शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

अनुभवाचे बोल

अनुभवाचे बोल 


गेल्या महिन्यात चैतालीचे आलेले हे पत्र. ती माझ्याकडे आली होती तेंव्हा लग्न होऊन चार वर्ष झाली होती परंतु बाळाची चाहूल नव्हती. तेंव्हा कुंडलीत काय योग आहेत हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. त्यांनतर तिला ज्योतिष- शास्त्राचा अनुभव कसा वाटला ह्याबद्दल तिने लिहिले आहे.  श्री स्वामी समर्थ 

माझ्या लग्नाला चार वर्षे झाली होती परंतु मला अपत्य होत नव्हते. मी बरेच उपाय केले, बरयाच जाणकार ज्योतिषांना विचारले पण सगळ्यांनी सांगितले की बाळ होईल पण कधी होईल ह्याबद्दल नक्की कोणीच सांगत नव्हते. ऑफिसमधल्या एका colleague बरोबर चर्चा करत असतना त्यांनी मला सांगितले कि अनुप्रिया देसाई म्हणून एक ज्योतिषी आहेत त्या तुम्हाला ह्याबाबतीत मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे मी त्यांची appointment घेतली.  


आमची ही पहिलीच भेट. परंतु त्यांनी माझ्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही गोष्टींबद्दल अचूक सांगितले. माझ्या लग्नात बरीच विघ्ने आली होती त्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. 

त्यांनी आमच्या दोघांचीही कुंडली संततीच्या संदर्भात अभ्यासली.
 त्यांनी मला सांगितले की तुमच्या दोघांच्याही कुंडलीत २०१२ च्या ऑगस्टनंतर संततीप्राप्तीचे योग आहेत परंतु काही complications आहेत त्यामुळे Pregnancy राहिल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी मला त्यासंदर्भात काही स्तोत्रे आणि मंत्र सांगितले. त्यात स्वामींचा तारक मंत्राचाही समावेश होता. बाकी उपायांबरोबरच तारकमंत्रचा ११ वेळा जप मी करत होते. 

दिलेले उपाय तर करतच होते आणि मला फेब्रुवारीच्या २०१२च्या शेवटच्या महिन्यात मला प्रचीती आली. मला गोड बातमी मिळाली. अनुप्रियाला सांगितल्यानंतर त्यांनी उपाय सुरु ठेवायला सांगितले आणि काळजी घ्यायला सांगितली. दिलेल्या स्तोत्रांचे वाचन चालू होते. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी Regular Check-up साठी गेले असता डॉक्टरांनी मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये Admit होण्यास सांगितले. काही Complications आहेत असे सांगण्यात आले. १४ ते १५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. अक्षरशः कंटाळले होते. हॉस्पिटलच्या वातावरणाचा उबग आला होता. अनुप्रियाच्या सतत Contact मध्ये होतेच. डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगितल्यावर खूप निराश झाले होते. अनुप्रियाला विचारल्यावर तिने मला समजावले की Complications तर आहेत त्यामुळे उगीच risk घेण्यापेक्षा C- Section चा  मार्ग बरा. आणि १६ ऑक्टोबर २०१२ला आम्हांला मुलगी झाली.  

आमचा त्यांच्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला आहे.  मला महत्वाचा निर्णय घ्याचा असेल तर त्यांना जरूर विचारते. आज त्या माझ्या friend आणि Guide दोन्ही आहेत. त्यांचे खूप खूप आभार. 


चैताली जोशी 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD