बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

नवरात्र उत्सव कथा भाग १




नवरात्र उत्सव कथा  भाग १

नवरात्र ह्या वर्षी एक ऑक्टोबरला सुरु होत आहेत. ह्याबाबतीत मला बऱ्याच जणांनी नवरात्रावर काही लिहा ही विनंती केली आहे. त्यामुळे मी नवरात्राची उत्सव कथा ही ह्या लेखाच्या पहिल्या भागात आणि देवीची ओटी कशी भरावी ? ओटी भरण्याचे नेमके प्रयोजन काय ? प्रत्येक देवीची रूपे आणि त्यांना अर्पित केला जाणारा रंग ह्याबद्दलची माहिती लेखाच्या दुसऱ्या भागात मांडलेली आहे. ही माहिती मी स्वतः रचलेली नाही. ही माहिती मला एका जातक मित्राने पाठवलेली आहे.  


!!!श्री नवरात्र उत्सव कथा!!!
🚩🚩🚩🚩🕉🚩🚩🚩🚩

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !  नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.

तिथी 

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.
नवरात्री शनिवार १ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत आहे व विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तो दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आहे.

नवरात्र व्रताचा इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

नवरात्र व्रताचे महत्त्व

१. जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.’ उपांग ललिता ’ ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात  ” श्री दुर्गादेव्यै नम: । ” हा नामजप जास्तीतजास्त करावा.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात.

देवी कां प्रकट झाली? कशासाठी अनं कशी प्रकट झाली. ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवघरांत, मठ मंदिरात जी घटस्थापना केली जाते ती कशी ह्याच उत्तर असं :

दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश. अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते.नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेल धान हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीच घटावरच दर्शन असत.

आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी. पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख शांती अन समाधान लाभते.

नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.

ह्या नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसांत करतात. मुली पाटावर   काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे.

*नवरात्रीचे कलर*

०१/१०/२०१६   *ग्रे* 
०२/१०/२०१६   *ऑरेंज* 
०३/१०/२०१६   *सफेद*  
०४/१०/२०१६   *लाल* 
०५/१०/२०१६   *निळा* 
०६/१०/२०१६   *पिवळा* 
०७/१०/२०१६   *हिरवा* 
०८/१०/२०१६   *मोरपीसी* 
०९/१०/२०१६   *जांभळा* 
१०/१०/२०१६   *आकाशी* 
११/१०/२०१६   *गुलाबी*

तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या भगव्या शुभेच्छा

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

नवी दिशा - Career Guidance through Astrology

नवी दिशा - Career Guidance through Astrology 


गेल्या वर्षीच्या जूनमध्ये वंदना सावंत मॅडम मुलीच्या करिअर संदर्भात चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. Bio-medical चे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची त्यांच्या मुलीची म्हणजेच आरोहीची इच्छा होती. परंतु पुढे जाण्याअगोदर त्यांना पत्रिकेवरून सर्व नीट पार पडेल का ? आरोही परदेशी जाईल का ? Bio-medical चेच शिक्षण तिच्या Destiny आहे का ?  इ. प्रश्न जाणून घ्यायचे होते. 

वंदना मॅडमना पत्रिकेवरून आरोहीचा कल कुठे आहे त्याची कल्पना दिली. म्हणजे शिक्षण Bio-Medical चे होईल,करिअर सुद्धा त्याच क्षेत्रातील असेल परंतु कुठेतरी आरोही आर्टिस्ट वाटतेय,काहीतरी Creative आहे तिच्याकडे. आरोहीच्या कुंडलीवरून तिच्यातली कला स्पष्ट दिसत होती. ह्या माझ्या म्हणण्यावर वंदना मॅडमनी लगेचच दुजोरा दिला. आरोहीला गाण्याची अत्यंत आवड आहे आणि तिच्या गाण्याच्या परीक्षाही देऊन झाल्या आहेत. ( कुंडली वगैरे सगळे खोटे असते त्यांच्यासाठी - कुंडलीवरून मनुष्य स्वभाव,त्याचा पिंड,व्यक्ती किती झेप घेऊ शकते ह्याचा अंदाज नक्कीच बांधता येतो आणि त्याबद्दल भविष्य वर्तवता येते. परंतु कुंडली विवेचन करणाऱ्याचा तेवढा सखोल अभ्यास असावा. बरेच ज्योतिषी तर अगदी मृत्यूची तारीख सुद्धा अचूक सांगतात,काहींचा हातखंडा चेहेऱ्यावरून पत्रिका बनवण्यावर आहे आणि त्यावरून वर्तवलेले भविष्ये खरीही ठरली आहेत. कुंडली/ज्योतिष शास्त्र हे ढोंगी बाबांमुळेच जास्त बदनाम आहे. ज्यांना ओ का ठो काळात नाही ते रंगीबेरंगी माळा घालून आणि कपाळभर भस्म लावून गावभर भविष्य सांगतो म्हणून भटकत असतात. ह्या भोंदू लोकांना तर शिक्षा झालीच पाहिजे. गेल्याच महिन्यात सुप्रसिद्ध अशा मुंबईतल्या हॉस्पिटल मधून काही डॉक्टर्सना आणि CEO ला किडनी रॅकेट चालवल्याचे आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्यांनी तो गुन्हा केला कि नाही ते लवकरच सिद्ध होईल परंतु त्यावेळी लोकांनी डॉक्टर्स वर आरोप केले कि Medical Science वर ??? ह्या सर्वांत Medical Science अजिबात बदनाम झाले नाही. मग काही भोंदू ज्योतिषांमुळे आपले ज्योतिष- शास्त्र लगेच कसं बदनाम होतं ? ह्यावर नक्की विचार करा. असो आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया.) 

तर आरोहीला गाण्याची आवाड आहे आणि मी तिला ही आवड जपण्यास सांगितले. पुढे अभ्यास वाढेल,वेळ मिळणार नाही कदाचित, परंतु गाणे अजिबात सोडू न देण्याचा सल्ला तिला दिला. आरोहीच्या पत्रिकेवरून तिचे गुण आणि दोष दोन्ही व्यवस्थितपणे आरोहीला आणि तिच्या आईला समजावले. तिच्यातले जे उपजत गुण आहेत त्यांना आपण कशा प्रकारे फुलवू शकतो आणि जे दोष आहेत त्यावर ती कशा प्रकारे मात करू शकते ह्यांवर भरपूर चर्चा केली. त्यांनंतर तिच्या आईचा प्रश्न होता - परदेशात शिकण्यासाठी बारावीत तिला ठरावीक टक्क्यांचा पाडाव पार करावा लागेल ? इच्छित टक्के मिळतील ना ? आणि प्रामुख्याने त्यांना कॅनडामधील प्रसिद्ध अशा "Waterloo" ह्या युनिव्हर्सिटीतच प्रवेश घेण्याची इच्छा होती. पत्रिकेचा सखोल अभ्यास करून प्रामुख्याने खालील गोष्टी सांगितल्या  -
१) आरोही Bio- Medical मध्येच शिक्षण घेईल.
२) परदेशातूनच तिचे उच्च शिक्षण दिसतेय. ह्या भविष्यावर मी त्यांना १००% गॅरंटी दिली होती.
३) त्यांनी तीन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची नावे दिली होती त्यातील कुठल्या युनिव्हर्सिटीत तिला प्रवेश मिळेल ? ह्या प्रश्नावर मी पत्रिकेवरून कॅनडातील "Waterloo University"तच प्रवेश मिळेल आणि त्यासाठी लागणारा टक्क्यांचा निकष ती नक्की पूर्ण करेल, हे ठसवून सांगितले.
४) शिक्षणासाठी "Scholarship"ही मिळेल. त्यामुळे आर्थिकदृष्टया भार थोडा कमी होईल. 

त्यांना मार्ग मिळाला. त्यांवर काही उपाय आरोहीला आणि वंदना मॅडम करायला सांगितले. त्यांनी ते वर्षभर अगदी बारावीचा निकाल हातात येईपर्यंत न चुकता केले. बारावीच्या परीक्षेच्यावेळीही त्या दोघी माझ्या संपर्कात होत्या. निकाल लागण्याआधी परदेशातल्या युनिव्हर्सिटीच्या संपर्कात राहून तिच्या तिथल्या प्रवेशासाठी काही Formalities ची चौकशी सुरु होती. काहीं युनिव्हर्सिटीतून तुम्हाला scholarship मिळणार नाही वगैरे सांगितले. सतत धागधुग होती. शिक्षणासाठी कर्ज कुठून मिळेल ? कितीपत मिळेल ह्या सर्व गोष्टीत मायलेकी व्यस्त झाल्या. त्यांनी संबंधित संस्था पालथ्या घातल्या. ह्या सर्व काळात वंदना मॅडमचे सतत फोन येत होते. "काय होईल ? हवा तसा निकाल लागेल ना ? युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळेल ना ? Scholarship मिळेल ना ? " ह्या त्यांच्या प्रश्नांवर वरील वर्तवलेले भविष्य सतत सांगत होते. तरी त्यांना सतत चिंता असायची. आणि बारावीचा निकाल लागला. आरोहीला ९२.५ % मिळाले. दोघी खूप खुश होत्या. आता खरी कसोटी होती युनिव्हर्सिटीतल्या प्रवेशाची. पासपोर्ट आणि व्हिसासाठी धावपळ सुरु झाली. निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात लागला. "Waterloo University"ने आरोहीचा प्रवेश नक्की केला आणि आंनदीआनंद झाला. परंतु त्या "Scholarship" साठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. करताकरता जूनच्या पहिल्या आठवडयात आरोहीला "Scholarship" मिळाली परंतु पूर्ण स्कॉलरशिप नाही त्यामुळे बाकीच्या पैशांची व्यवस्था करावी लागणार होती. त्यात आरोहीचे २३ ऑगस्टचे तिकीट आले परंतु व्हिसा अजूनही हातात नव्हता. चांगल्या गोष्टींमागे किती अडचणी असू शकतात ते ह्या उदाहरणावरूनच समजून येते.
वंदना मॅडमचा मला १८ ऑगस्टला फोन -" आरोहीचे तिकीट २३ तारखेचे आहे परंतु व्हिसा आलेला नाही. काय करायचे ?" प्रश्नकुंडली अभ्यासून त्यांना सांगितले व्हिसा मंगळवारी २३ तारखेला मिळेल. "पण आरोहीचे २३ तारखेचेच तिकीट आहे. व्हिसा त्याआधी येईल ना ?" त्यावर मी काही म्हणाले नाही. त्यांना काही उपाय सांगितले आणि धीर धरण्यास सांगितले. एवढे सर्व करून व्हिसा नाही मिळाला तर सर्व गोष्टींवर पाणी फिरणार होते. २२ तारखेला सोमवारी सकाळी त्यांचा मेसेज आला - अजूनही आरोहीचा व्हिसा आलेला नाही. आम्ही आमच्याकडून visa office मध्ये विचारणा करतोय परंतु कोणी धड उत्तर देत नाही. काय करू ? त्यावर मी काहीच उत्तर दिले नाही. काही वेळेस काळच उत्तर देतो. त्याच रात्री १०.२० वाजता त्यांचा मेसेज आला - मॅडम आज व्हिसा dispatch झालाय बँगलोरवरून आणि उद्या सकाळी घरी येईल. थँक यु. म्हणजेच प्रश्नकुंडलीने दिलेले मंगळवारी व्हिसा मिळेल हे उत्तर अचूक होते. 

२३ ऑगस्टला रात्री ९.०० वाजताचे विमान होते. आरोही सुखरूप कॅनडाला पोहोचली. २ सप्टेंबरला तिच्या उच्च शिक्षणाची सुरवात झाली.ह्या त्यांच्या सर्व प्रवासात वंदना मॅडमनी मलाही नकळत सामील करून घेतले. जेंव्हा जेंव्हा त्यांनी प्रश्न विचारले तेंव्हा तेंव्हा ज्योतिषशात्राच्या मदतीने मी अचूक उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले. 

ह्या सर्व प्रवासाबद्दल वंदना मॅडम ह्यांनी मला भावपुर्ण असे ई -पत्र पाठवले आहे. ते इथे प्रसिद्ध करतेय. हा लेख सर्व पालकांना प्रेरणादायी ठरावा अशी आशा करते. 


Dear Anupriya,

With all your good wishes, guidance and blessings – Finally Arohi has reached Canada and her New Beginning of Career starts from 2nd September, 2016.

We would like to express our sincere gratitude for an excellent guidance to me and my daughter to take a right decision for selecting her career path. I really loved your style of making  understand  my daughter the quality within her, building a confidence in her and help her overcome the fear within her. Your predictions and simple remedies to overcome obstacles has helped Arohi to reach high in her academics.

Arohi is today in one of the top universities – University of Waterloo, Canada for Biomedical Science. I appreciate your Consultation Skills and Accuracy in Predictions.

I thank you for giving your valuable time at odd times of day to answer my queries and directing me to take right decision. We are blessed to meet you.


God bless you and your family. 


बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

नावांची गंमत

नावांची गंमत
काल पेपरचे बिल घ्यायला विशीचा एक तरुण आला. "नवीनच दिसतो आहेस. काय नाव तुझे ?" सगळी माहिती नेहेमी विचारावी आणि कोणावरही विश्वास ठेवू नये ह्या "सावधान इंडिया" ह्या मालिकेचा सूर पकडून त्याला नाव विचारले. तो म्हणाला,"परदीप". हा चुकून नाव असे सांगतोय हे समजून त्याला म्हणाले,"अरे प्रदीप ना ?" तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याने सांगितले,"अहो नाही. माझे नाव परदीप आहे.". आणि पावतीवर चक्क "परदीप" अशी सही सुद्धा केली पठ्ठ्याने. आता काय बोलणार ? परदीप चा अर्थ काय विचारले तर काहीही उत्तरं येणार नाही हे माहित होते म्हणून धाडसचं केले नाही विचारायचे. इतका कसा अपभ्रंश होऊ शकतो ?  प्रदीप ह्या नावाचा किती सुंदर अर्थ आहे. प्रदीप म्हणजे दिवा/दिव्याचा प्रकाश. आणि हा पठ्ठ्या नावाची वाट लावतोय. परदीपचा अर्थ पर+दीप म्हणजेच परक्यांचा दीपक असा होतो. हास्यास्पद आहे. अर्थाविना नाव ठेवण्याची प्रथाच सुरु झाली आहे.

परवा एका लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका आलेली. वाचतांना आमंत्रिक म्हणून घरातल्या मूळ पुरुषाचे नाव लिहिलेले. नाव लिहिले होते - परषोत्तम. बहुदा चुकून नाव छापले गेले असे मी पुटपुटले. त्यावर त्यांचे म्हणणे ,"नाही. अहो आजोबांचे नाव परषोत्तमच आहे". "बरं" म्हणून मी विषय तिथेच थांबवला. ह्यांना अर्थ विचारण्यात अर्थच नाही हे समजून गेले. एवढे सुंदर नाव "पुरूषोत्तम" सर्व पुरुषांमध्ये उत्तम असा त्याचा अर्थ आणि आपण खुद्द भगवान राम ह्यांना पुरूषोत्तम म्हणून संभोधतो. अशा सुंदर नावाचा असा अपभ्रंश आणि तो ही इतक्या आत्मविश्वासाने सांगण्याचे आणि छापण्याचेही धाडस. काय म्हणावे ?

लोकांनी सुंदर नावांचा अगदी चुराडा केला आहे. माझ्या ताईच्या शाळेत एक मुलगी आहे. ती लक्षात राहण्याचे कारण तिचे नाव "उपेक्षा". "तुझे असे का बरं नाव ठेवले ?" असे विचारल्यावर तिचे अचंबित करणारे उत्तर - "माझ्या मोठ्या बहिणीचे नाव अपेक्षा आहे म्हणून माझे नाव आई-बाबांनी उपेक्षा ठेवले.अपेक्षा आणि उपेक्षा".  ह्या नावाचा अर्थ माहीत आहे का गं तुला ? असे विचारल्यावर  -काय माहित ? त्याने काय फरक पडणार आहे अशा अर्थाचे भाव तिच्या चेहेऱ्यावर होते. तिला सांगावेसे वाटले अगं तुझ्या नावाचा अर्थ एकदा तरी शब्दकोषात पहा. म्हणजे कळेल किती चुकीचे नाव ठेवलेय आई-वडिलांनी. बरं बऱ्याच वाचकांना उपेक्षाचा अर्थ माहीत नसेल त्यांच्यासाठी अर्थ इथे नमूद करतेय - उपेक्षा म्हणजे अवहेलना (neglect ). थोडक्यात आमच्या मुलीची अवहेलना/उपेक्षा. 

अजून एक गंमतीशीर नाव म्हणजे उल्का. उल्का नावाच्या दोन तरी मुली माझ्या पाहण्यात आहेत. आणि खरोखरीच त्यांचा स्वभावही खऱ्याखुऱ्या उल्के सारखाच आहे. दोघींना कधीही राग येऊ शकतो,दोघींचा पारा चढला की त्यांचे नवरे अगदी बिच्चारे होऊन जातात. उल्का हे नाव कसं काय एखाद्या मुलीचे असू शकेल ?

ताईने आताच एक नाव सांगितले - श्लेष्मा - अर्थ आहे शेंबूड - इंग्रजीत - Mucus. आणि हे एका मुलीचे नाव आहे. खरंच आश्चर्य आहे !!! लोकांनी नावे ठेवतांना एकदा त्याचा अर्थ तरी समजून घ्यावा नाहीतर किती अनर्थ होतो आहे पहा. 

आणि काही नावे अशी आहेत ज्यांचा त्यांच्या नावाशी काहीही संबंध नाही -

शौर्य - शौर्य नावाचे तीन जातक आहेत. तिघेही अत्यंत शांत आणि  केविलवाण्या चेहेऱ्याचे आहेत. शौर्याचा  "श" नाही आयुष्यात.

धैर्य - नावाचा अर्थ धीर धरणे. (patience ) परंतु त्या मुलांमध्ये अस्थिरता जास्त दिसते. धीर धरणे म्हणजे काय हे त्यांच्या गावीही नाही.

काही जातकांची नावे मला खूप भावली -


  • एका जातक मित्राचे नाव आहे - सुव्रत - सु + व्रत  = चांगले असे व्रत (विष्णूचे एक नाव ) विष्णू सहस्त्रनामावली वाचली असेल तर हे नाव त्यात आहे. 
  • एका जातकाचे नाव - ययाती - अर्थ = प्रवासी 
  • एका माझ्या जातकाचे नाव त्याच्या आईने ठेवले - दीपसण - दिवाळीच्या दिवसात जन्माला म्हणून दीपसण. किती सुंदर नाव.  
  • एका छोट्या अशा मुलीची पत्रिका आली होती भविष्य विवेचनासाठी तिचे नाव - जीविका अर्थ आहे पाण्याचा स्त्रोत /जीवन 
  • मित्राच्या मुलाचे नाव - अमानी - विष्णूचे नाव. विष्णू सहस्त्रनामावलीतील अजून एक नाव 
  • सुव्रतच्याच जुळ्या मुलींची नावे - समिधा - an offering for a sacred fire. आणि अर्चिता - अर्थ - जिची पूजा करावी.  (ही दोनही नावे विष्णूसहस्रनामावलीत आहेत )
  • एक वेगळे नाव - सनिशा - अर्थ अजूनतरी माहीत नाही.  
  • एका जातक मैत्रिणीच्या ओळखीत हे नाव आहे एका मुलीचे - बिल्व - अर्थ - बिल्वाचे फळं. वेगळे नाव ठेवण्याच्या स्पर्धेत आगळेवेगळे नाव. 
  • अजून एक नाव आले आहे suggestion बॉक्स मध्ये - शडवली -अर्थ आहे हिरवळ. एका मुलीचे नाव आहे. 
लेख प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच वाचकांनी नावे दिली आहेत. ती खालीलप्रमाणे -  
                              खंजन -अर्थ आहे - गालावरच्या खळ्या. 
                              
                              सुमुख -अर्थ आहे - सुंदर मुख असलेला. 
           
                              आरा - अर्थ आहे - प्रकाश आणणारा (Light Bringer)
                       
                              केया - अर्थ आहे - गोड (sweet)
                       
                              तादात्म्य - अर्थ आहे - ओळख (Identity)अत्यंत वेगळे नाव आहे हे. 

                                          
एक एका नावांची लाट येते प्रत्येक वर्षी. २०१० साली शौर्य  नावाची लाट होती. २०११ साली अर्णव. २०१२ साली सर्व अर्जुनच अर्जुन. २०१३ साली जन्मलेल्या बहुतांश मुलींची नावे "ओवी" 


अशी ही नावांची गंमत. तुमच्याही ओळखीत अशी नावे असतील. आहेत ? मग कळवा बरे मला. 


मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा




 काल निशाचा खूप वर्षांनी फोन आला. २००६ साली नोकरी कधीही मिळणार ताई ? हे विचारणारी निशा २००८ ला लग्नाचे योग कधी हे विचारायला आली. त्यानंतर तिचा काल फोन आला. काय म्हणतेस ? कशी आहेस सगळे औपचारिक सवांद झाल्यांनतर निशा मूळ मुद्द्यावर आली. "ताई माझी पत्रिका असेल ना तुमच्याकडे ? मागे मी लग्नाचे विचारायला आले होते. "
 "आहे गं पत्रिका माझ्याकडे. बोल काय प्रश्न आहेत ?"
" ताई आम्ही ना दुसऱ्या बाळाचा विचार करतोय. कधी योग आहेत ते सांगू शकाल का ?"
"हो अगं, सांगते मी. उद्या फोन कर मला."
"आणि ताई....... "
मी विचारले "काय गं ?"
आणि तिचा मला अपेक्षित असणारा प्रश्न आला. "ताई मला ना पहिली मुलगी आहे."
"मग ?" माझा तिरकस प्रश्न.
"ह्या वेळेस मला मुलगा होईल का ? जरा सांगा ना"
हा प्रश्न ऐकून इतका राग आला पण रागावर ताबा ठेवून मी तिला शांतपणे सांगितले,"हे बघ निशा. मी तुझ्या पत्रिकेवरून तुला आता बाळ होईल का आणि ते बाळ सुदृढ असेल ना एवढे सांगू शकेन. मुलगाच होईल हे मी सांगणार नाही."
त्यावर तिचा हतबल प्रश्न," ताई तेवढं जरा बघा नां होईल का मुलगा ते ? "
पुन्हा एकदा तेच सांगून फोन ठेवून दिला मी. मुलगाच होईल का ? हा प्रश्न मला नेहेमीच विचारला जातो. अगदी मुलगा होण्यासाठी काय उपाय करता येतील का तुमच्या शास्त्राप्रमाणे ? हे सुद्धा विचारले जाते. हे ऐकून खरंच कीव करावीशी वाटते.

माझे काही जातक हे अमेरिका, सिंगापूर,कोरिया,लंडन,जर्मनी इ. ठिकाणाहून आहेत. ते जेंव्हा बाळाचे गर्भाशयातील बाळाचे लिंग परीक्षण करून घेतात तेंव्हा आश्चर्य वाटते. काही जातकांनी मुलीचा गर्भ आहे हे कळल्यावर गर्भपात करून घेतला आहे. 

काही केसेस मध्ये तर मी हे ही पहिले आहे की सुनेला मुलगी झाली म्हणून सुतकी चेहऱ्याने सासूबाई बातमी सांगताहेत. इतकं सुतकी वातावरण की पेढे -बर्फी काहीही वाटण्याची गरज त्यांना वाटत नाही. एका केस मध्ये तर माझ्या जातक मैत्रिणीला ८ वर्ष बाळं होत नव्हतं. आठ वर्षांनी IVF पद्धतीने तिला जुळ्या मुली झाल्या. सासूबाई आणि नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्येच सुनावले की आता घरी यायची गरज नाही. सहा-सात महिन्यांनी नवऱ्याने तिला घरी आणले. परंतु सहा सात महिने त्या मुली बाबांच्या आणि आजी-आजोबांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. मुलींचा आणि त्यांच्या आईचा असा काय गुन्हा झाला की सासरच्यांकडून ही वागणूक मिळावी ? हे सगळं ऐकलं की खरंच मन सुन्न होतं. कुठल्या शतकात आहोत आपण ? उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांचेही हेच विचार आहेत अजून ? मग काय उपयोग आहे शिक्षणाचा ? ह्या सगळ्याचा विचार करता आपल्या भारतीय समाजव्यवस्थेकडे मन येऊन पोहोचते.    

सुरवातीला आपल्या समाजव्यवस्थेने काही नियम घालून दिले होते. म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा कारण मुलगा लग्न झाले तरी आडनाव बदलत नाही,घराणे बदलत नाही. आई - वडिलांकडेच राहतो. मुलगी तर लग्न होऊन जाते सासरी मग आम्हांला कोण बघणार ?? ह्या सर्व गोष्टी सांगून सुनेवर नाहीतर स्वतःच्या मुलीवर तुला मुलगाच झाला पाहिजे हे दडपण लादले जात असे. 

परंतु आजही २०१६ ला जेंव्हा मला असे फोन येतात तेंव्हा खूप चीड येते. आज माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्या कुटुंबातील मुलगा परदेशात वास्तव्य करून आहे आणि मुलगी सासरी नांदत असली तरी आई -वडिलांची काळजी घेतेय.

काळ बदला आहे. काळाप्रमाणे आपणही बदलायला हवे. जो हा बदल जाणीवपूर्वक आपल्या जीवनात आणत नाही तो संपलाच. ह्याचे अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर सध्या रिक्षा आणि टॅक्सीवाले संप पुकारणार आहेत ? का तर म्हणे उबर आणि ओला ह्यांनी आमच्या धंद्यात घसरण आणली. प्रत्यक्षात रिक्षावाल्यांची अरेरावी आणि काळाबरोबर न बदलण्याच्या वृत्तीमुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आपल्या शास्त्रातही हे नमूद केलेय काळाप्रमाणे बदल करणं गरजेचे आहे. काळाप्रमाणे जो बदलतो त्याच्या जीवनाची प्रगती झालीच म्हणून समजा. 

हेच सांगणे आहे माझे ह्या काळातल्या होणाऱ्या भावी पिढीला. मुलगाच हवा हा हट्ट सोडून द्या. का बरं मुलाचाच हट्ट धरून बसलात ? मुली कुठे कमी पडताहेत ? गेल्या कित्येक वर्षांचे बोर्डाचे निकाल बघा. प्रत्येक निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. आज सगळ्या क्षेत्रात मुली आहेत. आणि नुसत्याच त्या क्षेत्रात नाहीयेत तर आपल्या कर्तबगारीने अव्वल दर्जावर आहेत. मग मुलगी का नको ? का मुलगाच हवा आहे ?  संगोपन करतांनाच मुलगा म्हणून फार लाड  आणि मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन म्हणून हिणवू नका. ही मुलींची कामे आहेत ही मुलांनी करायची नाहीत हे शिकवणही देऊ नका. अजून आपल्या भारतात मुख्यत्त्वे गुजरात,राजस्थान,हरियाणा, उत्तरप्रदेश ह्या ठिकाणी बायकांना अक्कल नसते,बायकांना नेहेमी आपल्या धाकात ठेवावे,बायकांना शिक्षणाची गरज काय ? अशा प्रकारांची विचारसरणी अजूनही आहे. ती येत्या काळात बदलेलच. तुमचं काय ?  आत्तापासूनच संगोपनात बदल घडवून आणाल तर ह्या पिढीत तरी आपल्याला जुनाट विचारसरणीचा अंत झालेला दिसेल. मुलींचे संगोपन कुठल्याही बुरसटलेल्या विचारसरणीने करू नका. तिला फुलू दे,वाढू दे, बहरू दे कारण तीच तुमच्या पुढच्या पिढीला जन्म देणार आहे. तिचं अस्तित्व वाचवा हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना.  

काळाला बदलण्याची ताकद स्त्रीमध्येच आहे. 


बघा खालील चित्रांवरून काही समजतंय का ? 
सितार वादक अनुष्का 


शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण  

गुरुचे सिंह राशीतील पर्व संपून गुरूने कन्या राशीत प्रवेश केला. प्रत्येक राशीला त्याची काय काय फळे मिळतील वाचा बरे - 


मेष राशी - 


  • नोकरी - नोकरीत पदोन्नतीची शक्यता. नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवास होणार आहेत.  
  • तब्येत - लिव्हर/ pancreas ह्या संदर्भात ऑपरेशन होण्याचे योग आहेत. त्यामुळे पोटदुखीकडे कानाडोळा करू नका. 
  • घ्यायची काळजी - सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वादावादी होऊ शकते आणि त्यामुळे नात्यात गैरसमज होऊ शकतात. ह्या संपूर्ण काळात रागावर नियंत्रण ठेवणे. 


वृषभ राशी -


  • नोकरी - सध्या तुम्हाला त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला आहे. नोकरीत बदल हवा आहे. स्वतःचा व्यवसाय करण्याचे वारे डोक्यात फिरू लागतील. 
  • घर / गाडी - घरात इंटिरियर बदलून घ्याल. घरात सजावटीच्या महागड्या वस्तू घेण्याचे योग. गाडी घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. 
  • मुले - गुरु पंचमातून भ्रमण करणार आहे आणि लाभावर दृष्टी आहे. सर्व प्रकारचे लाभ होणारच आहेत त्याचबरोबर जी जोडपी मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभदायी ठरेल. 
  • तब्येत - High B. P., डायबेटीसचा त्रास आहे. वजन वाढू शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवणे.   
  • घ्याची काळजी - व्यवसाय करण्याची रिस्क सांभाळून घेणे. विचारपूर्वक निर्णय घेणे. पती/पत्नी बरोबर वादविवाद विकोपाला जाऊ शकतात. 


मिथुन राशी - 


  • नोकरी -  नोकरीत कामात वाढ होणार आहे. स्वतःच्या कामांबरोबरच दुसऱ्या कर्मचाऱयांचीही कामे करावी लागतील आणि त्याचाच ताण वाढेल. 
  • घर - नवीन घर घेण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - तब्येतीची काळजी घेणे. जुनी दुखणी पुन्हा डोके वर काढतील. 
  • प्रवास - ह्या वर्षात धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  • घ्यायची काळजी - प्रवासात तब्येतीची काळजी घेणे. 


कर्क राशी - 


  •  कर्क राशीसाठी धनप्राप्तीची योग खूपच चांगले आहेत. पगारात वाढ संभवते किंवा स्वतःचे घर भाड्याने दिले असेल तर भाडेवाढ कराल. fast money चे वेड लागेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवाल.  
  • नोकरी - नोकरीच्या निमिताने लांबचे प्रवास कराल. कामात वाढ होईल आणि जवाबदारीची कामे यशस्विरीत्या पूर्ण कराल आणि वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. 
  • तब्येत - अतिरिक्त चरबी रोगाच्या आमंत्रणास कारणीभूत ठरावी त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे. 
  • घ्यायची काळजी - वजनावर नियंत्रण ठेवणे. 


सिंह राशी - 


  •  कुटुंबस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण कुटुंबात होणाऱ्या वाढीचीच ग्वाही आहे. कुटुंबात विवाह सोहळा लवकरच साजरा होईल. धनप्राप्तीचेही चांगले योग आहेत.  
  • नोकरी - नोकरीत पदोन्नती होईल. कामाचा ध्यास राहील. 
  • घर - नवीन घराची गुंतवणूक लवकरच कराल. 
  • तब्येत - हात आणि पाय दुखण्याच्या तक्रारी वाढतील. कॅल्शिअमयुक्त आहार घेणे. रक्तासंदर्भातील अंगावर पुरळ उठणे अशा जुन्या रोगांचे पुन्हा त्रास संभवतात.  
  • घ्यायची काळजी - खर्चावर नियंत्रण ठेवणे. 


कन्या राशी - 


  •  गुरुचे तुमच्या राशीतून होणारे भ्रमण हे लाभदायी ठरेल. 
  • नोकरी - नोकरीत नवीन पद्धतीनेही काम होऊ शकते हा तुमचा ह्या वर्षी प्रयत्न राहील. परदेशवारीही घडेल. 
  • घर - घर बदलाचे योग आहेत. नवीन जागेत रहायला जाण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - वजन तर वाढणारच आहे परंतु खांदे आणि मानदुखी होणार तेंव्हा काळजी घेणे कारण ऑपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  • घ्यायची काळजी - मणक्यावर ताण येणार नाही ह्याची काळजी घेणे. 


तुळ राशी - 


  • नोकरी - नोकरी/व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात काही काळ वास्तव्य होणार आहे. पदोन्नतीबरोबरच वरिष्ठांची खास मर्जी तुमच्यावर राहील. 
  • घर - वडिलोपार्जित जागा विकली जाऊन त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमचे घर लवकरच redevelopment ला जाईल. 
  • तब्येत - पोटाची काळजी घेणे. हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहावे लागू शकते. 
  • घ्यायची काळजी - तब्येतीच्या बाबतीत खर्च वाढणार आहेत त्यामुळे वायफळ खर्च टाळावेत.   


वृश्चिक राशी - 


  • गुरुचे कन्येतील भ्रमण हे वृश्चिकेसाठी राजयोगकारक ठरेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने भाग्योदयकारक योग आहेत. 
  • नोकरी - मनपसंत काम करण्याची संधी नोकरीत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम संधी चालून येतील. 
  • तब्येत - डोकेदुखी,पित्त ह्या गोष्टी उद्भवतील. पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. 
  • घ्यायची काळजी - काळजी घेण्यासारखे काहीच नाही परंतु पित्त खवळू देऊ नये. 


धनु राशी - 


  • जर तुम्ही बांधकाम व्यवसायात किंवा राजकारणात असाल तर गुरुचे हे भ्रमण तुम्हाला भाग्योदयकारकच ठरेल. 
  • नोकरी - नोकरी/व्यवसायात कामे वाढतील. अडलेली कामे मार्गी लागतील. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत डोळ्यांची काळजी घेणे. डोळ्यांचे ऑपरेशन होऊ शकते. 
  • घ्यायची काळजी - शाब्दिक चकमकी नोकरीच्या ठिकाणी टाळा. 


मकर राशी - 


  • नोकरी - नोकरीत वरिष्ठांचा राग सांभाळावा लागेल.अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देता देता नाकी नऊ येतील. एकूणच काळ चांगला नाही. 
  • तब्येत - पाठीच्या कण्याचा त्रास आहे. 
  • घ्यायची काळजी - ताकही फुंकून प्यावे असे योग आहेत सध्या. परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतःचे मत मांडावे. 


कुंभ राशी - 


  • नोकरी -   चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळणार नाही. आळस झटकून कामाला लागा. परीक्षेचा काळ आहे. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत हृदयासंदर्भात त्रास दिसतोय. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे. ज्यांना आधीच हा त्रास आहे त्यांचे अँजिओप्लास्टी किंवा ह्याच सारखे ऑपेरेशन दिसतेय. 
  • घ्यायची काळजी - घरी अस्थिर वातावरण निर्माण होईल. गैरसमज दूर करण्यात वेळ घालवावा लागेल. 


मीन राशी - 


  • नोकरी -   शत्रूवर मात करण्याचे योग आहेत. नोकरी संदर्भात परदेशभ्रमण आहेच परंतु त्याच बरोबर नवीन गोष्टी शिकून घेण्याचा काळ आहे. 
  • तब्येत - पाठीचे दुखणे उद्भवू शकते. 
  • घ्यायची काळजी - कोणावरही विश्वास ठेवू नका.  


सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

वाचकसंख्या वाढतेय

वाचकसंख्या वाढतेय 


माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. ब्लॉगवरचे लेख हे ९५% वेळेस मराठीतून लिहिलेले असले तरी जगभरातून वाचले जातात हे विशेष. त्याचीच कल्पना खालील छायाचित्रावरून समजून येतं.   

जगभरातून असलेले वाचक 


अमेरिकेतून लक्षणीयरित्या लेख वाचले जातात.  

सर वाचकांना पुनःश्च धन्यवाद. लेख वाचून मला काहींनी त्यांचे वैयक्तिक प्रश्न मला पाठवले,काहीनी लेख खूप आवडतात ..लिहीत रहा म्हणून प्रोत्साहन दिले, काही वाचकांनी अमुक ह्या विषयावर लेख लिहिण्याची विनंती केली. आधीचे माझे सर्व लेख हे ज्योतिष ह्या विषयावरच आधारित होते परंतु नंतर वाचकांच्या विनंतीवरून मी वास्तू संदर्भातील लेख लिहिण्यास सुरवात केली. काही वेळेस वेळे अभावी मला लेख लिहिता आले नाहीत त्यावेळी वाचकांची विचारणा होते की ब्लॉग लिहा. अशी विनंती आली की खूप बरे वाटते. 

ब्लॉगचे वाचक भारत,जर्मनी,ऑस्ट्रेलिया, स्पेन, दुबई,दक्षिण कोरिया, सिंगापुर, अमेरिका, लंडन, रशिया, श्रीलंका इ. ठिकाणाहून आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे २००९ पासून इथंवर प्रवास केला आहे. सतत असाच पाठिंबा देत रहा आणि मी नवीन विषय घेउन लेख लिहीत राहीन. वाचकहो असेच नितांत प्रेम करत रहा आणि सतत माझ्या पाठीशी उभे रहा.

अनुप्रिया देसाई 

शनिवार, १४ मे, २०१६

अनुभवाचे बोल



अनुभवाचे बोल 


वास्तुशास्त्रज्ञाचे भविष्य ह्या सदरात मी शेवटच्या प्रसंगात अमीताबद्दल सांगितले होते. तिच्या आणि तिच्या आईच्या आजारपणाला कंटाळून ती माझ्याकडे वास्तू संदर्भात भेटण्यास आली होती. त्यानंतर काय झाले हे तिच्याच शब्दात वाचा - 

First of all thanks thanks and thank you so much for everything you did for us.. Initially I wasn't believing in vaastu and as such. We shifted to a new house. All was good. But slowly we started suffering from small ailments to big diseases(diabetes, blood pressure, thyroid). It was only suffering for my mumma and me. Immune system was badly affected. I was on special diet with the help of dietitian and a renowned diabetologist. Nothing improvement as such. I being a really overweight person was getting depressed day by day.. Mumma's diabetes ,Bp, thyroid concerned me a lot.


I believe in my Sadguru. She was there with us with full support and her blessings when I lost my father. One day I was sitting in front of her and asked her what have we done so much to suffer this much..I am not employed so we had our financial problems too. That day I don't know how but I saw you on Facebook (through 1 mutual friend) and read about your vaastu related experiences and thought I should consult you immediately as it was a sign from my guru to contact you. 

You saw ,you did remedies. I'm so greatful to you. I can't mention in words. My mumma's thyroid came down. Her all doses came down to small mg's. She is fit and fine and a strong woman I can feel now.. 😊 

My family doctor was so surprised that she thought we shifted to another place or we might have found another doctor. From 9 months we haven't visited anyyyy doctor for any reason.  This is all because of you, Anupriya. Your Vaastu remedies did magic to us. My doctor didn't believe at first that we did vaastu remedies at our place and everything is fine now. I think she didn't liked it that much.. 😄 

We thank you from the bottom of our heart and yes not to forget your predictions were so damn perfect about everything I asked you regarding My Career, Property related issues. 

God bless you and your family with every good thing for you are doing so much good to people.
Thank you so much. 😊😚


Amita 


शुक्रवार, १३ मे, २०१६

वास्तुशास्त्रज्ञाचे भविष्य

वास्तुशास्त्रज्ञाचे  भविष्य

ज्योतिषाचे भविष्य ह्यावरचे लेखन मी २०१३ च्या जुलै ला प्रसिध्द केलेले. त्यावेळी बऱ्याच वाचकांची आणि जातकांची मला ई-पत्रे आली. त्यांना लेख खूप भावला होता. त्यानंतर बऱ्याच वेळेस सगळ्यांची विचारणा होत होती अनुप्रिया लेख लिही पुन्हा ह्यावर. तर आज योग जमला आहे. आज मी वास्तुशास्त्रावर लेख लिहिला आहे. 


प्रसंग १ -  Second Home 

हल्ली स्वतःचे घर असतांना बँका कर्ज देत आहेत म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरु असतो. त्याला ते "investment" असं म्हणतात. हे नवीन फ्याड आहे सॉरी "Trend" आहे. माझे असे मत आहे घर घेतानांच जर तुम्ही वास्तुतज्ञ व्यक्तीला घेऊन गेलात तर तुमची बरीचशी मेहनत वाचते आणि घेतानाच घर "Perfect" घेतले जाते. काही जातक मग मला मागाहून फोन करतात. घर book केलय. तुम्ही कधी येता ? एकदा तुमच्या वास्तू -शास्त्राप्रमाणे आहे का जरा बघून घ्या.  आता एकदा घर घेतल्यानंतर मी काय सांगणार ?? 

प्रसंग २ -  वास्तूचे मुख्यप्रवेशद्वार 

काही खूप हुशार मंडळी मला नुसताच दिशाहीन floor plan पाठवतात. आता त्यावरून मी काय सांगणार ? वास्तुशास्त्र हे दिशांवर अवलंबून आहे. तुम्ही त्या floor plan  वर दिशाच जर नमूद केल्या नाहीत  तर काय सांगणार मी ?? त्याहून पुढे, वास्तू -शास्त्रवरची काही पुस्तके वाचून त्यांना शास्त्र कळले अशा थाटात काही लोक सांगतात - "मैडम ईशान्य दिशेचा दरवाजा आहे. तुमच्या शास्त्राप्रमाणे (माझ्या शास्त्राप्रमाणे ? बरं बाबा बोल पुढे ) ईशान्य दिशा खूप चांगली मानतात ना ? त्याच दिशेत आहे "Entry". घेऊ ना हे घर ? " आता तुम्हालाच शास्त्र समजले आहे तर मला फोन करून माझा वेळ का बरं घेता ?  बरं माझ्या सर्व लेखात मी नेहेमी सांगते की, नुसता घराचा दरवाजा अमुक एका दिशेत आहे म्हणजे घर चांगले असा गैरसमज आहे लोकांचा.  संपूर्ण घर कसे आहे, घराच्या खिडक्या कोणत्या दिशेत आहे ? वॉश रूमस कोणत्या दिशेत आहेत ? बेडरूम, स्वयंपाक घर कोणत्या दिशेत आहे ते ही महत्वाचे आहे. घरात चांगल्या उर्जेच्या प्रवाहासाठी संपूर्ण घराची रचना महत्वपूर्ण ठरते. 

प्रसंग ३ - नंबरचा खेळ 



नंबरच्या खेळाचा शोध आपल्या वास्तू - शास्त्रात कोणी लावला ते मला माहीत नाही. अमुक एका नंबरचेच घर लोकांना हवे असते. गुढीपाडव्याला शिल्पाला घर घ्यायचे होते. वर्षभराच्या शोधानंतर तिला एक घर आवडले. पण तिच्या नवरयाचे वेगळेच गणित. त्याला दिशेप्रमाणे नाही तर नंबरप्रमाणे घर घ्यायचे होते. आता पंचाईत. मग मला फोन केला गेला. ह्यावर मी माझे मत जे होते ते सांगितले. नंबरपेक्षा वास्तू शास्त्राच्या नियमांना महत्त्व द्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा व्ययक्तीक प्रश्न आहे. 

प्रसंग चार -  बिच्चारे देव 

ह्यानंतर नंबर येतो देवघराचा. मुख्य दरवाजानंतर घराच्या आकड्याचा नंबर आणि मग शेवटी देवघर कुठे ठेवायचे हे लोक विचारतात. त्यांना देवघर बेडरूम मध्ये नको असते. मग स्वयंपाक घरात नॉन-वेज मुळे काहींना ते तिथेही नको असते. राहता राहिला मुलांचा बेडरूम. मग त्या बेडरूममध्ये देवांची रवानगी होते. १ BHK असेल तर मग देव बैठकीच्या खोलीत बसतात. मला आजपर्यंत देवघर कुठे असावे ?  हा सर्वात पहिला प्रश्न एक - दोन जणांनीच विचारलाय. :-)
    
प्रसंग पाच -  रात्रीस खेळ चाले 

अमी माझ्याकडे पहिल्यांदा आली होती तेंव्हा खूपच साशंक होती. तिचा स्वभाव आजकालच्या पिढीसारखा. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर अशा स्वभावाची. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून माझा नंबर मिळाला तिला. Consultation च्या सुरवातीला फार बोलतच नव्हती. तिच्या वास्तूच्या संदर्भात प्रश्न घेऊन आलेली. घर बाबांच्या नावावर. बाबांच्या पत्रिकेत सदोष वास्तू असण्याचे योग. त्यामुळे तिला मी काही प्रश्न विचारले," तुझ्या वास्तूच्या आजूबाजूला अमुक गोष्टी आहेत का ? घरापासून काही अंतरावर "अमुक हे" आहे का ? घराच्या खिडकीतून नदी दिसते का ? वगैरे… विस्फारलेल्या तिच्या डोळ्यांनी मला पोचपावती दिली. मी म्हटले कोणाला काही घरात भास होतात का ? त्यावर तिचे उत्तर," हो. आजीला घरात रात्रीच्या वेळेस माणसे वावरतांना दिसायची. ती बरयाच वेळेस म्हणायची रात्री तुम्ही सगळे का भांडत होतात ? आणि वस्तुस्थिती अशी असायची कि आम्ही सर्व गाढ झोपलेले असायचो. आम्हाला वाटले हिला भास होत आहेत. बरेच डॉक्टर्स झाले. आम्ही नंतर तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. परंतु पुढच्या काही वर्षात आम्हाला असे लक्षात आले की आमच्या विंगच्या सर्वांनाच कधीना कधी अशा प्रसंगाचा सामना करावा लागलेला आहे. मग आम्ही सर्वांनी ठरवून सोसायटीत महायज्ञही करून घेतला. नंतर दोन तीन वर्ष कोणाला काही त्रास झालेला नाही. पण आता पुन्हा ते सगळे सुरु झाले आहे. काय करायचे ? तुम्हीच सांगा". अंधश्रद्धा आणि भुताटकी वगैरेच्या भानगडीत न पडता जर तुम्हा सर्वांना तिथे comfortable नसेल ते घर सोडवे हा सल्ला दिला. आणि घर लगेच सोडता येणार नसेल तर घरात रोज रामरक्षा म्हणण्यास सांगितले. त्याने फरक दिसेल.  

प्रसंग पाच -  

अमिता मला २०१४ च्या नोव्हेंबरला भेटायला आली होती. २५-२६ वर्ष वय तिचं. आईने साठी उलांडलेली. आईला बी. पी. चा त्रास. त्याच्या गोळ्या सतत सुरूच. एक दिवसही गोळी घेतली नाही तर आईची तब्येत बिघडायची. घरात कमवणारं कोणीही नाही. त्यात भरीसभर म्हणून अमिताला डायबेटीस. तिची रोजची औषधे सुरूच. अमिताने नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु २ महिन्यांच्यावर कुठल्याही नोकरीत  टिकली नाही. तब्येतीच्या कारणामुळे तिला प्रवासही फार करता येत नव्हता. अत्यंत हालाखीची परिस्थिती होत चाललेली. अशा परिस्थितीत तिला तिच्या ओळखीच्या व्यक्तीने माझा नंबर दिला. 
चर्चेनंतर तिने वास्तू विजीटसाठी बोलावले. ( सविस्तरपणे  ह्या विषयावर लिहीनच कधीतरी. सध्या जास्त लांबवत नाही. ) वास्तूसाठी जे उपाय करण्यास सांगितले ते तिने २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात करून घेतले. त्यानंतर तिचा मला ऑगस्ट महिन्यात फोन आला की सगळे व्यवस्थित सुरु आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा होतेय. आधीपेक्षा बरयाच कमी पॉवरच्या बी. पी च्या गोळ्या घेतेय ती. अमिताचा स्वतःचा डायबेटीसचा त्रास खूपच कमी झालाय. विशेष म्हणजे आधीसारखी औषधे अजिबात घ्यावी लागत नाहीत. ती जेंव्हा तिच्या डॉक्टरांकडे परवा सर्दीच्या औषधांसाठी गेली होती तेंव्हा डॉक्टरांनी तिला काय विचारले असेल ? गेल्या वर्षभरापासून अमिता त्यांच्याकडे गेलीच नसल्याने त्यांना वाटले ही दुसरीकडे shift झाली. तिने जेंव्हा डॉक्टरांना वास्तूमध्ये करून घेतलेल्या उपायांनबद्दल सांगितले तेंव्हा डॉक्टर आ वासून बघत राहिल्या.  
हे आणि असे बरेच प्रसंग आणि घटना आहेत. हळूहळू ह्यावर लेख लिहिण्याचा मानस आहे. तूर्तास ऐवढेच.  


For Consultation - anupriyadesai@gmail.com
Website - www.kpastrovastu.com

गुरुवार, १२ मे, २०१६

शासक ग्रहांनी सावध केले

शासक ग्रहांनी सावध केले  

पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या सौ. रेवती सावंत घरी आल्या. चेहेऱ्यावर भरपूर प्रश्न दिसत होते. आज अचानक कशा काय वगैरे विचारण्याआधीच रेवतीचा प्रश्न - "मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक business proposal आले आहे. त्या व्यक्तीबरोबर माझी मिटिंग आहे उद्या. तर मी पुढे जावे की न जावे ? आणि त्यात किती Risk घ्यावी ? Risk घेऊ कि नको ?"
मी म्हटले," आपण शासक ग्रहांच्या माध्यमाने तुमचा प्रश्न तापासून पाहू. उत्तर हो किंवा नाही मध्येच अपेक्षित असावे. " 
रेवती हो म्हणाली मग शासक ग्रह मांडले - २२ मार्च २०१६ संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटे ठाणे. 

L - बुध ६,१,१० शनि ३,५,६ 
S - रवि ६,१२ शनि ३,५,६
R - रवि ६,१२ शनि ३,५,६
D - मंगऴ २,३,८ शनि ३,५,६ 

चंद्र राहूच्या युतीमध्ये आहे.तोही व्ययात. लाभेश व्ययात आहे तोही वक्री गुरु बरोबर आणि राहूच्या युतीत. हा योग धरून सांगितले ज्या व्यक्तीने तुम्हांला व्यवसायाबद्दल सांगितले आहे त्याने तुम्हाला अर्धवट माहिती दिली आहे किंवा माहिती लपवून ठेवली असावी. त्यावर रेवतीचा प्रश्न -"असं कशाला ती व्यक्ती करेल ?" मी म्हणाले,"हे बघ ते मला काही माहित नाही. शासक ग्रह तरी तुला ह्या पासून लांब राहायला सांगताहेत. आता तूच ठरवं. उद्या काय होतेय ते मला येऊन सांग आठवणीने". "बरं " म्हणून रेवती गेली.   
दुसऱ्या दिवशी रेवती आली. खूप खुश होती. माझ्याकडून गेल्यानंतर ती जरा सावध झालेली. तिने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती जवळच्या इतर व्यक्तींकडून घेतली आणि तिला धक्काच बसला. सदर व्यक्ती गेले कित्येक वर्ष एका व्यवसायात असून तो व्यवसाय संपूर्णपणे दिवाळखोरीत निघालेला आहे अशी माहिती तिला मिळाली. तो व्यवसाय म्हणजे हल्ली जे chain marketing करतात तोच. फरक इतकाच की हा व्यवसाय tourist शी संबंधीत होता. म्हणजे तुम्ही सुरवातीला रू. ५०००/- भरून स्वतःचे नाव नोंदवायचे आणि पुढे इतर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना ह्यात रु.५०००/- गुंतवण्यास सांगायचे मग ५० च्या वर मेंबर झाले कि तुम्हाला एक ट्रीप फ्री मिळणार कंपनीतर्फे आणि प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हला कमिशन मिळेल. ह्या अशा भूलथापांना बरेच लोक फसतात. 

ह्या व्यवसायात त्या व्यक्तीला स्वतःला काही प्रगती करता आली नाही परंतु दिवाळखोरीचे पैसे काढायचे कुठून ? त्यांनी भोळ्याभाबड्या रेवतीला गाठले. 


हा सर्व प्रकार लक्षात येताच रेवतीने काढता पाय घेतला. त्याच संध्याकाळी तिने माझी भेट घेतली आणि सर्व प्रकार सविस्तरपणे सांगितला. शासक ग्रहांची किमया दुसरे काय ? शतशः नमन त्या शासक ग्रहांना. 

पुन्हा एकदा शासक ग्रहांनी नुसता मार्गच नाही दाखवला तर सावध करून काहीतरी गौडबंगाल असल्याचे निर्देशही दिले. 

For Consultation - anupriyadesai@gmail.com

My Website - www.kpastrovastu.com

बुधवार, ११ मे, २०१६

Transit of Mercury across the Sun बुधाचे अधिक्रमण

Transit of Mercury across the Sun

बुधाचे अधिक्रमण

सोमवार, 9 मे रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण संपूर्ण भारतातून सूर्यास्तापर्यंत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या दिवशी सायंकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी बुध ग्रह सूर्यबिंबावर येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी 4 वाजून 44 मिनिटानी संपूर्ण बुध सूर्यबिंबावर येईल. आकाशात सूर्यबिंबाच्या वरच्या बाजूने बुधाचा प्रवेश सुरू होईल. तर बुध ग्रह सूर्यबिंबावर असतानाच सूर्यास्त होईल. मुंबईतून सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांपर्यंत हे दृश्य पाहता येईल.    
ही बातमी सतत wats app आणि फेसबुक वरून फिरत होती. ही दुर्मिळ संधी सोडायची नाही असे ठरवून त्यादिवशीच्या सगळ्या appointments पुढे ढकलल्या. ९ मे रोजी वरळी सी फेसला नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणीतून बुधाचे हे अधिक्रमण पाहता येणार आहे हे कळले. 
ठरल्याप्रमाणे साडेपाचला आम्ही तिथे पोहोचलो. उत्साही लोकांची प्रचंड गर्दी. अगदी ५ वर्षाच्या मुलांपासून ते ७५ वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सवर्जण हा दुर्मिळ क्षण टिपण्यासाठी जमले होते. नेहेरु तारांगणातर्फे दुर्बिणी उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे उत्साही लोकांनी स्वतःच्याही दुर्बीणी आणल्या होत्या. सर्वांचे एकाच लक्ष्य- बुधाचे अधिक्रमण. पहिला फोटो जो आहे त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसतेय. फोटो झूम केल्यास दोन काळे ठिपके सूर्यावर दिसताहेत. त्यातील सूर्याच्या मधोमध जो ठिपका आहे तो सुर्यावरचा डाग आहे आणि उजव्या हाताला वरती जो ठिपका दिसतोय तो आहे "बुध".  


बुध 
मी दुर्बीणीतून बुधाचे अधिक्रमण  पाहताना 
हा दुर्मिळ घटना टी. वी. वर पाहण्यापेक्षा स्वतः दुर्बिणीतून पाहतांना अत्यंत आनंद झाला. बुध पाहतांना space station ही पाहता आले. 
Space Station 


दुसऱ्या दुर्बीणीतून 
सूर्यावर आलेल्या ढगांमुळे काही काळ बुध पाहता आला नाही.  
सूर्यावर आलेले ढग 






एकंदरीत अत्यंत विस्मरणीय अनुभव होता. 

READERS ALL OVER THE WORLD