मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

SAGITTARIUS / धनु राशी - सावधान साडेसाती सुरु झाली


SAGITTARIUS / धनु राशी  - सावधान साडेसाती सुरु झाली 


साडेसातीवर लेख लिहिल्यानंतर बरयाच वाचकांचे फोन आले आणि पत्रही आली. कन्या राशीचे लोक सध्या सुटकेचा श्वास घेत आहेत. कारण नोव्हेंबरला कन्या राशीची साडेसाती संपून धनु राशीची साडेसाती सुरु झाली आहे. साडेसाती म्हणजे काय ? साडेसातीत काय नियम पाळले पाहिजेत हे मी गेल्या लेखात स्पष्ट केले आहे. आज मी राशी नुसार त्या त्या लोकांना काय त्रास होऊ शकेल आणि त्यांनी स्वतःच्या स्वभावात काय बदल केले पाहिजेत हे सांगणार आहे. 

सध्या तुळ,वृश्चिक आणि धनु राशीची साडेसाती सुरु आहे. तुळ राशीची शेवटची अडीच वर्षे,वृश्चिक राशीची पाच वर्षे आणि धनु राशीची साडे सात वर्षे साडेसाती बाकी आहे. 
तुळ

तुळ - तुळ राशीत शनि उच्चीचा होतो. तुळ रास ही शुक्राची राशी आहे. शनि आणि शुक्र ह्या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचे/जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तुळ राशीची व्यक्ती ही मुळातच कलाकार. Acting,Dance,Drawing किंवा उत्तम स्वयंपाक म्हणजेच काहीतरी कलात्मक नक्कीच. ह्यांना सगळ्याचा आळस. कुठे वेळेवर पोहोचायचे म्हणजे ह्यांचे धाबे दणाणले. ह्यांना प्रवासाची खूप आवड असते. साडेसातीतील शेवटची अडीच वर्षे बाकी आहेत. ह्या काळात तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात ह्या मंत्राचा अवलंब केला पाहिजे -  
आळस झटकून कामाला लागणे. आजचे काम उद्यावर ढकलू नका.  अवाक्याबाहेरची आश्वासने कोणाला देऊ नका. 
तब्येतीच्या बाबतीत लिवर,किडनी,हार्निया आणि दात ह्या अवयावांबाबत त्रास होऊ शकतो. 
वृश्चिक

वृश्चिक - सध्या २ नोव्हेंबरपासून शनि महाराजांनी वृश्चिक राशीत बस्तान मांडले आहे. वृश्चिक राशीचे लोक हे अविश्रांतपणे  काम करणारे,लगेच राग येणारे, आतल्या गाठीचे,बोलण्यात उद्धट. वृश्चिक राशीचे लोक एखाद्याचा वचपा काढण्यात जाम हुशार असतात. स्वतः सतत कामात असल्याने दुसऱ्या व्यक्तींकडूनही हीच अपेक्षा असते. आळशी लोकांबरोबर ह्यांचे फार जमत नाही. risk घेण्याची क्षमता खूप चांगली असते परंतु कधी कधी फाजील आत्मविश्वासाने ह्यांचे दात ह्यांच्याच घशात येतात. साडेसातीचे चटके गेल्या २ वर्षांपासून जाणवत असतीलच त्यामुळे तुम्ही पुढील मंत्राचा अवलंब करणे - 
अति risk घेऊन कुठल्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करू नये. ( वृश्चिक राशी अति रिस्क घेते त्यामुळे ही special warning.) बोलून कोणाला दुखवू नये. फार घाई घाईत काम पूर्ण करण्यापेक्षा व्यवस्थित काम करण्यावर भर द्या
तब्येतीच्या बाबतीत किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. पाणी जास्त पिणे. 


धनु


धनु - अत्यंत महत्वाकांक्षी,परोपकारी,थोडी घमेंडी,स्पष्टवक्ती आणि सतत बडबडणारी माणसे म्हणजे धनु. प्रवासाची आवड,घरात ह्यांचा पाय टिकणे अवघड आहे. स्वतः च्या कमाईचां काही हिस्सा हा दुसऱ्यांना मदत म्हणून देण्यात ह्यांना आनंद मिळतो. ह्यांचा मित्र परिवारही खूप मोठा असतो परंतु ह्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे हे दुसऱ्यांची मने दुखावतात. ह्यांनी ह्या साडेसातीच्या काळात घ्यायची काळजी म्हणजे - 
खर्चावर नियंत्रण ठेवणे,येणाऱ्या अडीच वर्षात खर्च भरपूर होणार आहे त्यामुळे आलेला पैसा साठवण्याचे मार्ग शोधा. लांबचे प्रवास भरपूर होतील,ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे ती ह्या अडीच वर्षात पूर्ण होईल. अडीच वर्ष हे अत्यंत बिकट (Frustrating Period )असणार आहेत आणि त्याची सुरवात किंबहुना झालीच असावी. बोलण्यात शब्द जरा जपून वापरणे. 
तब्येतीच्या बाबतीत - दाताचे Root Canal करून घ्यावे लागेल. घराचे Interior बदलाल किंवा नवीन घरही घेण्याचे योग आहेत (अर्थात ह्याला संपूर्ण कुंडलीचा support हवा )       

त्यामुळे साडेसातीला घाबरू नका पण फाजील आत्मविश्वासही बाळगू नका नाहीतर जमिनीवर येण्यास वेळ लागणार नाही. वृद्ध आणि अपंग लोकांना तुमच्या कुवतीनुसार मदत करा. (पैशांचीच मदत नव्हे परंतु त्यांना मानसिक आधाराचीही गरज असते) शनिवारी मारुतीच्या मंदिरात रांग लावून दर्शन घ्या अथवा नका घेऊ परंतु गरजूंना नक्की मदत करा मग तुमचे भले झालेच म्हणून समजा. 

भेटू पुढच्या लेखात. प्रतिक्रिया नक्की कळवा. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD