वास्तुशास्त्रज्ञाचे भविष्य
ज्योतिषाचे भविष्य ह्यावरचे लेखन मी २०१३ च्या जुलै ला प्रसिध्द केलेले. त्यावेळी बऱ्याच वाचकांची आणि जातकांची मला ई-पत्रे आली. त्यांना लेख खूप भावला होता. त्यानंतर बऱ्याच वेळेस सगळ्यांची विचारणा होत होती अनुप्रिया लेख लिही पुन्हा ह्यावर. तर आज योग जमला आहे. आज मी वास्तुशास्त्रावर लेख लिहिला आहे.
प्रसंग १ - Second Home
हल्ली स्वतःचे घर असतांना बँका कर्ज देत आहेत म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरु असतो. त्याला ते "investment" असं म्हणतात. हे नवीन फ्याड आहे सॉरी "Trend" आहे. माझे असे मत आहे घर घेतानांच जर तुम्ही वास्तुतज्ञ व्यक्तीला घेऊन गेलात तर तुमची बरीचशी मेहनत वाचते आणि घेतानाच घर "Perfect" घेतले जाते. काही जातक मग मला मागाहून फोन करतात. घर book केलय. तुम्ही कधी येता ? एकदा तुमच्या वास्तू -शास्त्राप्रमाणे आहे का जरा बघून घ्या. आता एकदा घर घेतल्यानंतर मी काय सांगणार ??
प्रसंग २ - वास्तूचे मुख्यप्रवेशद्वार
काही खूप हुशार मंडळी मला नुसताच दिशाहीन floor plan पाठवतात. आता त्यावरून मी काय सांगणार ? वास्तुशास्त्र हे दिशांवर अवलंबून आहे. तुम्ही त्या floor plan वर दिशाच जर नमूद केल्या नाहीत तर काय सांगणार मी ?? त्याहून पुढे, वास्तू -शास्त्रवरची काही पुस्तके वाचून त्यांना शास्त्र कळले अशा थाटात काही लोक सांगतात - "मैडम ईशान्य दिशेचा दरवाजा आहे. तुमच्या शास्त्राप्रमाणे (माझ्या शास्त्राप्रमाणे ? बरं बाबा बोल पुढे ) ईशान्य दिशा खूप चांगली मानतात ना ? त्याच दिशेत आहे "Entry". घेऊ ना हे घर ? " आता तुम्हालाच शास्त्र समजले आहे तर मला फोन करून माझा वेळ का बरं घेता ? बरं माझ्या सर्व लेखात मी नेहेमी सांगते की, नुसता घराचा दरवाजा अमुक एका दिशेत आहे म्हणजे घर चांगले असा गैरसमज आहे लोकांचा. संपूर्ण घर कसे आहे, घराच्या खिडक्या कोणत्या दिशेत आहे ? वॉश रूमस कोणत्या दिशेत आहेत ? बेडरूम, स्वयंपाक घर कोणत्या दिशेत आहे ते ही महत्वाचे आहे. घरात चांगल्या उर्जेच्या प्रवाहासाठी संपूर्ण घराची रचना महत्वपूर्ण ठरते.
प्रसंग ३ - नंबरचा खेळ
नंबरच्या खेळाचा शोध आपल्या वास्तू - शास्त्रात कोणी लावला ते मला माहीत नाही. अमुक एका नंबरचेच घर लोकांना हवे असते. गुढीपाडव्याला शिल्पाला घर घ्यायचे होते. वर्षभराच्या शोधानंतर तिला एक घर आवडले. पण तिच्या नवरयाचे वेगळेच गणित. त्याला दिशेप्रमाणे नाही तर नंबरप्रमाणे घर घ्यायचे होते. आता पंचाईत. मग मला फोन केला गेला. ह्यावर मी माझे मत जे होते ते सांगितले. नंबरपेक्षा वास्तू शास्त्राच्या नियमांना महत्त्व द्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा व्ययक्तीक प्रश्न आहे.
प्रसंग चार - बिच्चारे देव
ह्यानंतर नंबर येतो देवघराचा. मुख्य दरवाजानंतर घराच्या आकड्याचा नंबर आणि मग शेवटी देवघर कुठे ठेवायचे हे लोक विचारतात. त्यांना देवघर बेडरूम मध्ये नको असते. मग स्वयंपाक घरात नॉन-वेज मुळे काहींना ते तिथेही नको असते. राहता राहिला मुलांचा बेडरूम. मग त्या बेडरूममध्ये देवांची रवानगी होते. १ BHK असेल तर मग देव बैठकीच्या खोलीत बसतात. मला आजपर्यंत देवघर कुठे असावे ? हा सर्वात पहिला प्रश्न एक - दोन जणांनीच विचारलाय. :-)
प्रसंग पाच - रात्रीस खेळ चाले
अमी माझ्याकडे पहिल्यांदा आली होती तेंव्हा खूपच साशंक होती. तिचा स्वभाव आजकालच्या पिढीसारखा. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर अशा स्वभावाची. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून माझा नंबर मिळाला तिला. Consultation च्या सुरवातीला फार बोलतच नव्हती. तिच्या वास्तूच्या संदर्भात प्रश्न घेऊन आलेली. घर बाबांच्या नावावर. बाबांच्या पत्रिकेत सदोष वास्तू असण्याचे योग. त्यामुळे तिला मी काही प्रश्न विचारले," तुझ्या वास्तूच्या आजूबाजूला अमुक गोष्टी आहेत का ? घरापासून काही अंतरावर "अमुक हे" आहे का ? घराच्या खिडकीतून नदी दिसते का ? वगैरे… विस्फारलेल्या तिच्या डोळ्यांनी मला पोचपावती दिली. मी म्हटले कोणाला काही घरात भास होतात का ? त्यावर तिचे उत्तर," हो. आजीला घरात रात्रीच्या वेळेस माणसे वावरतांना दिसायची. ती बरयाच वेळेस म्हणायची रात्री तुम्ही सगळे का भांडत होतात ? आणि वस्तुस्थिती अशी असायची कि आम्ही सर्व गाढ झोपलेले असायचो. आम्हाला वाटले हिला भास होत आहेत. बरेच डॉक्टर्स झाले. आम्ही नंतर तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. परंतु पुढच्या काही वर्षात आम्हाला असे लक्षात आले की आमच्या विंगच्या सर्वांनाच कधीना कधी अशा प्रसंगाचा सामना करावा लागलेला आहे. मग आम्ही सर्वांनी ठरवून सोसायटीत महायज्ञही करून घेतला. नंतर दोन तीन वर्ष कोणाला काही त्रास झालेला नाही. पण आता पुन्हा ते सगळे सुरु झाले आहे. काय करायचे ? तुम्हीच सांगा". अंधश्रद्धा आणि भुताटकी वगैरेच्या भानगडीत न पडता जर तुम्हा सर्वांना तिथे comfortable नसेल ते घर सोडवे हा सल्ला दिला. आणि घर लगेच सोडता येणार नसेल तर घरात रोज रामरक्षा म्हणण्यास सांगितले. त्याने फरक दिसेल.
प्रसंग पाच -
अमिता मला २०१४ च्या नोव्हेंबरला भेटायला आली होती. २५-२६ वर्ष वय तिचं. आईने साठी उलांडलेली. आईला बी. पी. चा त्रास. त्याच्या गोळ्या सतत सुरूच. एक दिवसही गोळी घेतली नाही तर आईची तब्येत बिघडायची. घरात कमवणारं कोणीही नाही. त्यात भरीसभर म्हणून अमिताला डायबेटीस. तिची रोजची औषधे सुरूच. अमिताने नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु २ महिन्यांच्यावर कुठल्याही नोकरीत टिकली नाही. तब्येतीच्या कारणामुळे तिला प्रवासही फार करता येत नव्हता. अत्यंत हालाखीची परिस्थिती होत चाललेली. अशा परिस्थितीत तिला तिच्या ओळखीच्या व्यक्तीने माझा नंबर दिला.
चर्चेनंतर तिने वास्तू विजीटसाठी बोलावले. ( सविस्तरपणे ह्या विषयावर लिहीनच कधीतरी. सध्या जास्त लांबवत नाही. ) वास्तूसाठी जे उपाय करण्यास सांगितले ते तिने २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात करून घेतले. त्यानंतर तिचा मला ऑगस्ट महिन्यात फोन आला की सगळे व्यवस्थित सुरु आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा होतेय. आधीपेक्षा बरयाच कमी पॉवरच्या बी. पी च्या गोळ्या घेतेय ती. अमिताचा स्वतःचा डायबेटीसचा त्रास खूपच कमी झालाय. विशेष म्हणजे आधीसारखी औषधे अजिबात घ्यावी लागत नाहीत. ती जेंव्हा तिच्या डॉक्टरांकडे परवा सर्दीच्या औषधांसाठी गेली होती तेंव्हा डॉक्टरांनी तिला काय विचारले असेल ? गेल्या वर्षभरापासून अमिता त्यांच्याकडे गेलीच नसल्याने त्यांना वाटले ही दुसरीकडे shift झाली. तिने जेंव्हा डॉक्टरांना वास्तूमध्ये करून घेतलेल्या उपायांनबद्दल सांगितले तेंव्हा डॉक्टर आ वासून बघत राहिल्या.
हे आणि असे बरेच प्रसंग आणि घटना आहेत. हळूहळू ह्यावर लेख लिहिण्याचा मानस आहे. तूर्तास ऐवढेच.
For Consultation - anupriyadesai@gmail.com
Website - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा