मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

SAGITTARIUS / धनु राशी - सावधान साडेसाती सुरु झाली


SAGITTARIUS / धनु राशी  - सावधान साडेसाती सुरु झाली 


साडेसातीवर लेख लिहिल्यानंतर बरयाच वाचकांचे फोन आले आणि पत्रही आली. कन्या राशीचे लोक सध्या सुटकेचा श्वास घेत आहेत. कारण नोव्हेंबरला कन्या राशीची साडेसाती संपून धनु राशीची साडेसाती सुरु झाली आहे. साडेसाती म्हणजे काय ? साडेसातीत काय नियम पाळले पाहिजेत हे मी गेल्या लेखात स्पष्ट केले आहे. आज मी राशी नुसार त्या त्या लोकांना काय त्रास होऊ शकेल आणि त्यांनी स्वतःच्या स्वभावात काय बदल केले पाहिजेत हे सांगणार आहे. 

सध्या तुळ,वृश्चिक आणि धनु राशीची साडेसाती सुरु आहे. तुळ राशीची शेवटची अडीच वर्षे,वृश्चिक राशीची पाच वर्षे आणि धनु राशीची साडे सात वर्षे साडेसाती बाकी आहे. 
तुळ

तुळ - तुळ राशीत शनि उच्चीचा होतो. तुळ रास ही शुक्राची राशी आहे. शनि आणि शुक्र ह्या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचे/जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तुळ राशीची व्यक्ती ही मुळातच कलाकार. Acting,Dance,Drawing किंवा उत्तम स्वयंपाक म्हणजेच काहीतरी कलात्मक नक्कीच. ह्यांना सगळ्याचा आळस. कुठे वेळेवर पोहोचायचे म्हणजे ह्यांचे धाबे दणाणले. ह्यांना प्रवासाची खूप आवड असते. साडेसातीतील शेवटची अडीच वर्षे बाकी आहेत. ह्या काळात तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात ह्या मंत्राचा अवलंब केला पाहिजे -  
आळस झटकून कामाला लागणे. आजचे काम उद्यावर ढकलू नका.  अवाक्याबाहेरची आश्वासने कोणाला देऊ नका. 
तब्येतीच्या बाबतीत लिवर,किडनी,हार्निया आणि दात ह्या अवयावांबाबत त्रास होऊ शकतो. 
वृश्चिक

वृश्चिक - सध्या २ नोव्हेंबरपासून शनि महाराजांनी वृश्चिक राशीत बस्तान मांडले आहे. वृश्चिक राशीचे लोक हे अविश्रांतपणे  काम करणारे,लगेच राग येणारे, आतल्या गाठीचे,बोलण्यात उद्धट. वृश्चिक राशीचे लोक एखाद्याचा वचपा काढण्यात जाम हुशार असतात. स्वतः सतत कामात असल्याने दुसऱ्या व्यक्तींकडूनही हीच अपेक्षा असते. आळशी लोकांबरोबर ह्यांचे फार जमत नाही. risk घेण्याची क्षमता खूप चांगली असते परंतु कधी कधी फाजील आत्मविश्वासाने ह्यांचे दात ह्यांच्याच घशात येतात. साडेसातीचे चटके गेल्या २ वर्षांपासून जाणवत असतीलच त्यामुळे तुम्ही पुढील मंत्राचा अवलंब करणे - 
अति risk घेऊन कुठल्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करू नये. ( वृश्चिक राशी अति रिस्क घेते त्यामुळे ही special warning.) बोलून कोणाला दुखवू नये. फार घाई घाईत काम पूर्ण करण्यापेक्षा व्यवस्थित काम करण्यावर भर द्या
तब्येतीच्या बाबतीत किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. पाणी जास्त पिणे. 


धनु


धनु - अत्यंत महत्वाकांक्षी,परोपकारी,थोडी घमेंडी,स्पष्टवक्ती आणि सतत बडबडणारी माणसे म्हणजे धनु. प्रवासाची आवड,घरात ह्यांचा पाय टिकणे अवघड आहे. स्वतः च्या कमाईचां काही हिस्सा हा दुसऱ्यांना मदत म्हणून देण्यात ह्यांना आनंद मिळतो. ह्यांचा मित्र परिवारही खूप मोठा असतो परंतु ह्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे हे दुसऱ्यांची मने दुखावतात. ह्यांनी ह्या साडेसातीच्या काळात घ्यायची काळजी म्हणजे - 
खर्चावर नियंत्रण ठेवणे,येणाऱ्या अडीच वर्षात खर्च भरपूर होणार आहे त्यामुळे आलेला पैसा साठवण्याचे मार्ग शोधा. लांबचे प्रवास भरपूर होतील,ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे ती ह्या अडीच वर्षात पूर्ण होईल. अडीच वर्ष हे अत्यंत बिकट (Frustrating Period )असणार आहेत आणि त्याची सुरवात किंबहुना झालीच असावी. बोलण्यात शब्द जरा जपून वापरणे. 
तब्येतीच्या बाबतीत - दाताचे Root Canal करून घ्यावे लागेल. घराचे Interior बदलाल किंवा नवीन घरही घेण्याचे योग आहेत (अर्थात ह्याला संपूर्ण कुंडलीचा support हवा )       

त्यामुळे साडेसातीला घाबरू नका पण फाजील आत्मविश्वासही बाळगू नका नाहीतर जमिनीवर येण्यास वेळ लागणार नाही. वृद्ध आणि अपंग लोकांना तुमच्या कुवतीनुसार मदत करा. (पैशांचीच मदत नव्हे परंतु त्यांना मानसिक आधाराचीही गरज असते) शनिवारी मारुतीच्या मंदिरात रांग लावून दर्शन घ्या अथवा नका घेऊ परंतु गरजूंना नक्की मदत करा मग तुमचे भले झालेच म्हणून समजा. 

भेटू पुढच्या लेखात. प्रतिक्रिया नक्की कळवा. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

Shani Sadesati,Remedies And You शनिची साडेसाती आणि उपाय


निची साडेसाती आणि उपाय 

Shani Sadesati,Remedies And You 

२ नोव्हेंबरला शनि महाराजांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि त्यामुळे धनु राशीला साडेसाती सुरु झाली आणि कन्या राशीची साडेसाती संपली. मी मागच्या काही लेखात हा उल्लेख केला आहे कि मार्च २०१४ पासून माझ्याकडे जितके जातक आले आहेत त्यातले सगळेच धनु राशी किंवा धनु लग्नाचेच आले. एखादा अपवाद असला तर. ह्याचाच अर्थ साडेसातीचा त्रास खूप आधीच सुरु झालेला जाणवतो. २ नोव्हेंबरला शनिने तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला. शनि ज्या राशीत असतो त्या राशीला,त्या राशीच्या मागच्या राशीला आणि त्याच्या पुढील राशीला साडेसाती सुरु असते. म्हणजे उदा. सध्या शनि वृश्चिकेत आहे त्यामुळे वृश्चिक राशीला, वृश्चिक राशीच्या मागच्या म्हणजेच तूळ राशीला आणि वृश्चिकेच्या पुढील राशीला म्हणजेच धनु राशीला सध्या साडेसाती सुरु आहे. 
शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही.ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे  
शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे..... 
शुक्र,चंद्र,सूर्य,गुरु,बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे.... 

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे....त्याच्या आधीची राशी आहे कर्क.......म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली. 
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत............. 

ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते.... 
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी... 
Shani Sadesati,Remedies And You 

To interpret Sadesati we have to understand Saturn. Saturn is described as the son of the Sun, the king of all planets, by his Queen Chhaya, “the shadow”. The sun is the creator of light, and Chhaya is indicator of darkness. Saturn partakes of the apparent physical characteristics of his mother and remains dark. Saturn, being so opposed in nature to this father, Saturn or Sani is said to be banished by the Sun.

Characteristics of Saturn are - 

Saturn is said to be concerned with fairness or justice, (No injustice with anybody)
Saturn makes things slow but stable,(Teaches us Patience)
Saturn is dark complextion,
Saturn is handicap by one leg,
Saturn is Service oriented and hard worker (Teaches us to be with No Ego)
Saturn is deep thinker,Researcher,Scientist,
Saturn is Reserved in character.

What is Sadesati ?

Sadesati is a 7.5 years of Saturn's Transit twelfth,First and Second house from the house where Moon is placed in Natal Chart. (Moon Sign /Chandra Rashi). For Example - If your Moon Sign is Scorpio. The sign before Scorpio is Libra and Sign after Scorpio is Sagittarius. When Saturn enters in Libra Sign your Sadesati will start. 
Why 7 1/2 Years ?

Saturn is slow moving planet so to transit from one sign to another it takes 2.5 years. So first Phase for Sadesati is of 2.5 years, Scond Phase of 2.5 years and Third Phase of 2.5 years. If you calculate sum of these 2.5 years total comes to 7.5 years. Thats why it is called Sadesati ( 7.5 years). 

Sadesati starts means bad luck starts, now there will be loss in Business, You will loose your Loved ones, Your Career will be ruined,you will be shattered etc. According to me this is all nonsense. I will not deny all points but we have to observe these points from other perspective. 

I have explained you the the characteristics of Saturn. Saturn is concerned with fairness and Justice. If you are doing or you have done injustice to anyone, you will get the effects for this Karma during your Sadesati. When First Phase of Sadesati begins Saturn effects Starts like - Saturn makes things happen slowly and person who is going through this phase gets puzzled. He suddenly could not understand why things are being so slow around him. For e.g. if he has given an Interview and waiting for a Call from a Company, he has to wait for really long time to get the Job. So the person thinks this is really very bad thing happening with him and that is because of Sadesati.  He started feeling negative about Saturn but please hold on, here Saturn wants to teach us Patience. Patience to wait for your turn. 

So basically, you have to be loyal,do your work without corruption, do not lie, don't be greedy, help to needy people to get them Food,Shelter,Education etc. according to your budget. Saturn gets impressed by such things. So next time before blaming this Planet,peek inside you. 

Saturn's Gemstone- Blue Sapphire. Do not use Blue Sapphire without consent of Astrologer. 

Saturn's Colour - Navy Blue/Black


वाचकांसाठी टीप - For Astrological and Vasstu Consultation Contact -  www.kpastrovastu.com


READERS ALL OVER THE WORLD