Transit of Mercury across the Sun
बुधाचे अधिक्रमण
सोमवार, 9 मे रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण संपूर्ण भारतातून सूर्यास्तापर्यंत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या दिवशी सायंकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी बुध ग्रह सूर्यबिंबावर येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी 4 वाजून 44 मिनिटानी संपूर्ण बुध सूर्यबिंबावर येईल. आकाशात सूर्यबिंबाच्या वरच्या बाजूने बुधाचा प्रवेश सुरू होईल. तर बुध ग्रह सूर्यबिंबावर असतानाच सूर्यास्त होईल. मुंबईतून सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांपर्यंत हे दृश्य पाहता येईल.
ही बातमी सतत wats app आणि फेसबुक वरून फिरत होती. ही दुर्मिळ संधी सोडायची नाही असे ठरवून त्यादिवशीच्या सगळ्या appointments पुढे ढकलल्या. ९ मे रोजी वरळी सी फेसला नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणीतून बुधाचे हे अधिक्रमण पाहता येणार आहे हे कळले.
ठरल्याप्रमाणे साडेपाचला आम्ही तिथे पोहोचलो. उत्साही लोकांची प्रचंड गर्दी. अगदी ५ वर्षाच्या मुलांपासून ते ७५ वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सवर्जण हा दुर्मिळ क्षण टिपण्यासाठी जमले होते. नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणी उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे उत्साही लोकांनी स्वतःच्याही दुर्बीणी आणल्या होत्या. सर्वांचे एकाच लक्ष्य- बुधाचे अधिक्रमण. पहिला फोटो जो आहे त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसतेय. फोटो झूम केल्यास दोन काळे ठिपके सूर्यावर दिसताहेत. त्यातील सूर्याच्या मधोमध जो ठिपका आहे तो सुर्यावरचा डाग आहे आणि उजव्या हाताला वरती जो ठिपका दिसतोय तो आहे "बुध".
बुध |
मी दुर्बीणीतून बुधाचे अधिक्रमण पाहताना हा दुर्मिळ घटना टी. वी. वर पाहण्यापेक्षा स्वतः दुर्बिणीतून पाहतांना अत्यंत आनंद झाला. बुध पाहतांना space station ही पाहता आले. |
Space Station |
दुसऱ्या दुर्बीणीतून
सूर्यावर आलेल्या ढगांमुळे काही काळ बुध पाहता आला नाही.
|
सूर्यावर आलेले ढग |
एकंदरीत अत्यंत विस्मरणीय अनुभव होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा