बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

गणेश चतुर्थी च्या निमित्ताने …

गणेश चतुर्थी च्या निमित्ताने … 




गणेश,शिवसुताय,हेरंभ,वक्रतुंड,विघ्नहर्ता अशा बऱ्याच नावांनी आपण गणपतीला साद देतो. कुठल्याही पूजेची सुरवात गणेशवंदन झाल्याशिवाय होत नाही. नुसती पूजाच नव्हे तर अगदी वास्तूतही प्रवेश करतांना प्रथम गणेश पूजनाला महत्त्व आहे. म्हणूनच त्याला "प्रथम"ह्या नावानेही संबोधले जाते. गणेश विघ्नहर्ता,विघ्नविनाशक आहे. सुरवातीच्या काळी म्हणजेच अगदी पेशवेकालीन काळापासून संकटाच्या वेळेस पूजेतल्या गणपतीच्या मूर्तीला पाण्यात ठेवण्याची प्रथा होती. ते म्हणेज अगदी गणपतीला डांबून ठेवण्यासारखे आहे. प्रत्येकाचा श्रध्देचा भाग आहे.

 असो तर सांगण्याचा मुद्दा हा की ह्या दहा दिवसात लालबागच्या गणपतीला भेट द्या अथवा नका देऊ परंतु घरात असलेल्या गणेश मूर्तीवर अथर्वशीर्षाचे कमीतकमी ११ आणि जास्तीतजास्त २१ वेळेस दुधाचा अभिषेक करता करता पठण केल्यास नक्की फायदा होईल. गणेशाच्या १०८ नावांची आवर्तने करा. नावे पाठ नसतील तर  मोबाईलवर डावूनलोड करून घेऊ शकता. टेक्नोलोजीचा असा फायदाही होऊ शकतो. 

हे सर्व करून काय फायदा होईल ? होईल का नक्की ? अशा शंका मनात न आणता करून पहा. फायदा नक्की आहे.  

सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. 

ज्योतिषीय आणि वास्तू मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करावा - anupriyadesai@gmail.com किंवा वेब साईट वरचा फॉर्म भरून पाठवणे - www.kpastrovastu.com

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

Readers and Followers of the Blog are Increasing


 Readers and Followers of the Blog are Increasing


संपूर्ण जगभरातून हा ब्लॉग वाचला जातोय आणि जातकांचे मला इ-मेल्सही येत असतात. ब्लॉगच्या वाचकांची एकूण संख्या ५३०६८ असून वाढतेच आहे परंतु सर्व मोठ्या देशातून वाचक आहे ह्याचा खूप आनंद आहे



 अमेरिका,जर्मनी,रशिया इ. देशातूनही ब्लॉग वाचणारे वाचक आहेत

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

पिठोरी अमावस्या

पिठोरी अमावस्या 


श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.
पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जाते, ठाऊक नाही. पूवीर् घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. घरातली कतीर् स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे,’चा घोष करत असे. तिला ‘मीच, मीच’ म्हणत आपण प्रतिसाद दिला जायचा.
बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य. या साध्या खिरीला त्या दिवशी किती चव लागायची! ज्या घरांमध्ये गणपती येतो, अशा घरांमध्ये ‘पिठोरी’चं पूजन होतं. अन्यथा ही पूजा जवळजवळ कालबाह्यच झाली आहे.
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद मंडलावर आठ कलश स्थापन करून त्यावर पूर्णपात्रे ठेऊन ब्राह्मी, माहेश्वरी या शक्तींची पूजा करतात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ योगिनींना आवाहन दिले जाते. पूवीर् या पूजेसाठी पिठाच्या मूतीर् तयार केल्या जात असे. तसेच पिठाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जात असे, म्हणून या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात.
या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत.या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.पुढे ती पुन्हा घरी आली.विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले.अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत…च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे.
या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीकरिता पूजा करतात.या दिवशी सवाष्ण ब्राम्हण ही जेवावयास घालतात. पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात. श्रावणाची अमावास्या असते पिठोरी अमावस्या. हा दिवस मातृदिन म्हणून फार पूवीर्पासून पाळतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन युगाचा Computer आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल ? माता,जननी,मातृभूमी आणि  मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या बैलाचीही पूजा होते. या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची , पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ शिंगे रंगविली , बाशिंगे बांधिली , चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात.
तरी अशी ही पिठोरी अमावस्या. मातृदिन,पोळा आणि बाल गोपाळांच्या पूजेची कहाणी 


READERS ALL OVER THE WORLD