बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

गर्भधारणा झाली पण …….

गर्भधारणा झाली पण …….आई होणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. काहीं जोडप्यांना ते खूप सहज आहे तर काही जोडप्यांना ह्यासाठी संघर्ष आहे. बरीच जोडपी माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की  लग्न होऊन बरीच वर्ष झाली पण बाळ होत नाहीये, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सगळे झालेत पण यश नाही. पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांना गर्भधारणा झाली पण गर्भपात झाला. दोन्ही Cases मध्ये फरक हा आहे कि पहिल्या case मध्ये Conceive होत नाहीये आणि दुसरया Case मध्ये गर्भाची पूर्ण वाढ होण्याआधीच गर्भपात होतोय. आज मी ह्याच संदर्भातील सोनालीची Case तुम्हाला सांगणार आहे.

सोनाली माझ्याकडे २०११च्या मे महिन्यात आली होती. तेंव्हा लग्न होऊन ४ वर्ष झाली होती. त्यामुळे सगळीकडून बाळाबद्दल विचारणा होत होती. बारसे,डोहाळजेवण,लग्न कुठेही सोनाली गेली कि सगळे नातलग तोच प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. सोनालीने कुठल्याही कार्यक्रमाला जायचे सोडून दिले. कुंभ लग्न आणि मेष राशीची कुंडली. कुंभ लग्नाप्रमाणेच सावळी,शांत अशी सोनाली. पारंपारिक आणि कृष्णमुर्ती ह्या दोन्ही पद्धतीने कुंडलीचे केलेले विवेचन खालीलप्रमाणे : 

पारंपारिक : 
 •  कुंभ लग्न त्यामुळे पंचमेश आहे बुध. बुध स्वतः मेष राशीत आणि शुक्राच्या नक्षत्रात. 
 • शुक्र चतुर्थात. चतुर्थ हे पंचमाचे व्यय स्थान म्हणजे पंचमेश बिघडलेला आहे. 
 • संततीसाठी पारंपारिक ज्योतिष-शास्त्रात गुरु ह्या ग्रहाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. इथे गुरु आहे लाभत आणि त्याची संपूर्ण दृष्टी जरी पंचमावर असली तरी गुरु वक्री असून शुक्राच्याच नक्षत्रात आहे. 
 • सोनाली मला भेटण्यास आली तेंव्हा तिला रवि महादशा आणि बुध अंतर्दशा सुरु होती. बुध पंचमेश आहे आणि रवि चतुर्थात. ह्याचा अर्थ सोनालीला "Pregnancy" राहिली असणार परंतु गर्भ जास्त वेळ राहिला नसणार. सोनालीला तसे विचारल्यानंतर सोनालीने सांगितले ते असे," हो लग्नानंतर मला दोन वेळेस दिवस गेले होते परंतु २-३ महिन्यातच माझा गर्भपात झाला. डॉक्टरांनाही कारण समजले नाही. आता तर डॉक्टरांकडे जायची भीतीच वाटते. माझ्या एका मैत्रिणीला तुमच्यावर खूप विश्वास आहे. तिनेच तुम्हाला कुंडली दाखवण्यास सांगीतली. आता जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी."
 • पंचम स्थानाबरोबरच द्वितीय आणि लाभ ह्या स्थानांचाही संततीप्राप्तीसाठी विचार होतो. ह्या कुंडलीत द्वितीय स्थानात गुरुची मीन राशी आहे. आणि लाभ स्थानात गुरु स्वतः आहे. मग तर संतती होणारच असे जरी वरवर वाटत असले तरी कुंडलीला पुढे येणाऱ्या दशा-अंतर्दशांचाही विचार व्हावा. येणाऱ्या दशा चतुर्थ स्थानाचीच फळे देत आहेत.   
कृष्णमुर्ती (के.पी.) पद्धतीने : 
 • पंचम स्थानाचा सब लॉर्ड आहे रवि. आणि तो पुढीलप्रमाणे कार्यरत आहे :                                                                               
 •   रवि    ४   ७                                                                                                                                   
 •   न. स्वा. चंद्र  २  ६                                                                                                                          
 •  सब लॉर्ड राहू  ४  ४  ९                                                                                                                     म्हणजे कुठेही पंचम स्थानाचा लवलेश नाही. चंद्र जरी द्वितीय स्थानाचा कार्येश होत असला तरी तो बलवान कार्येश ग्रह नाही. 
 • तीच गात द्वितीय आणि लाभ स्थानाच्या सब लॉर्डची आहे. कुठेही पंचम,द्वितीय आणि लाभ स्थानाचे बलवान कार्येश कोणतेही ग्रह नाहीत. 
 • येणारया दशा- अंतर्दशा,सब period कुठेही संतती होण्यासाठी मदत करत नाहीये. 

सोनाली अगदी आशेने माझ्याकडे पाहत होती. खोटे सांगावे तर व्यक्तीच्या आशा/अपेक्षा वाढतात आणि खरे सांगावे तर ते कसे ? शेवटी तिला म्हणाले,"तुझ्या कुंडलीत मला संततीबाबत जे चित्र दिसतंय ते असं आहे की तुला गर्भधारणा २०१२ला पुन्हा होईल परंतु खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरी सोडावी लागेल. Bed Rest compulsory आहे. डॉक्टरांनी दिलेले पथ्य -औषधे काटेकोरपणे सांभाळावे लागतील. त्याच बरोबर मी तुला काही स्तोत्र आणि जप देते ते regular करत रहा. आणि माझ्याही contact मध्ये रहा." ती खूप खुश झाली. "हो नक्की हे सगळे मी व्यवस्थित लक्षात ठेवेन. कळवते तुम्हाला."

 त्यानंतर  ऑगस्टमध्ये तिचा फोन आला. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करतेय. आणि मला  शंका आहे कि मी गरोदर आहे. माझी डॉक्टर दोन दिवसांनी येणार आहे बाहेरगावहून. तपासणीनंतर बातमी confirm  होईल."  सोनालीचा आनंद ओसंडून वाहत होता पण मला खूप tension आलं. तिला म्हटले," Congrats. पण काळजी घे. जे जे सांगितले आहे ते सोडून देऊ नकोस. स्तोत्र वाचत रहा. आणि जमल्यास नोकरीत रजा घेतलीस तर बरे होईल. आणि मला कळवत रहा." "हो हो नक्की" असे म्हणून सोनालीने फोन ठेवला. 

सप्टेंबरच्या गौरी- गणेश उत्सवात एक दिवस मला सोनालीचा फोन आला. फोनवर बोलण्यापेक्षा सोनालीचे नुसते हुंदकेच ऐकू येत होते. मी समजले. तिला म्हटले, "सोनाली शांत हो. आणि …… "  मी काही म्हणण्याआधी सोनालीचे,"पण असे कसे झाले…. मी कोणाचे काय बिघडवले आहे ? माझ्याबरोबर असे का होतंय  ????". तिला काय समजवणार. 

काही Cases मनाला खूप चटका लावून जातात. पुढच्या आमच्या भेटीत मी सोनालीला ज्योतिष-शास्त्र काय सांगते हे नीट समजावून सांगितले. ती बरीच शांत दिसत होती. "मग असेच होणार असेल तर मग मी मुलं  दत्तक घेतले तर ?"  हा तिचा आशावादी स्वभाव मला खूप आवडला. जे नाहीच मिळणार त्यावर रडत राहण्यापेक्षा तिने नवीन मार्ग स्वीकारला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD