गुरुवार, २५ जून, २०१५

वास्तूचा प्रत्यय

वास्तूचा  प्रत्यय

डिसेंबर २०१२ ला मी एक लेख लिहिला होता. त्याची link इथे देतेय - http://astroanupriya.blogspot.in/2012/12/blog-post_15.html

ह्या वन रूम किचनच्या घराला त्यांनी १ BHK चे स्वरूप दिले होते. म्हणजे बैठकीची खोली तशीच ठेवून, जिथे किचन आहे तिथे बेडरूम बनवला आणि मधल्या passageway चे किचन केले होते. म्हणजेच Toilets च्या समोर स्वयंपाक घर बनवले होते. तेंव्हा ती वास्तू माझ्या पूर्णपणे मनातून उतरली होती. परंतु "कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करायचा" हे भूत त्यांच्या मानगुटीवर असल्याने त्यांनी वास्तू विषयक सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. आणि नंतर मी ही ते विसरून गेले. परवा तिचा म्हणजेच पुर्वाचा फोन आला. "अनुप्रिया अगं आर्थिकदृष्ट्या सध्या खुपच बेजार झाले आहे. सध्या मला नोकरीही मिळत नाहीये आणि प्रवीणच्या पगारात काही भागात नाहीये. घराचे हफ्ते फेडण्यासाठी आता दागिने विकावे लागतील बहुदा. एवढे qualification आणि experience  असताना सुद्धा नोकरी मिळत नाहीये. सध्या तब्येतीच्या पण कुरुबुरी सुरु झाल्यात. काय करावे कळत नाहीये गं".

तेंव्हा मला त्या लेखाची आठवण झाली. म्हणजेच निसर्गाचे घड्याळ नेमाने चालते. आज न उद्या त्याचा फटका बसतो. ह्या वास्तूत येण्याआधी पूर्वा आणि प्रवीणच्या घरी आर्थिक सुबत्ता होती. दोघांची नोकरी व्यवस्थित होती,पगार चांगला होता, ठेवणीचे पैसे बँकेत वाढत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघेही आनंदी होते. 

ह्या लेखाच्या माध्यमाने मला वाचकांना एवढेच सांगायचे आहे कि, फार वास्तू - ज्योतिष ह्या मागे लागूच नका परंतु काही नियम जे आपल्या पूर्वजांनी नेमून दिले आहेत तेवढे तरी पाळा. आपल्या गावी शौचालये घराच्या बाहेर असायची. अगदी परसाकडे. आता तर घराच्या बाहेर सोडाच घरातच आहेत (जे अनिवार्य आहे ). म्हणजेच बाहेरची negativity घरात आणलीच आहे आणि त्यात असे लोक अगदी स्वयंपाक घराच्या समोर त्याची थाटणी करतात. काय म्हणावे ह्या दुर्दैवाला.  ह्या वरून एक म्हण आठवली - Earlier people used to eat at home and go out to shit and now eat out and shit at home.  

सहजीकच तुमच्या मनात आले असेल आता ह्याला उपाय काय ? काय तोडफोड करावी लागेल ? ह्याला तोडफोडीची गरज नाही. आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे काही उपाय केले तर फरक पडू शकेल.(जे थोडे खर्चिक आहे ) परंतु जोपर्यंत ती वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करून घेत नाही तोपर्यंत तिने शौचालयात स्वच्छता ठेवावी. खडे मीठ एका काचेच्या अगर चिनी मातीच्या बशीत ठेवावे. संध्याकाळी एक अगरबत्ती शौचालयाच्या खिडकीत लावावी. त्याने बरीचशी negativity कमी होण्यास मदत होईल. संध्याकाळी रामरक्षा किंवा हनुमान चालीसा म्हणावी. ह्या सुपरिणाम नक्कीच मिळेल. 
     ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD