मंगळवार, २१ मे, २०१९

साडेसाती 

भारतीय लोक ज्या गोष्टीला सर्वात जास्त घाबरतात ती गोष्ट म्हणजे शनिची साडेसाती. माझ्याकडे येणारे जातक साडेसातीबद्दल नेहेमीच प्रश्न विचारात असतात. काहींना साडेसाती म्हणजे काय ? इथपासून ते साडेसातीत नक्की काय होतं ? इथपर्यंतचे प्रश्न असतात. तुमच्याही मनात हे प्रश येतच असतील. ह्या सर्व प्रश्नांवर एकी व्हिडीओ बनवावा असं मनात होत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शंकांचे नक्की निरसन होईल ही आशा करते.



धन्यवाद 
अनुप्रिया देसाई 
ज्योतिष -वास्तू विशारद 

बुधवार, १५ मे, २०१९

Second Time Predictions Proved to be Correct

 Second Time Prediction Proved To Be Correct. 

I had predicted in my Video Released on 4th May 2019 about effects of Mars and Rahu Conjunction. As Predicted things are happening around us. My Followers and Friends noticed such incidents happening around us. I have listed such incidents here - 

1) Predicted about - Major Airplane Accidents and Planes bursting in Flames. 

  • Incident happened in Moscow on 6th may. Airplane had some technical issues while taking off and they did emergency landing of Airplane which burst in to flames. Sadly 41 people died in this incident. 


Airplane in Flames - 4th May 2019
My Video About Predictions regarding Mars and Rahu in Gemini. 



Alaska Plane Crash happened on 14th May 2019. 

Alaska Plane Crash Incident 14th may 2019
2) Predicted about Chemical Factory Fire accidents - Chemical factory fire accidents are common but fire accidents happening during Mars and Rahu conjunction had resulted back to back incidents. There are many fire breaking accidents in these days. 
  • Chemical Factory Fire Incident near Navi mumbai in last week.
  • Chemical Factory Fire Incident in Ludhiana in Last week. 
3) Predicted about Fire Incidents - 
  • On 9th May 2019 Massive Fire killed Five employees of Rajyog Saree Centre in Pune. Reason of Fire is unknown.
  • On 5th May 2019 A fire broke out at a plastic factory near a mall in outer Delhi's Bawana. 
4) Predicted about Violence will take place - 
  • Bangal - Violence is the recent example for the this Prediction. I had clearly mentioned in video that People might get misdirected,will get angry. Media will play major role in this. This is actually happening. 
  • This is just not happening in  India but Sri Lanka also Facing issues regarding the same. 


5) Predicted about Car or vehicles catching fires- many incidents took place in these days regarding Cars catching of fire or Mobile Phone exploding. 

6) Predicted about Politicians/Media taking about Provoking people about religion and all. Yes this is happening. Politician's comments about competitors are reaching cheap level and affecting general people's thinking. 

This article or video is just for study and research. In my Previous video also I had predicted about Sri Lanka Incident and yes that happened. Still situation is critical in Sri Lanka. Still many days to go as this Mars and Rahu conjunction will remain together till mid of June. So just be careful. Keep control on your anger and anxiety. Avoid getting into situations which includes subjects regarding Religion. 

Will keep You Updated. 
Thank You. 



बुधवार, ८ मे, २०१९

Mars in Gemini



Mars in Gemini 

Mars will enter Gemini on 7th May. It will Conjunct with Rahu in May-June. Saturn-Ketu-Pluto will be aspecting this Conjunction. Saturn and Jupiter are retrograde. Effects of such conjunction and aspects are explained in this video. Do share and like the video. Don't forget to subscribe the channel.

मंगळवार, ७ मे, २०१९

वास्तूतील पाण्याची टाकी




वास्तूतील पाण्याची टाकी


हा प्रश्न मला कित्येक जातक विचारतात की," वास्तूत पाण्याची टाकी कुठे असावी ?" त्याहून पुढे, ज्यांनी फक्त पुस्तके वाचून आणि इंटरनेटवरून वास्तूबद्दल ज्ञान संपादन केले आहे त्यांच्या मते ईशान्य ही पाण्याची टाकी बसवण्याची बेस्ट जागा. कारण ईशान्य ही तर जलतत्वाची दिशा आहे. त्या सर्वांसाठी आजचा लेख. 

दिवसेंदिवस पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याची टाकी प्रत्येकाच्या घरी बसवावीच लागतेय. ज्यांचा प्लॉट आहे म्हणजेच बंगला आहे आणि जे फ्लॅटमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठीही आजचा लेख उपयोगी ठरावा. त्याआधी वास्तूचे काही नियम समजून घेऊ -

वास्तुशास्त्र म्हणजे फार अवडंबर नसून,वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूतील पाच तत्वांचा समतोल राखणे. ही पाच तत्वे - अग्नि,पृथ्वी,वायू,जल आणि आकाश. ह्या पाच तत्वांना वास्तूमध्ये ठरावीक असे स्थान आहे.

  • अग्नि - आग्नेय दिशा (South East)
  • जल - ईशान्य दिशा (North East)
  • पृथ्वी - नैऋत्य दिशा (South West )
  • वायू - वायव्य दिशा (North West)
  • आकाश - ब्रम्हस्थान (Center of the Vastu)
ईशान्य ही ईश तत्वाची दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा.  ही दिशा सर्वात पवित्र आहे. वास्तुपुरुष मंडळानुसार इथे वास्तू पुरुषाचे डोक्याचा भाग येतो. ह्या दिशेत पवित्र आणि स्वच्छ गोष्टी असाव्यात आणि म्हणूनच ह्या दिशेत  देवघराची रचना असावी असे सांगितले गेले आहे. मुंबईत जागेअभावी इथे देवघर शक्य नसल्यास काही हरकत नाही परंतु ह्या दिशेत हलक्या वस्तू असल्यास बरे. तुमची बैठकीची खोली ह्या दिशेत येत असल्यास सोफा असावा. बेडरूम येत असल्यास आरसा असल्यास चांगले. (आरसा झाकलेलाच असावा ) स्वयंपाकघर आल्यास पाणी भरून ठेवण्यासाठी ही दिशा चांगली. ह्या दिशेत शक्यतो टॉयलेट्स असू नयेत. 

ह्या दिशेत पाणी असावे असे शास्त्रात लिहिले गेले आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की पाण्याची दिशा आहे तर पाण्याची टाकी चालू शकेल. ह्या दिशेत स्वयंपाकघर असल्यास हमखास ह्या दिशेत पाण्याची टाकी आढळून येते. परंतु शास्त्र खोलात अभ्यासल्यास असे लिहिले आहे की ईशान्य दिशेत पाणी असावे परंतु ते जमिनीखाली असावे. ह्या दिशेत पाण्याची टाकी जर जमिनीखाली असेल तर उत्तम. ज्यांचा प्लॉट आहे म्हणजेच बंगला आहे अर्थातच त्यांना हे सहज शक्य आहे. कारण ही टाकी बंगल्याच्या बाहेर ईशान्य दिशेत जमिनीखाली बसवता येऊ शकते. अशी बरीचशी उदाहरणे आहेत ज्यांच्या बंगल्याच्या बाहेर ईशान्य दिशेत मी पाण्याची टाकी जमिनीखाली असलेली पाहिली आहे. 

प्रश्न असतो फ्लॅटधारकांचा. फ्लॅटमध्ये जमिनीखाली टाकी बसवणे अशक्य. त्यामुळे गैरसमज हा आहे की हि टाकी स्वयंपाकघरातील माळ्यावर बसवली तरी चालेल म्हणून ईशान्य दिशेत माळा बनवून त्यावर ही टाकी बसवली जाते.  शक्यतो ह्या दिशेत उंचावर टाकी बसवणे निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे मग टाकी बसवायची तर कुठे ? घरात पाण्याची टाकी ही माळ्यावर बसवायची असल्यास दक्षिण पश्चिम दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा शास्त्रकारांनी अधिकृत सांगितलेली आहे. ज्यांना ह्या नैऋत्य दिशेत टाकी बसवणे शक्य आहे त्यांना ह्या दिशेचा असा उत्तम उपयोग करून घेता येऊ शकतो. 

मुंबईत प्रत्येक फ्लॅटमध्ये हे शक्य होइलच असे नाही. आधीच जागेची कमतरता त्यात स्वयंपाकघराला फार न्याय मिळालेलाच नसतो. गेल्या एका लेखात मी सांगितले होते की हल्ली जागेच्या अभावामुळे स्वयंपाकघर हे अगदी घराच्या पॅसेजमध्ये असते आणि जिथे मूळ किचन असावे तिथे लोकं बेडरूम बनवून घेतात. त्यामुळे अशावेळी  जिथे जागा मिळेल तिथे टाकी बसवावी लागते. अशा वेळी ह्याचे वाईट परिणाम मिळू नयेत ह्याकरिता वास्तुशास्त्राप्रमाणे  काही परिहार असू शकतो तो जाणकारांकडून नक्की समजून घ्या आणि तसे उपाय वास्तूत करून घ्या. कारण पंचतत्वांचा (अग्नि,पृथ्वी,वायू,जल,आकाश)balance बिघडल्यास वास्तूतील वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. 

वास्तूतील पाण्याची टाकी शास्त्राप्रमाणे कुठे असावी आणि कुठे नसावी ? जमिनीखाली आणि जमिनीवर ह्याबद्दलचा जनमानसांत जो गैरसमज आहे तो ह्या लेखाद्वारे निश्चितच राहणार नाही अशी मी अशा करते. 




मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

करिअरची सुरवात आणि कुंडली

करिअरची सुरवात आणि कुंडली


दहावीच्या परीक्षा झाल्या आणि पालक मुलांच्या कुंडल्या घेऊन यायला सुरवात झाली. गेल्याच आठवड्यात  सुयशचा फोन आला होता. मुलीच्या कुंडलीबाबत भेटायला कधी येऊ हा त्याचा प्रश्न. मुलीची दहावीची परीक्षा झालीये आता पुढे काय हा मोठा प्रश्न घेऊन सुयश, त्याची पत्नी आणि मुलगी माझ्याकडे आले. सुयश आणि त्याची पत्नी नावाजलेल्या IT कंपनीत उच्च पदावर. मुलीच्या कुंडलीत शुक्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात. वृषभ लग्नाची कुंडली. चंद्र सुद्धा वृषभ राशीतच. पुढील येणाऱ्या दशा पाहता मुलगी कलेचे शिक्षण घेऊन त्यात प्रगती करेल असे दिसते. त्यामुळे तिला School Of Art मध्ये Graphic Designer  किंवा Photography चे शिक्षण द्यावे असे कुंडली सांगतेय. सुयशला तसे सांगितल्यानंतर त्याचा थोडा हिरमोड झाला कारण त्यांना Art ह्या शिक्षणाबद्दल कसलीही कल्पना नव्हती. त्यांना मुलीने IT किंवा तत्सम क्षेत्रातच शिक्षण घेऊन एक निश्चित भविष्य बनवावे अशी इच्छा.  परंतु माझे बोलणे ऐकल्यावर मुलीची कळी लगेच खुलली. तिला फोटोग्राफीत खूप इंटरेस्ट आहे. तिला त्यातच शिक्षण घ्यायचे आहे. परंतु आई -बाबांपुढे ती काही बोलू शकत नव्हती. सुयश आणि त्याच्या पत्नीला समजावले. कुंडली जरी कलेचे शिक्षण घ्या हे सांगत असली तरी तुम्ही Aptitude Test करून घ्या म्हणजे खात्री होईल. त्याप्रमाणे त्यांनी ती Test करून घेतली आणि त्या analysis मध्ये सुद्धा कलेचे म्हणजेच फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनींगचे शिक्षण घेण्याबाबत सुचवले होते. म्हणजेच मुलीचा कल कुठे आहे हे Aptitude Test ने आणि कुंडलीने अचूक दर्शवले होते. त्यानंतर हे दांपत्य पुन्हा भेटण्यास आले तेंव्हा सुयशच्या पत्नीने मुलीला लहानपणापासूनच चित्रकला,क्राफ्ट ह्याची किती आवड आहे हे सांगत होती. आता दहावीच्या निकालानंतर तिला ह्या क्षेत्रात शिक्षण घेऊ द्यावे ह्यांवर दोघांचे एकमत झाले. त्यांना तिच्या पुढील शिक्षण आणि करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. कारण हे शिक्षण घेऊन ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल का ? ही काळजी सुयशच्या पत्नीने दर्शवली. अर्थात प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते की आपल्या मुलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असावे आणि त्यात काही गैर नाही. तिच्या येणाऱ्या पुढील महादशा आर्थिक दृष्ट्या तिला फायदेशीर ठरणार आहेत हे त्यांना सांगितले. समाधानाने दोघांनी माझा निरोप घेतला.

अशीच एक कुंडली आली होती १० वर्षांपूर्वी. बुध शनिच्या मकर राशीत. शनि तूळेचा. Financeचा कारक ग्रह गुरु शनिच्या अनुराधा नक्षत्रात. रवि कुंभेचा. सगळीकडे बुध,गुरु आणि शनि combination. हे सर्व C.A. च्या शिक्षणासाठी उपयुक्त वाटत होते. पुढील महादशा सुद्धा रविचीच. खात्री करावी म्हणून दशमांश कुंडलीसुद्धा तपासली. दशमांशावरून जातकाच्या करिअरची कल्पना येते. ह्या दशमांश कुंडलीतही बुध आणि गुरु धनु (गुरुची राशी) राशीत,शनि मकरेत दशम स्थानात. आज ती मुलगी C.A. चे शिक्षण पूर्ण करून नावाजलेल्या फर्ममध्ये पार्टनर आहे.

वकील किंवा L.L.B. चे शिक्षण घेण्यासाठी शनि, राहू,बुध,मंगळ ह्यांचं combination चांगलं असावं. शनि म्हणजे सातत्य किचकट अभ्यास. कायद्याचा अभ्यास हा खूप किचकट आहे. राहू हा ग्रह imagination किंवा illusion चा कारक आहे. सत्य -असत्यचा आभास म्हणजे राहू. त्यामुळे हा ग्रह सुद्धा कुंडलीत दमदार असावा. बुध हा common sense आणि वाणीचा कारक. वकिलांना त्यांचा कॉमन सेन्स सतत जागृत ठेवावा लागतो. मंगळ कुरघोडी करणारा ग्रह. त्यामुळे तो तर हवाच. ह्या combination बरोबर चंद्रही खंबीर असावा. तर यश तुमचेच. बऱ्याचशा वकिलांच्या कुंडलीत हेच combination मिळाले आहे.

 


कुंडलीतल्या ग्रहांच्या combinations वरून मुलांचा शैक्षणिक कल लक्षात नक्कीच येतो. त्यांचा स्वभाव,त्यांची ग्रहणशक्ती,आकलनशक्ती आणि जे समजलंय ते उत्तरपत्रिकेत व्यवस्थित मांडण्याचं कौशल्य हे आपण कुंडलीवरून नक्कीच जाणून घेऊ शकता. पुढील महादशा तिला तिने घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग होणार किंवा नाही ह्याबद्दल मार्गदर्शन करतात. काहीवेळेस असेही पाहण्यात येते की शिक्षण डॉक्टरकीचे परंतु करिअर ऍक्टिंगमध्ये. नावाजलेल्या नावांपैकी निलेश साबळे,श्रीराम लागू,काशिनाथ घाणेकर,गिरीश ओक. सर्वांचेच करिअर खूप दमदार आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीतही असेच आहे का हे पडताळून पाहता येईल.

४ ते पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे एक डॉक्टर आल्या होत्या. नुकतंच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरु होती. पुढे कुठले शिक्षण घेऊ ह्यांवर मार्गदर्शनासाठी आल्या होत्या. कुंडलीतील केतू,गुरु,मंगळ आणि महादशा हे बघून Oncology करावी असा सल्ला दिला होता. त्यांचीही तीच इच्छा होती. त्यांनी त्यात शिक्षण घेऊन आज त्यांची प्रॅक्टिस सुरु आहे.

मागे एका केसमध्ये मुलाला राहू महादशा होती त्यावर article लिहिले होते. राहू महादशेत मुलांचे अभ्यासातील लक्ष विचलित होते असे observation आहे. मुलाची आई कुंडली घेऊन आली होती. मुलाला वडील नाहीत त्यामुळे धाक असा नाहीच. त्यात मुलगा वाया जातो की काय ही त्या माऊलीला काळजी. तेंव्हा कुंडलीच्या अभ्यासावरून ह्या मुलाला काही instrumentsची आवड आहे का म्हणून विचारले होते. तेव्हा त्याच्या आईने कॅसिओ खूप चांगल्या प्रकारे वाजवतो ही माहिती दिली होती. कलेच्या शिक्षणासाठी राहू तर नक्कीच वरदान ठरेल. कारण राहू महादशा असते १८ वर्षांसाठी. ह्या १८ वर्षात मुलाने काही शिक्षणच घेऊ नये का ? तर नाही. राहुशी निगडीत आणि त्याच्या कुंडलीच्या अभ्यासाने त्याला एखाद्या क्षेत्रात नक्कीच यश मिळू शकेल. मग ह्याला कॅसिओमध्ये शिक्षण घेण्यास सांगितले. सध्या कॅसिओ वाजवण्यासाठी काही प्रोग्राम अथवा आर्केस्ट्रामध्ये जातो.

हल्ली करिअरचे ऑपशन्स खूप जास्त आहेत. २० वर्षांपूर्वी टी. व्ही. सिरिअल्स एवढ्या चालतील आणि त्यामुळे बऱ्याच ऍक्टर्स,डायरेक्टर्स,प्रोड्युसर्स,स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांना,मेकअप आर्टिस्ट,एडिटर ना scope आहे असे सांगितले असते तर विश्वास बसला नसता. फक्त ह्यांच क्षेत्रात असे चित्र नसून मेडिकलमध्येही Oncology (कँसर स्पेशियालिस्ट),IVF शी निगडीत शिक्षण घ्यावे असे वाटलेही नसेल परंतु आज ह्या डॉक्टर्सकडे प्रचंड गर्दी असते. सामान्य लोकांना ह्या स्पेशियालिस्ट डॉक्टर्सची गरज आहे.

तुमच्या मुलाची कुंडली काय सांगते हे नक्की तपासून पहा. कारण काही वेळेस पालकांच्या अट्टाहासामुळे मुलं सायन्स करू पाहतात परंतु अकरावीतच अभ्यास झेपत नाही ह्या कारणावरून मग कॉमर्सकडे वळवले जाते. आधीच जर कल्पना आली तर तुमचा आणि तुमच्या पाल्याचा वेळ नक्की वाचेल. पहा विचार करून !!

रविवार, २१ एप्रिल, २०१९

Shri Lanka Blast

नमस्कार,

आज श्रीलंकेत सकाळी ८.४५ च्या दरम्यान सिरीयल ब्लास्ट झाले. अतिशय दुःखदायक घटना आहे. दुःखाबरोबरीनेच धक्कादायक सुद्धा आहे. का आणि कशासाठी हे प्रश्न मनात येतातच. मुख्य म्हणजे हे ब्लास्ट मानवी बॉम्बद्वारे घडवून आणण्यात आले. लवकरच पुढील माहिती समोर येईल. ही घटना घडल्यावर माझ्या व्हिडिओच्या दर्शकांनी ताबडतोब मला मेसेजेस पाठवायला सुरवात केली. २० मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या माझ्या व्हिडिओमध्ये तत्सम गोष्टींचे अंदाज दिले होते. ह्या काही महिन्यांत अशाच काहीशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि घटना एकाच व्यक्तिवर परिणाम करणार नसून एक साथ बऱ्याच व्यक्तिंवर ह्याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ह्यातील तीन ब्लास्ट हे चर्चमध्ये झालेत. ह्या दोन्ही गोष्टी मी त्यात नमूद केल्या होत्या.  पुन्हा एकदा ग्रहांनी दर्शविलेला धोका खरा ठरला. 
त्या व्हिडिओची लिंक देत आहे - 


ज्योतिष प्रेमींसाठी वि. टी. - आज गुरु वक्री असून,नक्षत्रसुद्धा गुरुचेच आहे - विशाखा. ह्या पुढे शनिवार,गुरुवार, शनि -गुरूच्या नक्षत्रात चंद्र असतांना अशा घटना घडतील. लक्ष ठेवा.  

अनुप्रिया देसाई - ज्योतिष वास्तू विशारद  
www.kpastrovastu.com 

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

गंडांत योगातील गुरु

गंडांत योगातील गुरु

गुरु सध्या गंडांत योगात आहे. गंडांत हा शब्द ऐकूनच सामान्य व्यक्तिला भीती वाटणे स्वाभाविक आहे. परंतु गंडांत ह्याचा अर्थ फार वेगळा आहे. ह्या व्हिडिओत ह्याचा अर्थ आणि गुरूच्या राशीबदलमुळे इतर राशींवर होणार परिणाम सांगितला आहे. मागच्या व्हिडिओत राशीवर बोलणे झाले होते म्हणजेच नोकरी,करिअर,लग्न इ. बाबतीत सांगितले होते. ह्यावेळेस गुरूच्या राशीबदलचा तुमच्या तब्येतीवर काय परिणाम होणार आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे ह्याची कल्पना ह्या व्हिडिओवरून नक्कीच तुम्हांला येईल. -

https://www.youtube.com/watch?v=rX3V4WOm22g

अनुप्रिया देसाई - ९८१९०२१११९ (संध्या ६.०० ते ८.०० ह्या वेळेतच फोन करणे)
ज्योतिष -वास्तू विशारद. 

बुधवार, २० मार्च, २०१९

शनि केतूची युती २०१९

नमस्कार वाचकहो,
शनि केतूची युती २०१९ साठी महत्त्वाची ठरणार आहे. निवणुका जवळ आहेत. होणारी ही युती धनु राशीत रवीच्या नक्षत्रात आहे. रवी हा "Politics" चा कारक. ही युती प्रत्येक राशीला फळ देण्याऐवजी सामूहिकपणे फळ(ह्याला Collective Destiny म्हणतात.)) देणार आहे ह्याचे कारण ह्या युती बरोबर प्लूटो सुद्धा आहे. प्लूटो हा समूहाचा कारक आहे त्यायोगे घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 


अनुप्रिया देसाई (9819021119)
ज्योतिष -वास्तू विशारद 


बुधवार, ६ मार्च, २०१९

अनावश्यक वाढलेले वजन आणि तुमची कुंडली

अनावश्यक वाढलेले वजन आणि तुमची कुंडली

वाढलेल्या वजनाबद्दल सध्याची पिढी ही सजग आहे. दिक्षित आणि दिवेकर ह्यांत काही जण confused आहेत तर काही जण जिममध्ये जाणे पसंत करीत आहेत. काहीजणांसाठी "योगासेही होगा" हे ब्रिदवाक्य चपखलपणे बसतंय. आपण छान दिसावं हे सर्वांनाच वाटतं परंतु त्यासाठी प्रयत्नशील मात्र काहीजणच आहेत. वाढलेले वजन (Fat )आणि लठ्ठपणा (Obese ) ह्यांत फरक आहे. लठ्ठपणाची पहिली पायरी म्हणजे वाढेलेले वजन. ह्या लठ्ठ्पणानंतर शारीरिक व्याधी जडायला सुरवात होते.  त्यामुळे वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे. वाढत्या वजनामुळे हॉर्मोन्स,मधुमेह,हार्निया,हृदयरोग इ. व्याधी जडतात. ह्या वाढलेल्या वजनाचा आणि कुंडलीचा काय संबंध हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. कुंडलीवरून तुमच्या मानसिक आणि शारीरिक जडणघडणाची कल्पना येते. एखाद्या लहान मुलाच्या कुंडलीवरून त्याची शारीरिक चण पुढे कशी असेल हे नक्कीच सांगता येऊ शकते. कालच टी. व्ही.वर एक प्रोमो पाहिला. त्यांत मुलगी म्हणते,"कुंडल्या तर जुळतील पण स्वभाव ?" कुंडली मुळातच आहे तुमचा स्वभाव ओळखण्यासाठी. तुम्ही जे लपवून ठेवू शकता ते सर्व कुंडली विवेचनाने वाचता येऊ शकते. एखादी व्यक्ति पहिल्या -दुसऱ्या भेटीत ते स्वतः किती तापट किंवा रागिष्ट आहेत हे तुम्हांला सांगणार नाहीत पण हेच कुंडलीवरून लगेच सांगता येऊ शकते. स्वभावाप्रमाणेच तुमच्या शरीरस्वास्थ्याबद्दल कुंडली बरेच काही सांगू शकते. तुम्हांला असणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी तुम्ही लपवू शकाल परंतु कुंडली हे लपवू शकत नाही. तुमच्या स्वभावाचा पूर्ण कच्चा-चिठ्ठा म्हणजेच कुंडली. मनाप्रमाणेच शारीरिक ठेवणंही कुंडलीवरून लक्षात येते. ते कसे ते पाहू.


लठ्ठपणा हा तुमच्या वाढत्या चरबीवर अवलंबून आहे. गुरु हा मेदवृद्धीकरक आहे. गुरूचा अंमल यकृत (Liver ),चरबी, रक्तातील साखर आणि cholesterol वर आहे. गुरु ग्रहाचा अभ्यास केल्यास गुरु हा सर्व ग्रहांमध्ये आकारमानाने फार मोठा आहे.

गुरु म्हणजे -  ‘वाक् धोरणी मंत्र याग तंत्र नैतिक गज तुरंग यानिगमबोधकर्मपुत्रसंपन्जीवनोपाय कर्मयोग सिंहासनकारको गुरूः’. 
अर्थात - गुरु हा ज्ञान,  ज्ञानसुख, संपत्ती, वैभव, हत्ती, घोडे वगैरे राजवैभव, संतती, राजकारणकुशलता, शहाणपण, अध्यापकत्व,परमार्थप्राप्ती, दातृत्व, पुण्यकर्म, तीर्ययात्रा,साधु समागम, योगमार्ग, दीक्षा, दीर्घायुत्व, इत्यादी गोष्टींचाही कारक ग्रह मानला गेला आहे. 
अशा ह्या गुरूचा अंमल तुमच्या कुंडलीत कुठल्या स्थानांवर आहे ? तो कुठल्या राशीत आहे ह्यांवरून लठ्ठपणा ठरतो. गुरु जर शुक्राच्या राशीत असेल, शुक्राबरोबर असेल, चंद्राबरोबर असेल तर तुमच्या शरीरात चरबी प्रमाणापेक्षा जास्त असू शकते. तुमची राशी धनु,मीन असून जर तुमचा राशी स्वामी गुरु ह्या ग्रहांबरोबर असेल तर तुम्हांला वजन कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल.
गुरूप्रमाणेच शुक्र हा सुद्धा शरीरातील अतिरिक्त वजन वाढवण्यास मदत करतो. शुक्राचा अंमल असणाऱ्या व्यक्तिंमध्ये आळस असतो. सुख-भोगविलास हा स्वभाव असल्याने जेवल्यानंतर लगेच कामाला सुरवात करणे, चालणे हे टाळले जाते. त्यामुळे जेवणानंतर आहाराचे रूपांतर चरबीत (गुरु)होण्यास शुक्र मदत करतो. शुक्रप्रधान व्यक्तिंनी जेवण हे एकाच वेळीस करू नये. जेवण हे Installment मध्ये केल्यास फायदा होऊ शकेल. ह्यामुळे जेवणानंतर येणारा आळसही येणार नाही. जेवल्यानंतर थोडे चालणे असावे. ह्याचे कारण असे की शुक्र हा वायुतत्वाचा ग्रह आहे. शुक्राच्या दोन राशी आहेत. वृषभ आणि तुळ. वृषभ राशीत जर तुमचा चंद्र,शुक्र किंवा गुरु असल्यास व्यक्ति सडपातळ असणे अपवादात्मकच आहे. अशी स्थिती तुमच्या कुंडलीत असल्यास सडपातळ होणे शक्य नाही. त्यामुळे बारीक होण्यापेक्षा वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवून बांधा योग्य प्रमाणात राहील ह्यांवर लक्ष द्या.
शुक्रप्रधान व्यक्ति म्हणजे ज्यांची राशी वृषभ किंवा तुळ आहे. ज्यांचे जन्मलग्न वृषभ अथवा तुळ आहे. लग्नात शुक,चंद्र,गुरु हे ग्रह आहेत. चंद्र हा शुक्राच्या नक्षत्रात,चंद्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र स्वतःच्याच तुळ अथवा वृषभ राशीत आहे राशीत आहे. अशी कुंडलीतील स्थिती म्हणजे व्यक्ति शुक्रप्रधान असणे. अशा व्यक्तिंना वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असते. गोड आणि दुग्धजन्य( पनीर-चीझ),मांसाहार हा प्रिय असतो. अशा व्यक्तिने वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे. नियमित व्यायाम न केल्यास Obesityचा सामना करावा लागतो. ह्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सायकलिंग,जिम किंवा किमान सूर्य नमस्कार रोजच्या नित्यक्रमात असावेत.
शुक्रानंतर लठ्ठपणासाठी कारक असलेला ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. शरीरातील पाण्यावर चंद्राचा अंमल आहे. शरीरातील हॉर्मोन्सचा कारक ग्रह चंद्र आहे. चंद्र लग्न स्थानात असणे,शुक्राबरोबर असणे, उच्च राशीत असणे म्हणजे चंद्राचा कुंडलीवर असणारा अंमल दर्शवतो. अशी स्थिती वजन वाढवण्यासाठी पूरक ठरते. चंद्र प्रधान व्यक्ति ह्या मुळातच हळव्या स्वभावाच्या असतात. दुसऱ्या व्यक्तिने जराही काही नकारत्मक बोलणे म्हणजे गंगा -जमुना डोळ्यातून उगम पावल्याच म्हणून समजा. स्वतःच्या आयुष्यातील चढ -उताराचा सामना करीत असतांनाच दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःखावर सतत विचार करीत राहणारी व्यक्ति म्हणजे चंद्रप्रधान व्यक्ति. पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवणे आणि मग त्याच व्यक्तिकडून फसवणूक अशामुळे ह्या चंद्रप्रधान व्यक्तिंना  नैराश्य (depression), दुःख,चिंता,anxiety अशा गोष्टींचा सामना सतत करावा लागतो.  मनावर होणाऱ्या परिणामाचे रूपांतर वाढत्या वजनात होऊ शकते. त्यामळे तुमच्या रागावर, नैराश्यावर, anxietyवर त्वरित उपचार करून घेणे. Meditation, योगाभ्यास, Counselling ह्यामुळे अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यांत आणता येईलच परंतु हॉर्मोन्स संदर्भातही तुम्हांला चांगले परिणाम मिळू शकतील.
वजन कमी करण्यासाठी मंगळ ह्या ग्रहाचे उपाय करायला हवेत असं मला वाटतं. मंगळाचे उपाय म्हणजे शारीरिक कसरत. चालणे,धावणे,व्यायाम,सायकल चालवणे हे मंगळाच्या अंमलाखाली येणारे उपाय. परंतु हे उपाय सर्वांनाच जमू शकतील असे नाही त्यामुळे तुमची कुंडली तपासून कुठल्या उपायांचा अवलंब करायला हवा ते व्यवस्थित समजून घ्या. वजन कमी करणे फक्त हेच लक्ष्य न ठेवता कमी झालेले वजन नियंत्रणताही ठेवता आले पाहीजे. त्यासाठी सातत्य हवे. सातत्य म्हणजेच Continuity. व्यायाम,मेडिटेशन,योग ज्या कुठल्या उपायांचा तुम्ही अवलंब केला आहे त्यात सातत्य ठेवा म्हणजे वजनावर नियंत्रण राहील.  

हा लेख सामना मध्ये ०६/०३/२०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 


अनुप्रिया देसाई 

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

राजकारणातील यश आणि कुंडली

राजकारणात यश मिळेल का ? 

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी बरेच जण मला राजकारणात यश आहे का ? मी राजकारणात जाऊ का ? माझे बरेचसे मित्र राजकारणात आहेत. मलाही जावेसे वाटतेय. मला निवडणुकीत तिकीट मिळेल का पासून ते मी निवडणूक जिंकेन का ? हे प्रश्न विचारले जात आहेत. काही जण ह्यात यशस्वी ठरतात तर काही जणांना हार मानावी लागते. मुळात कुंडलीत जर राजकारणात यश हा योग असेल तर तुम्हांला दिल्ली गाठायला वेळ लागणार नाही. काही वेळेस दिग्गज नेते निवडणुकीत हरतात तर राजकारणात नवखी असलेली व्यक्ति बाजी मारून जाते.
तुमच्या कुंडलीत जर राजकारणात यश मिळणारे योग असतील तर तुम्ही राजकारणात यश संपादन कराल. राजकारणात यशस्वी होण्यासाठी मुख्यत्वे रवि,शनि,मंगळ,राहू आणि बुध ह्या ग्रहांची साथ हवी. ह्या ग्रहांबरोबरच लग्न स्थान,दशम स्थान,षष्ठ स्थान,पराक्रम स्थान,अष्टम आणि लाभ स्थान ह्याची जोड असावी. स्थान आणि ग्रह ह्याच बरोबरीने सिंह,मेष,वृश्चिक राशी ह्यांचा प्रभाव मोठमोठ्या राजकारण्यांच्या कुंडलीतून दिसून येतो.

रवि - रवि म्हणजेच सूर्य. आपल्या ग्रहमालेतील महत्त्वाचा तारा म्हणजे सूर्य. सर्व ग्रह सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्य भोवती फिरतात ज्यामुळे ग्रहमाला स्वतःचे कार्य कुशलतेने करू शकते. थोडक्यात हा सूर्य "Leadership" चे कार्य करीत आहे. रवि म्हणजे नेतृत्व. नेता हा पक्षाचे नेतृत्व करीत असतो. हे नेतृत्व करणे तेवढे सोपे नाही. सर्वांचे ऐकून,सर्वांना सांभाळून घेऊन, सर्वांकडून कार्य करवून घेणे,महत्त्वाचे निर्णय घेणे,दूरदृष्टी ठेवणे आणि पक्ष चालवणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. नेतृत्व गुण नसतील तर असे कित्येक राजकारणी आले आणि तसेच गेले. सर्वांना धरून ठेवण्याचे कसब हे हवेच. हे फक्त रविच करू शकतो. तुमच्या कुंडलीत रविचे स्थान,राशी बलवत्तर असावे. हाच रवी जेंव्हा राजकारण्यांच्या कुंडलीत तपासला तेंव्हा तो कधी लग्नात (तनु स्थानात ),दशमेश किंवा दशमवर दृष्टी असणारा,कधी स्वतः लाभ स्थानात किंवा लाभावर दृष्टी असणारा आढळला. आज मी विविध पक्षातील माननीय राजकारण्यांच्या कुंडलीतून हे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे,शरद पवारजी,पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल ह्यांच्या कुंडल्या मी इथे नमूद करीत आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत रविची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. Leadership Qualities निश्चितच आहेत. रवि हा शनिच्या मकर राशीत आहे. दीर्घकाळ चालणारा पक्ष. शरद पवारांच्या कुंडलीत रवि दशमेश असून लग्न स्थानात मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत रवि दशमेश असून लाभ स्थानात आहे तर सोनियांच्या कुंडलीत रवि मंगळाच्या वृश्चिक राशीत असून त्याची लाभ स्थानावर दृष्टी आहे. अरविंद केजरीवालांच्या कुंडलीत रवि स्वतःच्याच सिंह राशीत असून त्याची दशमावर दृष्टी आहे.

शनि - रवि खालोखाल दुसरा बलवान ग्रह असावा शनि. शनि म्हणजे सातत्य. शनि म्हणजे चिकाटी. शनि हा कष्टाळु आहे. दीर्घकाळ चालत आलेल्या गोष्टींचे प्रतिनिधित्त्व शनि करतो. पक्ष स्थापन करणे सोपे आहे तो पक्ष दीर्घकाळ राजकारणात टिकवून ठेवणं सोपे नाही. असा शनि तुमच्या कुंडलीत असेल तर सातत्याने एक पक्ष चालवणे, चिकाटीने-नेटाने एखादे कार्य करणे सोपे होते. तुमच्यातच जर धरसोड वृत्ती असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे शनि बलवान हवाच.
बाळासाहेबांच्या कुंडलीत शनि पराक्रम स्थानात असून दशमेश बुधावर शनिची दृष्टी आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत शनि दशमात आहे. शरद पवारांच्या कुंडलीत षष्ठातल्या शनिची लग्नेश मंगळावर दृष्टी आहे. सोनिया गांधींच्या कुंडलीत शनि लग्न स्थानातच तर केजरीवालांच्या कुंडलीत शनि षष्ठ स्थानावर दृष्टी आहे.

मंगळ - मंगळ म्हणजे Strength. मंगळ म्हणजे तडफदारपणा. लाजणे,भिडस्तपणा,लाडिकवाळ बोलणे हे मंगळाला आवडत नाही. मंगळाचे बोलणे म्हणजे एक घाव दोन तुकडे. मंगळ म्हणजे निडरपणा. तुम्ही चुकीचे वागलात हे तुम्हांला फक्त मंगळ व्यक्तिच सांगू शकते. त्यावेळी तुमचा हुद्दा -वय ह्या सर्वांचा मंगळप्रधान व्यक्ति विचार करीत नाहीत. पक्षाचा नेताही असाच असावा. निडर. पक्षाच्या नेत्यांना धमकीवजा बरेच फोन/संदेश येत असतात. ही धमकी कधी विरोधी पक्षाकडून असू शकते किंवा अंडरवर्ल्डकडून. परंतू आपले कार्य आपण निडरपणे करत राहणार तो म्हणजे मंगळ. अशा मंगळाची साथ कुंडलीला जरूर हवी.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत मंगळ मेषेचा (स्वराशीचा) आणि तो ही अष्टमात. अष्टमातून लाभ आणि पराक्रम स्थानावर दृष्टी. कुंडलीत मंगळाची अशी स्थिती नसती तर ते नवलच होते. मंगळ जेंव्हा अष्टमात असतो किंवा त्याची दृष्टी अष्टमावर तेंव्हा ती व्यक्ति निडर असतेच परंतु risk घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. बाळासाहेब अत्यंत निडर असे व्यक्तिमत्त्व. आपल्या भाषणात मोठंमोठ्या नेत्यांबद्दल बोलतांना ते कधीही कचरले नाहीत. किंबहुना बाकी नेत्यांवर बाळासाहेबांचे दडपण असायचे. बाळासाहेबांचा दराराच तसा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असायचा. पंतप्रधान मोदींच्या कुंडलीत हा मंगळ वुश्चिकेचा  (स्वराशीचा) चंद्राबरोबर असून लग्न स्थानात आहे. मंगळाची दृष्टी सप्तमावर आणि अष्टमावर आहेच. त्यांचा दराराही आहेच. पवारांच्या कुंडलीत मंगळ लग्नेश असून व्ययात आहे. व्ययातून षष्ठ स्थानावर,चंद्र,गुरु आणि शनिवर दृष्टी. षष्ठ स्थान हे सातत्याने कार्य करण्याचे स्थान. त्यांची कार्यपद्धती सर्वांना ज्ञात आहेच. सोनियाजींच्या कुंडलीत मंगळ हा षष्ठ स्थानात धनु राशीचा आहे. षष्ठ स्थान स्थानातून व्ययात असलेल्या चंद्रावर आणि लग्नातील शनिवर दृष्टी. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर राजकारणात प्रवेश केला. त्या राजकारणात चुकीचं वागल्या की बरोबर हा ज्योतिषशास्त्राचा मुद्दा आता नाही. विदेशात आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. हिंदी भाषेचा गंध नव्हता. हिंदी भाषा चिकाटीने शिकून घेतली. पेहरावात बदल केला. त्यांचाही दरारा पक्षात आहेच. केजरीवालांच्या कुंडलीत कर्केचा मंगळ पराक्रम स्थानात आहे. मंगळाची दृष्टी दशम स्थानावर आहेच. दशम स्थान हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचे. पक्षाचे नेतृत्व जरी करीत असले तरी त्यांचा दरारा आहे असं म्हणता येणार नाही.

राहू - जनसामान्यांसाठी राहू म्हणजे वाईट फळे देणारा. खरंतर तसं नाही. राजकारणी व्यक्ति,फिल्म -सीरिअल इंडस्ट्रीतील व्यक्ति इ. व्यक्तिंच्या कुंडलीत राहू सुस्थित असल्यास प्रगती लवकर होते. राहू म्हणजे प्रभाव. आपल्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकणे हे काम राहूचे. ज्यांच्या कुंडलीत राहू बलवान अशा व्यक्तिंचा जनसागरावर लगेचच प्रभाव पडतो. त्यांचे Followers सुद्धा जास्त असतात.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत दशमात मिथुन राशीचा. दशम स्थान हे राजकारणी व्यक्तिंसाठी महत्त्वाचे आहेच परंतु इथे मिथुन राशीतील राहू आहे. मिथुन राशी ही बोलण्याशी संलग्न आहे. मिश्कीलपणे बोलणे,हजरजबाबी असणे हे मिथुनेचे गुण. हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेबांना संपूर्ण महाराष्ट्रने भरभरून प्रेम दिलं. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी होणारी गर्दी,दसरा मेळावा म्हणजे राहूच्या प्रभावाची उत्तम उदाहरणे. मोदींच्या कुंडलीत हाच राहूची पंचमातून लाभ स्थानावर दृष्टी. गंमत म्हणजे शरद पवारांच्या,सोनियाजींच्या आणि केजरीवालांच्या कुंडलीत राहू स्वतः लाभ स्थानातच. म्हणजेच जनसागर आहेच पण त्याला दशमातल्या मिथुनेतल्या राहूची तोड नाही.

बुध - वरील सर्व ग्रहांबरोबरच बुध हा ग्रह सुद्धा राजकारणात प्रवेश करणार असाल तर सुस्थितीत, बलवान असावा. बुध म्हणजे बुद्धी. बुध म्हणजे तुमची सद्सदविवेकबुद्धी(Common Sense). कुठल्याही परिस्थिती सद्सदविवेकबुद्धीने चोखपणे निर्णय घ्यावे लागतात. हे कुंडलीत सुस्थित असलेल्या बुधामुळे शक्य आहे. बुध हा वाणीचा सुद्धा कारक ग्रह. तुम्ही प्रभावीपणे बोलू शकाल का ? हे कुंडलीतील बुधाच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमचे बोलणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे बुधाचे कार्य. बोलतांना जीभ घसरणे हे कुंडलीतील बुधाची स्थिती काही चांगली नाही हे दर्शवते. असा बुध जेंव्हा रविच्या सान्निध्यात येतो तेंव्हा त्या व्यक्तिचे बोलणे अत्यंत प्रभावी असते. बहुतांश राजकारण्यांच्या कुंडलीत असा योग नसल्याने त्यांची भाषणे तेवढी प्रभावी ठरत नाहीत. बुध आणि रवि ह्यांची जेंव्हा अंशात्मक युती होते तेंव्हा त्याला "बुधादित्य योग" म्हटले जाते. हा योग असणाऱ्या व्यक्तिचे बोलणे प्रभावी असतेच. त्यांना संभाषणकाला चातुर्य नैसर्गिकरित्या असते. त्यांच्या बोलण्याची छाप जनसामान्य लोकांच्या मनावर लगेच पडते.
बाळासाहेबांच्या कुंडलीत असा "बुधादित्य योग" आहे. पंचम स्थानात हा योग असून लाभ स्थानावर दृष्टी आहे. मिश्कीलपणे बोलणे. बोलण्यातून लोकांवर छाप पाडणे,लोकांपर्यंत विषय प्रभावीपणे जाणे हे बाळासाहेबांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. मोदींच्या कुंडलीत "बुधादित्य योग" लाभ स्थानातच आहे. पवारांच्या कुंडलीत हा योग नसला तरी रवि आणि बुध हे लग्न स्थानातच आहेत. (अंशात्मक युती नाही.)सोनियाजींच्या कुंडलीतसुद्धा हा योग नाही परंतु रवि आणि बुधाची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे बोलणे फार प्रभावी नाही. लोकांवर छाप पडणारे तर नक्कीच नाही. मिश्कीलपणा Totally Absent. केजरीवालांच्या कुंडलीत बुधादित्य योग आहे. त्यांच्या राजकारणात येण्याआधीची भाषणे पाहिली तर लोकांवर त्यांचा पडणारा प्रभाव लक्षात येईल. लोकांची मनं त्यांनी तेंव्हा जिंकली खरी परंतु काही कारणामुळे लोकांच्या मनातील स्वतःचे स्थान त्यांना टिकवता आले नाही. ह्यावर अजून विश्लेषण करता येईल परंतु आपला आजचा हा विषय नाही.

तर वाचकांनो हे सर्व योग तुमच्या कुंडलीत असतील आणि योग्य महादशांचा लाभ मिळाला तर राजकारणात नुसताच प्रवेश नव्हे तर ह्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल आणि नावलौकिक मिळेल.

कसा वाटला आजचा लेख. जरूर कळवा.

अनुप्रिया देसाई (ज्योतिष वास्तू विशारद )
९८१९०२१११९
वेबसाईट - www.kpastrovastu.com












मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

भारताचे पुलवामा भ्याड हल्ल्याला चोख उत्तर


भारताचे पुलवामा भ्याड हल्ल्याला चोख उत्तर 

आज भारताच्या वायुदलाने POK वर हल्ला केला. पुलवामा भ्याड हल्ल्याला भारताचे आज प्रत्युत्तर. आजचा दिवस आणि कुंडली अभ्यासनीय आहे. ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्यासाठीच.  कुंडली आज पहाटे ३.३० काश्मीर इथली आहे. 

१) धनु लग्न आणि ते ही केतूच्या नक्षत्रात. केतू कस्पने धनु राशीत येतो. येणाऱ्या काही काळात केतू-शनि-प्लुटो युती बरेच काही घडवून आणणार आहे. त्या दृष्टीने आजची घटना फार महत्त्वाची. 

२) चंद्र व्ययात वृश्चिक राशीत शनिच्या अनुराधा नक्षत्रात. चंद्र स्वतः अष्टमेश. 

३) मंगळाची दृष्टी अष्टम आणि व्यय स्थान,चंद्रावर. मंगळ हा हल्ल्याचा कारक ग्रह आहे. 

४) लग्नात शनी प्लुटो युती लग्न स्थानात. 

५) आजचा वार मंगळवार. दिवसावर मंगळाचा प्रभाव. 

६) आजची तारीख २६ - एकूण ८ नंबर 

गुरु स्वतः व्ययात असणे आणि अष्टमावर दृष्टी असणे ह्यामुळे आपल्या जवानांना काहीही इजा झालेली नाही. संरक्षण मिळाले. 

आज मंगळ,शनि,प्लूटो ह्यांचा प्रभाव कुंडलीवर जाणवतो. 

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९







शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

ऑपेरेशन - कधी आणि कसे ?- कुंडलीप्रमाणे ऑपेरेशन



ऑपेरेशन - कधी आणि कसे ?- कुंडलीप्रमाणे ऑपेरेशन

ऑपेरेशन ही गोष्ट सध्या सामान्य झाली आहे. कधी ना कधी प्रत्येकाला ऑपेरेशन थिएटर मध्ये हजेरी लावावीच लागतेय. अगदी छोट्यांपासून ते प्रौढ व्यक्तिंना ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेय. कधी हार्ट सर्जरी तर कधी किडनी ट्रान्सप्लांट. कधी मोती बिंदूचे ऑपेरेशन तर कधी सिझेरिअन डिलिव्हरी. कधी गॉल ब्लॅडरचे ऑपेरेशन तर कधी गुडघ्याचे. प्रत्येक ऑपेरेशनची ईमर्जन्सी वेगळी. जेव्हा ऑपेरेशन करण्यास काही दिवसांचा अथवा महिन्यांचा अवधी असतो तेंव्हा ऑपेरेशनसाठी योग्य वेळ निवडण्याची संधी मिळू शकते.

मुळात ऑपेरेशनसाठी योग्य वेळ म्हणजे काय ? हा प्रश्न वाचकांच्या मनात आला असेलच. योग्य वेळ ह्याचा अर्थ मुहूर्त नव्हे. योग्य वेळ ह्याचा अर्थ ती व्यक्ति जिचे ऑपेरेशन होणार आहे ती व्यक्ति आणि तिचे शरीर ऑपेरेशन करून घेण्यासाठी तयार आहे का ? कुंडली म्हणजेच तुमची कुंडलिनी. तुमच्या कुंडलीवरून शरीराची ठेवण, मानसिक जडण घडण लक्षात येते. नदी परीक्षेवरून जसे आधीच्या काळी आणि हल्ली सुद्धा तुमच्यातील शारीरिक बदल,त्रास,कमतरता लक्षात येते तसेच कुंडलीवरून कॅल्शियम,आयर्न ची कमतरता, शरीराला असणारा त्रास हा कुंडलीत प्रतिबिंबित होतो. कित्येक वेळेस माझ्याकडे येणाऱ्या जातकांना त्यांना भविष्यात होणाऱ्या शारीरिक त्रासाबद्दल आगाऊ सूचना दिलेल्या खऱ्या ठरल्या आहेत. त्याचा उपयोग असा झाला की वेळीच औषधोपचार केल्यामुळे शारीरिक व्याधींना आला बसू शकला आहे. त्यात गुडघ्यांचा होणार त्रास, मूळव्याध, फायब्रॉइड्स (गर्भाशयाशी निगडित),किडनीचे त्रास हे आणि ई. सांगू शकले. त्यामुळे कुंडलीचा अभ्यास ज्यांचा सखोल आहे ते तुम्हांला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकतील. ज्योतिष सांगणे किंवा कुंडलीतून काही गोष्टी सांगू शकणे हे त्या ज्योतिषाच्या ज्ञानावर अवलंबून आहे. त्याचा अभ्यास,अवांतर वाचन,मनन -चिंतन स्वतःचा ह्या क्षेत्रातील अनुभव ह्यावर अचूक भविष्य वर्तवता येते. त्यामुळे भविष्य चुकल्यास ज्योतिष थोतांड ठरत नाही तर ज्योतिषी व्यक्तिचा अभ्यास कमी पडला असे म्हणूं शकतो.

ऑपेरेशनसाठी योग्य वेळ किंवा दिवस ठरवतांना जातकाच्या कुंडलीतील ग्रह स्थितीही तेवढीच महत्त्वाची. नाहीतर ऑपेरेशनसाठी चांगला दिवस ठरवतांना काही व्यक्ति कॅलेंडरच्या मागच्या पानावर दिलेले दिवस आणि वेळ ठरवून मोकळे होतात. तसे नको. ऑपेरेशनसाठी दिवस नक्की करताना खालील गोष्टींचा विचार व्हावा -

१) ऑपेरेशन शक्यतो शुक्ल पक्षात करावे.

२) पौर्णिमा आणि ग्रहण दिवस टाळावेत.

३) ऑपेरेशन करतेवेळी लग्न हे जातकाच्या कुंडलीला अनुरूप असावे. लग्नाधिपती अष्टमात असू नये.

४) जातकाच्या जन्म चंद्राला गोचरीचा चंद्र षडाष्टक योगात नसावा.

५) प्रश्नकुंडलातील ग्रहस्थिती काय सांगते आहे ते पहावे. ह्यासाठी एक केस आठवली ती इथे नमूद करते. दोन वर्षांपूर्वी एका जातकाने फोन केला होता तो त्याच्या मुलीच्या ऑपेरेशन संदर्भात. दोन वर्षाच्या त्या मुलीच्या हाताला कसलासा फोड आला होता. त्या फोडामुळे हाताला Infection झाले होते. हाताचे ऑपेरेशन करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. त्यावेळी मुलीच्या कुंडलीबरोबरच मी प्रश्नकुंडलीवरही भर दिला. प्रश्नकुंडलीने कुठेही ऑपरेशनचे संकेत दिले नव्हते. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही हे सांगितले. आणि घडलेही त्याप्रमाणेच. एका MRI च्या रिपोर्टसाठी ऑपरेशन थांबवले होते. तो रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी आता ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रश्नकुंडलीही तितकीच महत्त्वाची.

६) शनि,राहू आणि बुधाची नक्षत्रे टाळावीत कारण शनिची नक्षत्रे ऑपेरेशन delay करू शकतात. ऑपेरेशन वेळेत झाले तरी पेशंटला बरे होण्यास वेळ लागू शकतो. बुधाच्या नक्षत्रांमुळे एकच ऑपेरेशन दोनदा करावे लागते. ह्याचे एक उदाहरण देते - ओळखीच्या एका मित्राच्या वडिलांचे डोळ्याचे ऑपेरेशन करावे लागणार होते. ऑपेरेशनची  emergency नव्हती. त्यांना आधीपासूनच एका डोळ्याने दिसत नव्हतं. म्हणजे कित्येक वर्ष त्यांना फक्त एका डोळ्याचीच दृष्टी होती. आणि एक दिवस अचानकपणे त्यांना दुसऱ्या डोळ्यानेही दिसणे कमी होऊ लागले. त्यामुळे त्यांनी ऑपेरेशन करून घेतले. ऑपेरेशन करण्याआधी मित्राने मला फोन केला. दोन दिवसांनीच म्हणजेच येत्या बुधवारी ऑपेरेशन करण्याचे ठरवले होते. जमल्यास बुधवारी ऑपेरेशन करू नये असा सल्ला त्याला दिला. त्याने कारण विचारल्यावर बुधवार आणि  रेवती नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यावर त्याचे म्हणणे,"नाही गं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टरांची सगळी तयारी झाली आहे. म्हणजे डॉक्टर ओळखीचे आहेत. सांगितलं तर ते ही तयार होतील पण आता बाबा ऐकणार नाहीत. त्यांना लवकरात लवकर ऑपेरेशन करून घ्यायचे आहे." आता प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही. ऑपेरेशन झाल्यानंतर  मला त्या मित्राचा फोन आला. बाबांचे ऑपेरेशन सुरु असतांना काही कॉम्प्लिकेशन्स आले होते त्यामुळे एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे. "मानले बुवा तुझ्या शास्त्राला" हे त्याचे शब्द. एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन केले परंतु फक्त ३०% दृष्टी प्राप्त झाली होती. ऑपेरेशनच्या वेळी बुधाचे रेवती नक्षत्र होते. बुध हा  Duality चा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा करावे लागते असा अनुभव आहे. असो आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ या.

७) प्रत्येक अवयव आणि राशी ह्यांचा नक्कीच संबंध आहे. मंगळाची मेष राशी मेंदूशी निगडीत तर मंगळीची दुसरी राशी वृश्चिक ही गुद्द्वाराशी निगडीत. वृषभ राशी घशाशी तर कन्या ही पोटाशी निगडीत. मकर राशी गुडघ्याशी निगडीत आहे. एखाद्या अवयवाचे ऑपेरेशन करत असतांना त्याच्याशी संबंधित ग्रह हा योग्य स्थितीत असावा.

वर सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाला अंमलात आणता येतीलच असे नाही. Emergency Operation करायचे  असल्यास ह्या गोष्टी पाळता येणार नाहीत. त्यावेळेस जातकाच्या पंचम आणि लाभ स्थानातील ग्रहाचे अथवा राशीचे उपाय करणे योग्य ठरेल. ते ही शक्य नसल्यास नजीकच्या व्यक्तिने पेशंटसाठी "महामृत्युंजय" मंत्र ऑपेरेशन होईस्तोवर म्हणत रहावे. सिझरिन तात्काळ करायचे ठरल्यास अथवा एखाद्याचे हृदयाचे ऑपरेशन हे मुहूर्तासाठी थांबवणे योग्य नाहीच. परंतु एका महिन्याने अथवा आठवड्याने ऑपरेशन करून चालण्यासारखे असेल तर वरील गोष्टींचा विचार जरूर व्हावा.

धन्यवाद
अनुप्रिया देसाई - ९८१९०२१११९ 

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

दागिने पुन्हा मिळतील का ?


दागिने पुन्हा मिळतील का ?

२५ जानेवारीला संध्याकाळी गीतांजलीचा फोन आला. १ मंगळसूत्र, सहा तोळ्यांच्या बांगड्या, कानातले डूल असा ऐवज तिला सापडत नव्हता. त्याचे झाले असे की गीतांजली कालच आपल्या नव्या घरी शिफ्ट झाली. घरातील बाकी सामान तर टेम्पोने घरी गेले होते परंतु दागिने आणि काही महत्वाच्या कागदपत्रांना सोबत घेऊन ती टॅक्सिने घरी आली. दुसऱ्या दिवशी दागिने आणि कागदपत्रे कपाटात ठेवून द्यावीत ह्या उद्देशाने गीतांजलीने ज्या बॅगेत हा ऐवज ठेवला होता ती बॅग उघडली. बॅगेत कागदपत्रे होती परंतु दागिने नव्हते. सर्व शोधाशोध केल्यानंतरसुद्धा दागिने मिळाले नाहीत तेंव्हा तिने मला फोन केला. घर शिफ्ट करण्याच्या गोंधळात दागिने चोरीला गेले की काय ही काळजी गीतांजलीला सतावत होती. आज मी लग्नसमारंभात व्यस्त असल्यामुळे लगेच तर उत्तर देऊ शकणार नाही परंतु उद्या सांगू शकेन. गीतांजलीने इतक्यात घरी कोणालाच ह्याबद्दल सांगितले नव्हते त्यामुळे जमल्यास आज उत्तर देऊ शकलात तर बरे ह्या विनंतीवर मी फक्त हो म्हणाले.

रात्री घरी आल्यावर प्रश्नकुंडली मांडली. ज्यावेळी गीतांजलीने प्रश्न विचारलं होता ती वेळ होती संध्याकाळी - ५. ११ . तेंव्हाचे शासक ग्रह खालीलप्रमाणे -

L - बुध
S - चंद्र
R - बुध
D - शुक्र

लग्न मिथुन आणि राशी कन्या. कर्क राशी द्वितीय स्थानी. प्रश्न कुंडलीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंडलीत चंद्र आणि कर्क राशी प्रश्नकर्त्याच्या मनातील खऱ्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करतात. इथे कुंडलीत चंद्राची कर्क राशी द्वितीय स्थानात म्हणजेच धन स्थानात आहे. प्रश्न धनाबद्दल विचारला गेला आहे. म्हणजेच प्रश्न अगदी मनापासून विचारला गेला आहे.
चंद्र चतुर्थ स्थानात. चंद्र चंद्राच्याच हस्त नक्षत्रात. चंद्र त्या वस्तूबद्दलची किंवा हरवलेल्या व्यक्तिबद्दलची माहिती देतो. इथे चंद्र चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थान म्हणजेच स्वतःचे घर. त्यामुळे दागिने घरातच आहेत ही प्राथमिक माहिती मिळाली. दागिने चोरीला गेलेले नाहीत.
आता पुढचा अपेक्षित प्रश्न म्हणजे दागिने कधी मिळतील ? वर शासक ग्रहांमध्ये सर्व जलदगतीचे ग्रह आहेत. जलदगतीचे ग्रह जेंव्हा शासक ग्रह म्हणून येतात तेंव्हा घटना लगेचच घडून येते. म्हणजेच दागिने लगेचच मिळणार आहेत.
शासक ग्रहांमध्ये बुध आहे. म्हणजेच दागिने जिथे ठेवले आहेत तिथे पुन्हा शोधणे. परंतु गीतांजलीला दागिने नेमके कुठे ठेवले आहेत हे आठवत नव्हते. कपाटात शोधून झाले होते. दागिने उत्तर दिशेत हिरव्या-पिवळ्या रंगाच्या बॅगेत असावेत.  गीतांजलीला पुन्हा एकदा शोध घेण्यास सांगितले. आमचे हे बोलणे रात्री १०.३० ते ११.०० च्या दरम्यान झाले. दागिने घरातच आहेत हे ऐकून गीतांजलीला हायसे वाटले कारण तिने आतापर्यंत टॅक्सी ड्राइव्हर,शिफ्टिंग करतांना मदतीला आलेल्या कामगारांना विचारून झाले होते. कोणाकडेही तिने सांगितलेल्या वर्णनाची पिशवी नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०७ मिनिटांनी गीतांजलीचा फोन आला. दागिने मिळाले. घराच्या उत्तर दिशेलाच मिळाले. ह्या दिशेत तिने सध्या कपाट ठेवले होते त्या कपाटात तिने दागिन्यांची पिशवी ठेवली परंतु त्यावर इतर कपडे आणि वस्तू आल्याने सापडत नव्हते. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर ती पिशवी मिळाली. (पिशवी - हिरव्या पिवळ्या रंगाची होती). बुधाचा प्रताप. पुन्हा पुन्हा तपासल्यावर वस्तू मिळाली.

दागिने मिळाले असा जेंव्हा फोन आला तेंव्हा मीन लग्न होते आणि चंद्र सप्तमात अर्थात केंद्रातच होता. 

READERS ALL OVER THE WORLD