गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

गुरु चंद्र युती

गुरु चंद्र युती 

आज पहाटे ५.०० वाजता आकाशात गुरु आणि चंद्राची युती पाहिली. अत्यंत मनमोहक दृष्य होते. ह्यावेळी गुरु कन्या राशीत २१ अंशावर हस्त नक्षत्रात आणि चंद्र कन्या राशीत २० अंशावर हस्त नक्षत्रात होता. ही युती आज दुपारी १२.०५ वाजेपर्यंत असेल आणि नंतर मात्र चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. 

चंद्र आणि गुरुची युती ही शुभ मानली गेली आहे. जर ही युती कर्क राशीत होत असेल तर त्याला गजकेसरी योग म्हणून संबोधले जाते. ही युती ज्याच्या कुंडलीत असते ती व्यक्ती भाग्यवान समजली जाते. (माझ्या पाहण्यात अजूनही गजकेसरी योगाच्या कुंडलीला जीवन संघर्ष नाही असे नाही. किंबहुना त्यांनाही सामान्य व्यक्ती एवढाच जीवन संघर्ष करावा लागलेला आहे. ) परंतु आजची युती ही कन्या राशीत हस्त नक्षत्रात झालेली आहे. मी माझ्या मोबाईलच्या कॅमेराने टिपलेली ही युती इथे प्रसिद्ध करतेय - 
चंद्र आणि त्याच्या बाजूला जो ठिपका दिसतोय तो आहे गुरु ग्रह. खगोलशास्त्रीय दृष्ट्या जे आकाशमंडळात दिसले ते मी इथे मांडले आहे. ह्याचा कन्या राशीवर काय परिणाम होईल ? ह्याची फळे काय ? हे सांगण्याचा अजिबात उद्धेश नाही. 
टिपणी - उद्या पहाटे ही युती दिसणार नाही कारण चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD