह्यांची स्थापना करावी. अभ्यासासाठी व ध्यानासाठी उत्तम दिशा असे म्हटले गेले आहे. जर ह्या दिशेत कचरा,रद्दी इ. असेल खूप अवजड वस्तू ठेवल्या गेल्या असतील तर साहजिकच प्राणिक उर्जा मिळण्यास अडथळा निर्माण होतो. जलतत्व ह्या दिशेस असल्याने ह्या दिशेत Artificial Waterfall, पाण्याचा साठा असेल तर दुधात साखर. ह्या दिशेत सर्वात मोठा दोष म्हणजे इथे Toilets असणे. जर इथे Toilets असतील  तर ते तब्येतीच्या बाबतीत फार वाईट फळे मिळतात. (अशी एक वास्तू Case पुढील भागात मांडेन). ताबडतोब ह्या दोषाचे निवारण करावे. Toilets जर घराच्या दुसऱ्या जागी हलवता येणार नसतील तर त्यासाठी विनातोड्फोड उपाय आपल्या वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत. 

५) आकाशतत्व - आकाश म्हणजेच घराचे ब्रम्ह्स्थान (मध्यभाग) जर तुम्हाला आठवत असेल तर आधी गावच्या घरी घराचा मध्यभाग मोकळा ठेवून तिथे तुळशीवृंदावन असायचे. अजूनही कर्नाटक किंवा दक्षिण भारतात घराचा मध्यभाग मोकळा असून तिथे तुळशीवृंदावन असते. आणि त्या मोकळ्या जागेवर कधी कौलेही घातली जायची नाही.


संपूर्ण घराला कौले करणारे आपले पूर्वज घराचा मध्यभाग का बरे मोकळा आणि कौलाविना ठेवत असतील ?? असा कधी विचार केला आहे ?? आपल्या पूर्वजांना ह्याची संपूर्ण कल्पना होती कि सर्व तत्वांप्रमाणेच आकाशतत्वाची ही आपल्याला तितकीच गरज आहे. आकाशतत्व म्हणजेच ब्रम्हस्थान, वास्तुपुरुषाचा पोटाचा भाग. जर ह्या भागात अवजड वस्तू/अडगळ, भिंत, toilets इ  असेल तर हा महादोष आहे. ह्या दोषाचा परिणाम म्हणजे पोटाचे अत्यंत भयंकर विकार- आतड्यांचा त्रास, हार्निया,गर्भपात इ. त्यामुळे हा भाग मोकळाच असला पाहिजे. 

आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम आताच्या बांधकामात कसे काय बसणार ?? सध्या घर पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसे घर मिळतानाच मुश्कील आहे त्यात हे सगळे नियम बघून घर म्हणजे तर झालेच…. आपले वास्तुशास्त्र इतके सक्षम आहे की काही साधे उपाय केल्यानेही(तोडफोडीशिवाय) घरातील दोष नष्ट होऊन घरात सकारात्मक उर्जा प्रवाहित तर होईलच आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य,आयुष्य उत्तम राहून प्रगती साधता येईल. काही उपाय तर मी वर नमूद केलेच आहेत जसे ईशान्य दिशेत अडगळ नको, नैऋत्य दिशेत कपाट- दाग-दागिने,पैसे वगैरे. जसे डॉक्टरांकडून औषध घेतले म्हणजे चमत्काराप्रमाणे रोग लगेच बरा होत नाही आणि पथ्यपाणी सांभाळल्याने रोग बरा होतो त्याप्रमाणे वास्तुदोष निवारण झाल्यानंतर सुद्धा वास्तूततज्ञाने सांगितलेल्या इतरही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 


लक्षात ठेवा : १. वास्तू नेहेमी तथास्तु म्हणते.
२. त्यामुळे वास्तूत नकारात्मक गोष्टींची चर्चा,कटकट,सततचे वादविवाद टाळावेत. 
३. सकारात्मक संदेश देणारी चित्रे घरात लावावीत.  
४.मित्र मंडळी,नातेवाईक ह्यांच्या भेटीगाठी महिन्यातून एकदा तरी झाल्याच पाहिजेत. वास्तू हसत रहायला हवी. तुमची प्रसनत्ता तुमच्या वास्तूत प्रतिबिंबित होते. आणि नेहेमी हसणारी वास्तू आनंदी रहाते आणि आनंद देत राहते. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD