शुक्रवार, ७ ऑगस्ट, २००९

अंकशास्त्र भाग २ Numerology

अंकशास्त्र भाग २ Numerology अंक ४ :"हर्षल" ह्या ग्रहाने पूर्णपणे काबूत ठेवलेला अंक म्हणजे "४". सर्वात हुशार आणि सर्वात विक्षीप्त......नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडतात...ह्याना संशोधन करायला आवडते. मी तर म्हणेन आजकाल जेवढे शोध लागत आहेत त्यात हर्षल किंबहुना ह्या अंकाखाली वावरणारया सर्व व्यक्तींचा हातभार आहे....नेहेमीच प्रगतीशील रहाणारया व्यक्ति तुम्ही आहात. पण कधी कधी लोकाना तुमचे वागणे विचित्र वाटू शकते. तुम्हाला रूढी......परंपरा पाळणे कठिण जाते. तुमच्या बाबतीत काही गोष्टी अचानक घडतात.....
प्रसिद्द व्यक्ती : किशोरकुमार (४ ऑगस्ट) जमनालाल बजाज ( ४ नोव्हेंबर)
अंक ५ :"बुध" ग्रहाच्या अमलाखाली येणारा अंक "५". पक्के व्यवहारी...चांगली विनोदबुध्ही, भरपूर बोलणे....कुठलीही गोष्ट पटवून देण्यात हुशार,कोणासाठीही झोकुन काम करण्यापेक्षा उपयुक्त काम करणे तुम्हाला जास्त आवडते. एखादी गोष्ट तुम्ही खुप छान फुलवून सांगू शकता. बोलणे खुप आहे पण सातत्य नाही.. ...म्हणुन जितकी प्रगती व्ह्याला हवी तितकी होत नाही. सतत काहीतरी शिकणे आणि शिकवणे तुम्हाला आवडते.

प्रसिद्ध व्यक्ती : नील आर्मस्ट्रोंग ( ५ ऑगस्ट ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ( ५ सप्टेबर )
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD