बुधवार, २५ जून, २०१४

VAASTU TIPS- वास्तूची निवड कशी करावी ?

VAASTU TIPS- वास्तूची निवड कशी करावी ? भाग - १ 

वास्तू वरील लेखानंतर मला बरीच वाचकांची ई-पत्र आली. त्यात बहुतांश वाचकांनी वास्तू विषयक टिप्स देऊ शकाल का ? ह्या बद्दल विचारणा केली आहे. वास्तुविषयक टिप्स देण्या अगोदर आपण ज्या वास्तूत राहणार आहोत ती वास्तू असावी कशी ? इथून मी सुरवात करते. 
१) वास्तूची दिशा : ह्याबाबत सल्ला देतांना सर्वप्रथम मी हे सुचित करेन कि तुमची वास्तू ही शक्यतो दिशांना समांतर असावी. वास्तू विदिशा असू नये.विदिशा वास्तू म्हणजे हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, सुदिशा आणि विदिशा वास्तू खालीलप्रमाणे : 

सुदिशा वास्तू (वास्तू अशी असावी ) 


विदिशा वास्तू ( वास्तू  अशी असू नये)

मी मागील बरयाच लेखात उल्लेख केलेला आहे कि वास्तू विदिशा असू नये. विदिशा ह्याचा अर्थ दिशाहीन वास्तू. दिशाहीन ह्याकरिता म्हटले आहे कारण कोणतीही दिशा वास्तूला समांतर न येता काटकोनात येतात. अशी वास्तू तुम्हाला सकारात्मक उर्जा देण्यास असमर्थ ठरते. मुंबईतील नव्याने झालेल्या बांधकामांमध्ये ९५% वास्तू ह्या विदिशा प्रकारात मोडतात. ( ह्या साठी उपाय आहेत )

२) घराचे मुख्य प्रवेशद्वार :  सर्वसाधारण असा समज आहे कि प्रवेशद्वार पूर्व अथवा पश्चिम दिशेत असावे. दक्षिणेचा प्रवेश चांगला नाही. परंतु शास्त्रात खालील प्रमाणे प्रवेशद्वाराची रचना असावी असे नमूद केले आहे. खालील चित्रात जिथे हिरव्या रंगाने निर्देशित केले गेले आहे तिथे प्रवेशद्वार असावे आणि जिथे गुलाबी रंगाने निर्देशित केले आहे तिथून प्रवेश निषिद्ध मानले गेले आहे. ह्यावरून लक्षात येते कि दक्षिणेचा मुख्य प्रवेश नेहेमीच वाईट नाही परंतु तो नियमाप्रमाणे असावा. 

घराचे मुख्य प्रवेशद्वार कुठे असावे 
३) घरातील खिडक्या :  वास्तूतील जास्तीत जास्त खिडक्या मुख्यत्वे पूर्व आणि उत्तर दिशेत असतील तर ही वास्तू तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. हल्ली घराला खूप मोठ्या खिडक्यांची रचना असते. उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त प्रकाश आणि हवा घरात खेळती रहावी. परंतु वास्तू शास्त्राप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम दिशेत कमीत कमी खिडक्या असाव्यात किंबहुना असूच नयेत. ह्याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपले संपूर्ण शास्त्र हे चंद्र आणि सूर्य ह्यांच्या भ्रमणावर आधारीत आहे. सूर्य पूर्व दिशेस उगवून पश्चिमेत मावळतो. सूर्याची सकाळ्ची कोवळी किरणे अत्यंत लाभदायक आहेत. परंतु सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंतची किरणे घरात प्रवेश करू नयेत अशी घराची रचना असावी असे शास्त्र  सांगते. ह्याला कारण म्हणजे सूर्याची UV किरणे सकाळी ११.०० ते ४.३० पर्यंत अत्यंत प्रखर असून आरोग्यासाठी घातक आहेत. आणि सूर्याचे भ्रमण दक्षिणायन असताना पूर्व-दक्षिण-पश्चिम असे असते. आणि ह्या दिशेत खिडक्या असतील तर संपूर्ण वेळ म्हणजेच ११.०० ते ४.३० ह्या वेळेतील सूर्याची(घातक)किरणे घरात येतात. ह्याच अनुभव मला माझ्या बरयाच वास्तू परीक्षणासाठी गेले असता आलेला आहे. ज्या ज्या वास्तूत पश्चिम आणि दक्षिण दिशेत जास्त खिडक्या अथवा French Windows आहेत किंवा दक्षिणेस मोठा व्हरांडा,गच्ची आहे त्या त्या घरात एकतरी Cancer पिडीत रुग्ण असण्याचे निर्दर्शनास आले आहे आणि त्याच बरोबरीने घरातील बाकीही सदस्यांना दर महिन्याला डॉक्टरांची भेट घ्यावीच लागते. त्यामुळे मोठ्या खिडक्या,गच्ची पूर्व व उत्तर दिशेत असावी आणि दक्षिण व पश्चिम दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. शक्यतो पश्चिमेस अथवा दक्षिणेस गच्ची असू नये.  ( असल्यास उपाय आहेत )

४) Toilets  आणि Bathroom :  घरात Toilets  आणि Bathroom कुठे असावेत ह्याबाबत खूपच संभ्रम आहे. Toilets  आणि Bathroom वास्तूच्या उत्तर आणि पूर्व दिशेत नसावेत. पूर्व आणि उत्तर दिशेत असलेल्या Toilets  आणि Bathroom मुळे शिक्षणात आणि अर्थार्जनात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे  Toilets  आणि Bathroom वास्तूच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेत असावेत. दक्षिण आणि पश्चिम दिशेतही त्यांची रचना विशिष्ट ठिकाणी असावी. 

वास्तू निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या संदर्भात काही टिप्स मी ह्या पहिल्या भागात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील मुद्यांमध्ये मी पूर्वेस,उत्तरेस Toilet असू नये असे नमूद केले आहे परंतु जर तुम्ही सध्या राहत असलेल्या वास्तूत जर ह्या दिशेत Toilets असतील तर शास्त्रामध्ये ह्यासाठी आणि बाकी वास्तूतील दोषांसाठी विना तोडफोड उपायही सूचित केले आहेत. त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. 
वास्तू हा विषयावर बोलावे,लिहावे हे कमीच त्यामुळे वाचकांनी मला वास्तूच्या कुठल्या टिप्स बद्दल मी विस्ताराने लिहावे ते जरूर कळवा. मी पुढील लेखात त्याबद्दल लिहिण्याचा विचार करेन. 

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची वाट पाहतेय.   

मंगळवार, १० जून, २०१४

Marriage Date Prediction or Marriage Astrology


Marriage Date Prediction/
Marriage Astrology 

नमस्कार. खूप दिवसांनी भेट होतेय आपली. गेल्या दोन महिन्यात जातकांची सतत रीघ सुरु होती त्यामुळे blog वर काही लिहिण्यास जमले नाही. ह्या दोन महिन्यात धनु लग्न आणि धनु राशीच्याच जातकांनी भविष्यकथनाच्या सल्ल्यासाठी माझी भेट घेतली. ह्याचे एक कारण म्हणजे मंगळ आणि शनि मार्च महिन्यात वक्री झाले दुसरे कारण म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करणारा शनि. वृश्चिकेत शनि २ नोव्हेंबरला प्रवेश करणार म्हणजेच तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला साडेसाती असणार आहे. जरी धनु राशीला नोव्हेंबर महिन्यात साडेसाती सुरु होणार आहे तरीसुद्धा त्याचे परिणाम फेब्रुवारी २०१४ पासूनच दिसू लागलेत. वक्री शनि,मंगळ आणि सुरु होणारी साडेसाती ह्यांचा एकत्रित परिणाम धनु राशीवर दिसू लागला आहे. माझ्याकडे गेल्या दोन महिन्यात आलेल्या जातकांपैकी ९८% जातक हे धनु लग्न आणि धनु राशीचे होते. कोणाला नोकरीत त्रास होतोय,कोणाच्या घरी अचानक आजारपण वाढले आहे. काही जातकांना मंगळ आणि शनि वक्रीचा परिणाम इतका जबरदस्त मिळालेला आहे  की त्यांच्या कुटुंबात वाद,कलह होणे रोजच्या Routine सारखे झाले आहे. काही जातकांनी तर कौटुंबिक वादविवादामुळे आत्महत्याच करावीशी वाटतेय हे मला स्पष्ट सांगितले आहे. त्या सर्वांशीच फार जपून Counseling करावे लागतेय. असो तर आजचा मुळ मुद्दा असा आहे की कुंडलीत लग्नाचे योग कधी ? सर्व Bachelors चा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा.  

साधारणपणे २०१३ च्या एप्रिल - मे महिन्यात मला निकिताचा फोन आला. ती माझ्या ब्लॉगची नियमित वाचक आहे. तिच्या बहिणीच्या म्हणजेच तनुश्रीच्या लग्नासंदर्भात तिने मला फोन केला होता. म्हणजे तनुश्रीचे लग्न कधी होईल ? ह्या संदर्भात तिला मार्गदर्शन हवे होते. त्याप्रमाणे आमचे discussion झाले पण तिचे समाधान झाले नाही. जलतत्वाच्या ज्या राशी आहेत त्यातल्या कर्क आणि मीन ह्या राशींचे तेच तेच पालुपद सुरु असते आणि त्यांचे समाधान लवकर होत नाही असे माझे Observation आहे. मग त्यानंतर  ५-६ दिवसांनी पुन्हा निकिताचा फोन. पुन्हा तेच. मग शेवटी तनुश्रीने माझी भेट घेण्याचे ठरवले आणि आमची भेट १३-०६-२०१3 दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी झाली. (ह्या भेटीची वेळ आणि तारीख सांगण्याचे प्रयोजन मी लेखात पुढे स्पष्ट केले आहे.) त्यावेळेस तनुश्रीने लग्नापेक्षाही Career,Job, Promotional Exams ह्यावर जास्त भर दिला. तिची कुंडली खालील प्रमाणे :

तनुश्रीची कुंडली 

अतिशय समंजस आणि साधी अशी तनुश्री. बोलण्यात लाघवी. आम्ही तिच्या Career Horoscope,Finance Horoscope,Property Horoscope इ. अशा सर्व बाजूने discussion केले. आणि मग  तिचा प्रश्न आला माझे लग्न कधी होईल ? लग्न कधी होईल ह्यासाठी मी खालील प्रमाणे कुंडलीचे विवेचन केले. 

मकर लग्न आणि तुळ रास. लग्नेश आहे शनि. लग्नाचा सब लॉर्ड आहे शनि आणि तो आहे लाभात. शनि स्वनक्षत्री आहे आणि मंगळाच्या उप नक्षत्रात आहे. पुन्हा मंगळ आहे लाभात तो ही शनि बरोबरच. म्हणजेच ह्या जातकाला आयुष्यात सर्व गोष्टी मिळतील परंतु संघर्षाने आणि विलंबाने. त्यामुळे लग्नासंदर्भातही हा नियम लागू होतो. लग्नासंदर्भात नियम लागू होतो ह्याचा अर्थ लग्न जमण्यापासून ते लग्न होईपर्यंत अत्यंत कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. ह्याचे उत्तर तनुश्रीनेच दिले. माझ्याकडे येण्याआधी तिचे लग्न सतिशशी ठरले होते.लग्नाचा hall,पत्रिका,दागिने सर्व तयारी झालेली असतांना त्याने अगदी ऐनवेळेस नकार दिला. (शनि - संघर्ष ). 
तनुश्री ज्यावेळेस माझ्याकडे आली तेंव्हा तिला गुरु महादशा आणि केतू अंतर्दशा सुरु होती. गुरु खालीलप्रमाणे कार्येश :

गुरु -  १/ ३, १२    
न. स्वा. मंगळ - १०/ ४, ११      
उप न. स्वा. बुध  १/ ६, ९   
उप-उप न. स्वा.  चंद्र ९, ७ 

कुंडलीत लग्नयोग आहेत किंवा नाही ह्यासाठी सप्तमाचा उप. नक्षत्र स्वामी २,७, ११ पैकी चा कार्येश हवा. महादशा स्वामीही २, ७, ११ ह्या स्थानांचा कार्येश असावा. तनुश्रीच्या कुंडलीत सप्तमाचा सब लॉर्ड गुरूच आहे. गुरुचे कार्येशत्व वर नमूद केले आहेच. महादशाही गुरुचीच सुरु आहे. गुरु २, ७, ११ पैकी ११ चा कार्येश आहे.म्हणजेच लग्नाचे योग आहेत. आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्न कधी ? ह्या वेळेस मी शासक ग्रह म्हणजेच Ruling Planets ची मदत घेतली. Ruling Planets ना जादूची कांडी का म्हणतात ते ह्या उदाहरणावरून कळेल. ( हा सर्व प्रपंच एवढ्याकरिता की मला ज्योतिषी आणि नवीन ज्योतिष-अभ्यासकांचीही पत्र येतात. त्यानांही अभ्यासासाठी हे उदाहरण उत्कृष्ट ठरेल. ) शासक ग्रह खालीलप्रमाणे :

L  -   शुक्र 
S  -   बुध 
R  -   चंद्र 
S  -   गुरु 
शासक ग्रहांपैकी गुरु सोडला तर बाकी ग्रह हे Fast Moving Planets आहेत आणि ह्यापैकी कुठलाही ग्रह शनिच्या नक्षत्रात नाही. म्हणजेच लग्नाचे योग फार लांबणार नाहीत. शासक ग्रहांपैकी गुरुची महादशा सुरु आहे. तनुश्री माझ्याकडे आली तेंव्हा तिच्या मूळ कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती. केतू रुलिंग मध्ये नाही त्यामुळे केतूचा विचार करता येणार नाही. केतू नंतर येईल शुक्र अंतर्दशा. शुक्र रुलिंग मध्ये आहे. शुक्राची अंतर्दशा जुलै २०१३ ते मार्च २०१६ पर्यंत आहे. शुक्र खालील प्रमाणे कार्येश :

शुक्र  १ / ५, १०  न. स्वा. चंद्र ९, ७  

शुक्रानंतर रुलिंग मध्ये आहे चंद्र आणि बुध त्यापैकी शुक्र अंतर्दशेत चंद्राची अंतर्दशा बुधाच्या आधी येते.शुक्र अंतर्दशेत चंद्राची विदशा आहे जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१४ पर्यंत आहे.चंद्र खालील प्रमाणे कार्येश :

चंद्र  ९ , ७    न. स्व. मंगळ  १०, ४, ११ 

अजून खोलात अभ्यासायचे असेल तर रुलिंग मध्ये असलेला बुध बाकी राहतो. चंद्राच्या विदशेत बुधाच्या प्राण दशेचा कालावधी ६ मार्च २०१४ ते २७ मार्च २०१४ इतका येतो. बुध खालीलप्रमाणे कार्येश :

बुध  १, ६, ९   न. स्व.  चंद्र  ९, ७ 

म्हणजेच तनुश्रीचे लग्न २०१४ मार्चच्या १६ ते २७ तारखेच्या दरम्यान होईल. परंतु तनुश्रीला तारीख न सांगता फक्त एवढेच सांगितले की लग्न नोव्हेंबर नंतर ठरेल आणि लग्न सोहळा मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान होईल. तनुश्रीला त्याचे tension नव्हतेच. ती खूप खुश झाली कि अजून ८-९ महिने लग्नाला आहेत. 

त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मला तिच्या बहिणीचा म्हणजेच निकिताचा फोन आला. "अनुप्रिया अजून काहीच हालचाल नाही. तुमचा ब्लॉग मी नियमित वाचते. एकाचे लग्न तुम्ही जुलै-ऑगस्ट २००८ मध्ये होईल असे सांगितले होते आणि त्याचे लग्न जुलै  २००८ मध्येच झाले आहे. तसेच तुम्ही तनुश्रीचेही सांगा ना."  मी जे तनुश्रीला सांगितले होते तेच पुन्हा निकिताला सांगितले. त्यांनतर बरेच महिने आमचे बोलणे झाले नाही परंतु नोव्हेंबरच्या दरम्यान Facebook वर तनुश्रीने मला लग्न ठरल्याचे सांगितले. साखरपुडा डिसेंबरला होणार आहे आणि मग लग्नाची तारीख ठरेल असे कळवले. त्यांनतर फेब्रुवारीच्या महिन्यात तिने मला तिची लग्नाची तारीख  २२ मार्च  ठरली आहे हे सांगितले. तिला अभिनंदन केले आणि मनोमन K. S. KRISHNAMURTY  आणि त्यांनी संशोधित केलेल्या कृष्णमुर्ती पद्धतीला दंडवत घातला. लग्नाच्या तारखेपर्यंतचे भविष्यकथन शासक ग्रहांमुळे अचूक करता येते.  ( ठरल्याप्रमाणे तनुश्री लग्नाच्या बेडीत २२ मार्च २०१४ ला अडकली. )


प्रतिक्रियांची वाट पहातेय.  ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

Cesarean Birth अर्थात - मुहूर्त Baby

Cesarean Birth अर्थात - मुहूर्त Baby

सिझरिअन डिलिवरी सध्या खूपच सामान्य आणि प्रचलित झालेला शब्द. सध्या दहापैकी आठ मुलांचा जन्म सिझरिअन डिलिवरीने होत आहे. सध्याचे धावपळीचे जनजीवन,खाण्यापिण्याच्या बदलेल्या पद्धती आणि बदलेल्या वेळा व त्यामुळे होणारे शारिरीक/मानसिक बदल. ह्या शारीरिक/मानसिक बदलाची परिणीती म्हणजे गर्भधारणेतील अडथळे,गरोदरपणातील अडचणी आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस होणारे Complications. हे सगळे सांगण्याचा प्रपंच ह्यासाठी कारण परवा पल्लवीचा फोन होता. सध्या मैडम गरोदर आहेत आणि सात महिने उलटले आहेत. डॉक्टरांनी सिझरिअन डिलिवरी करण्याचा सल्ला दिला आहे. पण हे सगळे सांगण्याच्या आधी तिचा प्रश्न होता,"परीघ योग वाईट असतो का ?" ह्या तिच्या प्रश्नाचा मला काहीच संदर्भ लागला नाही. कुठल्या गोष्टीसंदर्भात हा प्रश्न आहे ? हे विचारल्यावर तिचे उत्तर," मला डॉक्टरांनी सिझरिअन डिलिवरीचा सल्ला दिला आहे. त्यांनी जून महिन्याची तारीख ठरवून ठेवायला सांगितली आहे. तिने स्वतःहूनच १० जून तारीख नक्की केली आहे. तो दिवस बाकी चांगला आहे( ? ) असा तिचा (गैर)समज परंतु त्या दिवशी परीघ योग आहे. म्हणून तिने मला फोन करून हे विचारण्याचा प्रपंच ?"

पल्लवीप्रमाणे बरयाच लोकांचा असा समज आहे की दिनदर्शिकेत दिवस कुठला आहे ??(काहींच्या दृष्टीने गुरुवार अत्यंत शुभ आणि शनिवार अत्यंत अशुभ वार आहेत. जो चुकीचा समज आहे.) हे पाहिले की झाले काम. त्यादिवशी मग सोईप्रमाणे कधीही बाळाचा जन्म झाला की जमले सगळे. इतके का ते सोप्पे आहे ? ह्यावरून एक गोष्ट आठवली २०१२ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मला काही जातकांनी त्यांच्या होणारया बाळासाठी सिझरिअन मुहूर्तासाठी विचारणा केली होती. ९०% जातकांनी १२-१२-१२ ही तारीख आधीच निश्चित केली होती. कारण काय तर म्हणे,"खूप छान वाटतं ना १२-१२-१२." सर्वांना मी ती तारीख मुहूर्त म्हणून चांगली नाही हे व्यवस्थित समजावले. त्यादिवशी अमावास्या योग आहे,गुरु वक्री आहे,वृश्चिकेचा बुध आहे ( आदरणीय व. दा. भट ह्यांचे वृश्चिकेचा बुध हा ग्रंथ नक्की वाचवा म्हणजे त्याचे काय परिणाम असतात हे वाचकांच्या लक्षात येईल ) त्यामुळे आंधळेपणाने वागू नका. 

 माझे असे मत आहे कि डॉक्टरांनी जर काही कारणास्तव सिझरिअन डिलिवरीचाच निर्णय घेतला असेल तर दिवसाबरोबरच वेळही तितकीच महत्वाची आहे. पल्लवीने दहा जुन तारीख नक्की केली आहे. परंतु त्यादिवशी चंद्र शनिच्या युतीत आहे. म्हणजेच जन्मतः बाळाला साडेसाती सुरु होईल. चंद्राबरोबर राहू सुद्धा आहे. युती जरी नसली तरी चंद्राबरोबर राहू किंवा केतू असणे बौद्धिक प्रगतीच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. बुद्धीचा कारक ग्रह बुध हा सुद्धा त्यादिवशी वक्री अवस्थेत आहे. म्हणजेच एकंदरीत ह्या दिवशी जन्म घेणारया बाळाची बौद्धिक क्षमता यतातथाच असू शकेल आणि जन्मतः असणारी साडेसाती, बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही फारशी चांगली नाही. म्हणूनच फक्त दिवस चांगला आहे असा तुमचा समज असेल तर तो त्वरीत Rectify करा.

दिवस कसा आहे हे त्यादिवशी चंद्र कुठल्या राशीत कुठल्या नक्षत्रात आहेत ? त्यादिवशी तिथी कुठली आहे ? कुठला योग आहे ? ह्यावरून ठरतो. काही नक्षत्र ही शक्यतो टाळलेलीच बरी. योगांमध्ये अतिगंड योग,वैधृति योग, व्यतिपात योग,व्याघात योग इ. टाळावेत. 

दिवस नक्की केल्यानंतर बाळाच्या जन्माची शुभ वेळ सुनिश्चित करणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. संपूर्ण दिवसात १४४० मिनिटांचा काळ आहे. ह्या १४४० मिनिटांमधून सर्वात चांगली वेळ बाळाच्या जन्मासाठी सुनिश्चित करणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. भविष्य वर्तवताना काही मिनिटांचा जरी फरक असेल तर वर्तवलेले भविष्य चुकण्याची शक्यता असते. माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश लोकांनी दिलेली जन्म वेळ ही चुकीची असते. म्हणजे उदारणार्थ सांगतांना जातक सांगतो माझी जन्म वेळ दुपारी ३.२० आहे. ह्या जातकाचा जन्म होताना जर घडयाळात वेळ ३.१८ असेल आणि डॉक्टरांनी सांगतांना ३.२० सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मनुष्य स्वभाव आहे की ३.२०, ३.२५ अशीच वेळ सांगितली जाते. आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस डॉक्टरांचे घड्याळाकडे लक्ष असणे आपण गृहीत धरू शकत नाही. म्हणूच जेंव्हा जातक माझ्याकडे कुंडली विवेचानासाठी येतो तेंव्हा त्याची जन्मवेळ शुद्धी करावी लागते जेणे करून भविष्य अचूक वर्तवता येते. 

जेंव्हा स्त्रीला ती गरोदर आहे हे समजते त्यावेळेस लागलीच तिने Gynecologist डॉक्टरांची भेट घेणे उचित ठरते. कारण सोनोग्रफीमुळे बाळाची गर्भाशयातच वाढ होतेय ना ह्याची खात्री करून घ्यावी कारण काही वेळेस बाळाची वाढ गर्भाशयात न होता Fallopian Tube मध्ये होत असते. ( ह्या संदर्भातील एका case ची लिंक वाचकांसाठी - http://astroanupriya.blogspot.in/2013_03_01_archive.html ) गर्भाशयाची स्थिती व्यवस्थित आहे कि नाही ? बाळाची व्यवस्थित वाढ होतेय कि नाही ? साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी बाळाच्या हृदयाचे ठोके समजू शकतात.ह्या सर्व चाचण्या करण्यात आळस अजिबात करू नये. हे सांगण्याचे कारण असे कि बरीचशी जोडपी काही गरज नाही म्हणून टाळाटाळ करतात आणि मग अगदी शेवटच्या क्षणी धावपळ होते.


एका रात्री दहा वाजता एका जातकाच्या पत्निला ( जी नऊ महिन्यांची गरोदर होती ) हॉस्पिटलमध्ये तपासणीकरिता नेले असता डॉक्टरांनी emergency मध्ये सिझरिअन करावे लागेल असे सांगितले. जातकाने मला फोन केला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. एवढ्या emergency मध्ये काय मुहूर्त काढणार ? तरी सुद्धा ज्यावेळेस जातकाने फोन केला होता त्यावेळेस मीन लग्न १५ अंशावर होते आणि चंद्र कर्क राशीत होता. मीन लग्न आणि कर्क रास म्हणजे जल तत्वाचा आणि द्विस्वभाव तत्वाचा अतिरेक. अशा योगावर जन्म घेणारे बाळ अत्यंत भावूक असते,अशा व्यक्तीची निर्णयक्षमता क्षीण असते आणि जगाशी स्पर्धा करण्यासाठी ह्यांना स्वतःला स्वतःशी खूप झगडावे लागते. त्यामुळे मीन लग्न शक्यतो टाळावे. मीन लग्नानंतर मेष लग्न सव्वा बारा वाजता सुरु होत होते. मी जातकाला रात्री बारा दहा ते सव्वा बाराच्या दरम्यान बाळाच्या जन्माचा मुहूर्त काढून दिला. अर्थात हा मुहूर्त देताना मात्र त्याला मी त्याला बजावले होते कि आता वाजताहेत साडे अकरा म्हणजेच सव्वा बाराला अजून पाऊण तास वेळ आहे. ह्या वेळेत जर डॉक्टरांनी बाळाच्या आणि आईच्या हितासाठी इतका वेळ थांबू शकत नाही असे सांगितले तर मात्र मुहूर्त लक्षात घेऊ नये. बाळाच्या आणि आईच्या जिवापेक्षा बाकी काही महत्वाचे नाही. त्यामुळे डॉक्टरांची परवानगी घेऊनच हा निर्णय घ्यावा. बाळाचा जन्म ठरल्येल्या मुहूर्तावर झाला. बाळ आता दोन वर्षाचे असून अत्यंत गुटगुटीत आणि गोड आहे.त्याच्याबरोबरीच्या मुलांपेक्षा Active आहे,ग्रहणशक्ती,स्मरणशक्ती उत्तम आहे आणि त्याहीपेक्षा मेष लग्नावर जन्म झाल्यामुळे मीन लग्नासारखे खूपच भावूक नाही आणि मेष लग्नासारखे प्रयत्नवादी दिसते.

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. पुढच्या वीस वर्षात अजून काय बदल होणार आहेत त्याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे माझे तरी मत असे आहे कि बाळाची जन्म वेळ निश्चित करताना पुढील वीस वर्षात होणाऱ्या बदलाचा विचार करतांनाच खालील गोष्टींचीही  काळजी घ्यावी -
१) शक्यतो स्थिर लग्न असावे. म्हणजे व्यक्ती स्थिर मनाची असेल आणि निर्णयक्षमता चांगली लाभेल. 
२) बाळाच्या आरोग्याला सर्व प्रथम प्राधान्य द्यावे. आरोग्यकारक योग कुंडलीत असावेत.  
३) बौद्धिक/शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने बुध आणि गुरु हे सुस्थितीत असावेत. किमान हे ग्रह वक्री/स्तंभी असू नयेत. 
४) आर्थिक दृष्टया कुंडलीत योग चांगले असावेत. 
५) चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे चंद्र कुंडलीत सुस्थितीत असावा.
६) चंद्राच्या युतीत/योगात पापग्रह नसावेत.
७) चंद्रावर पाप ग्रहांची दृष्टी नसावी.
८) षष्ठ,अष्टम आणि व्यय स्थानात पापग्रहांची युती असु नये.
९) कृष्णमुर्ती पद्धतीने लग्नाचा सब लॉर्ड ६,८,१२ चा शक्यतो निर्देशक होऊ नये. इ.


म्हणजेच पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्हीही पद्धतीने होणारया बाळासाठी शुभ योग जुळवून आणता येतील तेवढे उत्तम. पण वाचकांनी हे लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टी तेंव्हाच जमू शकतील जेंव्हा ज्योतिषाला साधारणपणे एक ते दोन आठवड्याचा तरी वेळ हा मुहूर्त ठरवण्यासाठी मिळू शकेल. काही वेळेस गरोदरपणाच्या सातव्या महिन्यातच केलेल्या सोनोग्राफीत डॉक्टर बाळाच्या गर्भात असलेल्या स्थितीवरून बाळ Natural Birth ने की Cesarean Birth ने जन्म घेणार ह्याची कल्पना देतात त्यामुळे तेवढा वेळ ज्योतिषाला मिळतो आणि नऊ महिने पुर्ण झाल्यानंतरचा शुभ दिवस आणि शुभ वेळ मुहूर्त म्हणून सुनिश्चित करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस अगदी शेवटच्या क्षणी समजते कि आता दोन दिवसात किंवा अगदी चार- पाच तासांचाच कालावधी उपलब्ध आहे. त्या दोन दिवसांपैकी किंवा चार तासांपैकी सर्वात चांगला दिवस किंवा चांगली वेळ निवडण्याची संधीच मिळू शकते.  II शुभं भवतु II 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

गुरुवार, १३ मार्च, २०१४

वास्तूतील दिशा आणि धनलाभ

 वास्तूतील दिशा आणि धनलाभ

विलास आणि अमृता ह्यांचा अचानक धनप्राप्तीचा मार्ग हा बंद झाला. म्हणजे त्याचे झाले असे की विलास आधी जिमचा मालकही होता आणि Instructor ही. अमृताही नोकरी करत होती. विलासचे गेल्या दोन वर्षापासून पाठीचे दुखणे इतके वाढले होते कि त्याला जिम मध्ये काम करता येईना. डॉक्टरांनी स्लीप डिस्कचे निदान केले. त्यामुळे नाईलाजाने  ऑक्टोबर २०१३ ला विलासने जिम दुसऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन केली. त्याचकाळात काही कारणांमुळे अमृताला नोकरी सोडावी लागली. नवीन घराचे हफ्ते,विलासचा औषधांचा खर्च,घरचा इतर खर्च आणि पैशांची आवक एकदम बंद. दोन-तीन महिन्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने अमृताच्या मैत्रिणीने तिला मला भेटण्याचा सल्ला दिला. 

त्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही जोडी मला भेटण्यास आली होती. सुरवातच तक्रारीने झाली. अमृताचा प्रश्न होता आर्थिक स्थैर्य कधी येईल ? तिचे म्हणणे असे कि ह्या वास्तूत राहायला आल्यापासून प्रोब्लेम्स सुरु झालेत. जेंव्हा अचानक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला आर्थिक अस्थैर्य येतं तेंव्हा वास्तूच्या नैऋत्य स्थानात नक्कीच गडबड असते. जर नैऋत्य दिशेत Cut असेल किंवा त्या दिशेत Toilets असतील तर त्या दिशेतील negative energy कर्त्या पुरुषाला नक्कीच प्रभावीत करते आणि त्याचा परिणाम म्हणजे नोकरी अचानक सुटणे,व्यवसायात नुकसान होणे,घरात आर्थिक चणचण भासणे. म्हणून मी विलासला विचारले तुमच्या वास्तूच्या दक्षिण- पश्चिम दिशेत Cut आहे का ? त्या दिशेत Toilets आहेत का ? पण प्रत्येक जातकाप्रमाणे त्याचे उत्तर,"कल्पना नाही मैडम. तुम्ही स्वतः ह्या गोष्टींचा पडताळा केलात तर बरे". मी म्हटलं,"ठीक आहे". मग वास्तूपरिक्षणाचा दिवस ठरला. 

वास्तू परिक्षण झाल्यानंतर निघालेले निष्कर्ष खालीलप्रमाणे : 

विलासची वास्तू 

१) वास्तूला नैऋत्य( South West direction ) दिशेत मोठा Cut आहे. त्याच दिशेत Toilets आहेत. ह्या दोन्ही गोष्टी त्या दोघांच्या लक्षात आणून दिल्या. आणि toilets नुसतेच नैऋत्य दिशेत नसून संपूर्ण वास्तूच्या ब्रम्हस्थानात आहेत. मागच्या बरयाच लेखात मी हे निर्देशनास आणून दिले आहे कि ब्रम्ह्स्थान जर दूषित असेल तर पुरुषांना पाठीच्या कण्याचा त्रास/हृदय विकार/स्त्रियांना गर्भाशयाचा त्रास होतोच. इथेही तो परिणाम मिळालेला आहे. 

२) वास्तूच्या कोपरयात मुख्य दिशा येत आहेत. म्हणजेच कुठलीही दिशा हे वास्तूच्या समोर नसून कोपरयात आहे. अशा वास्तूला "विदिशा वास्तू" म्हणजेच दिशाहीन वास्तू समजले जाते. अशी वास्तू स्वतःच्या/कुटुंबाच्या प्रगतीसाठी अजिबात अनुकुल ठरत नाही. 

३) मी विलासला म्हणाले," तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार आग्नेय दिशेत आहे. आग्नेय दिशेत जर दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर स्त्रियांना गुडघ्यांचा त्रास होतोच.घरात कुठल्या स्त्रिला (घरात एकूण दोन स्त्रियांचे राज्य - अमृता आणि अमृताच्या सासूबाई) गुडघ्यांचा त्रास आहे ?" अमृताचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले. दोघेही एकमेकांकडे आणि नंतर माझ्याकडे बघू लागले. मी म्हटले,"काय झाले ?" त्यावर अमृताचे उत्तर,"अहो गेल्या दोन वर्षापासून मला गुडघे दुखीचा त्रास होतोय आणि ह्या दिवाळीच्या आधी तो इतका वाढला कि मी प्रवास करून नोकरीला जाणे अशक्यच झाले. त्यामुळे नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. सध्या तो त्रास इतका वाढला आहे कि डॉक्टर म्हणालेत गुडघ्यांमध्ये "Gap" वाढली आहे आणि कदाचित ऑपरेशन करावे लागेल. (आग्नेय दिशेत Cut - गुडघ्यांचा त्रास )
४) आता ह्या सर्व गोष्टी बदलता येणे तर शक्य नाही त्यामुळे पुढे काय ? हा प्रश्न अमृताकडून (अपेक्षित)आला. मी म्हटले," इथे दोन्ही कडून समस्या आहेत अमृता. एक तर पैशांची आवक पूर्णपणे ठप्प आणि आहेत ते पैसे आजारपणात खर्च होत आहेत. हे बघ कुठलीही वास्तू संपूर्णपणे वाईट नसतेच. ह्या वास्तूत सर्वात चांगली आणि धनप्राप्तीसाठी उपयुक्त असलेली दिशा म्हणजेच उत्तर आणि ईशान्य दिशा. आणि तुमच्या वास्तूत असलेल्या सर्व मोठ्या खिडक्या ह्याच दिशेत आहेत. ह्याचा आपण नक्कीच उपयोग करून घेऊ." 

लोकांची साधारण अशी प्रवृत्ती असते की आहे खिडकी तर ठेव अडगळ तिथे. ठेवा रद्दी,वापरात नसलेल्या चप्पला, पुन्हा कधी वापरात न येणारयाही वस्तू. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अमृताचे घरही त्याला अपवाद नव्हते. त्यांनी सर्व अडगळीच्या वस्तू, वापरात नसलेले Fish Tank,रद्दी, चप्पला इ. तिथे ठेवलेले होते. अमृताला तत्काळ तिथली रद्दी,अडगळीच्या वस्तू भंगार मध्ये काढून टाकण्यास सांगितले. चप्पल ठेवण्याची दिशाही ठरवून दिली. 

५) जातकाच्या तब्येतीचा आणि त्याच्या वास्तूचा जसा संबंध आहे तसाच जातक वास्तूमध्ये कुठल्या दिशेत जास्त काळ व्यतीत करतो त्यालाही महत्व आहे. म्हणून मी विलासच्या वास्तूतील आवडत्या जागेबद्दल विचारल्यावर दोघानांही हसू फुटले. अमृता म्हणाली विलासची एक स्पेशल खुर्ची आहे. त्या खुर्चीत तो कोणालाच बसू देत नाही. आम्ही मस्करीत त्या खुर्चीला "सिंहासन" म्हणतो. मी विचारलं,"आहे कुठे हे सिंहासन ?" मग अमृताने ती खुर्ची/जागा दाखवली. ( वर वास्तूच्या नकाशात ती जागा निर्देशित केली आहे. )  ती जागा होती ब्रम्ह्स्थानातच आणि मुख्य म्हणजे toilet च्या भिंतीला लागुनच. तत्काळ मी विलासला जागा बदलण्यास सांगितले.(ब्रम्ह स्थानातात सतत बसल्याने वैचारीक चंचलता वाढते. ) विलासला त्याच्या तब्येतीच्या सुधारणेसाठी मी बैठकीच्या खोलीतील पूर्वोत्तर(ईशान्य ) दिशेतील खिडकीजवळ  जागा ठरवून दिली. 

६)विलासच्या औषधांची जागा ठरवून दिली ज्यामुळे औषधांचा त्वरित चांगला परिणाम मिळावा. 

७) नैऋत्य दिशेत जिथे cut आहे त्याच ठिकाणी स्वयंपाक खोलीला खिडकी आहे. म्हणजे त्यादिशेतील Negative उर्जा त्या खिडकीतून आत येत आहे . त्यासाठी अमृताला खिडकीत ठराविक झाडाचे छोटेसे रोप सध्या ठेवण्यास सांगितले जेणे करून येणारी negative  उर्जा संकुचित होईल. 

८) ह्याच बरोबरीने उत्तर दिशेत काही ठराविक वस्तू ठेवण्यास सांगितल्या ज्यामुळे पैसे येण्याचा मार्ग सुकर होईल. त्याचबरोबरीने दोघानांही दररोज प्राणायाम,दीर्घ श्वसनाच्या क्रिया,(डॉक्टरांकडून Confirm करुन मगच  विलास आणि अमृताला श्वसनाच्या क्रिया करण्यास सांगितल्या) वाचनात श्री सूक्त  ७ वेळेस, गायत्री मंत्राचा जप आणि इतरही उपाय लिहून दिले. 

त्यानंतर साधारण आठ दिवसांनी अमृताचा फोन आला. अत्यंत खुश होती ती. ह्या आठ दिवसात उत्तर दिशेतील अडगळ काढून टाकण्यात आली होती. विलासची जागा बदलली गेली. स्वयंपाक खोलीच्या खिडकीत सुचविलेले रोप कुंडीत ठेवले गेले. सुचवलेली स्तोत्र/जप आणि बाकी उपायही सुरूच होते. आणि अमृताच्या भाषेत,"मैडम आम्हांला एका ठिकाणाहून काही लाखांचं येण बाकी होत आणि कालच त्यांच्याकडून ते सर्व पैसे मिळाले. घरी आधी जशी मरगळ वाटायची ते अजिबात नाहीये उलट आता खूपच फ्रेश वाटतं आणि अचानक झालेली ही धनप्राप्ती सध्या खूप मोठा आधार आहे. घराचे हफ्ते फेडण्यापेक्षा आम्ही बैंकेचं कर्जच फेडून  आलो. म्हणजे दर महिन्याचं टेन्शनही कमी. आता फक्त आमच्या दोघांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची वाट बघतोय."  मी म्हणाले,"होईल होईल त्यातही लवकरच सुधारणा होईल. आपले बाकीचे उपाय आपण करून घेतलेत कि तीही सुधारणा दिसेल". 

Note  :इथे ब्रम्हस्थान दुषित असल्याने त्या जागी रत्नाध्याय सुचविण्यात आला होता. ह्या रत्नाध्यायात काही ठराविक मंत्रोक्त रत्ने ठराविक मुहूर्तावर वास्तूच्या ब्रम्ह स्थानात प्रस्थापित करण्याचा सल्लाही दिला होता. (तब्येतीसाठी) हा उपाय येत्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर तब्येतीची सुधारणा अपेक्षित आहे. 

त्याचप्रमाणे अमृताच्या तब्येतीसाठी बाकी उपायांबरोबरच वास्तूतील आग्नेय दिशेत असलेल्या मुख्याद्वारासाठी ठराविक धातूची मंत्रोक्त पट्टी प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे येत्या महिन्यात तो ही  उपाय विलास करून घेणार आहे. त्यांनतर तिच्याही तब्येतीत सुधारणा दिसू लागेल. 

Very Important :  जसे डॉक्टर रुग्णाला बरे होण्यासाठी औषधांबरोबर थोडा व्यायाम,जेवणाची पथ्ये देतात आणि त्यानंतर त्या रुग्णात सुधारणा दिसू लागते त्याचप्रमाणे नुसतेच वास्तूला औषधे न देता,त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींनाही पथ्ये पाळावी लागतात तरच गुण येतो. 

मंगळवार, ४ मार्च, २०१४

Missing Person - तो परत येईल का ??

Missing Person -  तो परत  येईल का ??

मार्चच्या पहिल्या तारखेला सकाळी ८.३३वाजता ज्योतीचा फोन. एवढ्या सकाळी फोन केला म्हणजे नक्कीच अत्यंत गंभीर प्रश्न असणार. ज्योतीचा प्रश्न तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याबाबत होता. "मैडम माझ्या मैत्रिणीचा नवरा शेखर जो software Engg आहे तो काल संध्याकाळपासून घरीच आलेला नाही. म्हणजे सकाळी नेहेमीप्रमाणे कामावर गेला आणि निघतांना संध्याकाळी त्याचा फोन सुद्धा आला होता कि ऑफिस मधून निघतोय म्हणून. पण नंतर रात्री उशीरापर्यंत तो घरीच आला नाही. आता तर त्याचा फोनही लागत नाहीये. सहसा कामावरून तो लगेच घरीच येतो आणि खूप साधा मुलगा आहे. घरी अत्यंत काळजीचे वातावरण झालेय."  मी म्हटले," ठीक आहे तुला कळवते थोड्या वेळेत". 

दिवसाचा पहिलाच प्रश्न असल्याने प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरवले :

प्रश्न विचारला तेंव्हाची कुंडली आणि शासक ग्रह खालील प्रमाणे : 


प्रश्न कुंडली 

शासक ग्रह :  

L  - गुरु(वक्री) ४, १, १०   न. स्वा.-  राहू ७, ३, ८ 
S  - राहू ७, ३, ८            न. स्वा. - राहू ७, ३, ८ 
R  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु(वक्री) ४, १, १० 
D  - शनि ८, ११, १२       न. स्वा. - गुरु ४, १, १० 

हरवल्येल्या अथवा परागंदा झालेल्या व्यक्तींबद्दल काही जाणून घ्यायचे झाल्यास प्रश्न कुंडली अत्यंत उपयुक्त ठरते. सर्वात आधी मनात प्रश्न येतो तो हा कि,


 ही व्यक्ती सुखरूप आहे का ?(जिवंत आहे ना ?) 
ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास नियम असा आहे की लग्नाचा सब लॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती हयात असते. शेखरच्या case मध्ये लग्नाचा सब लॉर्ड गुरु आहे आणि तो शासक ग्रहांमध्ये आहे. त्यामुळे शेखरच्या मृत्यूची शक्यता नाहीच. परंतु  लग्नेश गुरु स्वतः वक्री आहे. लग्नेश जर वक्री असेल तर व्यक्तीला काही इजा झाली असण्याची शक्यता असते.      कुंडलीतील चंद्र हरवल्येल्या व्यक्तीबद्दल माहिती देतो.चंद्रावर गुरुची दृष्टी आहे. (म्हणजेच शेखर Safe आहे.) कुंडलीत चंद्र व्यय स्थानात कुंभ राशीत रविच्या युतीत आहे. चंद्र व्ययात असेल तर व्यक्ती हॉस्पिटल/जेल किंवा बंधनात असणे - Kidnapping असू शकेल. चंद्र जर पापग्रहांबरोबर असेल तर व्यक्तीला कोणीतरी डांबून ठेवले असण्याची अथवा गुंडांच्या तावडीत सापडली असण्याची शक्यता असते. 

व्यक्ती कुठे आहे ?

पुढचा येणारा प्रश्न म्हणजे जर व्यक्ती जिवंत आहे तर ती आहे कुठे ? त्यासाठी नियम असा आहे कि चंद्र जर स्थिर राशीत असेल तर व्यक्ती एका जागी असते. जर चंद्र चर राशीत असेल तर व्यक्ती प्रवासात असते. इथे चंद्र कुंभ राशीत म्हणजेच स्थिर राशीत आहे. ह्याचाच अर्थ शेखर एकाच ठिकाणी आहे आणि प्रवासात नाही. चंद्र जर केंद्र स्थानात असेल तर व्यक्ती राहत्या शहराच्या आसपासच असते परंतु ह्या कुंडलीत चंद्र केंद्रात नाही  म्हणजेच शेखर स्वतःच्या घरापासून बराच लांब असण्याची शक्यता आहे. 

हरवल्येल्या व्यक्ती बरोबर कोण आहे का ?

ह्या प्रश्नासाठी चंद्राबरोबर असणारे ग्रह तपासावेत. इथे चंद्राबरोबर रवि सारखा "पापग्रह" आहे (युतीत आहे.) चंद्र रवि बरोबरीनेच नेपच्यून बरोबर सुद्धा युतीत आहे. (काही ज्योतिषी हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो सारख्या ग्रहांचा विचार करत नाहीत परंतु ह्या Case मध्ये मी आवर्जून ह्याचा अभ्यास अंतर्भूत केला) ह्याचाच अर्थ व्यक्ती बरोबर कोणी पुरुष व्यक्ती (रवि) आणि नेपच्यून (नेपच्यून हा बेशुद्धाअवस्थेत नेणारा ग्रह आहे ) असल्या कारणाने शेखरला भूल दिली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

व्यक्ती परत केंव्हा येईल ?

शासक ग्रहांमध्ये दोनदा शनि आणि एकदा गुरु जे Slow Moving Planets असल्याने शेखर आजच्या आजच घरी येईल असे वाटत नाही. 

शासक ग्रहांनुसार गुरु ग्रह चतुर्थाचा कार्येश असला तरी बाकी शनि आणि राहू अष्टम,व्यय आणि सप्तम स्थानाचे कार्येश आहेत. त्यामुळे व्यक्ती घरी जरी आली तरी व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरूपाची इजा झाली असण्याची शक्यता नाही Guarantee आहे

तेंव्हा एकूण विचार करता मी ज्योतीला उत्तर दिले कि, 

१) शेखर कुठेतरी अडकला असण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूपाने त्याला इजा झालेली असावी. तो घरी नक्की परतेल परंतु माझे शास्त्र असे सांगते कि काहीतरी गोष्ट शेखरने लपवली असावी आणि त्याचाच परिणाम आज त्याला मिळतोय जसे कि, कोणाकडून उधार घेतले असावेत आणि ते परत दिले नसतील व म्हणूनच अशा व्यक्तींकडून त्याला मारहाण वगैरे झाली असावी. 

२) शेखर जरी परत आला तरी धडधाकट परत येईल ह्याची शाश्वती नाही. तेंव्हा सांभाळून. 

३) चंद्र व्ययात असल्याने मी पोलिस चौकीत रीतसर तक्रार नोंदवून हॉस्पिटलमध्ये वगैरे तपासण्यास सांगितले. 

४) शेखरला घरी परतायला वेळ लागेल म्हणजेच आजच परत येईल असे नाही असे तिला सांगितले. (शासक ग्रहांमध्ये गुरु एकदा तर शनि दोनदा आलेला आहे. Slow Moving Planets ) 

५) कुंडलीत अष्टमात असल्येल्या मंगळ व राहू ह्यांची युती आणि शनिमुळे आणि व्ययात असल्येल्या रवि चंद्र नेपच्यून युती ह्यामुळे प्रकरण बरेच गंभीर असलेले दिसतेय तेंव्हा शेखरच्या पत्नीला काही उपाय करण्यास दिले. 

त्याच दिवशी साडे चार वाजता ज्योतीचा फोन आला. "मैडम तुम्ही सांगितले तसेच झाले ……… ".  पुढे तिने दिलेल्या माहितीनुसार,  

१) दिलेले सर्व उपाय शेखरच्या पत्नीने केले. 
२) शेखर दुपारी सव्वा तीन आणि साडे तीनच्या सुमारास घरी परत आला. (कर्क लग्नावर ) 
३) घरात आल्या आल्याच तो खाली कोसळला. त्याला कोणीतरी गंभीररित्या मारहाण केलेली दिसत होती. तो अजिबात शुद्धीत नव्हता. त्याच्या पाकिटातील पैसे,कार्डस सर्व गायब होते. (कार्डस वापरून सर्व पैसे काढण्यात आले होते हे मागाहून पोलीस तपासणीत कळले)
४) त्याला ताबडतोब हॉस्पिटलला भरती करण्यात आले. पोलीस आणि घरच्यांनी वारंवार विचारल्यानंतरही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शेखरने दिले नाही. किंबहुना आल्यापासून तो बोलतच नाहीये आणि नुसताच शून्यात पहात राहतो असे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला नेमके काय झाले आहे ते येत्या काही काळात कळेल अशी अशा आहे. 

पुढे जी काही माहिती मिळेल ती ज्योती मला कळवेलच.

Note : ज्योतीने पहिल्यांदा फोन केला तेंव्हा व्ययात अमावास्या योग होत आहे. ही अमावास्या त्यादिवशी शेखरच्या मूळ कुंडलीत सप्तम स्थानात होत होती. सप्तम स्थान हे मारक स्थान मानले जाते.  इथे मी वर्तवल्येल्या सर्व गोष्टींपैकी शेखर त्याच दिवशी परत येणार नाही हे एकच माझे वर्तवलेले भविष्य चुकले.  

  प्रश्न कुंडली आणि शासक ग्रहांनी स्पष्टपणे किंबहुना ठळकपणे घडल्येल्या घटनेचे स्वरूप दर्शविले आणि शेखर परत येईल ह्याची शाश्वती दिली. ह्या शास्त्राचे आणि शास्त्राचा सातत्याने अभ्यास करून संशोधन करणाऱ्या ज्योतिषांचे आभार मानावे तितके कमीच. त्या सर्वांनाच माझे कोटी कोटी प्रणाम.  

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

वास्तू प्रश्न

वास्तू प्रश्न 

नमस्कार 

वास्तूवर लेख लिहिल्यानंतर बरयाच जणांनी ई-पत्राद्वारे वास्तू संदर्भात त्यांचे शंका निरसन करून घेतले. इतक्या लोकांची पत्रे मिळाल्यानंतर खूप आनंदही झाला आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या वास्तूशास्त्राबद्दलच्या उत्सुकत्तेबद्दल खूप कौतुकही वाटले. त्यापैकी सर्वांपैकी लक्षात राहील असा प्रश्न आहे सामीधाचा. गेल्या आठवड्यात लिहिलेल्या वास्तूशास्त्रावरील लेखाबाबत समीधाचा प्रश्न असा होता :

   समीधा, "माझ्या घरातच मंदीर आहे. माझ्या सासूबाइंची श्रीकृष्णावर अपर भक्ती होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त होती. परंतु आम्हां कुटुंबियांना मंदीर व कृष्णाचा नेहेमीच आधार वाटतो आणि आशीर्वादाचा नेहेमीच प्रत्यय  येतो. मग मंदीर घरसमोर असणे हे शास्त्रीय दृष्टया चुकीचे असतांना आम्हांस मात्र असा कधीच अनुभव आलेला नाही. ह्यामागील नक्की शास्त्रीय कारण काय आहे हे सांगू शकाल का ?" 

त्यावर माझे उत्तर असे आहे :

खूप छान प्रश्न विचारला आहे. तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. शास्त्रात 

असे म्हटले गेले आहे कि जर तुमच्या घराच्या समोर मंदिर असेल आणि 

त्याचा कळस तुमच्या दारासमोर किंवा खिडकीसमोरच असेल तर 

त्याच्या उर्जेमुळे घरातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्रास का होऊ 

शकतो? तर त्याचे कारण असे कि त्याची पवित्रता इतकी असते कि 

आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्याचे तेज सहन होऊ शकत नाही.
ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळी "संध्या" करणे किंवा सूर्याला 

अर्ध्या देणे हे अनिवार्य होते. संध्या करताना किंवा सूर्याला अर्ध्य देताना 

कंबरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहून संध्या करावी लागते. ह्याचे कारण 

म्हणजे जेंव्हा सूर्याची किरणे थेट तुमच्या हृदयाच्या चक्रांपर्यंत(Heart 

Chakra) पोहोचतात तेंव्हा शरीरात अत्यंत उष्णता निर्माण होते. त्या 

उष्णतेचा प्रतिकूल फळ न मिळता उष्णता शमवण्यासाठी व्यक्तीला 

पाण्यात उभे राहून अर्ध्या द्यावे लागते. 
 

सामान्य व्यक्तीमध्ये ते(कळसातले) तेज/ओज/उर्जा सामावून घेण्याची 

कुवत कमी असते.ज्यांना सिद्धी प्राप्त असते त्यांच्यात ही उर्जा/तेज 

सामावून घेण्याची शक्ती असते.
 तुमच्या सासूबाईंना सिद्धी प्राप्त होती असे तुम्ही लिहिले आहे. ज्यांना 

सिद्धी प्राप्त होते त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांचा उत्कर्ष होतो अशी 

मान्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातच असलेले मंदिर हे तुमच्यासाठी 

नेहेमीच हितावह ठरेल परंतु घरातील सर्वांनीच अध्यात्माची ही 

मिळालेली संजीवनी सांभाळून ठेवणे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
      

रविवार, २६ जानेवारी, २०१४

वास्तू - समज-गैरसमज

वास्तू -  समज-गैरसमज 


नमस्कार,
मधला बराच काळ ब्लॉगवर काही लिहिता आले नाही. दिवसभर जातकांची रीघ,वास्तू visits आणि घरची जवाबदारी ह्यामुळे वेळच मिळत नव्हता. येणारे सगळे जातक सध्या ब्लोगवर नवीन काही लिहिले का नाही म्हणून विचारीत होते. आज योग साधला आहे. मागच्या दोन महिन्यात वास्तू-संदर्भात मला बरयाच ठिकाणी जाण्याचा योग आला. वास्तू संदर्भात मला जेंव्हा जातकांचे फोन येतात तेंव्हा जातकांना बरयाच गोष्टींबाबत संभ्रम असतात. तर त्यातल्या काही गोष्टींबद्दलचे समाज आणि गैरसमज आज मी इथे मांडणार आहे. 

घराचे मुख्य दार - अनुकूल दिशा 

दक्षिण दिशेस दरवाजा : 

घर निवडतांना बरेचजण पूर्व-पश्चिम दार असलेल्या घरालाच प्राधान्य देतांना आढळतात. दक्षिण दिशेस दार असल्येल्या घरांना कोणी वाली नाही. ठाण्यात जेंव्हा एका ठिकाणी मी वास्तू परीक्षणेसाठी गेले असता त्या tower (१५ मजली tower ) मधील दक्षिण दिशेला मुख्य दार असलेले एकही घर विकले गेले नव्हते. 
हा असलेला समज अंशतः चुकीचा आहे. जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी,तिचा स्वभाव वेगळा तसेच प्रत्येक वास्तू वेगळी आणि त्याची उर्जा वेगळी. प्रत्येक व्यक्तीसाठी एखादी वास्तू,त्या वास्तूची उर्जा इतकी अनुकूल ठरते कि त्याच घरात त्या व्यक्तीची किंबहुना त्या कुटुंबाची भरभराट होते. किंवा मग काही वेळेस लोक अशी तक्रार करतात मी तर घर पूर्व -पश्चिम दरवाजा पाहूनच निवडले होते मग माझी अधोगती का झाली ?  हे वास्तू वगैरेचे मग तुमचे नियम इथे खोटे ठरतात. अशा वेळेस खरे तर मला त्यांची कीव येते. Crocin हे औषध जरी तापासाठी असले तरी प्रत्येक तापासाठी औषध वेगळे असते कारण रोगाची लक्षणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती,त्या व्यक्तीच्या व्यवसायाप्रमाणे आणि त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तू, वास्तूचे मुख्य दार कुठे असणे अनुकूल ? हे ठरवणे महत्वाचे आहे. तेंव्हा दक्षिण दिशेचा दरवाजा नेहेमीच वाईट नाही. 

दिशेचा गोंधळ : 

हा प्रश्न तर बरयाच जणांना Confuse करतो. अगदी कालची गोष्ट, वेदिकाला तिच्या नवीन घराच्या निवडीसाठी माझी मदत हवी होती. बोरिवलीत एकाच Tower मधली दोन घरे तिने पसंत केली होती परंतु मुख्य दाराच्या दिशेचा गोंधळ होता. एका घराचे मुख्य दार दक्षिण दिशेस तर दुसरया घराचे उत्तरेला. आणि गोंधळ वाढवायला तिचे वास्तू संदर्भातले ज्ञान. वास्तू वरील बरीच पुस्तके,वर्तमान पत्रात येणारी संपूर्ण (?) माहिती ह्यामुळे दक्षिणेस दार म्हणजे वाईट एवढे पक्के अनुमान तिचे झाले होते. त्यामुळे दक्षिण दिशेला असल्येल्या घरास तिची एवढी पसंती नव्हती. पण अभयला (वेदिकाचा नवरा) तेच घर आवडले असल्याने त्यांचा निर्णय होत नव्हता. बर वेदिकला मी विचारले तेंव्हा तिचा पहिला प्रश्न होता कि,"मी घराच्या आतून बाहेरच्या दिशेस पाहिले की उत्तर दिशा येते आणि घराच्या बाहेरून आत पहिले कि समोर दक्षिण दिशा येते. मग ह्याला दक्षिणेचा दरवाजा म्हण्याचा का ?"  हा प्रश्न मला असंख्य वेळेस विचारला जातो. साधा नियम असा आहे कि तुम्ही घराच्या आत आहात आणि दारासमोर बाहेरच्या बाजूस जी दिशा येते तीच मुख्य दाराची दिशा. 

घराच्या बाजूस असलेले स्मशान/कबरीस्तान : 

पूर्वीच्या काळात स्मशान हे गावाच्या बाहेर नदीकाठी असायचे. म्हणजे अगदी दूर,नजरेआड. परंतु सध्या मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात इतकी लोकसंख्या वाढली आहे कि बरेच towers स्मशानाच्या बाजूसच असतात. काही व्यक्तींना स्मशानाच्या आसपास आपले घर असणे खूप negative वाटू शकते आणि काहींना  त्यात काहीच तथ्य नसल्याचे मत असू शकते. स्मशानाच्या आसपास आपली वास्तू असू नये ह्याचे एकमेव शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे अंत्यविधीत व्यक्ती पंचतत्वात विलिन होत असते आणि त्यासाठी अग्नि संस्कार सूचित केलेला आहे. हा संस्कार जेंव्हा एखाद्या व्यक्तीवर स्मशानात केला जातो त्यामुळे होणारा धूर,प्रदुषण हे आसपासच्या वातावरणात पसरतो. सध्या तर बरेच असाध्य असे रोग असलेले लोक आसपास आपण पाहतो. जर अशा व्यक्तीला अंत्यसंस्कारच्या वेळेस दिलेल्या अग्नीमूळे हवेत पसरणारे प्रदूषण तुमच्या घरात येत असेल तर घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी कदाचित घातक ठरू शकेल. आणि ह्याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी स्माशान हे गावाबाहेर असण्याची सोय सांगितलेली आहे. एकवेळेस कबरीस्तान वास्तूच्या आसपास असणे चालू शकेल परंतु शक्यतो स्मशानाच्या आसपास वास्तू न घेतलेली बरी. आता किती Risk घायची ते तुम्ही ठरवा. 

घराच्या समोर मंदिर :

हे एक नवीन Fad आलेले आहे. हल्ली ९०% सोसायटीच्या Compound मध्येच मोठे मंदिर असते. सोयीचे वाटत असले तरी ते वास्तूच्या नियमांविरुद्ध आहे. ह्यासाठीही मी पुन्हा तुम्हाला आपल्या शास्त्राचेच संदर्भ देईन. पूर्वी बांधलेली बहुतांश मंदिरे ही उंच डोंगरमाथ्यावर बांधली गेली आहेत. उदा. केदारनाथ,गिरनारचे दत्त मंदिर, वैष्णव  देवी मंदिर. ही सगळी मंदिरे अगदी उंच ठिकाणी बांधण्यात आली.  असे का ? असा प्रश्न तुमच्याही मनात बरयाच वेळेस आला असेल परंतु त्याचे उत्तर ? त्याचे उत्तर असे आहे कि संसारात गढून गेलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला काही वेळ हा ह्या संसारापासून दूर जाऊन मनः शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करावा. मंदिरात हजारो लोक नामस्मरण,देवाचा जयघोष करत असतात त्यामुळे मंदिरात एक वेगळे वातावरण तयार होत असते आणि प्रत्येक मंदिराची एक उर्जा असते. ही उर्जा आणि तयार झालेले वातावरण हे मंदिराच्या वर असणाऱ्या घुमटात/कळसात साठून रहाते. आणि जर हा कळस तुमच्या खिडकीच्या किंवा मुख्य दाराच्या समोर येत असेल तर त्या उर्जेचा स्त्रोत सतत तुमच्या घरी प्रवाहित होतो. ही उर्जा अत्यंत powerful असते.  जर सतत तुमच्या घरी हा स्त्रोत प्रवाहित होत असेल तर शास्त्राप्रमाणे तुमच्यासाठी ही वास्तू राहण्यायोग्य नाही.  परंतु आज देव इतका स्वस्त झाला आहे कि लोकांना अगदी त्यांच्या घरा समोर मंदिर हवे आहे. अगदी छोटे मंदिर असणे ठीक आहे परंतु घरासमोर/खिडकीसमोर मोठे मंदिर असणे घरातून मंदिराचा कळस दिसणे, घरात मंदिराच्या घंटांचा आवाज घुमणे हे वास्तू शास्त्राच्या नियमांविरुद्ध ठरते.  

वास्तू संदर्भातले मला सतत विचारण्यात येणारे समाज-गैरसमज मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तू निवडताना तुम्ही ह्यां सर्व गोष्टी लक्षात ठेवालच त्याच बरोबरीने हे ही ध्यानात असू दे प्रत्येक वास्तू चांगलीच असते. व्यक्तीप्रमाणे,त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तूची निवड करणे हितावह ठरते. 

प्रतिक्रियांची वाट पाहतेय : anupriyadesai@gmail.com  किंवा vaastupriya@gmail.com वर 





   

READERS ALL OVER THE WORLD