शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

वास्तू


वास्तू 


"आमचे घर वास्तूप्रमाणे आहे का जरा बघता का?" असा प्रश्न हल्ली मला मी कोणाच्या घरी समारंभाला गेले कि हमखास विचारला जातो.....मग काय हातातील फरसाणाची डीश बाजूला ठेवून घरात एक चक्कर मारायची...आणि घराचे अवलोकन करायचे...मला स्वतःला हे विषय खूप आवडीचे असल्याने ही request मी नाकारू शकत नाही....काहीना ह्या विषयावर विश्वास आहे काहीना विश्वास असूनही तो दाखवायचा नसतो तर काही लोकांच्या मते हे थोतांड आहे.ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांना समजावण्यात मला माझा अमूल्य वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. परंतु ह्या भूतलावर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये...पण म्हणून त्या नाहीत हा समज चुकीचा आहे असे मला वाटते. 

वास्तू समजणे म्हणजे फार काही कठीण नाहीये. आपण ज्या घरात(वास्तूत) राहतो त्या घरात एक उर्जा असते. त्या उर्जेचा आपल्या जीवनावर negative  किंवा positive परिणाम होत असतो. होणारा परिणाम positive किंवा  negative असणे हे त्या उर्जेवर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी फार पूर्वी काही नियम आपल्या दैनंदिन जीवनासाठी सूचित केले होते पण सध्या ते कालबाह्य झालेत. पण काही गोष्टी बदल्या नाहीत. सूर्य पूर्वेलाच उगवतोय..आणि पश्चिमेलाच मावळतोय. सूर्याकडून मिळणाऱ्या उर्जेची गृहिणीना अत्यंत गरज असते.त्यामुळे पूर्वेला स्वयंपाकघर असणे...किंबहुना तिथे असणाऱ्या खिडकीतून सूर्याची  किरणे आत यावीत व त्याचा आरोग्यपूर्ण उपयोग गृहिणी तसेच घरातील इतरांना व्हावा असा हेतू. परंतु आज बांधकामात असा विचार दिसत नाही. पूर्वेकडून व उत्तरेकडून  मिळणारी उर्जा ही positive आहे त्यामुळे ह्या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असणे महत्त्वाचे आहे. दक्षिण दिशा ही स्वाभाविकपणे negative उर्जेची मानली जाते. ह्याचाच अर्थ  दिशेकडून मिळणारी उर्जा/flow of energy ही घरात शक्यतो टाळण्यासाठी ह्या दिशेत कमीतकमी खिडक्या असाव्यात. ह्या दिशेत खिडक्या नसतील तर उत्तमच.

हा साधा नियम जरी कळला तरी आपल्या आता हे लक्षात येईल कि म्हणूनच घरातील देव्हारा हा "ईशान्य" दिशेत असावा जेणेकरून आपले मुख पूजा करताना "पूर्वेला" असेल.त्याच अनुषंगाने स्वयंपाकघर आग्नेयेत असावे. पूर्वीची जी घरे असायची त्यात "toilets"चा समावेश नसायचा. म्हणजेच toilets ही घराबाहेर असायची. शरीरातील निचरा/ घाण हा घराबाहेरच व्हावा असा हेतू. Toilets आणि बाहेर Ohh My God. सध्याच्या युगात आपण असा विचारही करू शकत नाही.

बिल्डर्सही कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर करू पाहतात. कारण सध्या राजा-राणीचा संसार हा बऱ्याच वेळा पहावयास मिळतो. मग हवे कशाला मोठे घर. Kitchen लहान झाले ....दिशेचा विचार न करता roomsची arrangement असते...म्हणजे जिथे देवपूजेची जागा असावी तिथे असते ह्यांचे Bedroom. जिथे असावे स्वयंपाकघर तिथे Toilets n Bathrooms. 

आता अशा प्रकारचे बांधकाम जवळजवळ ८०% ठिकाणी मी पाहिलेले आहे. ह्यावरून मला तुम्हाला माझी एक "Case" सांगावीशी वाटतेय. मागच्यावर्षी मी ज्या घरात वास्तू-अवलोकनासाठी गेले होते तो होता "One Room Kitchen".  मग त्या लोकांनी जिथे Kitchen होते तिथे Bedroom बनवला आणि Kitchen व Hallच्या मध्ये जिथे passageway होता तिथे बनवले Kitchen. कारण गृहिणी पूर्णवेळ कामावर...सकाळी ८.००ला घरातून निघणार ते थेट रात्री ९.०० ला घरी परतणार. म्हणजे स्वयंपाकघरात उभे राहण्यासाठीही वेळ नाही मग करायची काय आहे ही extra room ??? ह्या विचाराने जिथे Kitchen होता तिथे छान bedroom सजवला. Passageway मध्यॆ Kitchen बसवले गेले. चार चुलींची शेगडी,धूर होऊ नये म्हणून चिमणी ..इ. छानछान आधुनिक सोयींनीयुक्त असे "Kitchen". पण हा आपल्या सोयीचा विचार करताना एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष झाले ते म्हणजे Toilets आणि Bathrooms च्या बरोबर समोर ओटा बांधला होता. आत्ता काय सांगावे?? ज्यांचे घर होते त्यांना माझ्याकडून स्तुतीची अपेक्षा असावी कारण जेव्हा मी त्यांना स्वयंपाकघराबद्दल नाराजी दर्शवली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्यामते त्यांनी कमीतकमी जागेचा जास्तीतजास्त वापर केला होता. पण मी माझ्या मतांवर ठाम होते कारण मला माझ्या शास्त्रावर  पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्या घरातील रचनेवरून जेंव्हा मी त्यांना त्यांच्या carrier व health बद्दल भविष्यात होणारया घटनांबद्दल ठामपणे सांगितले तेंव्हा ह्या सूचनांची तितकीशी दाखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही.   

बऱ्याचदा घराच्या पूर्वेला खिडकीच नसते, घराचे मुख्यप्रवेश्द्वार दक्षिण किंवा उत्तरेकडे असते, संपूर्ण घर हे दिशाहीन असते ..म्हणजेच पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण ह्या दिशा घराच्या कोपऱ्यात असतात, ईशान्य दिशेत संपूर्ण बिल्डींगचे Drainage Pipes असतात इ. घरातील ह्या गोष्टींचा विचार करतो तसाच घराबाहेरील वातावरणाचाही विचार केला गेला पाहिजे. कधीकधी घरासमोर मोठा  नाला असतो कधी घरासमोरच स्मशान असते. मग घर असावे तरी कुठे आणि घरातील रचना असावी तरी कशी ?? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

सध्य परिस्थितीचा विचार करता अगदी पूर्वेकडे असणारे मुख्याप्रवेशद्वार,आग्नेयेकडे स्वयंपाकघर, घरासमोर बाग अशी रचना असणारे घर मिळणे दुर्लभ आहे. मग करायचे काय? आपले शास्त्र काळाच्या इतके पुढे आहे कि ह्याचाही विचार आपल्या शास्त्रकारांनी केला होता. त्यामुळे जर शास्त्रप्रमाणे घर नसेल तर काय करावे ह्यासाठी काही उपाय त्यानी सुचवले आहेत. त्याचा उपयोग आपण जरूर करू शकतो व सकारात्मक(positive) उर्जा आपल्या घरात वाहू शकते. 

हळूहळू ह्या शास्त्राचा व मला आलेल्या अनुभवांचा उलगडा मी पुढील काही भागात करणार आहे.       
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD