मंगळवार, ८ जुलै, २०१४

स्वयंपाकघर कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३

 स्वयंपाकघर  कसे असावे ? My Kitchen as per Vaastu Shastra - भाग ३ 

नमस्कार,

वास्तू-टिप्स संदर्भात लिहिलेल्या मागील दोन्ही लेखांनंतर वाचकांची भरपूर ई- पत्र आली. काहींनी वास्तूवर लेख लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत,काहींनी वास्तू परिक्षणासाठी बोलावले आहे,काहींनी त्यांच्या राहत्या  वास्तुसंदार्भात प्रश्न विचारले आहेत. पुन्हा एकदा ह्या लेखाच्या निमित्ताने मी इथे नमूद करते कि ह्या सर्व टिप्स ह्या घर घेतांनाच उपयोगी पडतील. ज्यांची वास्तू शास्त्राप्रमाणे नाही त्यांच्यावर फार मोठ संकट कोसळणार असे अजिबात नाही. जर काही Major Defects असतील तर मात्र वास्तू संदर्भात उपाय योजना करावी. म्हणजेच समजा तुमचे स्वयंपाक घर ईशान्येला असणे,Toilets उत्तर दिशेत असणे ह्यासाठी मूळ बांधकामाला धक्का न देता (तोडफोड न करता) उपाय शास्त्रात आहेत. तेंव्हा फार घाबरून जाऊ नका.  
[सूचना - हा ब्लॉगच्या इतर भाषिक वाचकांनी मला हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करण्याची सूचना दिली आहे. परंतु वेळेअभावी ते सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे ब्लॉगच्या वरती TRANSLATE म्हणून एक  बटण आहे.  त्याचा वापर करावा.  ] 

तर आज वळूया स्वयंपाक घराकडे. स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाचा घटक. भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घर छोटे असले अगदी झोपडे असले तरी खोपट्यात चूल ही मांडलेलीच असते. भारतीय संस्कृती आणि वास्तू शात्राप्रमाणे बाहेरील प्रज्वलीत अग्नि आणि पोटातील अग्नि ह्याचा संबंध आहे. पोटातील अग्नीचे प्रमाण हे समतोल असावे. म्हणजेच अग्नि योग्य प्रमाणात असेल तर अन्न व्यवस्थित पचते आणि शरीरात वायू धरत नाही. आणि जर अग्निचा समतोल बिघडून त्याचे प्रमाण वाढले तर पूर्ण शरीरास हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वास्तूत ही आग्न्येय दिशेत स्वयंपाक घर असेल तर उत्तम आरोग्य लाभते.  


१) ओटा कुठे असावा - ओटा पूर्व दिशेला आणि दक्षिणेला असावा. ( L - Shape ) शेगडी कुठे असावी - शेगडी ही आग्न्येय दिशेत असावी परंतु गृहिणीचे मुख स्वयंपाक करतांना पूर्व दिशेत येईल अशी व्यवस्था असावी. 
२)खिडकी कुठे असावी - स्वयंपाक घरात खिडकीची रचना पूर्व दिशेत असेल तर उत्तम. 
३) सिंक कुठे असावे - सिंकची रचना ईशान्य दिशेत असावी. 
४) पाण्याचा माठ किंवा पाणी साठवण्याची जागा - पाण्याचा माठ ईशान्य दिशेत उत्तम. पाण्याचा साठा ईशान्य आणि उत्तर दिशेत असावा. 
५) फ्रीज - फ्रीज नैऋत्य दिशेत असावा. नैऋत्य दिशेत नसेल तर किमान दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावा. 
६) Microwave/Mixer - ह्या सारखी तत्सम बाकी उपकरणे पूर्व -दक्षिण भागात ठेवावीत. 
७) धान्य साठा -  साठवणीची धान्य जसे, गहू,तांदूळ वगैरे ह्यांची साठवण दक्षिण ओट्या खाली असावी. 
८) रंग - स्वयंपाक घरात फरशीचा रंग हा फिक्कट असावा. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातील छटा चालतील. भिंतींचा रंग फिक्कट हिरवा,भगवा पिवळा ह्यांच्या छटेत असावा. फार गडद लाल,भगवा शक्यतो असून नये. 

सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात स्वच्छता असावी. रात्री उष्टी भांडी ठेवू नयेत. मुंबईत Working Women चा इलाज नसतो कारण कामवाली बाई येतेच सकाळी. त्यामुळे उष्टी भांडी रात्री ठेवावी लागली तरी शक्यतो विसळून तरी ठेवावीत. 

जेवढी महत्वाची माहिती देत येईल तेवढी इथे नमूद केली आहे. वाचकांना ह्याचा जरूर फायदा होईल अशी अपेक्षा. 

प्रतिक्रियांची वाट पाहतेय. ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD