गुरुवार, १२ मे, २०१६

शासक ग्रहांनी सावध केले

शासक ग्रहांनी सावध केले  

पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या सौ. रेवती सावंत घरी आल्या. चेहेऱ्यावर भरपूर प्रश्न दिसत होते. आज अचानक कशा काय वगैरे विचारण्याआधीच रेवतीचा प्रश्न - "मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक business proposal आले आहे. त्या व्यक्तीबरोबर माझी मिटिंग आहे उद्या. तर मी पुढे जावे की न जावे ? आणि त्यात किती Risk घ्यावी ? Risk घेऊ कि नको ?"
मी म्हटले," आपण शासक ग्रहांच्या माध्यमाने तुमचा प्रश्न तापासून पाहू. उत्तर हो किंवा नाही मध्येच अपेक्षित असावे. " 
रेवती हो म्हणाली मग शासक ग्रह मांडले - २२ मार्च २०१६ संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटे ठाणे. 

L - बुध ६,१,१० शनि ३,५,६ 
S - रवि ६,१२ शनि ३,५,६
R - रवि ६,१२ शनि ३,५,६
D - मंगऴ २,३,८ शनि ३,५,६ 

चंद्र राहूच्या युतीमध्ये आहे.तोही व्ययात. लाभेश व्ययात आहे तोही वक्री गुरु बरोबर आणि राहूच्या युतीत. हा योग धरून सांगितले ज्या व्यक्तीने तुम्हांला व्यवसायाबद्दल सांगितले आहे त्याने तुम्हाला अर्धवट माहिती दिली आहे किंवा माहिती लपवून ठेवली असावी. त्यावर रेवतीचा प्रश्न -"असं कशाला ती व्यक्ती करेल ?" मी म्हणाले,"हे बघ ते मला काही माहित नाही. शासक ग्रह तरी तुला ह्या पासून लांब राहायला सांगताहेत. आता तूच ठरवं. उद्या काय होतेय ते मला येऊन सांग आठवणीने". "बरं " म्हणून रेवती गेली.   
दुसऱ्या दिवशी रेवती आली. खूप खुश होती. माझ्याकडून गेल्यानंतर ती जरा सावध झालेली. तिने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती जवळच्या इतर व्यक्तींकडून घेतली आणि तिला धक्काच बसला. सदर व्यक्ती गेले कित्येक वर्ष एका व्यवसायात असून तो व्यवसाय संपूर्णपणे दिवाळखोरीत निघालेला आहे अशी माहिती तिला मिळाली. तो व्यवसाय म्हणजे हल्ली जे chain marketing करतात तोच. फरक इतकाच की हा व्यवसाय tourist शी संबंधीत होता. म्हणजे तुम्ही सुरवातीला रू. ५०००/- भरून स्वतःचे नाव नोंदवायचे आणि पुढे इतर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना ह्यात रु.५०००/- गुंतवण्यास सांगायचे मग ५० च्या वर मेंबर झाले कि तुम्हाला एक ट्रीप फ्री मिळणार कंपनीतर्फे आणि प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हला कमिशन मिळेल. ह्या अशा भूलथापांना बरेच लोक फसतात. 

ह्या व्यवसायात त्या व्यक्तीला स्वतःला काही प्रगती करता आली नाही परंतु दिवाळखोरीचे पैसे काढायचे कुठून ? त्यांनी भोळ्याभाबड्या रेवतीला गाठले. 


हा सर्व प्रकार लक्षात येताच रेवतीने काढता पाय घेतला. त्याच संध्याकाळी तिने माझी भेट घेतली आणि सर्व प्रकार सविस्तरपणे सांगितला. शासक ग्रहांची किमया दुसरे काय ? शतशः नमन त्या शासक ग्रहांना. 

पुन्हा एकदा शासक ग्रहांनी नुसता मार्गच नाही दाखवला तर सावध करून काहीतरी गौडबंगाल असल्याचे निर्देशही दिले. 

For Consultation - anupriyadesai@gmail.com

My Website - www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD