भारताचे पुलवामा भ्याड हल्ल्याला चोख उत्तर
आज भारताच्या वायुदलाने POK वर हल्ला केला. पुलवामा भ्याड हल्ल्याला भारताचे आज प्रत्युत्तर. आजचा दिवस आणि कुंडली अभ्यासनीय आहे. ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्यासाठीच. कुंडली आज पहाटे ३.३० काश्मीर इथली आहे.
१) धनु लग्न आणि ते ही केतूच्या नक्षत्रात. केतू कस्पने धनु राशीत येतो. येणाऱ्या काही काळात केतू-शनि-प्लुटो युती बरेच काही घडवून आणणार आहे. त्या दृष्टीने आजची घटना फार महत्त्वाची.
२) चंद्र व्ययात वृश्चिक राशीत शनिच्या अनुराधा नक्षत्रात. चंद्र स्वतः अष्टमेश.
३) मंगळाची दृष्टी अष्टम आणि व्यय स्थान,चंद्रावर. मंगळ हा हल्ल्याचा कारक ग्रह आहे.
४) लग्नात शनी प्लुटो युती लग्न स्थानात.
५) आजचा वार मंगळवार. दिवसावर मंगळाचा प्रभाव.
६) आजची तारीख २६ - एकूण ८ नंबर
गुरु स्वतः व्ययात असणे आणि अष्टमावर दृष्टी असणे ह्यामुळे आपल्या जवानांना काहीही इजा झालेली नाही. संरक्षण मिळाले.
आज मंगळ,शनि,प्लूटो ह्यांचा प्रभाव कुंडलीवर जाणवतो.
अनुप्रिया देसाई
९८१९०२१११९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा