मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही

वास्तूचे ब्रम्ह स्थान आणि तुम्ही


ज्योतिष आणि वास्तू ह्या शास्त्राचा अभ्यास करताना जस जसे त्यात संदर्भ येत गेले त्या अनुसार मी आपल्या  धार्मिक ग्रंथांचेही वाचन केले. आपली भारतीय संस्कृती महान आहेच परंतु आपल्या शास्त्रकारांनी/संतांनी  लिहिलेल्या ग्रंथांवरून ते काळाच्या कितीतरी पुढे होते ह्याची जाणीव होते. ज्ञानेश्वरांनी तेंव्हा लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी,रामदास समर्थांनी लिहिलेला दासबोध आता वाचतांना ज्ञानेश्वर,समर्थ आजच्या काळाबद्दलच बोलत आहेत कि काय असे वाटते. ज्योतिषशास्त्र म्हणजे प्रत्येक ग्रह आणि त्याचा मानवावर होणारया परिणामांचे शास्त्र. काहीजण त्याला Scientific मानतात तर काहीजण नाही. परंतु आज जेंव्हा चंद्राच्या  मानवी जीवनावर होणारया परिणामला सर्वच शास्त्रात मान्यता मिळालेली आहे तर बाकी ग्रहांबद्दलही लवकरच मतं बदलतील अशी मला खात्री आहे. अगदी अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास होणारे जन्म- मृत्युचे प्रमाण हे बाकीच्या दिवसात होणारया जन्म -मृत्युच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. (This is Scientific). म्हणजेच चंद्राचा मानवी जीवनावर बरयाच मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. ह्या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या Municipal Corporation मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारू शकता किंवा आयुर्वेदिक वैद्यांना.  असो तर आपला आजचा मुद्दा आहे वास्तू.

वास्तुसंदार्भात आपल्या वास्तु-शास्त्रकारांनी ब्रम्हस्थान हे नेहेमी मोकळे असावे असा उल्लेख केलेला आहे.वास्तूसंदर्भात लिहिलेल्या मागच्या एका लेखात मी ब्रम्हस्थानाचा उल्लेख केला आहे. ब्रम्हस्थान म्हणजेच आपल्या वास्तूचे मध्यवर्ती स्थान. शास्त्रात अशी मान्यता आहे की वास्तूदेवतेचे मुख हे ईशान्य दिशेस तर पाय हे नेऋत्य दिशेस आहेत. त्या अर्थाने वास्तुदेवतेचा पोटाचा भाग हा वास्तूच्या मध्यवर्ती येतो.  ब्रम्हस्थान जर सदोष असेल तर त्याचा कितीतरी विपरीत परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर होतो. त्याच संदर्भात माझ्याकडे ह्या वर्षीच्या मे महिन्यात एक वास्तूची Case आली. कुंडलीसंदर्भात चर्चा झाली आणि त्यांनीच त्यांच्या वास्तूसंदर्भात विषय काढला. स्वतःचा गेले दीड वर्ष न चालणारा व्यवसाय आणि घरातील सततच्या आजारपणामुळे ते कंटाळले होते. मग वास्तू-परिक्षणाचा दिवस ठरला. 

बरं एक नवीन गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे जसे प्रत्येक शास्त्रात दररोज नवनवीन गोष्टींबाबत संशोधन होत असते तसेच वास्तूशास्त्रातही संशोधन सुरूच आहे.तर ते संशोधन असे की वास्तू आणि ज्योतिष ह्यांची सुंदर सांगड म्हणजे वास्तू-ज्योतिष शास्त्र. हे नवीन नाही पण ह्याचा उपयोग करणारे मात्र खूप कमी आहेत. हे वास्तू-ज्योतिष शास्त्र म्हणजे एखादी व्यक्ती जेंव्हा तुम्हांला त्यांच्या वास्तूबद्दल काही सांगत असते तेंव्हा त्यावेळेची कुंडली वास्तूतज्ञाला अधिक उपयोगी माहिती देवू शकते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे कि जेंव्हा जातक मला त्यांच्या वास्तू बद्दल सांगतो तेंव्हाची कुंडली मांडल्यानंतर घराचे मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ? घरात पाण्याचासाठा कुठे आहे ? घरात मुख्य दोष कुठे आहे ? कशामुळे जातकाला नक्की त्रास होतोय ? ह्याची कल्पना होरा कुंडली देवू शकते.

होरा कुंडलीवरून ह्या जातकाला मी (वास्तू Visit करण्याआधी) घरात पूर्व दिशेला रद्दी,चपला बरेच वापरात नसलेले सामान किंवा अडगळीत पूर्वजांचे फोटो ठेवले आहेत का ? घराच्या मध्य ठिकणी काही अवजड वस्तू ठेवल्यात आहेत का ?? असे विचारले तेंव्हा बरयाच जातकांप्रमाणे त्याने  उत्तर दिले,"मला घरातून पूर्व दिशा कशी बघतात माहीत नाही. पण स्वयंपाक घरात एका ठिकाणी रद्दी ठेवलेली आहे. घराच्या मध्ये तर काहीच नाही मोकळी जागा आहे". मी म्हणाले,"ठीक आहे मी येतेच आहे मग पहाते."

जेंव्हा वास्तू परीक्षणासाठी ह्या वास्तूत गेले असता स्वयंपाक घरात पूर्व दिशेला फ्रीज होता. त्याखाली जाते (धान्य दळण्यासाठी पूर्वीच्याकाळी वापरात असलेले साधन )ठेवलेले. फ्रीजच्याच बाजूला रद्दी रचून ठेवलेली. रद्दीच्या थोडं वरती फळकुट बनवलेले आणि त्यात चादरीने काहीतरी झाकून ठेवलेले. मी विचारल्यावर घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेले उत्तर," अहो काही नाही …ते तुमच्या वास्तूवगैरेची पुस्तके मी ही वाचतो. घरात मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत असे म्हणतात ना ?? मग आम्ही ते चार-पाच  वर्षांपूर्वी भिंतीवरून काढून तिथे ठेवले आहेत."  मला उत्तर मिळाले. पूर्व दिशेला शक्य तितके स्वच्छ,मोकळे ठेवावे हे ही बरयाच पुस्तकांत लिहिलेले असते पण आजोबांनी आपल्या सोयीप्रमाणे वास्तूतील मृत व्यक्तींचे भिंतीवरचे फोटो काढले आणि त्यांना अडगळीत ठेवून दिले आणि ते ही पूर्वेला. आधीच पूर्वेला त्यांनी फ्रीज ठेवलेला त्याखाली जाते बाजूला रद्दी, त्यावर पूर्वजांचे फोटो. म्हणजे एकाच जागी किती दोष निर्माण झाला. 

 स्वयंपाक आणि बैठकीची खोली ह्यांच्या मध्ये एक दार आहे आणि त्या दारालाच लागून पूर्वेला घराचे मुख्यद्वार. शक्यतो जिथे मुख्यदार असते तिथेच चपलां ठेवण्याची जागा असते. हे घर चाळीतले त्यामुळे घराबाहेर फार जागा नव्हती. त्यांना तुम्ही चपला कुठे ठेवता असे विचारल्यावर त्यांनी मुख्यादाराकडे बोट दाखवले. मुख्य दारावरती एक खिडकीची झडप होती तिथे त्यांनी एक लाकडी Box बनवला होता आणि त्यावरच सर्वांच्या चपला ठेवण्यात येत होत्या. म्हणजे मुख्यादारावरच चपला. ज्या पूर्व दिशाकडून चांगल्या उर्जेचा प्रवेश होत होता तिथेच वरती चपला ठेवण्यात आलेल्या.  पूर्व दिशा पूर्णपणे दुषित झालेली दिसत होती. मग गेल्या दीड वर्षापासून त्या जातकाचा व्यवसाय का व्यवस्थित चालत नव्हता ह्याचे कारण कळले.

ह्या जातकाचा अजून एक प्रॉब्लेम होता आणि तो त्याने मला वास्तू परीक्षणासाठी गेले असतां सांगितले. तो म्हणजे त्याला एकच मुलगी होती आणि दुसऱ्या अपत्याची अपेक्षा होती. चार वर्षापूर्वी ह्याला स्वतःला नोकरीनिमित्ताने आफ्रिकेत जावे लागले. तेंव्हा जातकाची पत्नी गरोदर होती. दीड महिनाच झाला होता. ह्याच काळात घरात बरेच बदल करण्यात आले होते. पूर्वजांचे फोटो काढून ठेवण्यात आले होते आणि नवीन फ्रीज घरी आला होता. सर्वजण खुश होते. परंतु आठवा  महिना संपता संपता हिला रात्री दोन वाजतां दुखू लागले. हॉस्पिटल घराच्या अगदी खालीच होते परंतु बाळ वाचू शकले नाही. डॉक्टरांनी सांगितले हिच्या गर्भाशयाला भरपूर इजा झाली असून आता हिला पुन्हा बाळ होऊ शकणार नाही. आणि तिचे गर्भाशय काढून टाकावे लागेल अन्यथा  Infection वगैरे होऊन पुढे Cancerचाही धोका आहे.  ह्या घटनेनंतर दोनच दिवसात जातकाच्या वडिलांना छातीत अचानक कळ आली. तपासणी करण्यास गेले असता आन्जीयोप्लास्टी करावी लागेल असे सांगण्यात आले. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जातकाला मात्र इथे येता आले नाही कारण त्यांचे काही Contract वगैरे असते तेंव्हा असे मध्येच सुट्टी घेऊन येता येत नाही. घरात आनंद नांदू पाहत असतानाच तो पाठ फिरवून निघून गेला.

ह्या प्रोब्लेमसाठी घरातील सदोष ब्रम्ह्स्थान कारणीभूत असते. म्हणून मी माझा मोर्चा घराच्या ब्रम्हस्थानाकडे वळवला. कधी कधी घराची रचनाच अशी असते की ब्रम्ह्स्थान कुठले ह्याबाबतीत घरातील व्यक्तींनाच संभ्रम असतो. ह्या घराच्या ब्रम्हस्थानावर बाथरूम आणि टोयलेट होते. मी पूर्ण घराचे परीक्षण आणि मोजमाप केल्यानंतर जातकाच्या तसे लक्षात आणून दिले. घराचे ब्रम्ह्स्थान म्हणजे घराचा Backbone. त्यावरच तुम्ही हल्ला केलात तर घर तुटण्यास वेळ कसला ?? तुमची पाठ जराजरी दुखत असेल तर तुम्ही ना धड बसू शकत ना उभे राहू शकत. मग घराच्या पाठीवरचे ओझे घर किती काळ सहन करणार. सहनशक्ती संपली कि मग घरतील व्यक्तींना हृदयरोग,मणक्याचे त्रास, पोटाचे त्रास,गर्भपात इ. होणारच. अर्थात ह्यासाठी फक्त वास्तूतील दोषच कारणीभूत नसून कुंडलीही तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड झाली की मग एके दिवशी त्याचा स्फोट होतो आणि त्याचे परिणाम दिसायला लागतात. मग आपल्याला वाटते हे असे अचानक काय झाले??  हे अचानक होत नसते. त्याची सुरवात हळूहळू होत असते फक्त आपल्याला तेंव्हा त्याचे परिणाम जाणवत नाहीत एवढेच. 

ह्या जातकाला घरातील पूर्व दिशा मोकळी करून तिथले सामान दक्षिण दिशेस ठेवण्यास सांगितले. चपलांसाठी पश्चिमेला एका ठिकाणी जागा ठरवून दिली. पूर्वजांच्या फोटो संदर्भातील गैरसमज दूर करून दक्षिण भिंतीवर त्यांना स्थान दिले. 

ब्रम्ह्स्थानातील दोषासाठी ठराविक दिवशी काही ठराविक मंत्रोक्त रत्ने पुरावी लागतील असा सल्ला दिला. कारण बाथरूम आणि टोयलेट तर दुसरीकडे हलवणे शक्य नाही.

बाकीही काही सूचना दिल्या जसे त्यांची मुलगी चवथी इयत्तेत शिकत आहे त्यामुळे तिने अभ्यासासाठी कुठल्या दिशेस बसावे ? कुठल्या देवतेचे स्मरण करावे ? जातकाचा व्यवसाय गेले दीड वर्ष थंड होता. त्यालाही काही स्तोत्रे वाचण्यास सांगितली. व्यवसाय घरातूनच करत असल्याने घरात व्यवसायाचे सामान कुठे ठेवावे ? पैसे कुठे ठेवावेत ? जातकाची बसण्याची दिशा कोणती असावी ? इ. संदर्भात आमची चर्चा झाली. त्यांनतर काल जातकाचा फोन आला. गेल्या चार महिन्यात व्यवसाय नुसता सुरु झाला नाही तर व्यवस्थित धावतोय. एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीचेही contract मिळाले तेंव्हा त्याने  दुकानासाठी एक जागा पसंत केली आणि त्याच्या परीक्षणासाठी मला फोन केला. त्याच्या आनंद मला ऐकू येत होता. परीक्षणाचा दिवस ठरला. फोन ठेवताठेवता तो म्हणालाच,"मैडम हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. घरी सगळे खुश आहेत. त्यांचा आनंद बघून कामासाठी खूप उत्साह आला आहे."  मी म्हटलं,"नाही अजिबात नाही. ही शास्त्राची कमाल आहे. आभार शास्त्राचे मान. बाकी तुझीही मेहनत आहेच ना."

इथे काही गोष्टी वाचकांनी लक्षात घ्याव्यात : १) प्रामुख्याने घरात धन-संपत्ती असणे,येणे आणि ती टिकणे हे घराच्या निर्दोष पूर्व आणि उत्तर दिशेवर अवलंबून आहे. इथे जातकाला सोपा उपाय म्हणजे पूर्व दिशा मोकळी आणि स्वच्छ करण्यास सांगितले. त्याचे चांगले परिणाम म्हणजे त्याचे अर्थार्जनाचे मार्ग मोकळे झाले.  

२) जातक स्वतः चाळीत राहणारा. तरीही त्याने ब्रम्ह्स्थानावर रत्नाध्याय करून घेतला. बरेच लोक खर्च होतो… नको…. बघु… नंतर अशी टाळाटाळ करतात. परंतु जातक तत्काळ तयार झाला आणि त्याचे चांगले परिणाम म्हणजे बाबांच्या तब्येतीत चांगलाच सुधार आहे.  

आज त्याचा आनंद पाहून माझा शास्त्रावरचा विश्वास द्विगुणीत होतो. शास्त्राला कोटी कोटी प्रणाम. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com
  

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 


गेल्या महिन्यात चैतालीचे आलेले हे पत्र. ती माझ्याकडे आली होती तेंव्हा लग्न होऊन चार वर्ष झाली होती परंतु बाळाची चाहूल नव्हती. तेंव्हा कुंडलीत काय योग आहेत हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. त्यांनतर तिला ज्योतिष- शास्त्राचा अनुभव कसा वाटला ह्याबद्दल तिने लिहिले आहे.  



श्री स्वामी समर्थ 

माझ्या लग्नाला चार वर्षे झाली होती परंतु मला अपत्य होत नव्हते. मी बरेच उपाय केले, बरयाच जाणकार ज्योतिषांना विचारले पण सगळ्यांनी सांगितले की बाळ होईल पण कधी होईल ह्याबद्दल नक्की कोणीच सांगत नव्हते. ऑफिसमधल्या एका colleague बरोबर चर्चा करत असतना त्यांनी मला सांगितले कि अनुप्रिया देसाई म्हणून एक ज्योतिषी आहेत त्या तुम्हाला ह्याबाबतीत मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे मी त्यांची appointment घेतली.  


आमची ही पहिलीच भेट. परंतु त्यांनी माझ्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही गोष्टींबद्दल अचूक सांगितले. माझ्या लग्नात बरीच विघ्ने आली होती त्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. 

त्यांनी आमच्या दोघांचीही कुंडली संततीच्या संदर्भात अभ्यासली.
 त्यांनी मला सांगितले की तुमच्या दोघांच्याही कुंडलीत २०१२ च्या ऑगस्टनंतर संततीप्राप्तीचे योग आहेत परंतु काही complications आहेत त्यामुळे Pregnancy राहिल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी मला त्यासंदर्भात काही स्तोत्रे आणि मंत्र सांगितले. त्यात स्वामींचा तारक मंत्राचाही समावेश होता. बाकी उपायांबरोबरच तारकमंत्रचा ११ वेळा जप मी करत होते. 

दिलेले उपाय तर करतच होते आणि मला फेब्रुवारीच्या २०१२च्या शेवटच्या महिन्यात मला प्रचीती आली. मला गोड बातमी मिळाली. अनुप्रियाला सांगितल्यानंतर त्यांनी उपाय सुरु ठेवायला सांगितले आणि काळजी घ्यायला सांगितली. दिलेल्या स्तोत्रांचे वाचन चालू होते. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी Regular Check-up साठी गेले असता डॉक्टरांनी मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये Admit होण्यास सांगितले. काही Complications आहेत असे सांगण्यात आले. १४ ते १५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. अक्षरशः कंटाळले होते. हॉस्पिटलच्या वातावरणाचा उबग आला होता. अनुप्रियाच्या सतत Contact मध्ये होतेच. डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगितल्यावर खूप निराश झाले होते. अनुप्रियाला विचारल्यावर तिने मला समजावले की Complications तर आहेत त्यामुळे उगीच risk घेण्यापेक्षा C- Section चा  मार्ग बरा. आणि १६ ऑक्टोबर २०१२ला आम्हांला मुलगी झाली.  

आमचा त्यांच्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला आहे.  मला महत्वाचा निर्णय घ्याचा असेल तर त्यांना जरूर विचारते. आज त्या माझ्या friend आणि Guide दोन्ही आहेत. त्यांचे खूप खूप आभार. 


चैताली जोशी 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

गर्भधारणा झाली पण …….

गर्भधारणा झाली पण …….



आई होणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. काहीं जोडप्यांना ते खूप सहज आहे तर काही जोडप्यांना ह्यासाठी संघर्ष आहे. बरीच जोडपी माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की  लग्न होऊन बरीच वर्ष झाली पण बाळ होत नाहीये, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सगळे झालेत पण यश नाही. पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांना गर्भधारणा झाली पण गर्भपात झाला. दोन्ही Cases मध्ये फरक हा आहे कि पहिल्या case मध्ये Conceive होत नाहीये आणि दुसरया Case मध्ये गर्भाची पूर्ण वाढ होण्याआधीच गर्भपात होतोय. आज मी ह्याच संदर्भातील सोनालीची Case तुम्हाला सांगणार आहे.

सोनाली माझ्याकडे २०११च्या मे महिन्यात आली होती. तेंव्हा लग्न होऊन ४ वर्ष झाली होती. त्यामुळे सगळीकडून बाळाबद्दल विचारणा होत होती. बारसे,डोहाळजेवण,लग्न कुठेही सोनाली गेली कि सगळे नातलग तोच प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. सोनालीने कुठल्याही कार्यक्रमाला जायचे सोडून दिले. कुंभ लग्न आणि मेष राशीची कुंडली. कुंभ लग्नाप्रमाणेच सावळी,शांत अशी सोनाली. पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्ही पद्धतीने कुंडलीचे केलेले विवेचन खालीलप्रमाणे : 

पारंपारिक : 
  •  कुंभ लग्न त्यामुळे पंचमेश आहे बुध. बुध स्वतः मेष राशीत आणि शुक्राच्या नक्षत्रात. 
  • शुक्र चतुर्थात. चतुर्थ हे पंचमाचे व्यय स्थान म्हणजे पंचमेश बिघडलेला आहे. 
  • संततीसाठी पारंपारिक ज्योतिष-शास्त्रात गुरु ह्या ग्रहाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. इथे गुरु आहे लाभत आणि त्याची संपूर्ण दृष्टी जरी पंचमावर असली तरी गुरु वक्री असून शुक्राच्याच नक्षत्रात आहे. 
  • सोनाली मला भेटण्यास आली तेंव्हा तिला रवि महादशा आणि बुध अंतर्दशा सुरु होती. बुध पंचमेश आहे आणि रवि चतुर्थात. ह्याचा अर्थ सोनालीला "Pregnancy" राहिली असणार परंतु गर्भ जास्त वेळ राहिला नसणार. सोनालीला तसे विचारल्यानंतर सोनालीने सांगितले ते असे," हो लग्नानंतर मला दोन वेळेस दिवस गेले होते परंतु २-३ महिन्यातच माझा गर्भपात झाला. डॉक्टरांनाही कारण समजले नाही. आता तर डॉक्टरांकडे जायची भीतीच वाटते. माझ्या एका मैत्रिणीला तुमच्यावर खूप विश्वास आहे. तिनेच तुम्हाला कुंडली दाखवण्यास सांगीतली. आता जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी."
  • पंचम स्थानाबरोबरच द्वितीय आणि लाभ ह्या स्थानांचाही संततीप्राप्तीसाठी विचार होतो. ह्या कुंडलीत द्वितीय स्थानात गुरुची मीन राशी आहे. आणि लाभ स्थानात गुरु स्वतः आहे. मग तर संतती होणारच असे जरी वरवर वाटत असले तरी कुंडलीला पुढे येणाऱ्या दशा-अंतर्दशांचाही विचार व्हावा. येणाऱ्या दशा चतुर्थ स्थानाचीच फळे देत आहेत.   
कृष्णमुर्ती (के.पी.) पद्धतीने : 
  • पंचम स्थानाचा सब लॉर्ड आहे रवि. आणि तो पुढीलप्रमाणे कार्यरत आहे :                                                                               
  •   रवि    ४   ७                                                                                                                                   
  •   न. स्वा. चंद्र  २  ६                                                                                                                          
  •  सब लॉर्ड राहू  ४  ४  ९                                                                                                                     म्हणजे कुठेही पंचम स्थानाचा लवलेश नाही. चंद्र जरी द्वितीय स्थानाचा कार्येश होत असला तरी तो बलवान कार्येश ग्रह नाही. 
  • तीच गात द्वितीय आणि लाभ स्थानाच्या सब लॉर्डची आहे. कुठेही पंचम,द्वितीय आणि लाभ स्थानाचे बलवान कार्येश कोणतेही ग्रह नाहीत. 
  • येणारया दशा- अंतर्दशा,सब period कुठेही संतती होण्यासाठी मदत करत नाहीये. 

सोनाली अगदी आशेने माझ्याकडे पाहत होती. खोटे सांगावे तर व्यक्तीच्या आशा/अपेक्षा वाढतात आणि खरे सांगावे तर ते कसे ? शेवटी तिला म्हणाले,"तुझ्या कुंडलीत मला संततीबाबत जे चित्र दिसतंय ते असं आहे की तुला गर्भधारणा २०१२ला पुन्हा होईल परंतु खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरी सोडावी लागेल. Bed Rest compulsory आहे. डॉक्टरांनी दिलेले पथ्य -औषधे काटेकोरपणे सांभाळावे लागतील. त्याच बरोबर मी तुला काही स्तोत्र आणि जप देते ते regular करत रहा. आणि माझ्याही contact मध्ये रहा." ती खूप खुश झाली. "हो नक्की हे सगळे मी व्यवस्थित लक्षात ठेवेन. कळवते तुम्हाला."

 त्यानंतर  ऑगस्टमध्ये तिचा फोन आला. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करतेय. आणि मला  शंका आहे कि मी गरोदर आहे. माझी डॉक्टर दोन दिवसांनी येणार आहे बाहेरगावहून. तपासणीनंतर बातमी confirm  होईल."  सोनालीचा आनंद ओसंडून वाहत होता पण मला खूप tension आलं. तिला म्हटले," Congrats. पण काळजी घे. जे जे सांगितले आहे ते सोडून देऊ नकोस. स्तोत्र वाचत रहा. आणि जमल्यास नोकरीत रजा घेतलीस तर बरे होईल. आणि मला कळवत रहा." "हो हो नक्की" असे म्हणून सोनालीने फोन ठेवला. 

सप्टेंबरच्या गौरी- गणेश उत्सवात एक दिवस मला सोनालीचा फोन आला. फोनवर बोलण्यापेक्षा सोनालीचे नुसते हुंदकेच ऐकू येत होते. मी समजले. तिला म्हटले, "सोनाली शांत हो. आणि …… "  मी काही म्हणण्याआधी सोनालीचे,"पण असे कसे झाले…. मी कोणाचे काय बिघडवले आहे ? माझ्याबरोबर असे का होतंय  ????". तिला काय समजवणार. 

काही Cases मनाला खूप चटका लावून जातात. पुढच्या आमच्या भेटीत मी सोनालीला ज्योतिष-शास्त्र काय सांगते हे नीट समजावून सांगितले. ती बरीच शांत दिसत होती. "मग असेच होणार असेल तर मग मी मुलं  दत्तक घेतले तर ?"  हा तिचा आशावादी स्वभाव मला खूप आवडला. जे नाहीच मिळणार त्यावर रडत राहण्यापेक्षा तिने नवीन मार्ग स्वीकारला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

वाचकांसाठी काही सूचना

वाचकांसाठी काही सूचना 


 सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात ? दिवाळीची खरेदी सुरु केली कि नाही ??  सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारया वर्षात तुम्हा सर्वाना समृद्धी,बुद्धी आणि भरपूर धन-संपत्ती मिळो ही सदिच्छा.

 सध्या ब्लॉगच्या  वाचकांची संख्या जशी वाढतेय त्याच पटीने मला रोज ई-पत्रातून मला सतत विचारणा होत होती की मैडम तुम्ही article कधी लिहिणार ??? ब्लॉग अत्यंत वाचनीय आहे तुम्ही लिहित रहा वगैरे. काही वाचकांनी मला articles च्या संदर्भात suggestionsही दिले आहेत त्याचा मी जरूर विचार करेन. 

बरे आता मुद्याकडे वळूया. सध्या मला बरयाच ई -पत्राद्वारे "Consultation" साठी सतत विचारणा होत आहे. आणि मघाशी मी म्हटल्याप्रमाणे वाचकांची संख्या वाढते आहे आणि वाचक फक्त मुंबई तलेच नसून मुंबई बाहेरही जसे पुणे,नागपूर, नाशिक,कोल्हापूर,बंगळूरू,दिल्ली,राजस्थान,केरळ कर्नाटक,हैदराबाद आणि भारताबाहेरून ऑस्ट्रेलिया,अमेरिका, इंग्लंड,जर्मनी,आफ्रिका,दुबई,रशिया, फिलिपिन्स इ. देशातूनही आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि त्याचे प्रश्न वेगळे. प्रत्येकालाच समस्या आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यची सर्वांचीच धडपड सुरु आहे. काहीना लग्न जमत नाही म्हणून tension आहे तर काहीना लग्नानंतरच्या घरी होणारया वादविवादांमुळे Tension. काही वाचकांना पैसे हातात टिकत नाही ही समस्या तर काहींना आलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे ही समस्या. काही जोडपी बाळ होत नाही म्हणून चिंताग्रस्त आहेत तर काही आपले बाळ खूप हट्टी आणि मस्तीखोर आहे म्हणून चिंताग्रस्त. 

समस्या आहेत तसे त्याचे समाधानही आहे. बरयाच वाचकांनी ह्याच संदर्भात मला विचारणा केली आहे की आम्हालाही तुमच्याकडून ज्योतिषीय मार्गदर्शन हवे आहे परंतु तुम्ही मुंबईत आणि आम्ही इथे लांब ?? किंवा काही वाचक मुंबईत आहेत परंतु सध्या ऑफिसमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी मिळतेच असे नाही आणि सुट्टी असली तरी त्या दिवशी नेमके घरी पाहुणे यायचे असतात किंवा काहीतरी प्रोग्राम असतोच मग प्रत्यक्षात येऊन कुंडलीबद्दल discussions होऊ शकत नाही तर ह्याला Option काय ? तर आज त्याबद्दलची माहिती देत आहे,


 ज्यांना वेळेअभावी वा दुसरया कुठल्याही कारणामुळे मला प्रत्यक्ष भेटून  ज्योतिषीय मार्गदर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी फोनवरून अथवा facebook chat  इथून ज्योतिषीय मार्गदर्शन मिळू शकेल. 

 ह्या संदर्भातील काही गोष्टी मला इथे नमूद करीत आहे : 

१) फोनवरून मार्गदर्शन हवे असल्यास माझ्या खाली नमूद केलेल्या  इ-पत्त्यांवर मला आपली माहिती पाठवणे. 

२)माझा ई-पत्ता ( E-Mail IDs ) - vaastupriya@gmail.com किंवा anupriyadesai@gmail.com 
3) आपली कुंडली बनवण्यासाठी मला पुढील माहितीची गरज आहे - 
        अ) आपली जन्मतारीख 
        ब) अचूक जन्मवेळ 
        क) जन्म झाले ते ठिकाण 
जन्मवेळेबाबत बरयाचजणांचा नेहेमी होणारा गोंधळ म्हणजे जन्मतारीख आणि जन्मठिकाण सांगता येते परंतु जन्मवेळ लक्षात नसते त्यामुळे मग काहीजण सकाळी ७ आणि ८ च्या दरम्यान किंवा सकाळी ८ कि संध्याकाळी ८ हे लक्षात नाही असही सांगतात. तुमच्याकडे असलेल्या तुमच्या कुंडलीच्या पहिल्याच पानावर जन्मवेळ लिहिलेली असते परंतु त्यातही स्थानिक जन्मवेळ आणिस्टैन्डर्ड जन्मवेळ असे नमूद केलेले असते. कुंडली बनवण्यासाठी स्टैन्डर्ड जन्मवेळच विचारात घ्यावी लागते. त्यामुळे तीच जन्मवेळ तुमच्या माहितीत नमूद करणे. 
अचूक जन्मवेळ मिळाली तर कुंडली तर Perfect बनवता येते आणि भविष्यही अचूक सांगता येते त्यामुळे जन्मवेळ अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. 
[ कृपया मला तुमच्याकडे असलेल्या कुंडलेची Scan Copy पाठवू नका. बरेच वाचक मला Scan Copy पाठवतात. सध्या Technology च्या दरदिवशीच्या होणारया प्रगतीमुळे Computer वर काही सेकंदातच कुंडली बनवता येते.] 
४) आपल्याला काय समस्या आहेत त्याची थोडक्यात माहिती देणे. 
५) आपल्याला फोनवरून मार्गदर्शन हवे आहे/ई-मेल द्वारे/फेसबुक chat वरून हे स्पष्ट करणे. 
६) Technology ने प्रगती केल्यामुळे कुंडली जरी काही सेकंदात बनवता आली तरी अचूक भविष्य वर्तवणे हे ज्योतिषावर अवलंबून आहे. प्रत्येक कुंडलीचा सखोल अभ्यास करून भविष्यात तुमच्या आयुष्यात घडणारया घटना जसे नोकरीत Promotion,नोकरीत होणारी मानहानी,Propertyत गुंतवलेले पैसे बुडणार तर नाहीत ना?? संतती कधी होणार ?  भाग्योदय कधी होणार ? ह्या गोष्टी वर्तवण्यास ज्योतिषाच्या बुद्धीची कसोटी लागतेच आणि त्यासाठी अमुल्य वेळ द्यावा लागतो त्यामुळे ही "Professional Service" FREE  नाही.   (Fees प्रत्येक case प्रमाणे वेगळी आकारण्यात येईल)
७) प्रत्येक कुंडलीच्या विवेचानासाठी अर्धा तास देण्यात येईल. त्यामुळी शक्यतो तुमचे प्रश्न एका कागदावर लिहून तयार ठेवावेत म्हणजे फोनवर बोलताना तेवढा वेळ वाचेल. 
८) Appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. appointmentचा जो दिवस ठरलेला असेल त्याच्या दोन दिवस आधी Professional Fees, Bank Account मध्ये transfer करावी. बँक details तुमच्या ई-पत्त्यावर पाठवण्यात येतील.  
९) ज्यांना प्रत्यक्ष येऊन भेटणे शक्य आहे त्यांनीही वरील माहिती मला माझ्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. त्यांना appointment चा दिवस आणि वेळ ठरवून देण्यात येईल. 

आता निरोप घ्यायची वेळ झालीये. मधल्या काळात Consultations मध्ये busy असल्यामुळे लेख लिहिता आला नाही. ह्या अनेक cases पैकी बरयाच कुंडल्या मला वेगळ्या आढळल्या. पुढच्या वेळेस एक अत्यंत Interesting अशी Case घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD