गुरुवार, २७ जून, २०१३

Medical Astrology - My Fav. Subject


Medical Astrology - My Fav. Subjec

ही आहे नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना मला कुंडलीतील ६ वे स्थान आणि ८ वे स्थान नेहेमी अचंबित करायचे. ह्या स्थानांवरून व्यक्तीला होणारे त्रास/ रोग इ पहिले जातात. ज्यांना ज्योतिष-शास्त्र म्हणजे नेहेमी "राशी भविष्य" इतकेच वाटते त्यांच्यासाठी इथे नमूद करते, जसे Graduation घेताना काही विषयात specialisation करून तुम्हाला Degree मिळते त्याचप्रमाणे ज्योतिष-शास्त्रातही प्रत्येक ज्योतिषाची एक आवड असते त्यानुसार त्याचा अभ्यास आणि भविष्य वर्तवणे असे असते. म्हणजे काही ज्योतिषी Natural -Calamities वर अभ्यास करतात आणि भविष्यात होणारे भूकंप,पूर इ. बद्दल सांगू शकतात.त्यांना मेदनिय ज्योतिष किंवा इंग्लिशमध्ये "Mundane Astrology" असे म्हटले जाते. काही ज्योतिषी फक्त राशी भविष्यच सांगू शकतात, काहींचा जातकाला होणारे रोग त्याची कारणे त्यावरचे इलाज ह्यावरचा अभ्यास असतो त्यांना "Medical astrologer" संबोधले जाते, काहींना जातक काय शिक्षण घेणार आहे,काय Carrier करेल ह्याचा अभ्यास करायला आवडतो, काही ज्योतिषांना सगळ्याच विषयात इंटरेस्ट असतो.

मला मात्र Medical Astrology मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच आज मी नेल्सन मंडेला ह्यांची कुंडली explain करणार आहे. सध्या मंडेलांना फुफ्फुसाचे Infection झालेले आहे. फुफ्फुस हा अवयव कर्क राशीवरून पहिला जातो. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी, प्रत्येक रास ही व्यक्तीचे वेगवेगळे अवयव दर्शवते. जसे मेष रास मेंदू/डोक्याचा भाग, वृषभ रास घसा/गळा/डोळे इ. फुफ्फुस/छातीचा भाग हा कर्क राशीवरून आणि चतुर्थ व दशम स्थानावरून check केला जातो. आता कर्क रास म्हणजे कुंडलीत जिथे "4" आकडा लिहिला आहे.

चतुर्थ स्थानात म्हणजेच जिथे १२ लिहिले आहे तिथे एकही ग्रह नाही. दशम स्थानात म्हणजेच जिथे ६ आकडा आहे तिथे मंगळासारखा उष्ण ग्रह आहे. द्शमचा स्वामी बुध अष्टमात आहे आणि तो ही शनि सारख्या ग्रहाच्या युतीत.

जिथे ४  आकडा लिहिला आहे ते कुंडलीतील अष्टम स्थान आहे. अष्टम स्थानावरून व्यक्तीला होणारे त्रास/मृत्यु ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. मंडेलांच्या कुंडलीत अष्टम स्थानातच आणि कर्क राशीतच रवि,शनि,बुध आणि नेपच्यून सारखे  ग्रह आहेत त्यामुळे Lungs Infection होणे स्वाभाविक आहे.

ह्या कुंडलीला सध्या राहू महादशा सुरु आहे. राहू - १२, ६   न. स्वा. बुध ९, ७, ८,११
राहू अंतर्दशा आणि शुक्र विदशा सुरु आहे. शुक्र - ६,  १२   न. स्वा. मंगळ ११, ६ (२६ जुलै पर्यंत)
त्यामुळे Hospitalisation/Medicines इ. स्पष्ट दिसतेच आहे. सध्या प्रकरण खूप serious आहे. २३ जूनला बुध प्राण दशा सुरु झाली आहे ती १६ जुलै पर्यंत आहे. बुध ९,७, ८, ११  न. स्वा. बुध ९,७, ८, ११ त्यामुळे मंडेला ह्यांची प्रकृती जरी सुधरली तरी पुन्हा खालावण्याचे chances आहेत. 

माझ्या बुद्धीने जितके जमेल तितके सोप्पे करून वाचकांसाठी ही कुंडली explain केली आहे. अभिप्राय नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com वर 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

रविवार, २३ जून, २०१३

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 

गेल्या आठवडाभरात वाचकांचे सतत e-mails आणि फोन येत होते ब्लॉगवर लिहा म्हणून. पण पावसाला सुरु झाला आणि सर्दी-खोकला झाला त्यामुळे काही लिखाण करता आले नाही. क्षमस्व. एक लेख लिहायचा म्हणजे दोन तास गेले. त्यामुळे आजही लेख लिहिण्यापेक्षा एका आमच्या जातक- मित्राने त्याला आलेला शास्त्राचा अनुभव इथे नमूद करतेय. नाव गुप्ततेच्या कारणास्तव लिहिलेले नाही. अनुभव लिहिताना त्याने मोठेपणा मला दिलाय पण तो मोठेपणा शास्त्राचा आहे. त्यामुळे वाचकांनीही शास्त्रालाच महत्व देत हा अनुभव वाचावा. 


श्री स्वामी समर्थ !!!
माझा भविष्य अथवा पत्रिकेवर कधीच विश्वास नव्हता, मी २००७  साली दुबई मध्ये होतो त्या वेळेला सहज कुतहूल म्हणून मी माझी जन्मतारीख ,जन्म वेळ तसेच जन्मस्थान अशी माहिती अनुप्रिया देसाई यांना दिली ,त्यांना अभ्यास करण्यासाठी माझी माहिती हवी होती ,ती देताना पण मी त्यांना सांगितले की या सगळ्यावर माझा विश्वास नाही माझा स्वामींवर विश्वास आहे, पण एक कुतहूल म्हणून आणि तुम्हाला हवी आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतो. त्यांनी माझी कुंडली /पत्रिका बनवली अभ्यास केला आणि ठळकपणे दोन गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे १)तुझे लग्न जुलै-ऑगस्ट  २००८ मध्ये  होईल, २) तुझा प्रेमविवाह होईल. मला खरतरं थोडा धक्का बसला कारण त्यावेळेला मला एक मुलगी आवडत होती पण ही गोष्ट तेव्हा कोणाला माहिती नव्हती.  त्यामुळे मला हा सुखद धक्का होता. 

त्यांनी माझ्या भूतकाळाविषयीही   सर्व गोष्टी अचूक सांगितल्या ,तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या ज्या कालांतराने शत प्रतिशत खऱ्या  निघाल्या. 
१) जुलै  २००८ मध्ये माझा प्रेम विवाह झाला ,
२)मला त्यांनी पुढील वाट चालीसाठी पण मार्ग दर्शन केले ,माझ्या संपूर्ण कुटुंबाची कुंडली त्यांनी बनवली ,माझ्या अनेक मित्रांना पण त्यांनी अचूक भविष्य सांगितले तसेच मार्गदर्शन पण केले .

शनिवार, ८ जून, २०१३

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती …….

परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती ……. 


काल माधुरीचा फोन आला. "Madam मुलाचा बारावीचा रिजल्ट लागला. तुम्ही म्हणला होतात ७० आणि ७५ टक्केच्या दरम्यान मार्क्स मिळतील. त्याला ७४% मिळाले."
मी म्हटले," अरे वाह छान. मग पुढचे काय ? पुढे काय म्हणतोय काय करायची इच्छा आहे ?"
"तुम्ही सांगिल्याप्रमाणे त्यालाही सिव्हिल इंजिनीरिंगच करायचे आहे. ते करू शकेल ना ? पुढे काही अडचणी तर येणार नाहीत ना ? कारण तुम्हाला तर माहीतच आहे तो जराही स्थिर नाही. दहावीपर्यंत कसा अभ्यास करून घेतलाय ते  मलाच माहीत.बारावीचाही त्याने शेवटी शेवटी अभ्यास केलाय. त्यामुळे भीती वाटतेय. करेल ना पुढचे नीट?"
काही वेळेस काही जातक पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारात असतात. काळजी वाटत असल्याने ठीक आहे पण म्हणून कुंडलीचे विवेचन एकदा झालेले असताना पुन्हा पुन्हा तेच तेच विचारले कि मग त्रास होतो. कारण उत्तर तर बदलणार नसते. असो तर मी म्हटले, "गेल्यावेळेस आपले बोलणे झाले आहे ना ? करेल तो व्यवस्थित. तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा मी कुंडली check करते."
  "तसे नाही madam पण काय झालेय की मी मध्ये खूप Tension मध्ये होते अमोदच्या रिजल्टच्या संदर्भात,तेंव्हा माझ्या मैत्रिणीने मला एका ज्योतिषाबद्दल सांगितले. मी गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी तर स्पष्ट सांगितले कि हा मुलगा नापास होणार. मंगळ आणि राहूची युति आहे. ह्याला शिक्षणात खूप अडचणी आहेत. पुढे जास्त शिकू शकणार नाही.
मी खूप घाबरले हो. मी म्हटले मग काय करायचे? एकुलता एक मुलगा आहे तो पण नाही व्यवस्थित शिकला तर मग झालेच. त्यावर ते म्हणाले ह्यावर एक उपाय आहे. तो केल्याने तो पासच नाही तर मार्कही तुम्हाला हवे तसे मिळतील. आहे का तयारी ? मी विचारले काय उपाय आहे ? त्यावर त्यांनी मंगळ आणि राहुच्या शांतीचा उपाय सांगितला. ३०,०००/- रु. खर्च होईल पण तो उपाय केल्याने  फरक पडेल असे सांगितले. मला काय करावे काय कळतच नव्हते. मग पुन्हा आमची वारी माझी मैत्रीण दुसऱ्या ज्योतिषाकडे घेऊन गेली. खूप प्रसिध्द आहेत ते. त्यांनी ही तेच सांगितले आणि शांतीचा खर्च ३५०००/- रु.  सांगितला. इतकी घाबरली होते ना  madam घरी आल्यावर मी ह्यांना सांगितले. ते तर इतके रागवले. मला म्हणाले काय गरज होती तिथे जायची? एकदा आपल्याला अनुप्रियाने सांगितलेय ना ?? आणि ही शांती बिंती काही करायची गरज नाही. मी हा खर्च करणार नाही. 
रिजल्ट लागेपर्यंत मी इतकी tension मध्ये होते ना  madam. काय सांगू ?? आणि जिने मला त्या ज्योतिषांकडे नेले होते तिचाही सारखा फोन येत होता. ते ज्योतिषी सारखे तिला फोन करून विचारात होते कि लवकर करा शांती मग मुहूर्त नाहीत आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मग आपल्या हातात काहीच नाही वगैरे. पण ह्यांनी नाहीच सांगितलेले त्यामुळे मी तिला तसे सांगितले. 

आणि रिजल्टच्या  दिवशीतर मी सगळे फोन बंद केले होते. सगळ्या नातेवाईकांना काय सांगायचे ह्याची भीती. मुलगा घरी आला तेंव्हा रिजल्ट कळला आणि इतका आनंद झाला ना. हे पण म्हणाले बघ उगीचंच tension घेतलं होतीस. अनुप्रियाने ७० आणि ७५ च्या दरम्यान सांगितलं होत ७४%मिळाले आणि ते ही कुठलीही शांती बिंती न करता."

एका दमात माधुरी बाईनी आपली कहाणी सांगितली. ऐकून रागही आला आणि समाधानही वाटले.  माधुरीच्या ह्यांनी शास्त्रावर दाखवलेला विश्वास मला नवी स्फूर्ती देऊन गेला. माधुरीला सांगितले,"चला बरे झाले त्या निमित्ताने तुम्हालाही कळले ढोंगी लोक कसे असतात ते. आता लक्षात ठेवा आणि काळजी करू नका. अमोदची कुंडली व्यवस्थित आहे. काहीही अडचणी नाहीत. पुढचेही सगळे व्यवस्थित होईल."

ह्या शास्त्राचा वापर बरेच लोक आपल्या फायद्यासाठी करतात. लोकांना घाबरवून,खोटे सांगून पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग असतात ह्यांच्या कडे. पण लोकांनी सद्सदविवेकबुद्धीने विचार करावा म्हणून ही Case आज इथे Publish करतेय. चार दिवसांनी रिजल्ट लागणार आहे आणि त्याची आज शांती करून मार्क्स वाढतील असा विश्वास बरयाच ज्योतिषांकडून (ढोंगी) दिला जातो आणि भरगच्च रक्कम सांगितली जाते. चार दिवसात शांतीने रिजल्ट बदलू शकतो का ?? ह्याचा विचार पालकांनी करावा आणि अशा सगळ्या लोकांना थारा देऊ नये. कारण माधुरीने एकदा का शांती करून घेतली असती आणि रिजल्ट चांगला लागला आहेच तर ह्या ढोंगी लोकांनी त्याचे सर्व credit स्वतःला घेतले असते आणि भविष्यात अजून घाबरवून शांती वगैरेचा खर्च उकळला असता. पण अशा लोकांमुळे समाजाचे नुकसान तर होताच आहे त्याचबरोबरीने ह्या शास्त्राचा प्रांजळपणे अभ्यास करणारया लोकांवर(ज्योतिषांवर) मग समाज विश्वास ठेवत नाही आणि मार्गदर्शनापासून वंचित रहातो. 

तुम्हीही नीट विचार करा आणि माधुरीसारखे कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका.
प्रतिक्रिया नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com

 

सोमवार, ३ जून, २०१३

घे भरारी


घे भरारी 

"मला आणि आईला तुम्हाला भेटायचे आहे कधी येऊ ?" समिधाचा २०१०च्या  ऑक्टोबर महिन्यात फोन. कधी भेटायचे तो दिवस आणि वेळ ठरली. ठरल्या दिवशी दोघी आल्या. आईनेच सुरवात केली,"हिचे लग्नाचे योग कधी आहेत ? ते बघा जरा.  आता स्थळ येतात तर ही लगेच नाही म्हणते. अजून शिकायचं म्हणते. आमच्या समाजात मुलीना जास्त शिकवत नाहीत. नोकरी तर करू देत नाहीत त्यामुळे शिकवून काय फायदा ? आणि शिकलेल्या मुलींची लग्न लवकर होत नाहीत हो madam.  B.com. तर झाली त्यानंतर MBA करतेय.  मला तर काही समजत नाही काय करायचं ते. तुम्हीच समजावा."

मी समिधाच्या कुंडलीचा आढावा घेण्यास सुरवात केली. आजकालच्या मुला-मुलींना लग्नाची घाई नसते आणि लग्ना आधी "settle"  व्हायचे असते. त्यामुळे किंवा मग साथीदाराची निवड झालेली असते परंतु सध्या घरी सांगायचे नसते अशा काही कारणांमुळे मग आलेल्या स्थळांना नकार देणे असे प्रकार सुरु असतात. असेच काहीसे मला समिधाच्या बाबतीत वाटले. परंतु तिच्या कुंडलीचा आढावा घेत असतानांच मला जाणवले कि माझा अंदाज साफ चुकीचा आहे. समिधाची कुंडली खालीलप्रमाणे :

समिधाची कुंडली 

वैदिक पद्धतीने :  १) वृषभ लग्न आणि मकर राशीची कुंडली. दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी.
२) मकर राशीचा चंद्र म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या कर्माबद्दल नेहेमीच सतर्क असा माझा अनुभव आहे.  
३) लग्नेश शुक्र जो  षष्ठेशही आहे तो स्वतः धन स्थानात बुधाच्या राशीत. बुध म्हणजे व्यापारीवृती. ज्यांचा बुध चांगला ते मातीही सोन्याच्या भावात विकू शकतील. इथे लग्नेश स्वतः बुधाच्या राशीत.
४) दशम स्थान - ज्यावरून व्यक्ती नोकरी करणार कि व्यवसाय हे समजते. इथे दशमाचा स्वामी शनि सप्तमात  वृश्चिक राशीत. दशमाचा संबंध साप्तमाशी. गेल्या एका लेखात(योगेश पाटील) - आपण पहिलेच दशम आणि सप्तम ह्यांचा संबंध म्हणजे व्यक्ती मुळातच व्यापारीवृत्तीची असते.

कृष्णमुर्तीपद्धतीने :  १) लग्नाचा SL - गुरु - १०, ८, ११   NL -  गुरु - १०, ८, ११  म्हणजेच लग्नाचा सबलॉर्ड सुद्धा दशमाचा कार्येश. ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे निश्चित.

२) षष्ठ स्थानाचा SL - बुध - १२, २, ५  NL - चंद्र - ८  ३)षष्ठाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश म्हणजे नोकरी करणार नाहीच आणि केली तरी फार काळ टिकणार नाही.

मी आईना म्हटलं," ही काही नोकरी करणार  नाही."

मी पुढे काही बोलण्याच्या आधीच आई," मग तेच तर म्हणते मी. नोकरीसाठी आम्ही काही बोलत नाही पण मग लग्नाचं तरी बघावं."

जेंव्हा समिधा माझ्याकडे आली होती तेंव्हा तिला राहू महादशा आणि  बुधाची अंतर्दशा सुरु होती. बुध - १२, २, ५  NL - चंद्र ८ ३. बुध अंतर्दशा संपणार ऑक्टोबर २०१२ला. म्हणजे तोपर्यंत तरी MADAM बोहल्यावर चढणार नाहीत हे नक्की. आईना तसे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड झाला.
आता समिधाची कळी खुलली. समिधा," तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी दोन ते तीन ठिकाणी नोकरीसाठी गेले होते परंतु प्रत्येक ठिकाणी ३ दिवसापेक्षा जास्त राहूच शकले नाही. मला नोकरी करायची नाही हे मी निश्चित केले आहे आणि दोनच दिवसापूर्वी मी एका सेमिनारला गेले होते तिथे एका BUSINESS बद्दल सांगत होते. मला त्यांचा CONCEPT आवडला. त्यांनी खूप छान EXPLAIN  केले. त्यांची FRANCHISEE घ्यायची आणि BUSINESS पुढे चालवायचा. सुरवातीला सगळी मदत ते करणार. जागा आपली आणि ७ ते ८ जण आपल्याला ह्या कामासाठी लागतील."
मी म्हटले,"O.K. पण हा CONCEPT काय आहे ?"
समिधा,"आपल्याला जे MOBILE वर एखाद्या ऑफरबद्दल SMS येतात जसे hmmmm तुम्हाला car loan हवे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा किंवा astrology consultation हवे असेल तर ह्या नंबरवर फोन करा. हे असे sms आपण bulk मध्ये पाठवतो म्हणजेच थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या business बद्दल आपण advertise करायची. ह्यासाठी लागणारा Database (फोन नंबर) ज्यांच्याकडून franchisee घेऊ त्यांच्याकडून मिळणार."

वरती आपण पाहिलेच बुध म्हणजे व्यापार. बुध एखादी गोष्ट खुलवुन सांगू शकतो. बुधाकडे convincing power आहे.  कुंडलीत लग्नात बुध, लग्नेश शुक्र बुधाच्या राशीत आणि षष्ठ स्थानाचा सबलॉर्ड पण बुधच.अंतर्दशाही बुधाचीच.  काय ? काही लक्षात आले का वाचकांच्या ?? 
समिधाला म्हटले,"बिनधास्त सुरु कर."  बाकीचे औपचारिक बोलणे झाले आणि आई आणि समिधा निघणार तेवढ्यात पुन्हा आईंचा प्रश्न,"आमच्याकडे मुली शिकतच नाहीत तर नोकरी कुठून करणार ? हि हुशार म्हणून शिकली पण आता ही म्हणते business करायचा. कस काय व्हायचं हीच पुढे?? पुढचं जाऊदे आता हिच्या बाबांना काय सांगायचं ?? ते तर नाहीच म्हणतील. ही तर म्हणते businessला जागा पाहिजे. मग जागा वगैरे कशी काय होईल ??  कोण देईल जागा ??"
समिधा संपूर्ण गृहपाठ करून आली होती. तिला आई- बाबांच्या विरोधाची कल्पना होती. समिधा,"madam मी जागा बघून ठेवली आहे. सध्या भाडे तत्वावर घेईन. भाडं सुद्धा कमी आहे. सध्या त्या जागेत एक भाडेकरू आहेत. त्यामुळे ती जागा आपल्याला कधीपर्यंत मिळू शकेल हे कळू शकेल का ?"
समिधाच्या कुंडलीत चतुर्थेश आहे रवि. रविची विदशा सुरु होणार मार्चच्या एक तारखेला. तिला म्हटले,"मार्चच्या पहिल्या तारखेला जागा मिळेल".  समिधा खुश झाली.

 मार्चच्या पहिल्या तारखेला आठवणीने तिने फोन केला. जागा ताब्यात आली आणि उद्यापासून म्हणजेच दोन तारखेपासून office सुरु करणार. तिला शुभेच्छा दिल्या. पण एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे बुधाच्या अंतर्दशेत ह्या गोष्टी घडल्या. बुध म्हणजे Duality. आता Dualityचा संदर्भ लागत नव्हता. 

मधल्या काळात ती माझ्या Continuous Contact मध्यॆ होती. तिची प्रगती पाहून आई- बाबांचा विरोध मावळला होता. अत्यंत खुश होती पण बोलता बोलता नेहेमी म्हण्याची मला अजून काहीतरी करायचे आहे पण काय ते काळात नाही. हा business सध्या व्यवस्थित settle होतोय मग अजून एखादा business option चा विचार करतेय. पण options मिळत नाहीयेत. 
आणि २०१२ च्या सप्टेंबरला ती भेटायला आली."madam business तर व्यवस्थित सुरु आहे आणि अजून एक (बुध - duality - दोन business )  संधी मला मिळतेय. माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे त्यांचा घरगुती पापडाचा business आहे. त्यांचे स्वतःचे पापड बनवण्याचे machine आहे. पण सध्या त्यांना त्यांच्या आजारपणामुळे लक्ष देत येत नाही. तर ते machine मला विकण्याची त्यांची इच्छा आहे. रक्कम खूप मोठी आहे आणि machine ठेवायला जागा पण लागेल. जागेसाठी शोधाशोध सुरूच आहे आणि machine साठी लागणारे पैसे आहेत माझ्याकडे. आता प्रश्न एवढाच आहे की  हा business माझ्या कुंडलीला suit होतो का ? आणि पुढे व्यवस्थित होईल ना सगळे ?"
कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. मंगळाच्या अंमलाखाली पापड-लोणची हे पदार्थ येतात. म्हटले,"कर business. हा business suit  होतोय. मंगळाची विदशा सुरु होतेय फेब्रुवारी २०१३ ला. म्हणजेच फेब्रुवारीनंतर business settle होण्यास सुरु होईल." तिला धीर तो कसला ?? जागेची शोधाशोध सुरु होतीच. 

जागा मिळाली जानेवारी २०१३ ला आणि ती सुद्धा आधीच्या जागेला लागुनच. (Duality ) (पुन्हा रवि विदशेतच जागा मिळाली.) machine मिळाली. पापड कारखाना सुरु झाला. पण पापडाच्या business ने उंच भरारी घेण्यास सुरवात केली मार्च महिन्यापासूनच. गेल्याच आठवड्यात समिधा भेटायला आली होती. आधीचा business व्यवस्थित सुरु होताच आणि पापड व्यवसायसुद्धा वेग घेतोय. catering business करणाऱ्या संस्थांशी समिधा contract करतेय. पुढील सहा सात महिन्यात तिला ह्या business कडून बरयाच अपेक्षा आहेत.  

शहरात राहून, खूप शिकून आई-वडिलांचा support घेऊन business करणे  कठीण नाही परंतु एखाद्या गावात राहून शिकून,तिथे एक नाही दोन वेगळ्या पद्धतीचे business करणे तेही घरच्यांचा विरोध असतांना…. हे सोप्पे नाही. समिधा जेंव्हा भेटते तेंव्हा हेच बोलते,"madam हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही कुंडलीवरून माझ्या carrier बद्दल स्पष्टपणे सांगितले आणि मी ठामपणे निश्चय घेऊ शकले."  माझे तिला हेच उत्तर असते,"मी तर फक्त मार्ग दाखवला. मेहनत आणि destiny ही पूर्णतः तुझीच." 

येणारा पुढील काळातही समिधाने अशीच प्रगती साधावी व उंच भरारी घ्यावी ही इच्छा.  
 तिला खूप खूप शुभेच्छा देऊन हा लेख इथे थांबवते.   

Note : बुध हा communication शी संबंधीत आहे म्हणजे computer,mobile इ. पहिला व्यवसाय हा mobile/sms संदर्भात होता आणि त्याचवेळी बुध अंतर्दशा असल्याने हा व्यवसाय खूपच चांगला चालेल ह्या बद्दल कुंडलीने खात्रीच दिली आणि त्याचा प्रत्यय समिधाला मिळाला. दुसरा व्यवसाय हा पापडाशी निगडीत होता आणि त्यावेळी केतू अंतर्दशा आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. पापड व्यवसाय मंगळाच्या अंमलाखाली येतो त्यामुळे तिथेही तिला प्रगती साधता येईल याबद्दल खात्री आहे. 

बुधवार, २२ मे, २०१३

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case

कोणीतरी आहे तिथे - एक हटके Case 

दोन वर्षापूर्वी माझ्याकडे एक विचित्र Case आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच असा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टला आली होती. "मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो Passage आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा." 
मी (गेल्या इतक्या वर्षांच्या consultation मध्ये पहिल्यांदा असा प्रश्न मला विचारला गेला)  म्हटले," घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचन मध्ये जाताना वास येतो मग passage च्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?" 
वैशाली," हो बाथरूम आहे. पण बाथरूम मध्ये check केले. हा वास तिथे येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे बरेच महिने Rat kill, Pest Control केले. पण काही फायदा झाला नाही."
"मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?" मी. 
वैशाली,"ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळीच ६ ते ७ च्या दरम्यान येतो नंतर पुन्हा सगळे normal."
माझा बापुडा प्रश्न,"मग तुमच्या building मध्ये काही Drainage pipes खराब झालेत का?"
वैशालीचा कंट्रोल  सुटला,"नाही हो गेले तीन वर्ष हाच वास ठराविक वेळेस घरात त्या passage मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, Drainage Pipes, सिंक सगळे check  करून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास continue राहतो मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे जाणवले आहे. आता बरेचजण  घरी येण्यास पण नाकारतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. मला लहान मुलगा आहे. तो शाळेतून घरी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला कि खूप tension येत. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही."
मी म्हटले,"ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?" 
वैशाली," तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे Tension दूर होईल." 
म्हटले," सर्वात पहिले घरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे आपण समजू. जर तसे आहे तर
 १)घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे  घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.  
२)संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत. 
३) सांजवात घरी झालीच पाहिजे. 
४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या स्तोत्रात बरीच अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरु ठेवावी. 
५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी पायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडणे. 
६) दोन - तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ गुरुजींकडून करून घेणे. 
हे सगळे करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला."

वैशालीने निट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. " भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग वगैरे." 
म्हटले,"ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?" 
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू. 
ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले. 
वैशाली हसत हसत म्हणाली," अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका यायला लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते."
मी म्हटले," ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु  आहे ना ?"
वैशाली," उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरु केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेलीये. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरु आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झालीये. thanx to you अनुप्रिया."
"अरे मला काय thanx ??? हे तर त्या स्तोत्रांची कमाल आहे. continue ठेवा म्हणजे झाले."
खूप आनंद झाला हे सर्व ऐकून. आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा कि नाही ह्यात संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले कि हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहीना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.

लोकांना असाच शास्त्राचा फायदा होवो ही सदिच्छा.                 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १७ मे, २०१३

ईशान्य Toilets - वास्तू महादोष

ईशान्य Toilets - वास्तू महादोष


गेल्या लेखात पंचमहाभूते किंवा पंचतत्व ह्या बद्दल आपण वाचलेत. आज तुम्हाला एक Case सांगणार आहे ज्या वास्तूत ईशान्येला व पूर्वेला  Toilets आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम गृहस्वामिनी तसेच मुलांच्या तब्येतीवर कसा झाला ते पाहू. ह्या वास्तूबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही वास्तू दिशाहीन आहे म्हणजेच पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण ह्या मुख्य दिशा ह्या वास्तूच्या चार कोपरयात निर्देशित आहेत. अशी वास्तू कुठल्याही मुख्य दिशेची सकारात्मक उर्जा वापरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो अशी वास्तू घेणे टाळावे. 

ही Case सांगण्याआधी तुम्हाला background सांगते. जाधव कुटुंब आधी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होत. म्हणजे आई वडील,दोन भाऊ- सत्यम आणि निलेश. मोठया भावाची म्हणजेच सत्यमची बायको,दोन मुले असा परिवार 1BHK मध्ये रहात होता. छोट्या  भावाच्या लग्नाची बोलणी सुरु झाल्याबरोबर सत्यमने दुसरे घर शोधायला सर्वात केली. काही महिन्यातच सत्यमला एक घर आवडले. भावाचे लग्न झाले की रहायला येऊ असा plan होता. निलेशचे लग्न झाले आणि सत्यमही नवीन घरात रहायला आला.

काही दिवसांनी रेश्माला (सत्यमची बायको) पोटात खूप दुखू लागले. तपासणीत समजले तिच्या Appendixचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन झाले रेश्मा घरी आली. एक दोन महिने व्यवस्थित गेले. रेश्माच्या भावाचे लग्न ठरले म्हणून रेश्मा आणि मुले लग्नाला गेले होते. तिथे मुलांच्या मस्तीत रेश्माच्या मुलीचा पाय बाईकच्या चाकात अडकला आणि Fracture झाले. लग्न सोडून हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरु झाल्या. तिचा पाय बरा होतो न होतो तोच मुलाला काविळ झाली. दोन- तीन महिन्यांनी सत्यमला त्याच्या कपाळावर एक गाठ जाणवली. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यातच सासूबाई बाथरूम मध्ये पडल्या आणि त्यांचा हात Fracture झाला. कहाणी वाटत असली तरी हे सत्य आहे. मी जेंव्हा हे ऐकले तेंव्हा मलाही खूप आश्चर्य वाटले. 

ह्यानंतर रेश्मा माझ्याकडे आली होती. सगळे कथाकथन झाल्यानंतर घरातील सगळ्यांच्या पत्रिका मागवून घेतल्या. पत्रिका अभ्यासल्यानंतर मी रेश्माला फोन केला तेंव्हा कळले रेश्माचा पाय Fracture झाला आहे. रेश्माला त्यानंतरच्या भेटीत मी वास्तूबद्दल विचारणा केली. तेंव्हा तिने घराचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पण ती दिशा व्यवस्थित सांगू शकली नाही. मग वास्तू Visit चा दिवस ठरवून तिच्या घरी गेले. 
सत्यमची वास्तू 

अत्यंत स्वच्छ आणि ऐसपैस असे घर. मोठीशी बैठकीची खोली, स्वयंपाक घर, झोपण्याची खोली. पाहताक्षणी आवडावे असे घर. पण दिशेचे काय ?? होकायंत्र काढले आणि खरी गोम लक्षात आली. पूर्व दिशा घराच्या समोर न येता घराच्या एका कोपरयात आली होती त्या अनुषंगाने बाकीच्या दिशा. इथपर्यंत ठीक होते. परंतु घरातील एक Toilet हे ईशान्य दिशेला आहे आणि दुसरे आग्नेय दिशेला. मागच्या दोन- तीन लेखात मी उल्लेख केला होता जर आग्न्येय (South -East ) दिशेत जर दोष असेल तर त्याचे परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे आणि पायाचे विकार. आणि इथे वास्तू नेमके हेच दर्शवत होती. वास्तूचे  खालीलप्रमाणे विश्लेषण :

१) दिशा-हीन वास्तू - मुख्य दिशा वास्तूच्या काटकोनात आहेत
२) ईशान्य दिशेत Toilet  
३) आग्न्येय दिशेत Toilet 
४) पूर्व दिशेला कट 
५) ब्रम्ह स्थानावर भिंत 
६) मुख्यद्वार वायव्य दिशेत. 

ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम घरातील स्त्रीवर होणार हा नियम आहे. आणि परिणाम हा पोट आणि पायावर होणार. त्यामुळे रेश्माबरोबर झालेल्या पहिल्या भेटीच्या चर्चेत मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले होते पण वास्तू निरीक्षणानंतर फार आश्चर्य राहिले नाही. लेख वाचतानाच तुमच्याही हे लक्षात आलेच असेल, पाय आणि पोटासंबंधीचे त्रास जास्त झाले आहेत. आता ह्यावर काय उपाय केले पाहिजेत आणि त्याचे कसे Results मिळतील ह्या संदर्भात रेश्मा आणि सत्यमला व्यवस्थित समजावले. ईशान्य आणि आग्नेय दिशेत असलेले toilet कसे विपरीत परिणाम देत आहेत आणि पुढे काय परिणाम होतील हे सांगितले. दोघांना माझे म्हणणे पटले. परंतु त्यानंतर त्यांचा फोनही नाही की भेटही नाही. 

ह्या त्यांच्या भेटीला दोन- तीन महिने उलटून गेले. मी ही विसरून गेले. आठवण तेंव्हा झाली जेंव्हा रेश्माचा मला फोन आला. मी म्हटले," काय चाललय ?" 
 रेश्मा,"गेल्या वेळेस तुम्ही वास्तूबद्दल समजावले होते तर त्याच संदर्भात बोलायचे आहे."  म्हटलं,"बोला." "काही नाही वास्तूने पुन्हां एकदा प्रत्यय दिला. ५- ६ दिवसांपूर्वी घराची साफ- सफाई करायला घेतली होती. दिवाळी जवळ येतेय ना. पंखा साफ करत होते स्टुलावर चढून. तोल जाऊन पडले आणि हात सध्या गळ्यात आहे. वैताग आलाय हॉस्पिटलच्या वा-या कधी संपणार. ऐन दिवाळीच्या तोंडावर हात मोडून बसलेय. मुलांचा आणि सत्यमचा तर हिरमोड झाला आहे. तुम्हीच सांगा काय करायचे."  
मी रेश्माला म्हटले," जे करायचे आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेय आता तुम्हीच ठरावा."  
रेश्मा," हो ते आहेच लक्षात म्हणूनच call केलाय. पण सत्यमचा वास्तू वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. त्या दिवशी तो तुमच्या समोर काही म्हणाला नाही पण …………… "

मी समजले. रेश्माला सांगितले," ठीक आहे तुम्हाला वास्तूचे उपाय नसतील करायचे तर निदान वास्तू बदला. दुसरी वास्तू घ्या आणि तिथे किमान दिशा काटकोनात नसतील हे नक्की तपासून घ्या."

त्यानंतर तिचा फोन आलेला नाही. आता ते नवीन वास्तूत राहायला गेले किंवा नाही हे माहीत नाही. दिवाळी नंतर आज सहा - सात महिने झालेत परंतु त्यांची काही माहिती नाही. जर वास्तू बदलली असेल तर अत्यंत उत्तम नाहीतर हा सिलसिला कायमच राहणार. 

सत्यमसारखे काही वाचक असतीलही ज्यांचाही ह्या गोष्टींवर विश्वास नसेल. कदाचित हे ही म्हटले जाईल रेश्माने स्वतःची काळजी घेतली तर हे प्रसंग उद्भभवणारच नाहीत. पण एखाद्या वास्तूत राहायला गेल्यानंतर लागोलाग इतक्या वेळेस हॉस्पिटलच्या वा-या झाल्या ???? वास्तूत येण्याच्या आधी रेश्माला किंवा इतर मंडळींना असा त्रास का नाही झाला ??? प्रत्येक एक - दोन महिन्याच्या अंतराने घरातील कोणीतरी आजारी आहे किंवा अपघात झालाय ??  हा निव्वळ योगायोग ???? मला तसे वाटत नाही. जर सत्यमने ही वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञाला विचारले असते तर एवढा मानसिक आणि आर्थिक त्रास झाला नसता. 

म्हणूनच नवीन वास्तू घेण्याआधीच वास्तूतज्ञांची भेट घ्या, चर्चा करा. वास्तू नंतर Rectify करण्यापेक्षा आधीच काळजी घ्यावी. आणि हो वास्तूतज्ञ निवडतानाही काळजी घेणे.    

कशी वाटली ही case ??? जर अशा अजून काही Cases तुम्हाला वाचायच्या असतील तर मला जरूर कळवा : anupriyadesai@gmail.com 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १० मे, २०१३

वास्तू तथास्तु

वास्तू तथास्तु 

गेल्या महिन्यात मानेंकडे वास्तुपरीक्षणासाठी गेले होते. बैठकीच्या खोलीचे परीक्षण झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकघराकडे वळणार तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि साठे काकूंनी घरात प्रवेश केला."हे कोण आले आहेत ? हे काय ते काय ??" ही विचारणा सुरूच होती त्यांची. शेवटी न राहवून माने काकूंनी त्यांना सांगितले, "ह्या वास्तू परीक्षणासाठी आल्या आहेत". "अच्छा म्हणजे ते वास्तुबिस्तु बघतात ते का ?… आम्हाला नाही हो विश्वास ह्यावर. माणसाने कसे स्वतःवर विश्वास ठेवून चालावे म्हणजे सगळे व्यवस्थित असते. हे असे वास्तू बघून का कधी प्रगती होते? उगीच आपले पैसे उकळायचे." - इति सौ. साठे. त्या त्यांच्याच धुंधीत माने काकुंना  सांगत होत्या आणि त्यांना कल्पनाच नव्हती मी त्यांच्या मागेच उभी आहे. मला पाहिल्यावर बाहेर पळाल्या.

हा माझा अनुभव इथलाच नाही तर नेहेमी मला हे अनुभवाला येते की लोक ह्या शास्त्राला खूप दुषणे देतात. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र हे सगळे बकवास आहे. असे काही नसते. लोकांची Psychology वापरून हे लोक स्वतःचे Bank Balance वाढवतात,लोकांची फसवणूक करतात. एवढेच बोलून हे लोक थांबत नाहीत तर त्याही पुढे कोणाचेतरी उदाहरण देतात…अरॆ त्या अमुकच्या घरी "वास्तुवाले" आले होते … घरात सगळ्या गोष्टींची जागा बदलली,तोडफोड केली,Pyramids ठेवले तरी त्याला काही फायदा झालाय का ??  मला राग येण्यापेक्षा ह्या आणि अशा लोकांची कीव येते. 'कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तर आपण त्यावर भाष्य करू नये' अशी एक नीती आहे. आजारी असल्येल्या व्यक्तीला जेंव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तेंव्हा त्या डॉक्टरचे औषध लागूच पडत नाही. बरयाच लोकांना असा अनुभव आला असेल. मग अश्यावेळी आपण काय करतो ?? डॉक्टर बदलतो की त्या Medical Science ला नावे ठेवतो ??????

विश्वासाचा आणि अविश्वासाचा प्रश्न नसून हे एक शास्त्र आहे आणि हे आपल्या ऋषीमुनीनी (जे काळाच्या बरेच पुढे होते ) लिहून ठेवलेले आहे. त्या शास्त्राचा आपल्याला फक्त फायदा घ्यायचा आहे. हे शास्त्र आहे तरी काय ?? खरेच खूप तोडफोड करावी लागते का ??  ह्याचा खरेच काही फायदा आहे का आणि असेल तर आम्हाला कसा फायदा होईल ?? खूप खर्चिक आहे का ?? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

वास्तू म्हणजे फार काही complicated नसून ज्या घरात आपण राहतो ती जागा व आजूबाजूचा परिसर/वातावरण. इंजिनिअर्स कुठलेही बांधकाम करताना पंचमहाभूतांचा विचार करतात. उदाहरणार्थ फ्लायओवर बांधतानाही वातावरणाचा विचार केला जातो. पाऊस,भूकंप, वादळ इ गोष्टी ध्यानात घेऊन बांधकाम केले जाते. मग ज्या घराची ओढ आपल्याला कायमच असते, ज्या घरातून आपल्याला नेहेमीच चांगल्या उर्जेची अपेक्षा असते, कामावरून घरी कधी एकदा पोहोचतोय असे वाटते त्या घराची, एकदा घरी गेल्यावर relax वाटते. मग ह्या घराची, घरातल्या वातावरणाचाही आपण विचार केला पाहिजे. 

काही घरांमध्ये खूप कोंदट वातावरण असते. तिथे गेल्यानंतर कोंडल्यासारखे कोंडल्यासारखे वाटते. कधी एकदा तिथून निघतोय असे वाटते. काही घरात इतके Friendly वातावरण असते कि तिथे कधीही जा तुमचे स्वागतच असते. वातावरण खेळीमेळीचे आणि घरातील व्यक्ती आपल्याशी इतक्या आपुलकीने वागतात कि आपण त्या घरातीलच आहोत असे वाटू लागते. इथे घर लहान-मोठे, गरीब- श्रीमंत मला अजिबात म्हण्याचे नाही. हे आनंदी वातावरण तुम्हाला एखाद्या चाळीतही अनुभवास येईल आणि गर्भश्रीमंत घरात कोंडल्यासारखे वाटू शकेल. घर म्हणजे चार भिंती आणि त्यातील व्यक्ती.घराचा परिणाम त्या व्यक्तींच्या स्वभावावर,आरोग्यावर तर होतच असतो परंतु घरातील व्यक्तींचाही परिणाम त्या वास्तूवर होत असतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे घरातील सर्वांनी हे वातावरण कसे आनंदी राहील ह्यासाठी प्रयत्नशील असावे असे माझे स्पष्ट मत आहे.

पंचमहाभूते म्हणजेच 'अग्नि,पृथ्वी,वायू,जल  आणि आकाश'  ही पंचमहाभूते जर दुषित झाली नसतील म्हणजेच घरातील त्यांच्या दिशांना काही हानी झालेली नसेल तर ही पंचमहाभूते आपल्याला Positive results देतील अथवा काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतील. ही तत्वे जर बिघडली तर घरातल्या व्यक्तींना त्रास होण्यास सुरवात होते. ही पंचमहाभूते खालीलप्रमाणे स्थित असतात.



१) अग्नितत्व -  पूर्व दिशेच्या आणि दक्षिण दिशेच्या मध्ये ही आग्नेय दिशा असते. अग्नीतत्वाचा संबंध आपल्या पचनशक्तीशी निगडीत आहे. पोटातला अग्नी बिघडला तर काय होईल ? पित्ताचा त्रास,अंगावर उष्णतेचे पुरळ/गांधी इ. स्वयंपाक घर आग्नेय दिशेत अपेक्षित आहे. म्हणजेच ह्या आग्नेय दिशेत जर काही दोष असेल जसे की ह्या दिशेत मोठा कट असणे, खिडकी असणे,दरवाजा असणे हा एक वास्तूदोष आहे. ह्याचा परिणाम म्हणजे घरातील स्त्रीला पोटाचे विकार किंवा गुडघ्याचा त्रास. पुरुषाला पाठीच्या कण्याचा त्रास असणे. 

२)  पृथ्वीतत्व - नैऋत्य  दिशा ही दक्षिण आणि पश्चिम ह्यांच्या मधली दिशा. तिजोरी किंवा दागिने/ पैसे ह्या दिशेत असावेत. ह्या दिशेत जड वस्तू जसे कपाट , साठवणीच्या वस्तू - धान्य इ. असेल तर ह्या दिशेतून येणारी Negative ऊर्जा आपण Control करू शकतो. ही दिशा कधीही मोकळी असू नये. ह्या दिशेत जर दोष असेल म्हणजेच ह्या दिशेत Toilets असणे, विहीर असणे, underground water tank,गच्ची  असणे  म्हणजे संकटाला आमंत्रण देणे. असे दोष जर असतील तर अचानक आर्थिक संकट,अपघात किंवा आत्महत्या इ. घटना घडतात. (दक्षिण ही यमाची दिशा संबोधीत आहे. यमाची दिशा म्हणजे negative energy / confidence कमी असणे.) ह्या दिशेतील दोष लवकरात लवकर दुरुस्त करणे. 

३) वायुतत्व - वायव्य दिशा. पश्चिम आणि उत्तर ह्या दोन दिशेतील ही दिशा. ह्या दिशेची देवता पवनदेव आहेत. ह्या दिशेत दोष म्हणजे दरवाजा असणे, टेरेस असणे,विहीर असणे. ह्या दिशेतील दोष घरातील व्यक्तींना मानसिक व शारीरिक पिडा दर्शवते. मानसिक चंचलता, घराबाहेर वारंवार रहाणे इ. वायुत्तत्वाचा आणि व्यवसायाचा घनिष्ठ संबंध आहे. ह्या दिशेत वस्तू ठेवल्यास त्यांची लवकर विक्री होण्यास मदत होते. 

४) जलतत्व -  ईशान्य दिशा ही पूर्व व उत्तर दिशेच्या मधली दिशा. ईश म्हणजे ईश्वर- ईश्वराची दिशा. ह्या दिशेकडून प्राणिक उर्जा मिळते. त्यामुळे ह्या दिशेत जास्तीत जास्त खिडक्या असणे, मोकळी असणे म्हणजेच अडगळ अजिबात असू नये आणि अवजड वस्तू असे नये  हे अपेक्षित आहे. ह्या दिशेत जर दोष असेल तर शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात. चांगला प्रवाह वाहण्यास अजून मदत व्हावी ह्यासाठी ह्या दिशेत देवघर,देवांच्या तसबिरी ह्यांची स्थापना करावी. अभ्यासासाठी व ध्यानासाठी उत्तम दिशा असे म्हटले गेले आहे. जर ह्या दिशेत कचरा,रद्दी इ. असेल खूप अवजड वस्तू ठेवल्या गेल्या असतील तर साहजिकच प्राणिक उर्जा मिळण्यास अडथळा निर्माण होतो. जलतत्व ह्या दिशेस असल्याने ह्या दिशेत Artificial Waterfall, पाण्याचा साठा असेल तर दुधात साखर. ह्या दिशेत सर्वात मोठा दोष म्हणजे इथे Toilets असणे. जर इथे Toilets असतील  तर ते तब्येतीच्या बाबतीत फार वाईट फळे मिळतात. (अशी एक वास्तू Case पुढील भागात मांडेन). ताबडतोब ह्या दोषाचे निवारण करावे. Toilets जर घराच्या दुसऱ्या जागी हलवता येणार नसतील तर त्यासाठी विनातोड्फोड उपाय आपल्या वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत. 

५) आकाशतत्व - आकाश म्हणजेच घराचे ब्रम्ह्स्थान (मध्यभाग) जर तुम्हाला आठवत असेल तर आधी गावच्या घरी घराचा मध्यभाग मोकळा ठेवून तिथे तुळशीवृंदावन असायचे. अजूनही कर्नाटक किंवा दक्षिण भारतात घराचा मध्यभाग मोकळा असून तिथे तुळशीवृंदावन असते. आणि त्या मोकळ्या जागेवर कधी कौलेही घातली जायची नाही.


संपूर्ण घराला कौले करणारे आपले पूर्वज घराचा मध्यभाग का बरे मोकळा आणि कौलाविना ठेवत असतील ?? असा कधी विचार केला आहे ?? आपल्या पूर्वजांना ह्याची संपूर्ण कल्पना होती कि सर्व तत्वांप्रमाणेच आकाशतत्वाची ही आपल्याला तितकीच गरज आहे. आकाशतत्व म्हणजेच ब्रम्हस्थान, वास्तुपुरुषाचा पोटाचा भाग. जर ह्या भागात अवजड वस्तू/अडगळ, भिंत, toilets इ  असेल तर हा महादोष आहे. ह्या दोषाचा परिणाम म्हणजे पोटाचे अत्यंत भयंकर विकार- आतड्यांचा त्रास, हार्निया,गर्भपात इ. त्यामुळे हा भाग मोकळाच असला पाहिजे. 

आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम आताच्या बांधकामात कसे काय बसणार ?? सध्या घर पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसे घर मिळतानाच मुश्कील आहे त्यात हे सगळे नियम बघून घर म्हणजे तर झालेच…. आपले वास्तुशास्त्र इतके सक्षम आहे की काही साधे उपाय केल्यानेही(तोडफोडीशिवाय) घरातील दोष नष्ट होऊन घरात सकारात्मक उर्जा प्रवाहित तर होईलच आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य,आयुष्य उत्तम राहून प्रगती साधता येईल. काही उपाय तर मी वर नमूद केलेच आहेत जसे ईशान्य दिशेत अडगळ नको, नैऋत्य दिशेत कपाट- दाग-दागिने,पैसे वगैरे. जसे डॉक्टरांकडून औषध घेतले म्हणजे चमत्काराप्रमाणे रोग लगेच बरा होत नाही आणि पथ्यपाणी सांभाळल्याने रोग बरा होतो त्याप्रमाणे वास्तुदोष निवारण झाल्यानंतर सुद्धा वास्तूततज्ञाने सांगितलेल्या इतरही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 


लक्षात ठेवा : १. वास्तू नेहेमी तथास्तु म्हणते.
२. त्यामुळे वास्तूत नकारात्मक गोष्टींची चर्चा,कटकट,सततचे वादविवाद टाळावेत. 
३. सकारात्मक संदेश देणारी चित्रे घरात लावावीत.  
४.मित्र मंडळी,नातेवाईक ह्यांच्या भेटीगाठी महिन्यातून एकदा तरी झाल्याच पाहिजेत. वास्तू हसत रहायला हवी. तुमची प्रसनत्ता तुमच्या वास्तूत प्रतिबिंबित होते. आणि नेहेमी हसणारी वास्तू आनंदी रहाते आणि आनंद देत राहते. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com




रविवार, ५ मे, २०१३

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे"

"सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" 

"अनुप्रिया मैन बहौत थक गयी हुं. अभी सहेन नही होता. लगता है अब Suicide कर लु." हे धक्कादायक उदगार निशाचे. मला पहिल्यांदाच भेटायला आली आणि हे असे बोलणे. "सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे" अशी म्हण मला रोज प्रत्ययाला येते. लोकांना Problems असतील कि अनुप्रिया आठवते जसा Problem संपतो लोक ज्योतिषाला साधा फोन करून सांगण्याची तसदीही घेत नाहीत. फार कमी लोक फोन करून सांगतात,  "तुम्ही सांगितलेले तसे झाले ". पण काही लोकांना एवढे एक वाक्य सांगायलाही वेळ उरत नाही. "गरज सरो आणि वैद्य मरो" 

ज्योतिषी किंवा कुठलाही Professional हा आजीवन विद्यार्थी असतो. एका कुंडलीवर खोल अभ्यास करणे आणि त्या अभ्यासावरून जातकाला अमुक ह्या तारखेला तुझे काम होईल,तू ह्या क्ष्रेत्रात नोकरी कर तुझा फायदा होईल, तू नोकरीपेक्षा Business चांगला करू शकशील,तुझे लग्न ह्या महिन्यात होईल, तुला बाळ होईल पण ही काळजी घे, नॉर्मल कि सीझर इ. हे सांगणे हे सोप्पे मुळीच नाही.  त्यामुळे एखादी घटना ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडली हे त्याला सांगणे हे अत्यंत जरुरी आहे. तेंव्हा ज्योतिषाने सांगितलेले भविष्य बरोबर आले किंवा चुकले हे त्याला सांगितले पाहिजे. 

बरे आता निशाच्या Case कडे वळूया. निशाचे गेल्याचवर्षी लग्न झाले. ती स्वतः सिंधी आणि लग्न भरतेश ह्या गुजराथी मुलाबरोबर. निशा स्वतः माटुंग्याला रहाणारी आणि नोकरी करायची भायखळ्याला पण लग्न करून आली डोंबिवलीला. सुरवातीला सगळे छान चालले होते. नंतर नंतर निशाला घर आणि ऑफिस जमेना. मग काय नवरयाचा चांगला चालणारा Business होताच. निशाने चांगली लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. घरी राहिल्यापासून निशाला  जास्तच त्रास होउ लागला. सासरकडची मंडळी जुन्या वळणाची,डोंबिवलीत पाणी न विजेचा लपंडाव, घरी सासू सतत तिच्या समोर बसून रहायची. निशा दुसरया समाजातली असल्याने आमच्या समजातल्या मुली किती वळणदार, कामसू ह्याचा पाढा रोज ऐकवला जाई. स्वयंपाक,धुणी कधी न केलेले आणि आता ते करावे लागतेय, घरी फोन करायचा झाला तरी निशाला फुरसत मिळायची नाही. आधीच नोकरी सोडलेली, कधी न केलेली कामे करावी लागत होती ,सासू येत जाता टोमणे मारायची,नवरा रात्री उशीरा आल्यानंतर तो तक्रार ऐकण्याच्या स्थितीत नसायचा, निशाचा कोंडमारा होऊ लागला. निशाने आत्महत्येचा विचार मैत्रिणीला सांगितला तेंव्हा निशाला तिच्या मैत्रिणीने माझा नंबर दिला. 
निशाची कुंडली 
निशाचे बोलणे ऐकता ऐकता तिची कुंडली अभ्यासत होते. (वैदिक पद्धतीने)(Married Life ) - :  १)वृषभ लग्न आणि वृषभ राशीची कुंडली. निशा दिसायलाही सुंदर वृषभ राशी सारखी. 
२)सप्तमात वृश्चिक राशीत बुध,रवि आणि नेपच्यून सारखे ग्रह. 
३)सप्तमाचा स्वामी मंगळ अष्टमात धनु राशीत. मागच्या जवळ जवळ सगळ्या लेखात आपण हे पहिलेच आहे की अष्टमाचा संबंध आला की अडथळे आलेच. इथे सप्तमाचा स्वामी अष्टमात आणि तो ही मंगळासारखा ग्रह. म्हणजे ती जे काही वैवाहिक जीवनाबद्दल सांगतेय ते खरे आहे. (ज्योतिषाने नेहेमीच जातकाने सांगीतल्येल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. जातक काही गोष्टी लपवू किंवा खोटेही सांगू शकतो.)

कृष्णमुर्ती पद्धतीने : १) सप्तमाचा सब लॉर्ड गुरु आणि तो ३, ८, ११ चा कार्येश. इथेही अष्टम स्थान आहेच. पण कोणताही ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो त्यामुळे गुरुचा नक्षत्र स्वामी पहावा लागेल. गुरु आहे शनिच्या नक्षत्रात आणि शनि ४, ९, १० चा कार्येश म्हणजे फार Negative नाही. कुरबुरी आहेत त्या सगळ्याच वैवाहिक जीवनात असतात. त्यामुळे निशाला व्यवस्थित समजावणे गरजेचे होते. त्याप्रमाणे तिला समजावताना तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला म्हणजे नोकरीत वेळ जाईल आणि काही काळासाठी ती घरापासून दूर राहील. तिचे म्हणणे आता लगेच नोकरी मिळेल ?  म्हटले हे योग आहेत का ते पाहू ? 

नोकरी(कृष्णमुर्ती पद्धतीने) :  सध्या निशाला गुरु महादशा चालू आहे. २०११ ते २०१४ शनि अंतर्दशा. शनि  ४, ९, १०  आणि शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ६,१, ६ चा कार्येश. निशा माझ्याकडे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आली होती. तेंव्हा तिच्या कुंडलीत चंद्र विदशा ३ मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आहे. चंद्र खालील प्रमाणे :
चंद्र १  ३  न.स्वा. चंद्र १  ३ सब गुरु ३, ८, ११ सब सब शनि ४, ९, १०  
म्हणजेच नोकरी एप्रिल -मे च्या दरम्यान मिळायलाच हवी. परंतु अष्टम स्थान विसरून चालणार नाही. नोकरीसाठी काळ अनुकूल असला तरी अष्टम स्थानामुळे काहीतरी तडजोड करावी लागते. म्हणजेच कदाचित कमी पगाराची नोकरी पदरात पडून घ्यावी लागेल. त्याप्रमाणे तिला सांगितले.  
आता नाईलाज को क्या इलाज? ह्या उक्तीप्रमाणे तिने ही ते मान्य केले. काही स्तोत्रे आणि उपाय तिला दिले. २४  एप्रिलला संध्याकाळी आनंदी स्वरात निशाचा फोन," अनुप्रिया मुझे Interview के लिये दो अलग अलग  कंपनीसे Call आया है. Thanx To You.  एक कंपनी मार्केटिंग related कामकाज है और दुसरी मेरेही बँकसे मुझे call आया है.लेकिन बँकमें Package कम मिल राहा है.  क्या करू ? बहोत Confusion  है."  म्हटल," ठीक आहे. मला अर्ध्या तासाने फोन कर". 

तिची कुंडली Marketing साठी कि बँकेच्या जॉबसाठी Suitable आहे ते पाहिले पाहिजे. marketing साठी द्वितीय स्थान, द्वितीयाचा सब लॉर्ड check करावा. वृषभ लग्न म्हणजेच द्वितीयात बुधाची मिथुन राशी. हे पाहिल्यावर marketing असे सांगावेसे वाटेल परंतु खोल अभ्यासल्यास बुध स्वतः मंगळाच्या वृश्चिक राशीत आणि शनीच्या नक्षत्रात. marketing ??? शक्यच नाही. षष्ठेश शुक्र तुळ राशीत (तुळ - वजाबाकी no marketing ) वजाबाकी ही बँकेतच होत असते रोज. शुक्र राहूच्या नक्षत्रात आणि राहू शनि बरोबर. (शनि - किचकट कामे,वेळ काढू कामे) . बँकेत तिचा Job लोन Department मध्ये असणार आणि तिथे तिला Documents Verificationचे काम. मग काय ? कळले का तिला कुठला Job Suggest  केला मी ???? 

Note : hmmmm बरोबर. मे  महिन्याच्या ६ तारखेपासून निशा तिच्याच बँकेत परंतु  घाटकोपरच्या Branch ला जाणार आहे.  आणि हो तिला सध्या कमी पगार मान्य करावा लागला. वरती आपण पहिलेच तिला तडजोड करावी लागेल. निशा अत्यंत खुश होती. आयुष्यातले खूप मोठे कोडे सुटल्यासारखा आनंद झाला होता तिला. ज्योतिषशास्त्राचा फायदा आत्महत्येचे विचार घेऊन आलेल्या निशाला अशा प्रकारे झाला. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

ऑपरेशन ??? छे मुळीच नाही.

ऑपरेशन ??? छे मुळीच नाही. 


रात्रीची जेवण झाली आणि शतपावली करण्यासाठी सोसायटीच्या Garden मध्ये जाण्यासाठी निघणार तेवढ्यात फोन आला.…. इतक्या रात्री कोणी फोन केला ?? असा विचार करतानाच फोन घेतला. समोरून सौ.जोग," अनुप्रिया अगं माझ्या भाच्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केलेय. संध्याकाळी खेळताना त्याचा पाय लचकला…. डॉक्टरकडे नेले तर त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. आत्ताच त्याचा  Report  "Pulmonary Embolism" असा आलाय आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितलेय. आम्हाला Tension आलेय ग. कारण खेळता खेळता जरासा पाय लचकला तर काय ऑपरेशनची गरज आहे का ?  तर जरा कुंडली बघून सांगतेस का ऑपरेशन करावे लागेल की नाही ?"  म्हटलं, "ठीक आहे बघून सांगते". 

[Pulmonary Embolism - In most cases, pulmonary embolism is caused by a blood clot in the leg that breaks loose and travels to the lungs.Pulmonary embolism is the sudden blockage of a major blood vessel (artery) in the lung, usually by a blood clot . In most cases, the clots are small and are not deadly, but they can damage the lungIf symptoms are severe and life-threatening, "clot-busting" drugs called thrombolytics may be used. These medicines can dissolve clots quickly, but they increase the risk of serious bleeding. Another option is surgery to remove the clot (embolectomy).]

मुळ कुंडलीपेक्षा प्रश्नकुंडली अचूक उत्तरे देते. त्यामुळे ज्या वेळेस सौ. जोग यांनी फोन केला होता त्यावेळची कुंडली मांडली. ती खालीलप्रमाणे, 

Ruling Planets : 

L - मंगळ  ५,१, ५, १२           न. स्वा.  केतू  ५,१, ५, १२ 

S - राहू  ११, ६, ७,११              न. स्वा.  गुरु  ६, २, ४ 

R - शुक्र ५, ६, ७, ११              न. स्वा.  शुक्र  ५, ६, ७, ११   

D - गुरु   ६,२,४                     न. स्वा.  चंद्र ११ 


  • षष्ठ स्थानाचा( रोग स्थान)    सब लॉर्ड  -  गुरु  ६,२,४             न. स्वा. ११ 
  • लाभ स्थानाचा (लाभ स्थान) सब लॉर्ड - शुक्र ५, ६, ७, ११          न. स्वा.  शुक्र  ५, ६, ७, ११   
षष्ठ स्थानावरून रोग,रोगाचे स्वरूप लक्षात येते. इथे षष्ठ स्थानाचा सब लॉर्ड गुरु आहे. गुरु हा ग्रह गाठीचा(Clots) कारक आहे. षष्ठ स्थानाशी गुरुचा संबंध आहे म्हणजेच शरीरात गाठ आहे. डॉक्टरांचे निदान बरोबर आहे. आता हे ऑपरेशन करावे लागेल की नाही हे बघू. 

 षष्ठ स्थान - गुरु  ६,२,४  गुरुचा  न. स्वा. ११  जर षष्ठ स्थानाचा अष्टमाशी संबंध असेल तर ऑपरेशन करावे लागते. वर रूलिंग मध्ये कुठेही कुठलाही ग्रह अष्टम स्थानाचा कार्येश नाही. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही. परंतु १२ स्थान (१२ वे स्थान - बंधन, Hospitalisation,घरापासून दूर इ.) दर्शवत असल्याने हॉस्पिटलमध्ये काही काळ राहावे लागेल इतकेच. पंचम(रोगमुक्ती) आणि लाभ (११ स्थान - लाभ स्थान ) स्थान वरती रुलिंग मध्ये आहेत त्यामुळे लवकरात लवकर रोगमुक्ती आहे ती ही ऑपरेशन शिवाय. 

मी सौ. जोगना तसे सांगितले. त्यांच्या आवाजातली काळजी कमी झाली. दोन दिवसांनी त्यांचा फोन आला, "डॉक्टरांनी ऑपरेशनची गरज नाही असे सांगितलेय आणि औषधांनी गाठ Dissolve होईल असे म्हणालेत त्यामुळे बरेचसे Tension कमी झालेय". मी," वा great. मग आता कसा आहे भाचा ?". "हॉस्पिटलमध्येच आहे अजून. डॉक्टर म्हणताहेत काही दिवस त्याला ठेवावे लागेल इथे." 

इतके अचूक Prediction कृष्णमुर्ती पद्धतीने देता येते. काय Case Interesting वाटली ना? 


रविवार, २१ एप्रिल, २०१३

परदेशगमन योग

परदेशगमन योग 


आजकाल चांगली नोकरी कधी मिळेल हा प्रश्न विचारला तर जातोच त्याचबरोबर नोकरीनिमित्ताने परदेशात रहायचे योग आहेत का माझ्या कुंडलीत ???? हा प्रश्न सर्रास विचारला जातो. 

दिनेश प्रसिध्द अशा IT कंपनीत नोकरीला आहे. मागच्या सहा वर्षापैकी ३ वर्षे तो अमेरिकेला राहिला आहे. त्यानंतर काही कौटुंबिक कारणामुळे त्याला भारतात परतावे लागले.  भारतात परतल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा त्याला अमेरिका ,तेथील राहणीमान याची आठवण येऊ लागली. बरयाचदा मी हे ऐकते आणि पाहिले आहे कि एकदा अमेरिकेला गेल्यावर तिथल्या राहणीमानाची लोकांना सवय होते. मग त्यांना भारतात करमेनासे होते. दिनेशलाही आता अमेरिकेचे वेध लागले होते परंतु गेल्यावेळेस तडकाफडकी भारतात निघून आल्याने वरिष्ठ त्यावर नाराज होते. आता करायचे काय ? जायचे तर अमेरिकेला आणि वरिष्ठ जाऊ देत नाहीत आणि त्यात त्याने जाऊ नये म्हणून इथले म्हणजे भारतातले काही Projects त्याला देण्यात आले. आता ही गुगली होती कारण एकदा हा Project हातात घेतला कि वर्षभर तरी त्याची रवानगी अमेरिकेला नाही आणि Project वर काम करणार नाही असे म्हणूनही चालणार नाही. कारण त्याने Ratings वर परिणाम झाला असता. मग आता ????? 

दिनेश अगदी बारीकसा चेहेरा करून मला विचारात होता …मी  कधी जाऊ शकेन ? मी इथे आता जास्त काळ नाही राहू शकत. काय सांगतेय माझी कुंडली?? कुंडलीवरून ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्नकुंडलीवरून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी प्रश्नकुंडली मांडली. 

तूळ लग्नाची कुंडली. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी :  जेंव्हा जातक मनापासून प्रश्न विचारतो तेंव्हा कुंडली तसे Reflect करते. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे जातकाने जरी काही प्रश्न स्पष्टपणे ज्योतिषाला नाही विचारले तरी चंद्र प्रश्नकुंडलीत व्यवस्थितपणे जातकाच्या मनाचे प्रतिबिंब दाखवतो. तर इथे तुळ लग्न. चंद्र स्वतः षष्ठ स्थानात (नोकरीचे स्थान ) चंद्राची कर्क राशी लाभ स्थानात. म्हणजेच नोकरीत त्याला अपेक्षित आहे त्याचा त्याला लाभ होणार आहे. खाली त्यादिवशीचे रूलिंग मांडतेय. रूलिंग म्हणजेच प्रश्न विचारल्येला दिवशीचे Dominating Planets. तर रूलिंगज़   खालीलप्रमाणे :

L  - शुक्र ८, १, ८          न. स्वा. चंद्र ५, १० 

S  - शनि १२, ४, ५      न.स्वा. मंगल १०, २, ७ 

R  - गुरु ७, ३, ६          न.स्वा. शुक्र ८, १, ८ 

D  - बुध  ५, ९, १२       न. स्वा. शनि १२, ४, ५ 

कुंडलीतील बारावे स्थान हे जन्मठिकाणापासून दूर जाण्याचे योग दर्शवतो. जर जातकाला भारताबाहेर जायचे आहे तर बारावे स्थान हे बलवान हवे. [फार ज्योतिषशास्त्राचे "किचकट" गणित इथे संपूर्णपणे उलगडत नाहीये कारण त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास नसलेल्यांचा Interest जाईल.]  इथे बुध १२ व्या स्थानाचा निर्देशक आहे आणि तो शनिच्या नक्षत्रात आहे. शनि सुद्धा १२व्या स्थानाचा निर्देशक. 

हा प्रश्न मला दिनेशने गेल्या एप्रिलमध्ये विचारला होता. येणारया दशा सप्टेंबर व ऑक्टोबर ह्या काळात अमेरिकेला दिनेश जाईल असे चित्र होते. आता हे दिनेशला सांगायचे म्हणजे पंचाईत कारण दिनेशला उद्याच जा असे Managerने म्हटले असते तरी त्याची तयारी होती. अशा व्यक्तीला सांगायचे अरे तुला पाच महिने तरी निदान थांबावे लागेल. शास्त्राचे नियम चुकत नाहीत. त्याला स्पष्टपणे सांगितले, "दिनेश तुला जरी घाई असली तरी नियतीने तुझे अमेरिकेला जाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान ठरवलेले आहे." चेहेरा हिरमुसलेला झाला पण इलाज नाही. "ठीक आहे बघू ", असे म्हणून दिनेश निघाला त्याला काही मंत्र व उपाय दिले. 

मे व जुन महिना दिनेश अथक प्रयत्न करत होता पण त्याला दाद मिळत नव्हती. तोपर्यंत त्याच्या managerने त्याची वरती तक्रार केली होती ती न जुमानता दिनेशचे प्रयत्न सुरूच राहिले. ह्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्याला अमेरिकेचा Project मिळाला आणि तोही जुलैच्या पहिल्या आठवड्यात. दिनेशचा आनंदाने मला फोन आला पण एक गडबड होती. आता Project तर मिळाला परंतु तोपर्यंत दिनेशचा Visa संपला. [शक्यतो ज्यांचा Visa  आहे त्याच व्यक्तीला Project दिला जातो परंतु इथे दिनेशने काही प्यादी वेगळ्या पद्धतीने हलवली होती.] आता Visaची वाट बघा. Visaसाठी दिनेशला मद्रासला जावे लागले तिथे सगळ्या तांत्रिकी गोष्टी झाल्या आणि काही दिवसातच Visa मिळेल म्हणून सांगण्यात आले. सप्टेंबर उजाडला. दिनेशला धाकधूक होती. सप्टेंबर आला तसा गेला आणि दिनेशचा Patience संपला. कारण Project Manager चा सतत फोन येत होता. 

ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला दिनेशशी  माझे बोलणे झाले त्याला म्हटले जरा थांब. सांगितलेली उपासना सुरूच ठेव. ऑक्टोबर गेला नाहीये. त्याला कसला धीर,"ताई ही संधी गेली तर माझे Rating खूप कमी होईल. इथे मला त्रास देतील तो वेगळाच कारण इतके महिने इथल्या कुठल्याही Project ला मी हात लावलेला नाही." मी जास्त काही म्हणाले नाही कदाचित काळ उत्तर देईल. आठ ऑक्टोबर उजाडला आणि सकाळी सकाळी मला दिनेशचा फोन आला ती खुशखबर देण्यासाठी. त्याला Visa ही मिळाला आणि १४ ऑक्टोबरचे तिकीटही मिळाले. खूप खुश होता दिनेश आकाश ठेंगणे झाले होते त्याला त्यादिवशी. 

नेहेमीप्रमाणे शास्त्राने आपले काम चोख बजावले. मी संपूर्णपणे नतमस्तक आहे आणि तुम्ही ????
 कळवा मला इथे नक्की  : anupriyadesai@gmail.com 

NOTE : Ruling मध्ये शनि आहे. जरी तो १२ स्थानाचा कार्येश होतोय तरी शनिचे नैसर्गिक गुणधर्म "विलंब करणे" हा आहे त्यामुळे दिनेशला Visa मिळण्यास विलंब झाला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD