सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

शासक ग्रह


प्रश्नकुंडली/शासक-ग्रह अर्थात Ruling Planets (कृष्णमुर्ती पद्धती)


"जन्मकुंडली,राशी,अंकशास्त्र,गुण-मिलन,नवमांश" ह्या शब्दांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही परंतु "प्रश्नकुंडली" हा शब्द सर्वसामान्य जणांसाठी जरा वेगळा शब्द. त्याबद्दलच आज मी लिहिणार आहे. जन्मकुंडली बनवताना जर ज्योतिषाला अचूक जन्म वेळ दिली गेली नाही तर सांगितले गेलेले भविष्य हे चुकू शकते. पण काही वेळेस तुमच्याकडे तुमच्या जन्माचा पूर्ण तपशील नसतो. म्हणजे काही वेळेस जन्म तारीख माहिती आहे पण जन्म वेळ नाही. काहींनी तर मला खुपदा "जन्म ६.०० ते ७.०० च्या दरम्यान आहे पण madam सकाळी की संध्याकाळी माहिती नाही", काहीना जन्मवार अगदी पाठ पण जन्म तारीख माहित नाही???
असे जरी असले तरी आयुष्यातील प्रश्न तर प्रत्येकालाच भेडसावतात. मग अशावेळी करायचे का? hmmmmm......आहे... शास्त्रात ह्याला सुद्धा पर्याय आहे तो म्हणजे "प्रश्नकुंडली".
प्रश्नकुंडली म्हणजे ज्यावेळेस जातक ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्या वेळेची ग्रहांची आकाशातील स्थिती कागदावर मांडणे. ही कुंडली ९९%वेळेस ज्योतिषाला जन्मकुंडलीपेक्षा ही अचूक उत्तरं देऊ शकते. काही वेळेला काही प्रश्नांची उत्तरे ही जन्मकुंडली वरून check करू शकत नाही. अशावेळेस प्रश्नकुंडलीचा वापर आपण करू शकतो. ह्यासाठी उदाहरण दिले तर तुमच्या लवकर लक्षात येईल.
नवीन घरी आम्ही नुकतेच shift झालो होतो आणि सोसायटीमध्यॆ जरा ओळख झाली होती. ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजता मला आमच्या सोसायटीतल्या सौ. जोशींनी फोन केला. "अग अनुप्रिया, माझं महत्वाचे काम आहे तुझ्याकडे.जरा urgent आहे आत्ता लगेच येऊ का ग?" झाले असे होते की सौ. जोशीना नुकतीच मुलगी झाली होती त्यामुळे घरी मोलकरीणीचा ताफा राबत होता. एका दुपारी सौ जोशीना लक्षात आले कि आपले मंगळसूत्र नेहेमीच्या जागेवर नाही. तेंव्हा सर्वत्र शोधले गेले,संध्याकाळ उजाडली परंतु मंगळसूत्र काही मिळाले नाही. आत्तामात्र परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात ४-५ नोकर..आत्ता संशय घ्यावा तरी कोणावर? कोणावर संशय घ्यावा आणि कोणी दुखावले गेले तर एखादी  मोलकरीण गमवावी लागेल..मुंबईत नोकर मिळणे सोप्पे आहे पण ते टिकवणे महाकठीण. त्यांनी झाला प्रकार श्री.जोशींना सांगितल्यानंतर सौ जोशीना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल काय काय ऐकावे लागले असेल ह्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. श्री.जोशींनी सर्वप्रथम पोलिसांत रिपोर्ट करण्याचे ठरवले व त्यांनी सोसायटी समोरच्या पोलिस-स्टेशनात तक्रार नोंदवली सुद्धा....पोलिसांनी त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तपासाला सुरवात केली व  दुसरया दिवशी सकाळी सकाळीच घरातील सर्व नोकरमंडळीना पोलिस-स्टेशनात हजर राहण्यास सांगितले. तेंव्हा घाबरून सौ. जोशीना माझी आठवण झाली. सर्व नोकर-मंडळी आणि श्री.जोशी पोलिस-स्टेशनात तर सौ.जोशी माझ्याकडे.....
माझ्याकडे सर्व कथाकथन झाल्यानंतर मी त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडली.  

१) कन्या लग्नाची कुंडली
२) चंद्र होता तूळ राशीत म्हणजेच धन स्थानात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने प्रश्न जर मनापासून विचारला गेला असेल तर चंद्र त्या संबंधातील स्थान कुंडलीत दशवतो. आणि इथे चंद्र होता "धन स्थानात" म्हणजे किती मनापासून प्रश्न विचारला गेला आहे.
३) चंद्राची "कर्क" राशी होती "लाभ" स्थानात. "लाभ","धन" ह्यावरून काही कळले का?? hmmmm म्हणजेच अपेक्षित "धनाचा लाभ" नक्की होणार. पण पुढचा प्रश्न कधी? सौ.जोशीना त्यांचे मंगळसूत्र मिळणार तरी कधी ?
४) ह्यासाठी "शासक ग्रहांची" मी मदत घेतली.  "शासक ग्रह" हा शब्द जोतिष-शास्त्रवर अभ्यास असलेल्यांसाठी नवीन नाही परंतु ज्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग नवीन आहे त्यांनी एवढेच समजून घ्यावे ते म्हणजे "शासक ग्रह" हे प्रश्न विचारलेल्या वेळेचे महत्वाचे     ग्रह.
५) सौ जोशींनी जेंव्हा प्रश्न विचारला होता तेंव्हा शासक ग्रह होते : i) बुध   ii) राहू    iii) शुक्र   iv) गुरु  हे सर्व ग्रह fast moving किंवा ज्याला आपण जलदगती असणारे ग्रह म्हणतो.
६) Fast Moving ग्रह आहेत ह्याचाच अर्थ धन लाभ होणार आहे आणि तो ही लवकरच.
मग काही गणिते मांडून मी उत्तर सांगितले :  तुम्हाला मंगळसूत्र मिळेल. सौ.जोशींचा पुढचा(अपेक्षित) प्रश्न : कधी मिळेल ?  उत्तर : आज आहे गुरुवार. आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत मिळायला हवे.  प्रश्न : घरीच मिळेल ना? उत्तर : हो घरीच मिळेल.
जोशी काकू निघणार एवढ्यात त्यांना श्री. जोशींचा फोन आला ...त्यांना ताबडतोब पोलिस-स्टेशनात बोलावले होते. मलाही धागधुग होतीच की काय होतेय? संध्याकाळी सौ.जोशींचा फोन..."अनुप्रिया मंगळसूत्र मिळाले. हुश्श...अग आमच्या सुगंधानेच (मोलकरीण) नेले होते. सकाळी मी किचनमध्ये असताना लादी पुसण्यासाठी ती बेडरुममध्ये गेली होती आणि तिथे टेबलवर ठेवलेले मंगळसूत्र तिने नेले. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिने काबुल केले. व मंगळसूत्र घरी आणून दिले. Thanks a  Lot "
शास्त्राची प्रचिती पुन्हा एकदा आली. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

वास्तू


वास्तू 


"आमचे घर वास्तूप्रमाणे आहे का जरा बघता का?" असा प्रश्न हल्ली मला मी कोणाच्या घरी समारंभाला गेले कि हमखास विचारला जातो.....मग काय हातातील फरसाणाची डीश बाजूला ठेवून घरात एक चक्कर मारायची...आणि घराचे अवलोकन करायचे...मला स्वतःला हे विषय खूप आवडीचे असल्याने ही request मी नाकारू शकत नाही....काहीना ह्या विषयावर विश्वास आहे काहीना विश्वास असूनही तो दाखवायचा नसतो तर काही लोकांच्या मते हे थोतांड आहे.ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांना समजावण्यात मला माझा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. परंतु ह्या भूतलावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये...पण म्हणून त्या नाहीत हा समज चुकीचा आहे असे मला वाटते. 

वास्तू समजणे म्हणजे फार काही कठीण नाहीये. आपण ज्या घरात(वास्तूत) राहतो त्या घरात एक उर्जा असते. त्या उर्जेचा आपल्या जीवनावर negative  किंवा positive परिणाम होत असतो. होणारा परिणाम positive किंवा  negative असणे हे त्या उर्जेवर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी काही नियम आपल्या दैनंदिन जीवनासाठी सूचित केले होते पण सध्या ते कालबाह्य झालेत. पण काही गोष्टी बदल्या नाहीत. सूर्य पूर्वेलाच उगवतोय..आणि पश्चिमेलाच मावळतोय. सूर्याकडून मिळणाऱ्या उर्जेची गृहिणीना अत्यंत गरज असते.त्यामुळे पूर्वेला स्वयंपाकघर असणे...किंबहुना तिथे असणाऱ्या खिडकीतून सूर्याची  किरणे आत यावीत व त्याचा आरोग्यपूर्ण उपयोग गृहिणी तसेच घरातील इतरांना व्हावा असा हेतू. परंतु आज बांधकामात असा विचार दिसत नाही. पूर्वेकडून व उत्तरेकडून  मिळणारी उर्जा ही positive आहे त्यामुळे ह्या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असणे महत्त्वाचे आहे. दक्षिण दिशा ही स्वाभाविकपणे negative उर्जेची मानली जाते. ह्याचाच अर्थ  दिशेकडून मिळणारी उर्जा/flow of energy ही घरात शक्यतो टाळण्यासाठी ह्या दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. ह्या दिशेत खिडक्या नसतील तर उत्तमच.

हा साधा नियम जरी कळला तरी आपल्या आता हे लक्षात येईल कि म्हणूनच घरातील देव्हारा हा "ईशान्य" दिशेत असावा जेणेकरून आपले मुख पूजा करताना "पूर्वेला" असेल.त्याच अनुषंगाने स्वयंपाकघर आग्नेयेत असावे. पूर्वीची जी घरे असायची त्यात "toilets"चा समावेश नसायचा. म्हणजेच toilets ही घराबाहेर असायची. शरीरातील निचरा/ घाण हा घराबाहेरच व्हावा असा हेतू. Toilets आणि बाहेर Ohh My God. सध्याच्या युगात आपण असा विचारही करू शकत नाही.

बिल्डर्सही कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर करू पाहतात. कारण सध्या राजा-राणीचा संसार हा बऱ्याच वेळा पहावयास मिळतो. मग हवे कशाला मोठे घर. Kitchen लहान झाले ....दिशेचा विचार न करता roomsची arrangement असते...म्हणजे जिथे देवपूजेची जागा असावी तिथे असते ह्यांचे Bedroom. जिथे असावे स्वयंपाकघर तिथे Toilets n Bathrooms. 

आता अशा प्रकारचे बांधकाम जवळजवळ ८०% ठिकाणी मी पाहिलेले आहे. ह्यावरून मला तुम्हाला माझी एक "Case" सांगावीशी वाटतेय. मागच्यावर्षी मी ज्या घरात वास्तू-अवलोकनासाठी गेले होते तो होता "One Room Kitchen".  मग त्या लोकांनी जिथे Kitchen होते तिथे Bedroom बनवला आणि Kitchen व Hallच्या मध्ये जिथे passageway होता तिथे बनवले Kitchen. कारण गृहिणी पूर्णवेळ कामावर...सकाळी ८.००ला घरातून निघणार ते थेट रात्री ९.०० ला घरी परतणार. म्हणजे स्वयंपाकघरात उभे राहण्यासाठीही वेळ नाही मग करायची काय आहे ही extra room ??? ह्या विचाराने जिथे Kitchen होता तिथे छान bedroom सजवला. Passageway मध्यॆ Kitchen बसवले गेले. चार चुलींची शेगडी,धूर होऊ नये म्हणून चिमणी ..इ. छानछान आधुनिक सोयींनीयुक्त असे "Kitchen". पण हा आपल्या सोयीचा विचार करताना एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष झाले ते म्हणजे Toilets आणि Bathrooms च्या बरोबर समोर ओटा बांधला होता. आत्ता काय सांगावे?? ज्यांचे घर होते त्यांना माझ्याकडून स्तुतीची अपेक्षा असावी कारण जेव्हा मी त्यांना स्वयंपाकघराबद्दल नाराजी दर्शवली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्यामते त्यांनी कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर केला होता. पण मी माझ्या मतांवर ठाम होते कारण मला माझ्या शास्त्रावर  पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्या घरातील रचनेवरून जेंव्हा मी त्यांना त्यांच्या carrier व health बद्दल भविष्यात होणारया घटनांबद्दल ठामपणे सांगितले तेंव्हा ह्या सूचनांची तितकीशी दाखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही.   

बऱ्याचदा घराच्या पूर्वेला खिडकीच नसते, घराचे मुख्यप्रवेश्द्वार दक्षिण किंवा उत्तरेकडे असते, संपूर्ण घर हे दिशाहीन असते ..म्हणजेच पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण ह्या दिशा घराच्या कोपऱ्यात असतात, ईशान्य दिशेत संपूर्ण बिल्डींगचे Drainage Pipes असतात इ. घरातील ह्या गोष्टींचा विचार करतो तसाच घराबाहेरील वातावरणाचाही विचार केला गेला पाहिजे. कधीकधी घरासमोर मोठा  नाला असतो कधी घरासमोरच स्मशान असते. मग घर असावे तरी कुठे आणि घरातील रचना असावी तरी कशी ?? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

सध्य परिस्थितीचा विचार करता अगदी पूर्वेकडे असणारे मुख्याप्रवेशद्वार,आग्नेयेकडे स्वयंपाकघर, घरासमोर बाग अशी रचना असणारे घर मिळणे दुर्लभ आहे. मग करायचे काय? आपले शास्त्र काळाच्या इतके पुढे आहे कि ह्याचाही विचार आपल्या शास्त्रकारांनी केला होता. त्यामुळे जर शास्त्रप्रमाणे घर नसेल तर काय करावे ह्यासाठी काही उपाय त्यानी सुचवले आहेत. त्याचा उपयोग आपण जरूर करू शकतो व सकारात्मक(positive) उर्जा आपल्या घरात वाहू शकते. 

हळूहळू ह्या शास्त्राचा व मला आलेल्या अनुभवांचा उलगडा मी पुढील काही भागात करणार आहे.       
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२


12-12-12दोन दिवसापासून नुसतं भंडावून सोडले आहे सगळ्यांनी ...१२ तारीख येतेय काही special होणार आहे का...घर book करू का?? सिझर चा मुहूर्त चांगला आहे का येणाऱ्या बाळासाठी? हे ना ते...१२-१२-१२ काय special आहे? नेहेमीच्या तारखेसारखी तारीख ....काय auspicious ? 
भारतीय वंशाच्या माझ्या बांधवानो आणि भगिनीनो ....आपल्या शास्त्राप्रमाणे आज चंद्र "वृश्चिक" राशीत, अनुराधा नक्षत्रात त्यात आज तिथी चतुर्दशी काय बरे एवढे चांगले पंचांग आहे ??? काहीही नाही ... नुसते तारखेच्या मागे जाऊ नका....भारतीय शास्त्र हे खूप प्रगत आणि अत्यंत सखोल आहे..तेंव्हा हे "auspicious" चे वेड सोडा आणि कामाला लागा...

nothing going to happen special ....dont wait for it...

bye 

शनिवार, ८ डिसेंबर, २०१२अष्टमातील शुक्र आणि तो ही तूळ राशीतला ज्योतिष/कुंडली /ग्रह-तारे हे असे विषय आहेत कि ज्यांच्याबद्दल सर्वांनाच कुतूहलता असते. तशीच कुतूहलता मला माझ्या लहानपणा पासून होती.  दूरवर चमकणारे तारे आणि  आपण ह्यात नक्कीच काहीतरी नाते आहे असे नेहेमी वाटायचे.....ज्योतीशाशास्त्रावर मिळतील ती पुस्तके मी दिवाळीच्या सुट्टीत वाचून काढायचे. मग शाळा सुरु झाली कि मैत्रीणीच्या हातावरील रेषांचा अर्थ समजून घेणे ..व त्याचा काहीबाही अर्थ सांगू लागले..मैत्रिणीनाही त्याचा छंद लागला.....मला ही मज्जा वाटायची. शाळेनंतर college सुरु झाले.  Lecturesला बसण्यापेक्षा groupमध्ये सगळ्यांच्या हातावरील रेषा वाचणे आणि त्याचा अर्थ त्यांना सागणे...ह्यात  जास्त interest वाटू लागला.

College नंतर ज्योतिषशास्त्राचे शास्त्रोक्त शिक्षण घेतांना जगात घडणाऱ्या बऱयाच गोष्टींचा उलगडा होत गेला. लोकांबरोबर घडणाऱ्या गोष्टी आणि ग्रह-ताऱ्यांचा त्यांच्या कुंडलीवरून होणारा फेरा ह्याचा संबंध कळू लागला. ग्रह-तारे,साडेसाती,दशा,गोचर इ. सतत सुरु असायचे. ह्या ग्रहाची दशा सुरु आहे म्हणून का ह्याला हा त्रास झाला असावा?मग त्यावर खोल विचार करून निष्कर्ष काढण्यापर्यंत सराव झाला...आत्ता वेळ आली होती ती थेट अनोळखी माणसाची कुंडली मांडून आपले ज्ञान check करणे. 

एक challenging कुंडली जेंव्हा माझ्याकडे आली...तेंव्हा त्यातील मोजक्यां पण काही ठळक गोष्टी मी सांगितल्या आणि ज्यांची कुंडली होती ते अचंबित झाले. ह्याच कुंडलीचे काही मुद्दे मी इथे मांडणार आहे.: १) जातकाचे मीन लग्न आहे. २)लग्नेश स्वतः लाभ स्थानात  वक्री ३) चंद्र राशी कर्क. ४)तुळेचा शुक्र अष्टमात ?? ह्या व्यक्तीला नक्कीच ""किडनी"चा त्रास असावा. ५)सप्तम स्थानातील कन्या राशीतील हर्षल-बुध उटी पाहिल्यावर माझा निष्कर्ष ठाम झाला. हे मी त्या व्यक्तीला विचारताच तो म्हणाला अग अनुप्रिया एवढे कळते पत्रिके वरून?? मी म्हणाले बरेच काही कळते हे खरे आहे कि नाही ते सांग ....त्यावर त्याने सांगितलं ते असं : त्याला जन्मतः  एक "किडनी'च  नाहीये...आणि हे त्याला त्याच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षी समजले...

एक "किडनी' नसल्यामुळे त्याला त्याच्या day to day life मध्ये बरेच बदल करावे लागले..त्यावर काही उपाय मी त्याला suggest केले जेणे करून त्याला त्याच्या carrier मध्ये प्रगती साधता येईल तर असे हे शास्त्र. ज्या ग्रह स्थितीत व्यक्ती जन्म घेते त्याचा आयुष्यात नक्कीच काही चांगले तर काही वाईट परिणाम दिसून येतात...तेंव्हा ह्याचा सखोल अभ्यास खूप जरुरी आहे...अशाच काही वेगळ्या कुंडल्या तुमच्या समोर पुढच्या वेळेस मी घेऊन येईन...bye 

READERS ALL OVER THE WORLD